Inkscape/C2/Create-and-Format-Text/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:16, 27 November 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Inkscape च्या Create and format text वरील पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत:
  • टेक्स्ट समाविष्ट करणे
  • फॉरमॅट आणि अलाईन करणे
  • स्पेसिंग आणि बुलेटस
00:15 शेवटी simple flyer बनवण्याची कृती जाणून घेऊ.
00:19 या पाठासाठी वापरणार आहोत:
  • उबंटु लिनक्स 12.04 OS
  • इंकस्केप वर्जन 0.48.4
00:29 मी हा पाठ जास्तीत जास्त रेझोल्युशन वापरून रेकॉर्ड करीत आहे. यामुळे सर्व टूल्सची प्रात्यक्षिके दाखवता येतील.
00:38 इंकस्केप उघडू.
00:40 टूल बॉक्स मधील Text tool द्वारे टेक्स्ट समाविष्ट करता येते.
00:45 टेक्स्ट दोन पध्दतीने लिहिता येते
  • Regular Text आणि
  • Flowed Text.
00:50 आधी Regular Text बद्दल जाणून घेऊ. Text tool क्लिक करून नंतर canvas वर क्लिक करा.
00:57 "Spoken" शब्द टाईप करा. टेक्स्ट सामावून घेण्यासाठी टेक्स्ट बॉक्स मोठा होत जातो.
01:03 Line breaks स्वतः घालावे लागतात. नव्या ओळीवर जाण्यासाठी Enter दाबून “Tutorial” असे टाईप करा.
01:11 हा शब्द मागील ओळीवर नेण्यासाठी कर्सर 'T' अक्षराआधी ठेवा. backspace दाबा आणि दोन शब्दांमधे स्पेस द्या.
01:22 याचप्रकारे "Spoken Tutorial" च्या खाली नव्या ओळीवर http://spoken-tutorial.org/ हे टाईप करा.
01:33 Flowed text वापरून टेक्स्ट समाविष्ट कसे करायचे ते पाहू.
01:38 आता मी लिबर ऑफिस रायटरच्या फाईलमधे सेव्ह केलेले टेक्स्ट कॉपी करणार आहे.
01:45 Ctrl + A दाबून संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा आणि Ctrl + C द्वारे कॉपी करा.
01:52 आता इंकस्केपवर जाऊन Text tool सिलेक्ट केले असल्याची खात्री करा.
01:58 canvas वर क्लिक करून आयत किंवा चौरसाकृती टेक्स्ट एरिया काढण्यासाठी माऊस ड्रॅग करा.
02:03 माऊसचे बटण सोडल्यावर कॅनव्हासवर निळ्या रंगाचा आयताकृती बॉक्स तयार होईल.
02:10 आता टेक्स्ट बॉक्सच्या आत डाव्या वरील कोप-यात text prompt ब्लिंक होताना दिसेल.
02:17 कॉपी केलेले टेक्स्ट Ctrl + V दाबून पेस्ट करा.
02:22 टेक्स्ट बॉक्सचा रंग लाल झालेला दिसेल.
02:25 कारण समाविष्ट केलेले टेक्स्ट बॉक्सच्या मर्यादेपेक्षा अधिक झाले आहे.
02:31 हे टेक्स्ट बॉक्सच्या उजव्या कोप-यातील छोट्या diamond handle द्वारे नीट करू.
02:38 क्लिक करून टेक्स्ट बॉक्सचा रंग निळा होईपर्यंत ड्रॅग करा.
02:44 शेवटचे वाक्य हे त्याच्या मागील वाक्याबरोबर जोडले गेले आहे.
02:48 शेवटचे वाक्य वेगळे करण्यासाठी त्या वाक्याच्या सुरूवातीला दोन वेळा एंटर दाबा.
02:53 टेक्स्टसाठी असलेले विविध फॉरमॅटिंगचे पर्याय समजून घेऊ. “Spoken Tutorial” शब्दावर क्लिक करा.
03:01 मुख्य मेनूवर जा. Text वर क्लिक करून Text and Font पर्याय वर क्लिक करा.
03:09 Font आणि Text हे पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. Font टॅबखाली अनेक पर्याय आहेत.
03:17 Font family मधे उपलब्ध असलेल्या सर्व फाँटसची यादी दिसेल. तुमच्या पसंतीचा फाँट निवडू शकता.
03:25 सिलेक्ट केलेला फाँट कसा दिसेल हे preview box मधे बघता येतो. मी Bitstream Charter हा फाँट निवडला आहे.
03:33 Style खाली- Normal, Italic, Bold आणि Bold Italic हे चार पर्याय आहेत. तुम्ही गरजेप्रमाणे स्टाईल निवडा. मी Bold निवडत आहे.
03:46 फाँटचा आकार बदलण्यासाठी ड्रॉप डाऊन वापरून आकार निवडा. हे छोटे दिसत असल्यामुळे मी 64 हा मोठा फाँट निवडत आहे.
03:57 पुढे Layout हा पर्याय आहे.
03:59 ह्या पर्यायासाठी प्रिव्ह्यू दिसत नसल्यामुळे याबद्दल नंतर जाणून घेऊ.
04:04 Font टॅबच्या पुढील Text टॅबवर क्लिक करा. येथील preview window मधे टेक्स्ट दिसेल.
04:12 येथे तुम्ही टेक्स्टमधे कुठलेही बदल करू शकता.
04:16 Apply वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. टेक्स्ट फॉरमॅट झालेले दिसेल.
04:23 खालच्या भागातील color palette द्वारे टेक्स्टचा रंग बदलता येतो. maroon रंगावर क्लिक करा.
04:30 http://spoken-tutorial.org या URL मधील टेक्स्ट सिलेक्ट करा.
04:40 टेक्स्ट फॉरमॅटिंगचे पर्याय Tool controls bar वर देखील उपलब्ध आहेत.
04:44 मी Bitstream charter हा फाँट, त्याचा आकार 28 आणि रंग निळा निवडणार आहे.
04:54 परिच्छेदातील टेक्स्ट निवडू.
04:56 Text tool आधीच सिलेक्ट केलेले असल्यास टेक्स्ट बॉक्समधे जाण्यासाठी text वर क्लिक करा.
05:04 फाँटचा आकार बदलून 25 करा.
05:08 कॅनव्हासच्या आतील टेक्स्ट हलवण्यासाठी diamond handle क्लिक करून ड्रॅग करा.
05:15 आता टेक्स्ट अलाईन करू.
05:19 Tool controls bar वर Italic icon च्या पुढे चार आयकॉन आहेत जे टेक्स्ट डावीकडे, मध्यात किंवा उजवीकडे अलाईन करेल.
05:30 चौथा पर्याय टेक्स्ट बॉक्सच्या बाऊंडरीजमधे टेक्स्ट जस्टीफाय करेल. पुढे जाण्यापूर्वी मी left align वर क्लिक करत आहे.
05:39 Align and distribute पर्याय वापरून देखील टेक्स्ट अलाईन करता येते.
05:43 मुख्य मेनूतील Object मेनूवर क्लिक करून Align and Distribute पर्याय निवडा.
05:51 आता Spoken Tutorial हा शब्द मध्यात आणण्यासाठी यावर क्लिक करू.
05:57 प्रथम Relative to पर्यायासाठी Page हे पॅरामीटर सेट केले आहे का ते तपासा.
06:01 Centre on vertical axis वर क्लिक करा. आता टेक्स्ट मध्यात अलाईन झाल्याचे दिसेल.
06:10 येथे खालच्या रिकाम्या भागात आणखी काही टेक्स्ट लिहू.
06:13 "FOSS Categories" असे टाईप करा. हे टेक्स्ट पानाच्या मध्यात अलाईन करण्यासाठी Centre on vertical axis वर क्लिक करा.
06:25 कॅनव्हासवर Linux, LaTeX, Scilab, Python अशी काही FOSS ची नावे स्वतंत्रपणे आणि कुठेही टाईप करा.
06:39 आता हे टेक्स्ट एकाच रो मध्ये समान अंतरावर अलाईन करा.
06:44 चारही टेक्स्ट शिफ्ट बटणाच्या सहाय्याने सिलेक्ट करा. Align baseline of text आणि Distribute baseline of text horizontally वर क्लिक करा.
06:58 या शब्दांमधील अंतर समान नसल्याचे लक्षात येईल.
07:02 पहिल्या शब्दातील पहिले आणि दुस-या शब्दातील पहिले अक्षर यांच्यातील अंतर समान आहे. परंतु प्रत्यक्ष शब्दांतील अंतर समान नाही.
07:10 हे उभ्या टेक्स्टसाठी देखील असेच कार्य करते.
07:15 हे पर्याय काही ठराविक ठिकाणी उपयोगी पडू शकतात.
07:20 आता शब्दांमधील अंतर समान करणार आहोत.
07:23 त्यासाठी Distribute खालील पहिल्या ओळीतील चौथ्या आयकॉनवर क्लिक करा. आता शब्दांतील अंतर सारखे झाले आहे.
07:32 पुढे परिच्छेदातील ओळींमधील अंतर कमी जास्त कसे करायचे हे शिकू.
07:38 टेक्स्ट बॉक्समधील परिच्छेदावर डबल क्लिक करा.
07:44 टूल कंट्रोल्स बारवरील Spacing between lines आयकॉन ओळींमधील अंतर कमी जास्त करतो.
07:50 अंतर वाढल्यावर काय काय होते ते बघा.
07:55 मी लाईन स्पेसिंग 1.50 ठेवत आहे.
07:59 पुढील आयकॉन अक्षरातील अंतर कमी जास्त करेल. पुन्हा अप आणि डाऊन ऍरोवर क्लिक करून होणा-या बदलांकडे लक्ष द्या.
08:07 येथे space पॅरामीटर 0 ठेवू.
08:12 कॅनव्हासच्या दोन्ही उभ्या कोप-यात रिकामी जागा दिसत आहे. त्यात काही टेक्स्ट टाईप करू.
08:19 कॅनव्हासच्या बाहेर "Learn Open Source Software for free" असे वाक्य टाईप करा.
08:24 फाँट बदलून तो Ubuntu करा. फाँटचा आकार 22 करा आणि टेक्स्ट बोल्ड करा.
08:34 Tool controls bar वरील Vertical text या शेवटच्या आयकॉनवर क्लिक करा.
08:39 टेक्स्ट उभ्या पध्दतीने अलाईन झालेले दिसेल.
08:43 Selector tool वापरून टेक्स्टवर क्लिक करून कॅनव्हासच्या डाव्या कोप-यात ते सरकवा.
08:49 टेक्स्टची दुसरी प्रत मिळवण्यासाठी Ctrl + D दाबा. दुसरी प्रत Ctrl key च्या सहाय्याने दुस-या कोप-यात हलवा.
08:59 आता परिच्छेदात असलेल्या टेक्स्टला bullet points देऊ.
09:03 इंकस्केप टेक्स्टसाठी बुलेट किंवा अंकांची सूची देत नाहीत. बुलेट पॉईंटस स्वतः बनवावे लागतात.
09:11 ellipse टूलवर क्लिक करून लाल रंगाचे छोटे वर्तुळ काढा.
09:17 ही बुलेट परिच्छेदातील पहिल्या ओळीवर नेऊन ठेवा. त्याची दुसरी प्रत करून पुढील वाक्यावर नेऊन ठेवा.
09:27 हे सर्व वाक्यांसाठी करा.
09:32 आपल्या गरजेनुसार टेक्स्ट तयार झाले आहे.
09:36 शेवटी हे flyer सारखे दिसण्यासाठी थोडे नक्षीकाम करू.
09:41 हा पूर्ण झालेला flyer आहे.
09:45 आपण वर आणि खाली बॉर्डर्स टाकल्या आहेत. टेक्स्टभोवती गोलाकार आयत आणि लंबवर्तुळे काढली आहेत.
09:51 फ्लायरसाठी तुम्ही कलात्मकता वापरून विविध लेआऊट आणि डिझाईन्स बनवा.
09:57 थोडक्यात,
09:59 आपण टेक्स्ट समाविष्ट करणे, फॉरमॅट आणि अलाईन करणे, स्पेसिंग आणि बुलेट लिस्ट बनवायला शिकलो.
10:06 तसेच सिंपल flyer बनवायला शिकलो.
10:09 असाईनमेंट.
10:11 फ्लायर असा बनवा.
  • टेक्स्ट टाईप करण्यासाठी टेक्स्ट टूल वापरा.
  • rectangle टूल वापरून बुलेटस आणि बॉक्सेस बनवा.
10:19 star टूल वापरून 10 कोपरे असलेली चांदणी काढा.
  • color palette आणि Fill and stroke वापरून रंग बदला.
  • Align and distribute वापरून टेक्स्ट अलाईन करा.
10:31 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:39 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:47 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:57 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:01 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:03 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana