LibreOffice-Suite-Impress/C2/Printing-a-Presentation-Document/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Printing a Presentation
Author: Manali Ranade
Keywords: Impress
|
|
---|---|
00.00 | लिबर ऑफिस इम्प्रेसच्या 'Printing a Presentation' वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.06 | या ट्युटोरियलमध्ये आपण कागदावर प्रेझेंटेशन प्रिंट करण्याचे विविध पर्याय जाणून घेणार आहोत. |
00.11 | 'Slide', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline'. |
00.16 | इथे आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00.25 | अनेक वेळा आपल्याला प्रेझेंटेशनची हार्ड कॉपी कागदावर प्रिंट करावी लागते. |
00.29 | उदाहरणार्थ तुम्हाला प्रेझेंटेशनची कॉपी तुमच्या श्रोत्यांना पुढील संदर्भासाठी द्यायची आहे. |
00.35 | प्रथम आपण 'Sample Impress' प्रेझेंटेशन फाईल वर डबल क्लिक करून उघडू या. |
00.41 | आपल्या स्लाईडची प्रिंट घेण्यासाठी 'File' वर जाऊन मग 'Print' वर क्लिक करा. किंवा Ctrl आणि P ही कीबोर्डवरील बटणे एकत्रितपणे दाबा. |
00.50 | 'General' आणि 'Options' या टॅबखालील सेटींग्जबद्दल जाणून घेण्यासाठी, |
00.55 | लिबर ऑफिस रायटरमधील 'Viewing and printing documents' या ट्युटोरियची मदत घ्या. |
01:02 | 'General' टॅब मधल्या 'Print' खालील 'Document' या फिल्डमध्ये इम्प्रेससाठी काही विशिष्ठ पर्याय उपलब्ध असतात. |
01:09 | या पर्यायांमुळे आपण हव्या असलेल्या फॉरमॅटमध्ये आपल्या स्लाईडची प्रिंट घेऊ शकतो. |
01:15 | 'Slides', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline' यापैकी आपण 'Slides' हा पर्याय निवडू. |
01:22 | 'लिबर ऑफिस इम्प्रेस' या टॅबवर क्लिक करा. |
01:26 | येथे आपल्याला स्लाईडचा रंग आणि आकार व स्लाईडचा जो भाग प्रिंट करायचा आहे तो निवडू शकतो. |
01.34 | कंटेट्स खाली 'Slide Name', 'Date and Time' आणि 'Hidden Pages' हे सिलेक्ट करू या. |
01:41 | पर्यायांच्या नावाप्रमाणेच आपण स्लाईडचे नाव, तारीख व वेळ आणि एखादे न दाखवले जाणारे पान प्रिंट करू शकता. |
01:49 | नंतर कलर खालील 'Greyscale' हा पर्याय निवडा. |
01:53 | पर्यायांच्या नावाप्रमाणेच आपल्याला स्लाईड तिच्या मूळ किंवा कृष्णधवल रंगात प्रिंट करता येते. |
02:00 | आणि Size खाली 'Fit to printable page' हा पर्याय निवडा. लिबर ऑफिस इम्प्रेस टॅबमधील इतर पर्याय कशाप्रकारे काम करतात ते तुम्ही स्वतः करून पाहू शकता. |
02:10 | तुम्हाला कोणत्या उद्देशाने प्रिंट घ्यायची आहे त्यानुसार 'pane layout' या टॅबमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. |
02:18 | समजा आपल्याला एकाच पानावर अनेक स्लाईडस् ची प्रिंट घ्यायची आहे. |
02:23 | त्यासाठी 'pages per sheet' हा पर्याय निवडा. Default रूपात प्रत्येक पानावर एकच स्लाईड प्रिंट होते. |
02:29 | येथे पानाचा छोटा preview दिसत आहे. |
02:33 | ड्रॉप आऊन ऍरोवर क्लिक करा आणि प्रत्येक पानावर किती स्लाईडस् प्रिंट करायच्या आहेत ती संख्या निवडा. |
02:39 | जर आपण 2 ही संख्या निवडली तर preview मध्ये आपल्याला 2 स्लाईडस् दिसतील. जर 6 निवडल्या तर preview मध्ये 6 स्लाईडस् दिसतील. |
02:48 | 'Draw a border around each page' हा पर्याय निवडल्यावर प्रिंट करताना प्रत्येक पानाला काळ्या रंगाची बॉर्डर दिसेल. |
02:56 | त्यामुळे तुमचे पान जास्त आकर्षक दिसेल. |
02:59 | 'Brochure' या पर्यायामुळे आपल्याला स्लाईड, पुस्तक रूपात प्रिंट करता येतात. त्यामुळे बाईंडिंग करणे सोपे जाते. |
03:06 | सध्या आपण हा पर्याय निवडणार नाही. हा पर्याय कसे काम करतो ते तुम्ही नंतर स्वतः जाणून घ्या. |
03:14 | 'Option' या टॅबमधील कुठलाही चेक बॉक्स निवडलेला नाही याची खात्री करा. |
03:19 | हे चेक बॉक्स काही विशिष्ट करणांसाठी दिले आहेत. या ट्युटोरियलमध्ये आपण याविषयी चर्चा करणार नाही. |
03:25 | आता 'Print' या बटणावर क्लिक करा. |
03:28 | जर तुम्ही प्रिंटर योग्य पध्दतीने configure केलेला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल. |
03:36 | पुढे आपण 'Handouts' या पर्यायाबद्दल जाणून घेऊ या. 'File' वर जाऊन 'Print' वर क्लिक करा. |
03:41 | आणि 'General' टॅबमधील 'Print' खालील डॉक्युमेंट या फिल्डमधून 'Handouts' हा पर्याय निवडा. |
03:47 | 'Default' रूपात एका पानावर चार स्लाईड असतात व त्यांचा 'Default' क्रम डावीकडून उजवीकडे आणि नंतर खाली असा असतो. या प्रेझेंटेशनसाठी यात कुठलाही बदल करू नये. |
03:58 | लिबर ऑफिस इम्प्रेस या टॅबमधील 'Size' हा टॅब डिसेबल्ड म्हणजेच निष्क्रीय आहे. |
04:05 | ह्याचे कारण प्रिंटचा आकार हा तुमच्या स्लाईडस् ची संख्या आणि शीटचा आकार यावर अवलंबून असतो. |
04:12 | आता 'Print' या बटणावर क्लिक करा. |
04:15 | जर तुम्ही प्रिंटर योग्य पध्दतीने 'configure' केलेला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल. |
04:20 | आता पहिल्या स्लाईडवर जाऊन 'Note' या टॅबवर क्लिक करा. |
04:25 | येथे आपण 'This is a sample note' अशी तळटीप टाईप करू या. |
04:30 | तुमच्या स्लाईडस् साठी टाईप केलेल्या तळटीपा प्रिंट करण्यासाठी फाईलवर जाऊन 'Print' वर क्लिक करा. |
04:35 | 'General' टॅबमधील 'Print' खालील डॉक्युमेंट या फिल्डवर जाऊन 'Notes' हा पर्याय निवडा. |
04:42 | डावीकडील 'preview' पेजमध्ये पहा. स्लाईडच्या खालील भागात तुम्ही टाईप केलेली तळटीप दिसत आहे. |
04:48 | 'Libre Office Impress' या टॅबवर आता क्लिक करा. |
04:52 | लक्षात घ्या 'Notes' प्रिंट करताना 'Size' हा पर्याय उपलब्ध नसतो. |
04:57 | आता 'Print' या बटणावर क्लिक करा. जर तुम्ही प्रिंटर योग्य पध्दतीने 'configure' केलेला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल. |
05:05 | शेवटी, प्रेझेंटेशन करताना जलद संदर्भ म्हणून स्लाईड्सची रूपरेखा छापण्यासाठी, प्रथम File वर क्लिक करून नंतर Print वर क्लिक करा. |
05:13 | 'General' टॅबमधील 'Print' खालील 'Document' या फिल्डवर जाऊन 'Outline हा पर्याय निवडा. |
05:19 | डावीकडील 'Preview' पेजमध्ये पहा. तेथे तुमच्या स्लाईड्सची रूपरेखा म्हणजेच स्लाईड्सचा क्रम, त्यांची Headings व त्यातील मुद्दे तुम्हाला दिसतील. |
05:28 | 'Libre Office Impress' या टॅबवर आता क्लिक करा. |
05:32 | लक्षात घ्या 'Outline ' प्रिंट करताना 'Size' हा पर्याय उपलब्ध नसतो. |
05:38 | आता 'Print' या बटणावर क्लिक करा. जर तुम्ही प्रिंटर योग्य पध्दतीने 'configure' केलेला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल. |
05:47 | अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो असून त्यात आपण प्रिंटचे विविध पर्याय जाणून घेतले. |
05:52 | 'Slide', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline' |
05:57 | COMPREHENSION TEST ASSIGNMENT. नवीन प्रेझेंटेशन तयार करा. |
06:02 | फक्त दुसरी स्लाईड प्रिंट करा. 'Handout' रूपात पहिल्या चार स्लाईडस् प्रिंट करा. |
06:10 | *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:16 | *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
06:21 | *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:27 | *जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:31 | *अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken hyphen tutorial dot org वर संपर्क साधावा. |
06:38 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
06:42 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
06:50 | *यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे. |
07:01 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. |
07:06 | *ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |