Drupal/C2/Configuration-Management-in-Admin-Interface/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या “कॉनफिगरेशन मॅनेजमेंट इन ऍडमिन इंटरफेस” वरील पाठात आपले स्वागत. |
00:09 | या पाठात आपण काही मेनू आयटम्सबद्दलही पाहू. जसे की,
|
00:13 | एक्सटेंड |
00:15 | कॉनफिगरेशन |
00:16 | पीपल आणि |
00:18 | रिपोर्ट |
00:20 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
|
00:29 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:34 | आपण आधी बनवलेली वेबसाईट उघडू.
|
00:38 | आधी उल्लेख केल्याप्रमाणे ड्रुपल हे फ्रेमवर्कप्रमाणे आहे. त्यामुळे ते प्रत्यक्षात फारसे काही करत नाही. |
00:45 | आपण आपली साईट बनवायला सुरूवात करतो तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारवरील Extend ही लिंक अतिशय महत्वाची असते. |
00:53 | Extend वर क्लिक करा. हे आपल्याला साईटवरील सर्व Modules चा आढावा देईल. |
01:00 | Modules ही फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये आहेत. |
01:02 | आपण त्याबद्दल नंतर सविस्तर जाणून घेऊ. |
01:06 | ड्रुपल सोबत आलेल्या काही Modules ची ही सूची आहे. |
01:11 | चेकमार्क्समुळे आपल्याला कळू शकते की त्यापैकी कोणती एनेबल्ड आहेत आणि कोणती नाहीत. |
01:18 | आपल्या ड्रुपल साईटवर एनेबल केलेली सर्व Modules किंवा वैशिष्ट्ये Extend मेनूमधे पाहू शकतो. |
01:26 | या संपूर्ण मालिकेत आपण साईटमधे अनेक Modules समाविष्ट करणार आहोत. |
01:32 | आता कॉनफिगरेशन मेनूबद्दल जाणून घेऊ. हा भाग केवळ साईटचे ऍडमिनिस्ट्रेटर्सच ऍक्सेस करू शकतात. |
01:41 | आपण सुपर युजर किंवा युजर नंबर एक असल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींना ऍक्सेस आहे. |
01:47 | आपण स्क्रीनवर लाल रंगाचा पॉपअप बघू शकतो. |
01:51 | तुम्हाला हा स्क्रीन कदाचित दिसणार नाही. |
01:54 | हे स्टेटस रिपोर्ट कार्यान्वित नसल्याचे आणि मला माझी ड्रुपल साईट अपडेटेड आहे का हे तपासण्यास सांगत आहे. |
02:03 | याकडे आत्ता दुर्लक्ष करू. Reports स्क्रीन बद्दल बघताना त्याकडे पाहू. |
02:09 | या मेनूद्वारे आपल्याला साईटचे विविध पैलू कॉनफिगर करण्यास ऍक्सेस मिळतो. |
02:16 | जसे की - Site information, Account settings, Text formats and editors, Performance issues, Maintenance mode, Image styles, इत्यादी. |
02:30 | आपण पुढील भागात याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. |
02:35 | सध्या आपण आपल्या साईटची माहिती अपडेट करू. |
02:39 | Site information वर क्लिक करा. आपल्या साईटचे नाव बदलून Drupalville करा आणि
Slogan, मधे टाईप करा - "A Great Place to Learn All About Drupal." |
02:53 | जेव्हा जेव्हा आपण अशाप्रकारचे बदल करतो ते बदल पूर्ण साईटमधे होतात. |
02:58 | कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम्सची ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. |
03:04 | त्यामुळे आता आपल्या साईटमधे एक पान असेल किंवा हजार पाने असली तरी साईटच्या प्रत्येक पानाच्या वरच्या भागात Drupalville हे नाव दिसेल. |
03:16 | static HTML च्या तुलनेत ही खूप मोठी सुधारणा आहे. |
03:21 | तसेच या पानावर आपल्याला Email address देता येईल जो स्वचलित इमेल्ससाठी From address असेल. |
03:29 | आपण वेगळे मुखपृष्ठ आणि डिफॉल्ट 403 आणि 404 पाने तयार करू शकतो. |
03:37 | लक्षात घ्या ड्रुपलमधील प्रत्येक पेज हा वेबफॉर्म आहे. |
03:41 | त्यामुळे प्रत्येक वेळी ड्रुपल पेज बदलल्यावर Submit किंवा Save क्लिक करणे आवश्यक आहे. |
03:49 | खालच्या भागात असलेल्या Save configuration बटणावर क्लिक करा. |
03:54 | नंतर Back to site वर क्लिक करा. |
03:58 | आता आपल्या साईटचे नाव Drupalville झाले असून साईटच्या प्रत्येक पानावर स्लोगन दिसत आहे. |
04:06 | पुढील पाठात कॉनफिगरेशन मेनूबद्दल सविस्तर जाणून घेऊ. |
04:12 | ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार वरील People वर क्लिक करा. |
04:16 | हे आपल्याला ड्रुपल साईटच्या People या भागात घेऊन जाईल. |
04:20 | आपल्याला List, Permissions आणि Roles हे टॅब्ज दिसतील. |
04:26 | आत्ता केवळ परिचय करून घेऊ. त्याबद्दल सविस्तर माहिती नंतर जाणून घेऊ. |
04:32 | Roles सेक्शनमधे आपल्याला युजर अकाऊंटस बनवता येतात, लोकांना साईटवर काय पाहता येईल आणि ते काय करू शकतील याच्या पर्मिशन्स देता येतात. |
04:44 | येथे admin हे युजरनेम आहे. |
04:47 | Edit वर क्लिक केल्यावर आपण स्वतःच्या युजर अकाउंट बद्दल सर्व काही येथे पाहू शकतो. |
04:54 | तुम्हाला सध्याचा पासवर्ड माहित असल्यास तुम्ही तो बदलू शकता. |
04:59 | तुम्हाला तो माहित नसल्यास त्यासाठी येथे reset चा पर्याय आहे. येथे हे आपल्याला Administrator चा Role असल्याचे सांगत आहे. |
05:09 | माझे स्टेटस Active असून आपल्याकडे स्वतःचा Personal contact form आणि आपले LOCATION SETTINGS आहे. |
05:21 | Picture खालील Browse वर क्लिक करून तुम्ही स्वतःचे चित्र बदलू किंवा समाविष्ट करू शकता. |
05:29 | म्हणजेच आपण येथे आपल्या स्वतःच्या प्रोफाईलचे व्यवस्थापन करू शकतो. Save वर क्लिक करा. |
05:37 | थोडक्यात - Roles टॅबद्वारे आपण विविध रोल्स समाविष्ट करू शकतो. |
05:42 | Permissions टॅबमधे त्या रोल्सना आपण काही पर्मिशन्स प्रदान करू शकतो.
|
05:48 | आणि List टॅबमधे आपण त्या रोल्सना युजर असाईन करू शकतो. |
05:54 | त्यांना काही पर्मिशन्स मिळतील ज्याद्वारे ते ड्रुपल साईटवरील काही भाग पाहू शकतील आणि काही विशिष्ट काम करू शकतील. |
06:04 | People या भागात आपण आपल्या ड्रुपल साईटवरील सर्व युजर्सचे व्यवस्थापन करू शकतो. |
06:10 | शेवटी आपण ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार वरचा Reports हा भाग बघणार आहोत. |
06:16 | Reports वर क्लिक करा. |
06:18 | हे काही महत्वाच्या गोष्टींची सूची दाखवेल ज्या आपल्याला ड्रुपल साईटबद्दल माहित असणे गरजेचे आहे. |
06:25 | उदाहरणार्थ – काही अपडेटस उपलब्ध आहेत का? |
06:28 | अलीकडील लॉग मेसेजेस |
06:31 | entity types मधील सर्व फिल्डसची सूची |
06:36 | स्टेटस रिपोर्टस, |
06:37 | “access denied” आणि "Page not found” या मुख्य एरर्स |
06:42 | मुख्य search phrases, आणि काही plugins ज्या आपल्या Views साठी गरजेच्या असतात. |
06:49 | Available updates वर क्लिक करा. हे अपडेट करण्याची आवश्यकता असलेल्या सर्व गोष्टींची सूची दाखवेल. |
06:58 | 48 मिनिटांपूर्वी शेवटचे अपडेट असल्याचे आपल्याला दिसत आहे. |
07:04 | हे Cron द्वारे मॅनेज केले जाते. आपल्या सर्व्हरवर याचा सेटप करणे गरजेचे आहे. |
07:10 | सध्या केवळ Check manually वर क्लिक करा. |
07:15 | आता ड्रुपल आपण इन्स्टॉल केलेल्या सर्व गोष्टी तपासेल आणि अप-टू-डेट आहोत का हे सांगेल. |
07:24 | आपल्या साईटवर आणखी Modules किंवा वैशिष्ट्ये समाविष्ट केल्यास येथे ही मोठी सूची असेल. |
07:32 | हया पाठांत आपण हे नंतर परत बघणार आहोत. |
07:37 | आपल्या साईटच्या Status report साठी Reports वर क्लिक करा. |
07:42 | उदाहरणार्थ आपल्याकडे ड्रुपलचे कोणते वर्जन आहे आणि Cron शेवटचे केव्हा कार्यान्वित केले गेले. |
07:49 | येथे ही लिंक पाहू शकतो जिच्या सहाय्याने आपण Cron बाहेरून कार्यान्वित करू शकतो. |
07:55 | आपली डेटाबेस सिस्टीम, डेटाबेस वर्जन इत्यादी. |
08:00 | तुमच्या साईटच्या Reports सेक्शनवर बारीक नजर ठेवावी, |
08:05 | विशेषतः तुमच्यावर ड्रुपलचे आणि तुम्ही डाऊनलोड केलेल्या सर्व Modules चे अपडेटस कायम राखण्याची जबाबदारी असल्यास. |
08:14 | शेवटी आपल्याकडे Help पर्याय आहे. Help आपल्याला आपल्या साईटच्या हेल्प पेजच्या लिंक्स देतील. |
08:22 | अशाप्रकारे आपण ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारबद्दल जाणून घेतले. |
08:26 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
|
08:32 | आपण या पाठात हे मेनू आयटम्स जाणून घेतले.
|
08:52 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
09:03 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
09:11 | प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
|
09:19 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
09:32 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
|