Inkscape/C2/Basics-of-Bezier-Tool/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | इंकस्केपमधील “Basics of Bezier tool” वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत: |
00:08 | * सरळ रेषा आणि बंदिस्त आकार काढणे |
00:11 | * वक्र रेषा काढणे |
0013 | * नोडस समाविष्ट, एडिट आणि डिलिट करणे. |
00:15 | या पाठासाठी वापरणार आहोत- |
00:18 | * उबंटु लिनक्स 12.04 OS |
00:21 | * इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00:24 | मी हा पाठ जास्तीत जास्त रेझोल्युशन वापरून रेकॉर्ड करीत आहे.
|
00:28 | यामुळे सर्व टूल्सची प्रात्यक्षिके दाखवता येतील. |
00:32 | इंकस्केप उघडू. |
00:35 | प्रथम Bezier tool द्वारे सरळ रेषा काढा. |
00:39 | Pencil tool च्या खालोखाल Bezier tool आहे. |
00:42 | त्यावर क्लिक करा. |
00:44 | वरच्या बाजूला डावीकडे टूल कंट्रोल्स बारमधे चार पर्याय दिसतील. |
00:48 | Bezier वक्र रेषा काढण्याच्या चार पध्दती आहेत. |
00:51 | डिफॉल्ट रूपात Create regular Bezier path पर्याय निवडलेला असतो. |
00:57 | कॅनव्हासवर एकदा क्लिक करून कर्सर दुस-या बाजूला सरकवा. |
01:01 | पुन्हा एकदा क्लिक करा. हिरव्या रंगात हायलाईट केलेली रेष काढलेली दिसेल. |
01:07 | रेष पूर्ण करण्यासाठी राईट क्लिक करा. |
01:11 | रेषेच्या दोन्ही अंतिम बिंदूंना नोडस म्हणतात. त्याबद्दल नंतर जाणून घेऊ. |
01:17 | आता त्रिकोण काढू. |
01:21 | प्रथम तिरपी रेष काढा. एकदा क्लिक करून कोन तयार होईल अशी आणखी एक रेषा काढा. |
01:27 | तिसरी रेषा काढण्यासाठी आणखी एकदा क्लिक करा. त्रिकोण पूर्ण करण्यासाठी ती रेष सुरवातीच्या नोडला जोडा. |
01:34 | पुढे Bezier tool द्वारे वक्र रेषा काढू. |
01:38 | सरळ रेषा काढण्यासाठी कॅनव्हासवर क्लिक करा. पुन्हा क्लिक आणि होल्ड करून वक्र रेषा बनेपर्यंत ड्रॅग करा. |
01:46 | वक्र रेषा पूर्ण करण्यासाठी राईट क्लिक करा. |
01:48 | अशाप्रकारे कॅनव्हासवर आणखी काही वक्र रेषा काढा. |
01:55 | या पाय-या लक्षात ठेवा - 1. क्लिक करून सरळ रेषा काढा. |
01:59 | 2. पुन्हा क्लिक करा. बटण होल्ड करून वक्र रेषा बनेपर्यंत ड्रॅग करा. |
02:03 | 3. वक्र रेषा पूर्ण करण्यासाठी राईट क्लिक करा. |
02:06 | Ctrl + A दाबा आणि पुढे जाण्यापूर्वी कॅनव्हास रिकामा करून घ्या. |
02:11 | पुढे बंदिस्त वक्र रेषा कशी काढायची ते जाणून घेऊ. |
02:15 | कॅनव्हासवर प्रथम वक्र रेषा काढू. |
02:18 | माऊसचे बटण सोडा. वक्र रेषेच्या शेवटच्या नोडपासून कर्सर दूर सरकवा. |
02:23 | वक्ररेषा लाल रंगात दिसेल. |
02:27 | एकदा क्लिक करून कर्सर हलवल्यास लाल रंगातील सरळ रेषा दिसेल. त्याची वक्ररेषा बनवण्यासाठी क्लिक करून ड्रॅग करा. |
02:36 | शेवटचा नोड हलवू त्याप्रमाणे रेषा वक्र होईल. |
02:41 | पुन्हा एकदा क्लिक करा. लाल रंगात सरळ रेषा दिसेल. ती वक्र करण्यासाठी क्लिक करून ड्रॅग करा. |
02:50 | पुन्हा शेवटचा नोड हलवू. त्याप्रमाणे रेषा वक्र होईल. कर्सर सुरवातीच्या नोडपर्यंत घेऊन जा आणि हा पाथ पूर्ण करा. |
02:59 | टूल कंट्रोल्स बारवर जा. मोडच्या दुस-या आयकॉनवर क्लिक करा. याद्वारे अनियमित आणि स्पायरल पाथ बनवता येतात. |
03:08 | काही अनियमित वक्ररेषा काढून पाथ बंदिस्त करा. |
03:15 | हे बंदिस्त स्पायरल आकारात रुपांतरित झालेले दिसेल. आता कॅनव्हास रिकामा करू. |
03:22 | तिसरा आयकॉन केवळ सरळ रेषा काढतो. त्यावर क्लिक करून कॅनव्हासवर रेषा काढा. |
03:29 | या मोडमधे वक्र रेषा काढू शकत नाही. |
03:32 | सरळ बाजू असलेला त्रिकोण किंवा बहुभुजाकृती काढता येते. |
03:40 | शेवटच्या आयकॉनवर क्लिक करून कॅनव्हासवर रेखाटन करू. |
03:44 | या मोडमधे केवळ समांतर आणि लंबरेषा म्हणजेच उभ्या किंवा आडव्या रेषा काढू शकतो. |
03:52 | म्हणजे या मोडमधे चौरस आणि आयत काढू शकतो. |
03:58 | काढलेले सर्व आकार डिलिट करू. |
04:02 | Shape पर्याय सरळ आणि वक्र रेषा विशिष्ट आकारात काढायला मदत करतात. |
04:07 | ड्रॉप डाऊनवर क्लिक करा. |
04:09 | येथे पाच पर्याय आहेत- None, Triangle in, Triangle out, Ellipse, From clipboard. |
04:18 | None हा पहिला पर्याय कुठलाही इफेक्ट दाखवत नाही. Triangle in हा पर्याय पाहू. |
04:25 | त्यावर क्लिक करून कॅनव्हासवर एक रेष काढा. |
04:28 | रेषा आतील बाजूस रुंद झालेल्या त्रिकोणाकृतीत बदलेल. |
04:34 | पुढे Triangle out वर क्लिक करून कॅनव्हासवर रेष काढा. |
04:39 | बाहेरच्या बाजूला रुंद होत गेलेली त्रिकोणाकृती तयार होईल. |
04:43 | Ellipse वर क्लिक करून रेष काढा. |
04:47 | रेषा लंबगोलात बदललेली दिसेल. |
04:50 | From clipboard या शेवटच्या पर्यायाबद्दल पुढील पाठात जाणून घेऊ. |
04:56 | आता नोडस कसे समाविष्ट, एडिट आणि डिलिट करायचे हे जाणून घेऊ. |
05:00 | हे नोड टूलद्वारे करता येते. |
05:03 | कॅनव्हासवरील रेषा डिलिट करा. |
05:06 | टूल कंट्रोल्स बारवर जा. Mode साठी regular path आणि Shape साठी None निवडा. |
05:13 | कॅनव्हासवर परत जाऊन माणसाच्या तळहातासारखी दिसणारी कच्ची आकृती काढा. |
05:23 | आता Node टूलवर क्लिक करा. |
05:26 | आकृतीतील सर्व नोडस आता दिसत आहेत. |
05:30 | टूल कंट्रोल्स बारकडे लक्ष द्या. |
05:33 | येथील पहिले सहा पर्याय, नोड आणि पाथ समाविष्ट आणि डिलिट करण्यास मदत करतात. |
05:38 | अधिक चांगल्याप्रकारे समजण्यासाठी टूल टीप वाचा. |
05:41 | कुठल्याही रेषाखंडावर क्लिक करा. दोन्ही नोडस निळे झालेले दिसतील. |
05:48 | Add node पर्यायावर क्लिक करा. |
05:52 | सिलेक्ट केलेल्या रेषाखंडाच्या नोडसच्या बरोबर मध्यात नवा नोड समाविष्ट झाला आहे. |
05:58 | आता त्यातील छोटा रेषाखंड सिलेक्ट करून वरील स्टेप्स पुन्हा करा. |
06:04 | छोट्या रेषाखंडाच्या मध्य भागात नवा नोड समाविष्ट झालेला दिसेल. |
06:10 | नव्याने समाविष्ट केलेला नोड सिलेक्ट करा. |
06:13 | Delete node पर्यायावर क्लिक करा. नोड डिलिट झाला आहे. |
06:18 | तळहातावरील कुठल्याही एका नोडवर क्लिक करा. |
06:21 | Bezier handle दिसण्यासाठी टूल कंट्रोल्स बारवरील शेवटून दुस-या आयकॉनवर क्लिक करा. |
06:27 | सिलेक्ट केलेल्या रेषाखंडासाठी आता Bezier handles दिसतील. |
06:32 | नसल्यास केवळ रेषाखंडावर क्लिक करा. माऊसचे बटण न सोडता तो थोडासा सरकवा. |
06:37 | रेषाखंड वक्र होईल आणि Bezier handles आता दिसू लागतील. |
06:41 | निवडलेल्या नोडचा आकारात फेरबदल करण्यासाठी handles क्लिक करा. |
06:45 | अशाचप्रकारे इतर नोडसमधे देखील बदल करा. |
07:04 | पुढील आयकॉन नोडसना जोडायला मदत करेल. |
07:07 | तर्जनीवर अतिरिक्त नोड दिसेल. |
07:11 | मध्यातील आणि सर्वात वरचा अतिरिक्त नोड शिफ्ट बटणाच्या सहाय्याने सिलेक्ट करा. |
07:18 | Join node च्या आयकॉनवर क्लिक करा. आता नोडस एकमेकांना जोडले गेलेले दिसतील. |
07:25 | पुढील आयकॉन सिलेक्ट केलेल्या नोडसचा पाथ वेगळे करण्यास मदत करतो. |
07:29 | अंगठा आणि तर्जनीतील जोड आता काढून टाकू. |
07:33 | हा जोडणारा मधला नोड सिलेक्ट करा आणि Break path आयकॉनवर क्लिक करा. |
07:40 | नोड अनसिलेक्ट करा. नंतर पुन्हा सिलेक्ट करून ते थोडे सरकवा. |
07:46 | पाथ तुटलेला दिसेल आणि नोडस दोन भिन्न नोडसमधे विभक्त होतील. |
07:53 | ते जोडण्यासाठी हेच दोन नोडस सिलेक्ट करा आणि टूल कंट्रोल्स बारच्या Join selected end-nodes आयकॉनवर क्लिक करा. |
08:03 | या दोन नोडसमधे नवा पाथ तयार झालेला दिसेल. |
08:08 | पाथ किंवा रेषाखंड काढून टाकण्यासाठी Delete segment वर क्लिक करा. पाथ काढला गेला आहे. |
08:17 | Ctrl + Z दाबून undo करा. |
08:20 | आता हा हात बाजूला ठेवा. पुन्हा एकदा नोड टूलवर क्लिक करा. |
08:26 | टूल कंट्रोल्स बारवरील पुढील चार आयकॉन्स कसे वापरायचे ते पाहू. |
08:30 | हे आयकॉन्स सिलेक्ट केलेले नोडस एडिट करण्यास मदत करतात. |
08:34 | Bezier tool द्वारे उलटा U काढा. Node टूलवर क्लिक करा. तीन नोडस दिसतील. |
08:49 | वरचा नोड निवडा. टूल कंट्रोल्स बारवरील Make selected nodes corner वर क्लिक करा. |
08:55 | ह्यामुळे तो कोप-यातील नोड बनेल. |
08:58 | Bezier handles वर क्लिक करून ते वर आणि खाली सरकवा आणि होणारे बदल बघा. |
09:03 | नोड सफाईदार होण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा. आकारात होणारे बदल बघा. |
09:11 | नोड सममित करण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा. |
09:16 | नोड ऑटो स्मूथ करण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा.
|
09:20 | पुढील दोन आयकॉन्स केवळ रेषाखंडावरच कार्य करतात. U आकारातील डावा रेषाखंड निवडून पहिल्या आयकॉनवर क्लिक करा. |
09:30 | टूल टीपनुसार आता हा रेषाखंड सरळ रेषेत बदलेल. |
09:35 | Bezier handle क्लिक करा आणि हलवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला दिसेल की ते वक्र करता येत नाही. |
09:44 | ती पुन्हा वक्ररेषा करण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा.
|
09:49 | आता Bezier handles हलवा. आता ते वक्र आकारात बदलता येत आहे. |
09:54 | पुढील आयकॉन सिलेक्ट केलेले ऑब्जेक्ट पाथमधे रूपांतरित करेल. |
09:58 | पुढील आयकॉन स्ट्रोक पाथ मधे रूपांतरित करेल. |
10:02 | स्ट्रोक्स दिसण्यासाठी नोडस वर क्लिक करून ते ड्रॅग करा. |
10:08 | पुढील दोन आयकॉन्स निवडलेले नोडस अनुक्रमे X आणि Y अक्षांवर सरकवायला मदत करतात. |
10:15 | अप आणि डाऊनच्या बाणांवर क्लिक करून होणारे बदल बघा. |
10:24 | पुढील दोन आयकॉन्स पाथवर क्लिपींग आणि मास्किंग इफेक्टस असतील तरच काम करतात. |
10:29 | हे पर्याय तुम्ही स्वतः वापरून पहा. |
10:33 | थोडक्यात,
|
10:34 | पाठात शिकलो: |
10:37 | * सरळ रेषा आणि बंदिस्त आकार काढणे |
10:39 | * वक्र रेषा काढणे |
10:41 | * नोडस समाविष्ट, एडिट आणि डिलिट करणे. |
10:43 | असाईनमेंट - |
10:46 | Bezier tool द्वारे पाच पाकळ्या, एक देठ आणि दोन पाने काढा. |
10:52 | पाकळ्यांना गुलाबी रंग द्या. |
10:54 | देठ आणि पानांना हिरवा रंग द्या. |
10:57 | पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसली पाहिजे. |
11:00 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:05 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:12 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
11:14 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:20 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:24 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:26 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
|