BASH/C2/More-on-Loops/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:13, 19 December 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: More on Loops Author: Manali Ranade Keywords: video tutorial, Bash shell, for loop

Time Narration
00:01 नमस्कार. Nested for loop in BASH वरील पाठात आपले स्वागत.


00:07 या पाठात, काही उदाहरणांच्या सहाय्याने Nested for loop शिकणार आहोत.
00:13 ह्या पाठासाठी आपण वापरू, उबंटु लिनक्स 12.04 OS आणि GNU BASH वर्जन 4.1.10
00:24 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:31 ह्या पाठासाठी Bashमधील लूप संबंधीचे ज्ञान असावे.
00:37 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:43 सुरूवातीला nested लूपची प्राथमिक ओळख करून घेऊ.
00:46 लूपमधील लूपला nested लूप म्हणतात.
00:51 सिंटॅक्स पाहू. बाहेरील for लूप एक्सप्रेशन 1, 2, 3
00:57 आतील for लूप एक्सप्रेशन 1, 2, 3
01:01 स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2
01:04 आतील for लूप समाप्त. बाहेरील for लूप समाप्त.
01:09 nested for लूपचे उदाहरण पाहू.
01:12 प्रथम डिरेक्टरीची रचना पाहू.
01:17 येथे Desktop वर simple-nested-for नावाची डिरेक्टरी आहे. ती उघडू.
01:24 आपल्याकडे test, test2 आणि test3 ह्या सबडिरेक्टरीज आणि Bash स्क्रिप्ट आहे.
01:31 प्रत्येक सबडिरेक्टरीत अनेक text फाईल्स आहेत.
01:36 आता आपला कोड बघू.
01:39 हा प्रोग्रॅम प्रत्येक सबडिरेक्टरीमधे असणा-या सर्व फाईल्स दाखवेल.
01:45 कृपया लक्षात घ्या की हे सर्व आपण पुढील एका कमांडने करू शकतो. ls -1 (hyphen one) -R(hyphen R) test*(test asterix)
01:53 परंतु येथे हे for लूपच्या सहाय्याने करणार आहोत.
01:58 nested-(Hyphen)for dot sh हे Bash स्क्रिप्टचे नाव आहे.
02:05 ही shebang line आहे.
02:08 हे बाहेरील for लूप आहे.
02:10 हे for लूप testनावाने सुरूवात होणा-या डिरेक्टरीज तपासेल.
02:15 पहिली echo लाईन सबडिरेक्टरीजची नावे दाखवेल.
02:21 दुसरी echo रिकामी ओळ प्रिंट करेल.
02:25 हे आतील for लूप आहे. हे डिरेक्टरीजमधील असलेल्या फाईल्स तपासेल.
02:32 ls डिरेक्टरीमधील घटक दाखवेल.
02:36 -1 (हायफन वन) हे एका ओळीवर एक फाईल दाखवण्यासाठी वापरले जाते.
02:41 येथे फाईल्सची सूची दाखवणार आहोत.done च्या सहाय्याने आतील for लूप पूर्ण होईल.
02:45 ही कमांड बाहेरील for लूपची प्रत्येक सायकल पूर्ण झाल्यावर आडवी ओळ प्रिंट करेल.


02:53 done ने बाहेरील for लूप पूर्ण होते.
02:57 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:58 कीबोर्डवरील Ctrl+Alt आणि T ही बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडा.


03:08 आता Bash स्क्रिप्ट डिरेक्टरीवर जाऊ.
03:13 ती Desktopवर आहे.
03:15 टाईप करा cd Desktop. आता simple-(Hyphen)nested-(Hyphen)for फोल्डरमधे जाऊ.
03:22 एंटर दाबा.
03:24 टाईप करा chmod plus +x nested-(Hyphen)for dot sh
03:32 एंटर दाबा.
03:34 टाईप करा dot slash nested-(Hyphen)for dot sh
03:39 एंटर दाबा.
03:40 आऊटपुट दाखवले जाईल. हे test डिरेक्टरीमधील फाईल्स test2 डिरेक्टरीमधील फाईल्स आणि test3 डिरेक्टरीमधील फाईल्स दाखवेल.
03:52 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
03:56 थोडक्यात, या पाठात शिकलो,Nested for लूपची माहिती.
04:02 असाईनमेंट म्हणून,
04:04 nested (hyphen)-for dot sh हे bash स्क्रिप्ट nested while लूप वापरून पुन्हा लिहा.
04:11 तुमचा प्रोग्रॅम 'nested-(hyphen)while Dot sh' नावाने सेव्ह करा.
04:17 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.


04:23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.


04:37 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
04:45 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


04:57 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:03 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
05:08 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, Ranjana