BOSS-Linux/C2/Working-with-Linux-Process/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:23, 8 January 2015 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Working with Linux process

Author: Manali Ranade

Keywords: Linux


Visual Clue
Narration
0:00 Working with Linux process वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
0:05 आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वापरणार आहोत.
0:09 लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशी सुरू करायची व कमांड्स विषयी तुम्हाला प्राथमिक माहिती आहे असे आपण मानू या.
0:16 जर आपल्याला यासंबंधी माहिती हवी असेल तर http://Spoken-Tutorial.org येथील उपलब्ध ट्युटोरियलमध्ये पाहू शकता.
0:28 कमांडस् या Lowercase मध्ये असतात. तसेच त्या Case Sensitive देखील असतात.
0:38 प्रोसेस म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ या.
0:42 लिनक्समध्ये चालणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच प्रोसेस.
0:46 कमांडस स्विकारत असलेली चालू शेल देखील एक प्रोसेस आहे.
0:51 टाइप केलेल्या कमांड्सही कार्यान्वित होताना प्रोसेसच असतात.
0:56 या ट्युटोरियलमध्ये आपण बघत असलेला व्हिडिओ देखील एक प्रोसेस आहे.
1:00 Spoken Tutorial ची वेबसाईट व चालू ब्राउजरही एक प्रोसेसच आहे.
1:05 चालू शेल स्क्रिप्टस् सुध्दा प्रोसेसच आहे.
1:11 एखादा कार्यान्वित केलेला प्रोग्रॅम अशी आपण प्रोसेसची व्याख्या करू शकतो.
1:17 प्रोसेसेस ह्या आपल्यासारख्याच असतात. त्यांचा जन्म व अंतही होतो. त्यांना पालक व मुले असू शकतात.
1:28 प्रथम आपण shell process बदल जाणून घेऊ.
1:31 login केल्याबरोबर लिनक्स kernel द्वारे शेल प्रोसेस सुरू होते.
1:36 आता इतके सांगणे पुरेसे आहे की लिनक्स kernel हा लिनक्स Operating System चा गाभा आहे.
1:43 लिनक्स Operating System चालवणारे अत्यावश्यक घटक kernel मधे असतात. User commands द्वारे निर्माण होणा-या सर्व प्रोसेसना शेल जन्म देते.
1:53 आता आपण टर्मिनल उघडू या.
1:57 आपल्याला टर्मिनलवर डॉलरच्या चिन्हाच्या रूपात command prompt दिसेल.
2:03 हे शेल प्रोसेसचे काम आहे.
2:07 आता कोणतीही कमांड जसे की date टाईप करून Enter दाबा.
2:13 असे केल्यावर shell process, date नामक प्रोसेस तयार करेल.
2:18 शेल प्रोसेस डेट प्रोसेसला जन्म देत असल्याने शेल प्रोसेस ही डेट प्रोसेसची पालक म्हणजे parent ठरते तर डेट प्रोसेस ही शेल प्रोसेसची child म्हणजे बालक ठरते.
2:30 एकदा date प्रोसेसने सिस्टीमची तारीख व वेळ दर्शविली की ती नष्ट होते.
2:40 एक शेल दुसरी शेल प्रोसेस तयार करू शकते. नवीन प्रोसेस तयार करण्याच्या या प्रकाराला spawning of process म्हणतात.
2:50 दुसरी शेल प्रोसेस तयार करण्यासाठी टर्मिनलवर जाऊन केवळ shटाईप करून एंटर दाबा.
3:00 आपल्याला टर्मिनलवर नवीन prompt दिसेल. आता आपल्या shell 1 म्हणजेच original शेलने नवी shell तयार केली आहे. तिला आपण shell 2 संबोधू या.
3:13 आता आपण नव्या command prompt वर कमांड कार्यान्वित करू शकतो. या नव्या command prompt वर ls ही कमांड कार्यान्वित करा.
3:20 आता command prompt वर ls टाईप करा आणि एंटर दाबा. आपल्याला फाईल्स आणि डिरेक्टरीजची सूची दिसेल.
3:32 आता ls नामक नवीन प्रोसेस तयार झाली आहे.
3:35 इथे Shell2 ही ls ची parentआहे तर shell1 ही ls ची grandparent आहे. तसेच lsही shell2 ची child व shell2 ही shell1 ची childआहे.
3:56 Shell2 नष्ट करण्यासाठी नवीन promptवर exit टाईप करा आणि एंटर दाबा.
4:04 अशा प्रकारे Shell2 नष्ट होईल आणि आपण आपल्या ओरिजनल promptवर परत येऊ.
4:12 प्रोसेसेस व आपल्यातील साम्य पुढेही दाखवता येईल. आपल्याला जसे आपले नाव, पालकांचे नाव, PAN क्रमांक, जन्मतारीख अशी व्यक्तिगत माहिती असते,
4:26 त्याचप्रमाणे प्रोसेसेसचे सुध्दा गुणधर्म असतात जसे की PID म्हणजे (process ID) PPID म्हणजे (parent process ID), start time इत्यादी.
4:38 बहुतांश गुणधर्म कर्नेल द्वारे प्रोसेस टेबलमध्ये राखले जातात.
4:43 प्रत्येक प्रोसेस PID नावाच्या एका पूर्णांकाने ओळखली जाते. हा अंक कर्नेल द्वारे दिला जातो.
4:51 Parent प्रोसेसचा PID हा त्या प्रोसेसने spawn केलेल्या P1 प्रोसेसचा PPID असतो.
5:00 चालू शेलचा PID बघण्यासाठी command prompt वरecho space आणि dollar dollar असे टाईप करून एंटर दाबा.
5:11 एक संख्या दिसेल तो आपल्या चालू shell चा PID आहे.
5:23 प्रोसेस बद्दल बोलताना आपण ज्या कमांडचा सर्वात जास्त वापर करतो ती म्हणजे psकमांड
5:29 ps म्हणजेच प्रोसेस स्टेटस कमांड चालू प्रोसेसेस दर्शविते.
5:34 ही कमांड कुठल्याही पर्यायाशिवाय कार्यान्वित केली तर काय होते ते पाहू.
5:40 आता command prompt वर ps टाईप करून एंटर दाबा.
5:47 युझर प्रोग्रॅम चालू असताना त्याच्या मालकीच्या प्रोसेसेसची यादी आपल्याला ह्याप्रकारे पाहता येते.
5:54 आपण CMD या शीर्षकाखाली प्रोसेसचे नाव बघू शकता.
5:58 याशिवाय आपल्याला PID तसेच TTY किंवा console, ज्यावर ही प्रोसेस चालू आहे ते बघता येते.
6:06 TIME खाली प्रोसेसने संगणकाच्या प्रोसेसरचा घेतलेला एकूण वेळही दिसतो.
6:12 माझ्या मशिनवर या दोन प्रोसेसेस दिसत आहेत.
6:16 पहिली bash,म्हणजे आपण वापरत असलेली shell प्रोसेस आणि दुसरी म्हणजे स्वतः ps प्रोसेस आहे.
6:25 दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की shell प्रोसेसचा PID आणि echo space dollar dollar या कमांडने दिलेला PID सारखाच आहे.
6:35 नवी shell किंवा subshell बनवल्याने काय होते ते बघण्यास टर्मिनलवर sh कमांड द्या.
6:42 आता नवीन ओळीवर नवा prompt येईल. तेथे ps टाईप करून एंटर दाबा.
6:51 आता आपल्याला तीन प्रोसेसेसची सूची दिसेल. त्या सूचीत sh ही प्रोसेस समाविष्ट झाली आहे.
6:57 येथे पुन्हा लक्षात घ्या की bash प्रोसेसचा PID वरील प्रमाणे तोच राहिला आहे.
7:05 ps ह्या कमांडसोबत अनेक पर्यायही आहेत. पहिला पर्याय सूचीतील प्रोसेसेसचे गुणधर्म दर्शवतो.
7:13 आता prompt वर ps space minus fटाईप करून एंटर दाबा. हे आपल्याला वरीलप्रमाणे प्रोसेसेसची सूची दर्शवेल.
7:28 bash, sh आणि ps minus f
7:31 फरक एवढाच आहे की आता सूचीत अधिक गुणधर्म दिसत आहेत.
7:36 युजरचे नाव UID खाली मिळते. प्रोसेसचा PPID म्हणजेच पेरेंट प्रोसेसचा PID ही दर्शवला जातो.
7:45 उदाहरणार्थ bash प्रोसेस ही sh प्रोसेसची पेरेंट प्रोसेस आहे. त्यामुळे bash प्रोसेसची PID आणि sh प्रोसेसची PPID सारखीच आहे.
8:00 त्याचप्रमाणे जसे sh प्रोसेस ही ps प्रोसेसची पेरेंट प्रोसेस असल्यामुळे sh प्रोसेसची PID आणि ps minus f या प्रोसेसची PPID सारखी आहे.
8:17 C हा नंबर प्रोसेसचे युटिलायझेशन म्हणजेच प्रोसेसने प्रोसेसरचा वापरलेला वेळ पूर्णांक टक्क्यांत सांगतो.
8:26 वापर अत्यंत कमी असल्यामुळे आपल्याला इथे शून्य दर्शवत आहे.
8:32 Stream फिल्ड आपल्याला प्रोसेस केव्हा सुरू झाली ते दर्शवते. ps कमांड समजून घेताना आपण इतर फिल्डबद्दल जाणून घेतले होते.
8:42 प्रोसेसेस दोन प्रकारच्या असतात. पहिली म्हणजे userप्रोसेस. या प्रोसेसेस userकडून सुरू केल्या जातात.
8:49 उदाहरणार्थ ps कमांड किंवा टर्मिनलवर बहुतांशी कार्यान्वित केलेल्या कमांड.
8:54 आणि दुसरी प्रोसेस म्हणजे सिस्टीम प्रोसेस. या प्रोसेसेस सिस्टीम सुरू करताना किंवा user login करताना सिस्टीम द्वारे सुरू केल्या जातात.
9:05 bash हे सिस्टीम प्रोसेसचे एक उदाहरण होऊ शकते.
9:09 कधी कधी आपल्याला सर्व म्हणजेच दोन्ही, सिस्टीम आणि युजर प्रोसेस बघायच्या असतात.
9:17 तेव्हा आपण minus e किंवा minus capital A या पर्यायांचा उपयोग करतो.
9:23 आता टर्मिनलवर जा आणि command prompt वरps space minus e टाईप करून एंटर दाबा.
9:32 आपल्याला प्रोसेसची मोठी सूची दिसेल.
9:35 मल्टिपेज डिस्प्ले मिळवण्यासाठी command prompt वर टाईप करा.
9:40 ps space minus e space vertical bar space more आणि एंटर दाबा.
9:52 more पर्यायामुळे एका वेळी स्क्रीनवर मावतील एवढ्याच प्रोसेस दाखवल्या जातात.
9:58 एंटर या बटणाच्या सहाय्याने आपण प्रोसेसेसची सूची स्क्रॉल करू शकतो.
10:03 या सूचीतील पहिली प्रोसेस ही आपली उत्सुकता वाढविणारी आहे तिला init प्रोसेस म्हणतात.
10:09 या प्रोसेसपासून बहुतांशी इतर सर्व प्रोसेस तयार होतात.
10:12 ह्या प्रोसेसचा PID एक असतो.
10:16 prompt वर परत येण्यासाठी q दाबा.
10:24 तर ह्या ट्युटोरियलमधे आपण प्रोसेस म्हणजे काय ते शिकलो. शेल प्रोसेस, प्रोसेसेसची उत्पत्ती, त्यांचे गुणधर्म व प्रकार माहित करून घेतले.
10:37 आपण ps कमांडही शिकलो. अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:45 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:55 *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:07 *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana