BASH/C2/Case-statement/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Case Statement in BASH
Author: Manali Ranade
Keywords: video tutorial, Bash shell, case
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Case statement in Bash. वरील पाठात आपले स्वागत.
|
00:07 | या पाठात case स्टेटमेंटचे मह्त्व आणि उदाहरणासहित त्याचा सिंटॅक्स समजून घेऊ. |
00:17 | ह्या पाठासाठी, Shell स्क्रिप्टींगचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:23 | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
|
00:29 | ह्या पाठासाठी आपण उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
GNU BASH वर्जन 4.1.10 वापरू. |
00:39 | पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
|
00:47 | Bash shell मधे दोन प्रकारची कंडिशनल स्टेटमेंटस असतात. if स्टेटमेंट आणि case स्टेटमेंट. |
00:56 | if-else स्टेटमेंटच्या जागी Case स्टेटमेंट वापरता येऊ शकते. |
01:03 | अनेक गोष्टींमधून निवड करायची असल्यास case स्टेटमेंटला पसंती दिली जाते. |
01:09 | सहसा स्क्रिप्टमधील मेनूज कार्यान्वित करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. |
01:14 | आता सिंटॅक्स पाहू. |
01:15 | case space $(dollar)VARIABLE space in match_1 close round brackets space commands and semicolon twice |
01:27 | match_n close round bracket space commands and semicolon twice asterisk close round bracket space command_to_execute_by_default and semicolon twice esac |
01:45 | VARIABLE match_1बरोबर जुळवून बघितले जाईल. |
01:48 | ते न जुळल्यास, ते match_n ह्या पुढील केसवर जाईल. |
01:54 | VARIABLE दिलेल्या कुठल्याही एखाद्या स्ट्रिंगशी जुळतो का ते तपासले जाईल. |
02:01 | जुळल्यास डबल सेमीकोलन (;;) पर्यंत सर्व कमांड कार्यान्वित होतील. |
02:07 | VARIABLEकुठल्याच स्ट्रिंगशी न जुळल्यास asterisk सोबतच्या कमांड कार्यान्वित होतील.
|
02:14 | ही डिफॉल्ट case कंडिशन आहे कारण asterisk सर्व स्ट्रिंगशी जुळतो. |
02:21 | esac हे case ब्लॉक पूर्ण झाल्याचे दाखवते. |
02:26 | case स्टेटमेंट उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ. |
02:32 | मी case.sh फाईलमधे प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे. तो उघडू.
|
02:38 | उपलब्ध डिस्क स्पेस विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचल्यावर तशी सूचना देणारा मेसेज हा प्रोग्रॅम प्रिंट करेल. |
02:45 | ही shebang lineआहे. |
02:47 | CentOS, RedHat इत्यादी इतर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीममधे bash चे लोकेशन वेगळे असू शकते. |
02:55 | आधी वापरलेला पाथ /bin/bash थेट binary फाईलला निर्देश करतो. |
03:01 | येथे वापरलेला env bash च्या ख-या लोकेशनचा गोषवारा देतो. |
03:07 | shebang लाईनमधील ह्या सुधारणेमुळे स्क्रिप्ट कुठल्याही GNU/Linux सिस्टीमवर चालू शकेल. |
03:16 | df -(hyphen)h मुळे डिस्कवरील जागा वाचण्यायोग्य पध्दतीने दाखवली जाते. |
03:22 | आऊटपुट sort -rk5 कडे पाठवले जाईल, जे पाचवा कॉलम उलट्या क्रमाने सॉर्ट करेल. |
03:31 | नंतर आऊटपुट awk 'FNR == 2 {print $5}' कडे पाठवले जाईल. |
03:38 | जे दुस-या ओळीचे पाचवे फिल्ड मिळवेल. |
03:43 | शेवटी आऊटपुट cut -(hyphen)d “%” -(hyphen)f1 कडे पाठवून त्यातील % sign काढेल. |
03:55 | ही case स्टेटमेंटची पहिली ओळ आहे. |
03:59 | येथे space 0 ते 69 मधील व्हॅल्यूशी जुळवून बघू. |
04:04 | हे जुळल्यास, “Everything is OK” असे प्रिंट करेल. |
04:08 | पुढे हे space 70 ते 89 च्या मधील किंवा 91 पासून 98 पर्यंतच्या व्हॅल्यूशी तुलना करेल. |
04:17 | जुळल्यास “Clean out. There's a partition that is $(dollar)space % full.” असे प्रिंट केले जाईल. |
04:27 | येथे space 99 सोबत जुळवून बघितली जाईल. |
04:30 | ती जुळल्यास “Hurry. There's a partition at $(Dollar) space %!”असे प्रिंट केले जाईल.
|
04:39 | ही केसची डिफॉल्ट कंडिशन आहे कारण asterisk सर्व स्ट्रिंग्जशी जुळते. |
04:45 | येथे caseस्टेटमेंट पूर्ण झाले आहे. |
04:48 | आता टर्मिनलवर जाऊन फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवू. |
04:52 | टाईप chmod space plus x space case dot sh |
04:57 | टाईप dot slash case dot sh |
05:02 | Everything is OK. लक्षात घ्या तुमच्या डिस्कस्पेसनुसार आऊटपुट बदलेल. |
05:10 | माझ्या मशीनसाठी हे 0 आणि 69 मधील व्हॅल्यूबरोबर जुळले आहे. हे Everything is OK. प्रिंट करेल. |
05:18 | तुमच्या मशीनसाठी कोणता मेसेज प्रिंट होतो ते तपासा. |
05:20 | त्यानुसार कोणते case स्टेटमेंट कार्यान्वित झाले हे तुम्हाला समजून घेता येईल. |
05:27 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
|
05:31 | पाठात शिकलो, caseस्टेटमेंटचे महत्त्व. आणि डिस्क स्पेसच्या उदाहरणाच्या सहाय्याने त्याचा सिंटॅक्स समजून घेतला. |
05:41 | असाईनमेंट म्हणून,
|
05:42 | गणिती क्रिया करण्याचा मेनूसहित प्रोग्रॅम लिहा. |
05:47 | हा a आणि bअसे युजर इनपुट घेईल. |
05:51 | (बेरीज +, वजाबाकी -, भागाकार / आणि गुणाकार *) ह्यापैकी गणिती क्रियांबद्दल विचारेल. मूल्यमापन करून आऊटपुट प्रिंट करेल. |
06:01 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
06:06 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:08 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
|
06:14 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
06:16 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
|
06:23 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
06:31 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
|
06:35 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:48 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
|
06:53 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |