Xfig/C2/Feedback-diagram-with-Maths/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:18, 14 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | एक्सफीग मध्ये गणित अंतःस्थापना या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्यूटोरियल मध्ये मी समजवेल की, ही आकृती कशी काढावी. |
00:11 | दुसऱ्या खंडातील गणितीय वाक्यप्रयोग पहा. |
00:16 | हे ट्यूटोरियल शिकल्यानंतर तुम्ही कोणतेही गणितीय वाक्यप्रयोग अंतःस्थापित करु शकता. |
00:23 | एक्सफिग द्वारे फीडबॅक डायग्राम कसा बनवायचा या स्पोकेन ट्यूटोरियल मध्ये बनविलेल्या या आकृती पासून सुरवात करून आपण मागील स्लाईड मधील आकृती सुद्धा बनवू. |
00:36 | यास सुरवात करण्यापूर्वी एक्सफिग द्वारे फीडबॅक डायग्राम कसा बनवायचा या ट्यूटोरियल चा अभ्यास करावा. |
00:42 | या ट्यूटोरियल मध्ये शिकवलेल्या विषया साठी कोणत्या साधनांची गरज आहे ते मी सांगते. |
00:48 | मी एक्सफिग वर्जन 3.2, पॅच लेवल 5वापरेल. |
00:52 | तुम्हाला लेटेक आणि त्याबददल ची माहीती असणे आश्यक आहे. |
00:56 | तुम्हाला इमेज क्रॉपिंग सॉफ्ट वेअर ची आवश्यकता आहे. |
01:01 | पिडीऍफ़ क्रोप लिनक्स आणि Mac OS X वर कार्य करते. आम्ही या ट्यूटोरियल मध्ये हे स्पष्ट करू. |
01:09 | ब्रिस विंडोस वर कार्य करते, परंतु हे या ट्यूटोरियल मध्ये सांगितले नाही. |
01:15 | चला वर एक्सफीग जाऊ. |
01:19 | फाइल निवडून नंतर त्यास उघडु. |
01:26 | सूची वर स्क्रोल केल्यावर एक्सफिग द्वारे फीडबॅक डायग्राम कसा बनवायचा या ट्यूटोरियल मध्ये असलेली “feedback.fig” फाइल पाहू. यास क्लिक करा. |
01:42 | तुम्ही या बॉक्स मध्ये असलेली आकृती पहाल. |
01:45 | चला यास उघडु. |
01:53 | आता यास आत घेऊ. |
02:01 | यास झूम हि करू. |
02:05 | फाइल वरील “save as” पर्याय वापरून हि आकृती mathsनावाने सेव करू. |
02:20 | चला यास सेव करू. |
02:24 | आपल्याकडे maths.fig फाइल आहे. |
02:27 | “Edit” निवडुन “Plant” टेक्स्ट वर क्लिक करू. |
02:34 | मी माउस येथे घेते, यास डीलीट करते आणि
$G(z) = \frac z{z-1}$ एंटर करते. |
02:50 | टायपिंग करताना माउस बॉक्स च्या आत असावा ही खात्री करा. |
02:56 | फ्लॅग च्या “normal” वॅल्यू ला - “special” मध्ये बदलू. |
03:01 | “done” वर क्लिक करा. |
03:07 | टेक्स्ट मोठा असल्याने तो इतर एंट्रीस सोबत ओवरलॅप्स होत आहे. |
03:12 | चला टेक्स्ट ला बॉक्स च्या बाहेर घेऊन त्यावर काम करू. |
03:23 | मी येथे क्लिक करते. |
03:26 | मी ग्रिड मोड़ निवडते. |
03:31 | एकदा का येथे आपल्या मनासारखा बदल केल्यानंतर, आपण टेक्स्ट पुन्हा बॉक्स च्या आत टाकू शकतो. |
03:39 | फ़ाइल सेव करू. |
03:44 | कंबाइंड पिडीऍफ़ एंड लेटेक फाइल्स वापरुन एक्सपोर्ट करूया. |
03:51 | ' फाइल ' . ' एक्सपोर्ट ' . '( File. Export. ) कंबाइंड पिडीऍफ़ एंड लेटेक एक्सपोर्ट करूया. |
04:03 | मला एक एरर मेसेज मिळाला आहे, पण काळजी करण्याची गरज नाही. |
04:11 | मी टर्मिनल वर जाते. |
04:13 | “ls -lrt” टाइप करते. |
04:21 | आपल्याला फाइल ची सूची मिळेल, नवीन फाइल सर्वात शेवटी दिसत आहे. |
04:26 | maths.pdf_t आणि maths.pdf या दोन शेवटच्या फाइल आहेत. |
04:33 | “open maths.pdf” कमांड देऊया. |
04:42 | यास आत मध्ये घेऊया. |
04:45 | आपण पाहू शकतो कि, ब्लॉक डाइग्रॅम गणितीय वाक्यप्रयोगा शिवाय आहे. |
04:50 | मी हे बंद करते. |
04:52 | इमेक्स एडिटर मधील आपण maths.pdf_t (मेथ्स .पिडीऍफ़_टी) फाइल पाहूया , जी, मी अगोदरच उघडलेली आहे. |
05:01 | हि येथे आहे यास उघडुया. |
05:14 | तुम्हाला चा इमेक्स वापर करायचा नाही कृपया याची नोंद घ्या. |
05:17 | जो एडिटर तुम्हाला सोइस्कर वाटेल तो वापरु शकता. |
05:22 | तुम्ही पाहु शकता की, “picture” परिसराचा वापर केला आहे. |
05:26 | येथे ' इनक्लूड ग्राफिक्स ' आणि ' कलर ' पॅकेजस चा वापर केला आहे. – याच्या आवश्यकते बद्दल आपल्याला लेटेक ला माहीत दिली पाहिजे. |
05:41 | आता मी maths-bp.tex,फाइल उघडते जी या ट्यूटोरियल साठी मी अगोदरच तयार केली आहे. |
05:59 | मी ' आर्टिकल क्लास ' चा वापर केला आहे. |
06:02 | मी ' कलर ' आणि ' ग्राफिकएक्स ' पॅकेजस चा वापर केला आहे, ज्याचा उपयोग अगोदर पहिल्या प्रमाणे pdf_t(पिडीऍफ़_टी ') मध्ये केला होता. |
06:15 | मला पृष्ठ संख्येची गरज नाही कारण मला रिक्त पृष्ठ हवे. |
06:20 | शेवटी मला maths.pdf_t फाइलचा सामावेश करायचा आहे. |
06: 27 | टर्मिनल मध्ये “pdflatex maths-bp” कमांड कार्यन्वित करू. |
06:42 | maths-bp.pdf तयार आहे, असा मेसेज आपल्याला मिळेल. |
06:48 | “open maths-bp.pdf” कमांड वापरुन यास उघडू. |
06:58 | आपल्याकडे आता हवी असलेली फाइल आहे. मी त्यास ज़ूम करते. |
07:07 | आता आपल्याला माहीत आहे की गणितीय वाक्यप्रयोग कार्यरत आहे, चला टेक्स्ट ब्लॉक च्या आत घेऊ. |
07:30 | सेव आणि एक्सपोर्ट करू. हे अगोदरच आवश्यक भाषेत आहे. एक्सपोर्ट करू. |
07:38 | चेतावणी ला काढून टाकु. |
07:41 | मी यास पुन्हा संकलित करते. |
07:44 | pdf ब्राउज़र क्लिक करू ज्यामध्ये फाइल आहे. |
07: 49 | आपल्याला पाहिजे तसे गणितीय वाक्य प्रयोग बॉक्स च्या आत आपण पाहु शकतो. |
07:56 | जर स्पेशल फ्लॅग नाही निवडणार तर काय होईल ते पाहु. |
08:01 | मी येथे येते. |
08:04 | मी टेक्स्ट एडिट करते, ' स्पेशियल फ्लैग ' ला ' नोर्मल ' मध्ये बदलते. हे झाले आहे. |
08:25 | फाइल सेव करून एक्सपोर्ट करते. |
08:37 | मी संकलित करते आणि येथे येते. |
08:41 | फॉर्मूला आपल्याला हव्या असलेल्या रूपात नाही आहे. |
08:46 | स्पेशियल फ्लैग ला पुन्हा स्पेशल मध्ये बदलू. |
09:03 | फाइल सेव करून एक्सपोर्ट करा. |
09:12 | पुनः संकलन करा. फाइल हव्या त्या रूपात आहे ते पहा. |
09:18 | चला या फॉर्मूल्याचे स्वरुप सुधारू. |
09:22 | या मध्ये dfrac, चा वापर फ्रैक्शन ला चांगले बनवेल. |
09:28 | या विषया मध्ये आपण frac ला dfrac मध्ये बदलू. |
09:38 | मी येथे क्लिक करते माउस ला बॉक्स चा आत ठेवा. |
09:43 | d येथे ठेवा. हे झाले आहे. फाइल सेव करून एक्सपोर्ट करू. |
09:52 | “pdflatex” वापरुन पुन्हा फाइल संकलित करू. |
10:03 | “Undefined control sequence” \dfrac आपल्याला हा एरर मेसेज मिळेल. |
10:11 | \dfracकमांड, “Amsmath” पॅकेज मध्ये व्याख्यात आहे पण आपण त्यास समाविष्ट केले नाही म्हणून लेटेक एरर देत आहे. |
10:21 | आपल्याला हे maths-bp.tex. फाइल मध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. |
10:27 | हे आता करू. Emacs वर जाऊ. |
10:35 | “\usepackage{amsmath}” एंटर करा. |
10:41 | फाइल सेव करून पुन्हा एकदा संकलित करू. अगोदर मे बाहेर येते. |
10:49 | मी पुन्हा संकलित करते. हे संकलित होत आहे यावर क्लिक करा. |
10:59 | आपण आता पाहु शकतो की fraction चांगल्या तऱ्हेने बनून आला आहे. |
11:03 | आपण आपला एक्सफीग मध्ये गणितीय वाक्यप्रयोग अंतःस्थापित कसा करायचा हा उद्देश पूर्ण केला आहे. |
11:11 | मुख्य नोंद- एक्सफिग लेटेक चे कमांड मुळीच समजू शकत नाही. |
11:16 | “pdflatex” कमांड द्वारे स्पष्टीकरण पूर्ण होते. |
11:20 | संकलना वेळी लेटेक कमांड अचूक आणि सुसंगत असणे आवश्यक आहे. |
11:25 | आता आम्ही आकृती च्या सभोवतालची रिकामी जागा कशी काढावी हे स्पष्ट करू. |
11:31 | मी टर्मिनल वर जाते. |
11:33 | “pdfcrop maths-bp.pdf” कमांड टाइप करते. - ही फाइल आपण “maths-out.pdf” मध्ये बनविली होती. |
11:53 | Pdfcrop एक पृष्ठ लिहिलेला आहे, असा मेसेज देतो. |
11:57 | “pdfcrop”cफाइल चा स्वीकार करून, आकृतीच्या सभोवतालची रिकामी जागा काढून टाकते. क्रॉप्ड फाइल ला आउटपुट फाइल मध्ये बदलते. |
12:09 | “pdfcrop” माझ्या कंप्यूटर मध्ये अगोदरच स्थापित आहे. |
12:12 | जर नसेल तर अगोदर यास स्थापित करण्याची गरज आहे. |
12:15 | “open maths-out.pdf” या कमांड द्वारे आउटपुट फाइल पाहुया. |
12:29 | मी यास आत घेते. |
12:31 | आकृती आता खूप लहान झाली आहे. |
12:34 | येथे असलेल्या रिकाम्या जागेला काढून टाकण्यात आले आहे. |
12:38 | आता आपण यास डॉक्युमेंट्स मध्ये निविष्ट (insert) करू शकतो. |
12:42 | यास बंद करूया आणि याला सुद्धा. |
12:52 | पुन्हा स्लाइड वर येऊया. |
12:57 | ब्रिस सॉफ्टवेर ही रिकाम्या जागेला काढून टाकण्यास वापरु शकतो. |
13:01 | ब्रिस सॉफ्टवेर लिनक्स , Mac OS X विन्डोज़ वर सुद्धा कार्य करते. |
13:08 | मी याचे Mac OS X. वरील कार्य तपासले आहे. परंतु आम्ही हे येथे दर्शविणार नाही. |
13:17 | आता आपण ट्यूटोरियल च्या शेवटी आलो आहोत. |
13:20 | तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. या ट्यूटोरियल मध्ये तयार केलेल्या आकृतीला अधिक प्रमाणबद्ध आणि सुंदर बनवा. |
13:27 | विविध गणितीय वाक्यप्रयोग करण्याचा प्रयत्न करा. |
13:30 | इतर पर्याय जसे कि, फ्लिप आणि रोटेट ज्याचा स्पोकन ट्यूटोरियल मध्ये उल्लेख केलेला नाही त्यास करण्याचा प्रयत्न करा. |
13:36 | विविध आकृती बनविण्याचा प्रयत्न करा. लाइब्ररी चे अन्वेषण करा. |
13:41 | इंटरनेट वर एक्स फिग संबंधी माहिती शोधा. |
13:47 | अभ्यास करण्यासाठी उपयुक्त माहिती spoken-tutorial.org. वर उपलब्ध आहे. |
14:02 | स्पोकन ट्यूटोरियल ची संकल्पना "What is a Spoken Tutorial" मध्ये स्पष्ट केली आहे. |
14:09 | तुम्ही लेटेक चा अभ्यास उपलब्ध स्पोकन ट्यूटोरियल मध्ये करू शकता, जे मी या टॅब मध्ये डाउनलोड केले आहे. |
14:19 | लेटेक मध्ये गणित कसे तयार करायचे हे Mathematical Typesetting ( गणितिय टाइप सेटिंग) या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट केले आहे. |
14:29 | ' टेबल्स और फिगर्स हे ट्युटोरियल आकृति,जशी या ट्यूटोरियल मध्ये बनविली आहे डॉक्युमेंट्स मध्ये कशी नियुक्त करायची याबद्दल माहीत देतात. |
14:38 | या वेबसाइट वर एक्स फिग ट्यूटोरियल आणि इतर विषया बद्दल अधिक माहिती मिळेल. पुन्हा स्लाइड वर येऊ. |
14:53 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
15:03 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
15:12 | आम्ही तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या सहभागाचे स्वागत करतो. |
15:16 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |