Drupal/C3/Adding-Functionalities-using-Modules/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Adding Functionalities using Modules वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात Modules विषयी शिकणार आहोत. Book Module आणि Forum Module बद्दल जाणून घेऊ. |
00:19 | या पाठासाठी वापरणार आहोत,
आपण आपल्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:35 | ड्रुपल वेबसाइटचा विस्तार किंवा फीचर समाविष्ट करण्यासाठी Modules आणि themes या प्राथमिक पध्दती आहेत. |
00:42 | ड्रुपल एक संपूर्ण कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रदान करते. परंतु काही वेळा आपल्याला आणखी काही हवे असते तेव्हा modules चा उपयोग सुरू होतो. |
00:53 | Modules वेबसाइट मधे फीचर्स समाविष्ट करतात. येथे ड्रुपलमधे तीन प्रकारची modules आहेत. |
00:59 | येथे Core Modules आहेत. ही modules डिफॉल्ट रूपात ड्रुपल सोबत येतात. |
01:06 | ती बंद करता येतात. परंतु ftp च्या सहाय्याने वेबसाइटच्या मुख्य भागात कधीही, म्हणजेच ही modules काढण्यासाठी जाऊ नका. |
01:15 | जेव्हा आपण ड्रुपल अपडेट करू तेव्हा ते परत इन्स्टॉल केले जातील. |
01:22 | ह्या Core Modules ची संरचना ड्रुपलच्या प्राथमिक फंक्शनॅलिटीजसाठी करण्यात आलेली आहे. |
01:28 | नंतर येथे Contributed Modules आहेत. आपण आधीच एक म्हणजेच Devel इन्स्टॉल केले आहे. |
01:38 | Contributed Module हे असे मॉड्युल आहे जे कम्युनिटीतील एखाद्या सदस्याने बनवलेले असते. हे drupal.org वर उपलब्ध आहे. |
01:49 | Custom Module हे शेवटच्या प्रकारचे मॉड्युल आहे. |
01:52 | येथे आपल्याला काही विशिष्ट फंक्शनॅलिटीज हव्या आहेत ज्यांची आपल्या प्रोजेक्टमधे आवश्यकता आहे. ह्यासाठी module उपलब्ध नाही आणि इतर कोणी त्याचा अजून विचार केलेला नाही. |
02:07 | अर्थातच आपल्याला हे स्वतः बनवावे लागेल किंवा पैसे देऊन बनवून घ्यावे लागेल. |
02:15 | येथे ड्रुपलची अनेक वेगवेगळी modules उपलब्ध आहेत. |
02:20 | drupal.org वर आधीच 32, 458 modules दिसत आहेत. |
02:30 | Modules अनेक कामे करतात. |
02:33 | एक module, Content type मधे field समाविष्ट करू शकते. दुसरे module आपल्या संपूर्ण वेबसाइटसाठी एक पूर्ण Voting System समाविष्ट करू शकते. |
02:45 | परंतु आपण फक्त आपल्या ड्रुपल वर्जनसाठी अनुकूल module चाच उपयोग करू शकतो. |
02:51 | त्यामुळे आपल्याला drupal.org/project/modules वर आपली modules फिल्टर करणे आवश्यक आहे. |
03:03 | फिल्टर केल्यावर हे नेहमी popularity च्या क्रमानुसार सूची दर्शवते. |
03:09 | पहिल्या तीन किंवा चार पानांवर सर्वात लोकप्रिय modules आहेत. म्हणजेच ती सर्वाधिक आणि वारंवार वापरली जाणारी तसेच अतिशय उपयोगी आहेत. |
03:21 | थोडक्यात, Modules फीचर्स समाविष्ट करतात. drupal.org वर अनेक modules विनामूल्य उपलब्ध आहेत. |
03:30 | आपण बनवलेली वेबसाइट उघडा. Extend वर क्लिक करून खाली स्क्रोल करा. |
03:38 | आपल्याजवळ काही modules आहेत जी ड्रुपल सोबत डिफॉल्ट रूपात आली आहेत. परंतु ती अजून सुरू केलेली नाहीत. |
03:48 | Book module सुरू करा. |
03:53 | थोडे खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला Forum module मिळेल. ते सुरू करा. |
04:01 | एकाच वेळी दोन वेगवेगळी modules सुरू करू शकतो. |
04:07 | खाली स्क्रोल करून Install वर क्लिक करा. |
04:12 | Book module आणि Forum module ही दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची मॉड्युल्स आहेत. |
04:19 | परंतु ती दोन्हीही संपूर्ण नवीन Content types बनवत आहेत. आणि ती ड्रुपलचा विस्तार करून त्यामधे अतिरिक्त functionality आणतात. |
04:29 | Drupal modules ही सर्वच मॉड्युल्स असूनही ती खूप वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. |
04:35 | * जेव्हा आपल्याला आपल्या साईटमधे फीचर्स समाविष्ट करायची असतात,
|
04:45 | * तुम्ही Drupal core चा विस्तार करण्यासाठी module समाविष्ट करत असता. |
04:50 | आता Structure खालील Content types वर क्लिक करा. आपण येथे Book page आणि Forum topic हे नवे कोरे Content Types बघू शकतो. |
05:03 | Book page चे Content type बघण्यासाठी Content वर क्लिक करून नंतर Add content क्लिक करा. |
05:11 | Book page आपल्या साईटवर chapters, navigations सह एक पूर्ण पुस्तक तयार करते. आणि आपण हवा तिथे blog ही ठेवू शकतो. |
05:24 | Book page वर क्लिक करून Title मधे Our Drupal Manual टाईप करा. |
05:30 | Body मधे This is the beginning of our Drupal manual टाईप करा. |
05:36 | Publication settings वर आपल्याकडे नवीन सेटींग आहेत. |
05:41 | BOOK OUTLINE वर क्लिक करून None पर्याय बदलून तो Create a new book करा. नंतर Save and publish वर क्लिक करा. |
05:55 | येथे Add child page नावाच्या लिंककडे लक्ष द्या. drupal.org मधे Documentation वर क्लिक करा. |
06:06 | Understanding Drupal वर क्लिक केल्यावर आपण Book module पाहू शकतो. |
06:12 | उजव्या बाजूला navigation आहे. पेजच्या शेवटी आणखी काही navigationआहेत जी आपोआप तयार झाली आहेत. |
06:24 | डाव्या बाजूला links आहेत. |
06:29 | Drupal concept वर क्लिक करा. आपल्याजवळ नेविगेशन आहे. |
06:34 | पुढे काय येणार आहे हे दाखवण्यासाठी उजव्या बाजूला असलेले नेविगेशन देखील विस्तारले गेले आहे. |
06:42 | Book module च्या सहाय्याने आपण पूर्ण आणि गुंतागुंतीचे युजर गाइड किंवा कोणत्याही प्रकारचे पुस्तक बनवू शकतो. |
06:51 | आपल्या वेबसाईटवर परत जाऊन Add child page वर क्लिक करा. |
06:57 | Title मधे Installing Drupal टाईप करून Body मधे "This is where we explain how to install Drupal" टाईप करा. |
07:08 | आपण बनवत असलेल्या Drupal manual मधे हे आपोआप आलेले दिसेल. असे होण्याचे कारण Create Book page वर आपण क्लिक केले होते. |
07:20 | Save and publish वर क्लिक करा. |
07:23 | आपण बघू शकतो की नेविगेशन आपोआप तयार झालेले आहे. |
07:29 | Up वर क्लिक करा. हे मुख्य level वर घेऊन जाईल. यासोबत block उपलब्ध असल्याचा मागे मी उल्लेख केला होता. |
07:41 | Structure खालील Block layout वर क्लिक करा. |
07:45 | आणि, Sidebar first मधे block ठेवू या. Place block वर क्लिक करा. आपल्याकडे Book navigation मेनू आहे. |
07:56 | Place block वर क्लिक करून 'Save block' वर क्लिक करा. |
08:01 | Save blocks वर क्लिक करून साईट वर जा. येथे Book navigation, Our Drupal Manual आणि Installing Drupal आहे. |
08:14 | आपण नवीन child pages समाविष्ट करताना हे गरजेनुसार छोटे होईल किंवा विस्तारेल. |
08:21 | लक्षात घ्या, drupal.org वर जाऊन user manual किंवा documentation च्या माध्यमातून ब्राउज करा. ह्यासाठी हे Book module चा उपयोग करत आहे. |
08:35 | अशा प्रकारचे कंटेंट आपल्या साईटसाठी आवश्यक असल्यास हे अतिशय प्रभावशाली आहे. येथे तुम्ही title आणि body पर्यंतच सीमित नाहीत. |
08:47 | आपण Content type मधे fields समाविष्ट करू शकतो जी Book module सोबत येतात. |
08:53 | forum मुळे आपल्या वेबसाइटला खरोखर फायदा होणार असल्यास Forum module अतिशय उपयुक्त आहे. |
09:01 | Content वर क्लिक करून Add content वर क्लिक करा. |
09:07 | Forum module प्रत्यक्षात Forum topic नावाचा नवा Content type तयार करेल. |
09:13 | हा field able आहे, म्हणजेच आपण फक्त title आणिbody पुरतेच सीमित नाही. |
09:21 | Forum topic वर क्लिक करा. forum topic ला Learning Drupal असे नाव द्या. Forums च्या ड्रॉपडाऊनमधे General discussion पर्याय निवडा. |
09:35 | नंतर body मधे Hi, I’m just learning Drupal. Can someone help me?" टाईप करा. |
09:42 | Save and publish वर क्लिक करा। |
09:45 | आता हे Forum Content type मधे असल्यामुळे comments समाविष्ट करून प्रतिक्रिया द्या. |
09:53 | येथे Sure I can help. You should just read everything at Drupalville! ही कॉमेंट समाविष्ट करून Save वर क्लिक करा. |
10:07 | आपण सुपर युजर म्हणून लॉगिन केले असल्यामुळे त्याला आपोआप मंजूरी दिली गेली आहे. |
10:14 | General discussion वर क्लिक केल्यावर आपल्याला एक जनरल डिस्कशन दिसेल. |
10:21 | Learning Drupal नावाचा Forum topic एका कॉमेंट सहित दाखवत आहे. |
10:25 | कॉमेंटवर क्लिक करून आपण कॉमेंटस समाविष्ट करू शकतो. अशाप्रकारे आपण सर्व प्रकारचे forums बनवू शकतो. |
10:37 | Forums वर क्लिक करा. |
10:41 | नवा forum topic समाविष्ट करण्यासाठी येथे क्लिक करा, जे general discussion असेल. परंतु administrator म्हणून तुम्हाला यापेक्षा आणखी वेगळे forums समाविष्ट करायला लागू शकतात. |
10:55 | आता हे करून बघू. Structure वर क्लिक करून नंतर Forums वर क्लिक करा. येथे नवे forums आणि containers समाविष्ट करू शकतो. |
11:07 | forum समाविष्ट करायचा असल्यास तो करू शकतो. आणि मी त्याचा हवा तसा क्रम लावू शकते. |
11:18 | Content वर जा आणि नंतर Add content वर जाऊन Forum topic वर जा. आता हे इतर forums मधे ठेवण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. |
11:31 | अशा प्रकारे आपण ड्रुपल वेबसाइट वर forum चे व्यवस्थापन करू शकतो. |
11:38 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
या पाठात,
|
12:05 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे |
12:16 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
12:25 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
12:35 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:49 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |