Java/C2/Programming-features-Eclipse/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Programming-features-Eclipse
Author: Manali Ranade
Keywords: Java
| Time | Narration |
| 00:02 | Programming Features of Eclipse वरील ट्युटोरिलयमधे आपले स्वागत. |
| 00:07 | यात शिकणार आहोत, |
| 00:10 | युजरला सहज वापरता येणारी Eclipse ची प्रोग्रॅमिंग फीचर्स. |
| 00:15 | यासाठी Ubuntu 11.10, JDK 1.6, आणि Eclipse 3.7.0 वापरणार आहोत. |
| 00:23 | तसेच यासाठी आपल्या, |
| 00:26 | सिस्टीमवर Eclipse असणे आवश्यक आहे. |
| 00:28 | तसेच Eclipse मधे java प्रोग्रॅम लिहिता यायला हवा. |
| 00:32 | नसल्यास, संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
| 00:40 | Eclipse IDE मधे अनेक युजर फ्रेंडली फीचर्स जसे की, |
| 00:44 | Auto completion, |
| 00:45 | Syntax highlighting, |
| 00:46 | Error dialog box आणि |
| 00:48 | Shortcut keys आहेत. |
| 00:49 | आपण ही वैशिष्ट्ये सविस्तर बघणार आहोत. |
| 00:59 | Featuresनावाचा class बनवून त्यात मी main मेथड समाविष्ट केली आहे. |
| 01:05 | प्रथम Eclipse मधील Auto completion हे वैशिष्ट्ये पाहू. |
| 01:10 | main मेथडमधे टाईप करा opening braceआणि एंटर दाबा. |
| 01:17 | संबंधित closing brace आपोआप सेट झालेली दिसेल तसेच कर्सरची जागा indentation नुसार असेल. |
| 01:25 | जोडीने कार्य करणारी फीचर्स Eclipse पूर्ण करते. |
| 01:29 | उदाहरणार्थ कंस. टाईप करा open parentheses |
| 01:35 | open parenthesis लिहिल्यावर Eclipse आपोआप closing parenthesis लिहिते. |
| 01:42 | closing parenthesis समाविष्ट केलेला असल्यास आणखी closing parenthesis समाविष्ट करत नाही. |
| 01:52 | आता closing parenthesis टाईप करू. दिसेल की आणखी parenthesis समाविष्ट न होता कर्सर केवळ उजवीकडे सरकला. |
| 02:02 | हे double quotes साठीही असेच कार्य करते. |
| 02:06 | opening quotes टाईप केल्यावर हे आपोआप quotes close करेल. |
| 02:12 | जर closing quotes देखील टाईप केला तर आणखी quote समाविष्ट करणार नाही. |
| 02:19 | मी quotes टाईप केले आहेत. आणखी quotes समाविष्ट न करता कर्सर उजवीकडे सरकला आहे. |
| 02:27 | Auto-completion हे बहुउपयोगी वैशिष्ट्य कोडचे स्ट्रक्चर नीट ठेवायला मदत करते. |
| 02:32 | तसेच missing closing braces, missing closing parentheses आणि missing closing quotes सारख्या टायपिंग errors पासून बचाव करते. |
| 02:44 | suggestion हे पुढील प्रोग्रामिंग वैशिष्ट्य पाहु. |
| 02:48 | आता टाईप केलेले सर्व काढून टाका. |
| 02:54 | “hello” हा शब्द प्रिंट करण्यासाठी आऊटपुट स्टेटमेंट लिहू. System dot. |
| 03:07 | Eclipse आपल्याला drop-down लिस्ट दाखवेल. |
| 03:11 | स्टेटमेंट पूर्ण करण्यासाठी err, in, out, console असे सर्व पर्याय आहेत. |
| 03:19 | Scroll करून out पर्याय निवडून एंटर दाबा. पुन्हा dot टाईप करा. |
| 03:28 | Eclipse आपल्याला out ह्या module चे पर्याय देईल. |
| 03:33 | Scroll करून println() निवडा. एंटर दाबा. आता कंसात quotes मधे Hello टाईप करा. |
| 03:57 | पुढे Syntax highlighting हे वैशिष्ट्य पाहू . |
| 04:02 | public class, public static void हे कीवर्ड वेगवेगळ्या रंगात दिसतील. |
| 04:09 | Hello हा शब्द string आहे हे दाखवण्यासाठी निळ्या रंगात दाखवला आहे. |
| 04:16 | Syntax highlighting ह्या वैशिष्ट्यामुळे कीवर्डस आणि कोडचे इतर भाग ह्यांच्यातील फरक सहज ओळखता येतात. |
| 04:27 | Eclipse प्रोग्रॅमरला errors शोधण्यास मदत करते. |
| 04:31 | प्रोग्रॅममधे डाव्या मार्जिनवर लाल रंगाच्या फुलीने error दाखवली जाते. |
| 04:36 | येथे काही error दिसत आहेत त्यावर माऊसचा कर्सर न्या. |
| 04:46 | semi-colon missing अशी error दिसत आहे. ती दुरूस्त करण्याचे उपाय दाखवले आहेत. |
| 04:57 | ती दुरूस्त न करता कार्यान्वित करण्यासाठी राईट क्लिक करून run as java application निवडा. |
| 05:12 | Error Dialog Box येतो. येथे एरर असून पुढे जायचे की नाही असे विचारले जाते. |
| 05:18 | आपण पुढे जाऊ. आऊटपुट मधे एरर असल्याचे दाखवले गेलेले दिसेल. |
| 05:35 | जेव्हा problem console वर जाऊ तेव्हा समस्या त्यावरील उपायांसहित दिसतील. |
| 05:43 | एरर दुरूस्त करण्यासाठी semi-colon समाविष्ट करा. Ctrl, S दाबून सेव्ह करा. |
| 05:53 | shortcut-keys हे eclipse चे पुढचे उपयोगी वैशिष्ट्य. |
| 06:01 | सेव्ह करण्यासाठी Ctrl+S आणि फाईल उघडण्यासाठी Ctrl+O ह्या shortcut-keys आहेत. |
| 06:07 | नेहमीच्या फंक्शनसाठी Eclipse कडे shortcut keys आहेत. |
| 06:12 | कोड कार्यान्वित करण्यासाठी Control F11 हा शॉर्टकट आहे. |
| 06:16 | हे करून पाहू. Ctrl F11 दाबा. कोड कार्यान्वित होऊन Hello हे आऊटपुट प्रिंट झालेले दिसेल. |
| 06:27 | shortcut keys चे पर्याय मेनूत पहायला मिळतील. Run वर क्लिक करा. |
| 06:33 | लक्षात येईल की पर्यायाच्या उजवीकडे शेवटी त्याचा शॉर्टकट दिला आहे. |
| 06:40 | Debug चा शॉर्टकट F11 आहे. |
| 06:45 | ही सर्वाधिक वापरली जाणारी Eclipse च्या प्रोग्रॅमिंग फीचरची छोटीशी यादी आहे. अधिक वैशिष्ट्यांबद्दल पुढील पाठात पाहु. |
| 06:56 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. यात Eclipse ची प्रोग्रॅमिंग फीचर्स पाहिली. |
| 07:04 | Auto completion, |
| 07:05 | Syntax highlighting, |
| 07:06 | Error dialog box आणि |
| 07:07 | Shortcut keys. |
| 07:10 | असाईनमेंट. |
| 07:12 | class असलेला एक सोपा प्रोग्रॅम लिहा जो “Hello” प्रिंट करेल. |
| 07:17 | यात Eclipse ची प्रोग्रॅमिंग फीचर्स वापरा. |
| 07:22 | हे कसे कार्य करते ते पहा. |
| 07:25 | प्रकल्पाची अधिक माहिती, |
| 07:28 | दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
| 07:30 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
| 07:33 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
| 07:37 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
| 07:39 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
| 07:42 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
| 07:45 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
| 07:52 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
| 07:56 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
| 08:02 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
| 08:07 | सहभागासाठी धन्यवाद . |