GChemPaint/C3/Features-and-Color-Schemes/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Features-and-Color-Schemes
Author: Manali Ranade
Keywords: Periodic table of the element buttons, Elemental window, Color Schemes, Video tutorial
Time | Narration |
---|---|
00:01 | नमस्कार. GChemTable मधील Features and Color Schemes वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोत, |
00:11 | * GChemTable |
00:12 | * एलिमेंटल विंडो आणि रंगसंगती. |
00:16 | त्यासाठी आपण, |
00:19 | उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04, |
00:22 | GChemPaint वर्जन 0.12.10.आणि |
00:27 | GChemTable वर्जन 0.12.10 वापरू. |
00:32 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, |
00:35 | * मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि * GChemPaint ची माहिती असावी. |
00:41 | नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:46 | GChemTable ह्या अॅप्लिकेशनबद्दल जाणून घेऊ. |
00:50 | GchemTable हे GChemPaint चे युटिलिटी सॉफ्टवेअर म्हणून, |
00:55 | * Synaptic Package Manager द्वारे इन्स्टॉल करता येते. |
00:58 | GChemTable हे रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे अॅप्लिकेशन आहे. |
01:03 | हे मूलद्रव्यांची रासायनिक माहिती देते. |
01:08 | हे विविध रंगसंगती असलेली मूलद्रव्यांची आवर्त सारणी दाखवेल. |
01:13 | GchemTable उघडण्यासाठी Dash Home वर क्लिक करा. |
01:17 | सर्च बार मधे टाईप करा "gchemtable". |
01:21 | Periodic table of the elements आयकॉनवर क्लिक करा. |
01:26 | Periodic table of the elements विंडो उघडेल. |
01:30 | GChemTable विंडोमधे इतर विंडो बेस अॅप्लिकेशनसारखा Menubar आहे. |
01:36 | Menubar मधे GchemTable सोबत काम करण्यासाठी लागणा-या सर्व कमांडस असतात. |
01:41 | ही मूलद्रव्यांची आवर्त सारणी आहे. येथे मूलद्रव्यांची बटणे पाहू शकतो. |
01:49 | मूलद्रव्याचे नाव मिळवण्यासाठी मूलद्रव्यावर कर्सर न्या. |
01:52 | टेबलमधे बटणांसाठी वापरलेले रंग हे मूलद्रव्यांचे पारंपारिक रंग आहेत. |
01:58 | हे टेबल आधुनिक आवर्त सारणीची प्रतिकृती आहे. |
02:02 | आता एलिमेंटल विंडो बद्दल जाणून घेऊ. |
02:05 | ती दाखवण्यासाठी आवर्त सारणीवरील कुठल्याही एका मूलद्रव्याच्या बटणावर क्लिक करा. |
02:10 | Carbon(C) वर क्लिक करा |
02:13 | कार्बनची एलिमेंटल विंडो उघडेल. |
02:16 | एलिमेंटल विंडोमधे चार टॅब्ज समाविष्ट आहेत. |
02:20 | * Main, |
02:21 | * Electronic Properties, |
02:23 | * Radii |
02:24 | * Thermodynamics |
02:26 | आपण प्रत्येक टॅबबद्दल जाणून घेणार आहोत. |
02:30 | डिफॉल्ट रूपात Main टॅब सिलेक्ट केलेला आहे. |
02:33 | * त्यात मूलद्रव्याचे चिन्ह आहे, |
02:36 | * Atomic number, अणुक्रमांक |
02:38 | * Atomic weight अणूचे वजन |
02:40 | * आणि इलेक्ट्रॉनिक कॉनफिगरेशन आहे. |
02:43 | त्यामधे Lang आणि Name असे शीर्षक असलेले टेबल आहे. |
02:47 | हे टेबल इतर भाषेतील कार्बनची नावे दाखवते. |
02:53 | पुढे Electronic properties टॅब वर क्लिक करा. |
02:56 | ही टॅब अशी माहिती दाखवते. |
03:00 | Pauling electro-negativity व्हॅल्यू, |
03:02 | Ionization energies, |
03:05 | MJ per mol मधे पहिल्या, दुस-या आणि तिस-या Ionization energies, |
03:10 | KJ per mol मधे Electronic affinities. |
03:15 | उजव्या बाजूला संबंधित Show curve बटणे दिसत आहेत. |
03:20 | चार्ट बघण्यासाठी Show curve बटणावर क्लिक करा. |
03:24 | हा चार्ट Electronegativity विरूध्द Atomic number(Z) असा आहे. हा बंद करू. |
03:31 | Radii टॅब वर क्लिक करा. |
03:34 | ह्या टॅबमधे |
03:35 | * Covalent, |
03:36 | * Van der Waals आणि |
03:37 | * Metallic radii च्या व्हॅल्यूज, सर्व व्हॅल्यूज 'pm' मधे. |
03:41 | 'pm' म्हणजे pico metre= 10 चा वजा 12 वा घात मीटर्स. |
03:47 | कार्बन हा अधातू असल्यामुळे त्याला Metallic radius ची व्हॅल्यू नाही. |
03:53 | कार्बन विंडो बंद करू. |
03:56 | Periodic table of the elements विंडोवर परत जाऊ. |
04:00 | Sodium(Na) बटणावर क्लिक करा. |
04:04 | Radii टॅबवर क्लिक करा. |
04:07 | Metallic radii च्या व्हॅल्यू येथे दाखवल्या आहेत. |
04:11 | Radii टॅब Ionic radii चे टेबल दाखवत आहेत. |
04:15 | ह्या टेबलमधे Ion, C.N आणि Value असे कॉलम्स आहेत. |
04:22 | टेबलमधे खाली स्क्रोल करा. |
04:24 | ह्या टेबलमधे सोडियमच्या विविध शक्य असलेल्या आयनिक स्थितींची माहिती दिलेली आहे. |
04:31 | तसेच त्याचे Coordination number(CN) आणि त्याच्या Ionic radii व्हॅल्यूज 'pm' मधे आहेत. |
04:37 | Chromium, Manganese, Iron, Cobalt, Nickel आणि Copper या मूलद्रव्यांची मोठी कॉम्प्लेक्सेस बनवण्याची वृत्ती आहे. |
04:48 | Iron(Fe) बटणावर क्लिक करा. |
04:51 | त्याची एलिमेंटल विंडो उघडेल. |
04:54 | Radii टॅबवर क्लिक करा. |
04:56 | Ionic radii टेबलमधे Spin नावाचा अतिरिक्त कॉलम आहे. |
05:02 | Spin कॉलम आर्यनच्या कॉम्प्लेक्स बनवण्याच्या वृत्तीची कल्पना देतो. |
05:07 | येथे High म्हणजे स्पीन मुक्त कॉम्प्लेक्सेस जेथे इलेक्ट्रॉन्स एकाकी आहेत. |
05:13 | Low म्हणजे स्पीनशी संबंधित कॉम्प्लेक्सेस जेथे इलेक्ट्रॉन्स जोडीने आहेत. |
05:20 | Iron(Fe) ची एलिमेंटल विंडो बंद करू. |
05:23 | कॉम्प्लेक्स बनवण्यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर मिळेल. |
05:28 | कार्बनच्या एलिमेंटल विंडोवर पुन्हा क्लिक करा. |
05:33 | Thermodynamics टॅबवर क्लिक करा. |
05:36 | ही टॅब कार्बनचा Melting Point आणि Boiling point दाखवते. |
05:40 | Show curve बटण वापरून पहा. |
05:45 | कार्बनची एलिमेंटल विंडो बंद करू. |
05:48 | आता रंगसंगतीबद्दल जाणून घेऊ. |
05:52 | View मेनूत जाऊन Color schemes सिलेक्ट करा. |
05:57 | Color schemes ची सूची असलेला सबमेनू उघडेल. |
06:01 | No colors वर क्लिक करा. |
06:04 | सर्व मूलद्रव्यांची बटणे राखाडी रंगाची झालेली दिसतील. |
06:09 | Color Schemes वर क्लिक करा नंतर Physical states सिलेक्ट करा. |
06:13 | निळ्या रंगाच्या मूलद्रव्यांची बटणे असलेली नवी आवर्त सारणी उघडेल. |
06:18 | काळ्या रंगातील काही बटणे वगळली जातील. |
06:21 | सर्वात वर Temperature(K): चा शून्य (0)ही किमान व्हॅल्यू असलेला स्केल स्लायडर आहे. |
06:28 | खाली "Solid-Blue", "Liquid-Green" आणि "Gas-Red" असे रंग बघू शकता. |
06:36 | शून्य डिग्री Kelvin वर सर्व मूलद्रव्ये घनरूपात असतात. |
06:41 | त्यामुळे ते निळ्या रंगात दिसत आहे. |
06:44 | तापमान वाढवण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा. |
06:48 | मूलद्रव्ये आपली भौतिक स्थिती बदलत असल्याचे लक्षात येईल. |
06:52 | निळ्या रंगाच्या जागी हिरवा (द्रवरूपासाठी) आणि लाल(वायुरूपासाठी) रंग येईल. |
07:00 | 6010(six thousand ten) डिग्री Kelvin वर सर्व मूलद्रव्ये वायुरूपात बदलतात. |
07:04 | सर्व बटणे लाल रंगात बदललेली दिसतील. |
07:09 | काही मूलद्रव्ये काळ्या बॅकग्राऊंडमधे दाखवली आहेत. |
07:12 | त्यांची स्थिती सदर तापमानाला माहित नाही. |
07:16 | Family पर्याय सिलेक्ट करा. |
07:19 | Selected Family ड्रॉपडाऊन बटण दिसेल. |
07:23 | ड्रॉपडाऊनच्या सूचीत संबंधित रंगांसहित विविध फॅमिलीजचा समावेश आहे. |
07:27 | डिफॉल्ट रूपात All सिलेक्ट केले आहे. |
07:31 | मूलद्रव्यांची प्रत्येक Family त्याच्या विशिष्ट रंगात दिसेल. |
07:36 | ड्रॉपडाऊनच्या सूचीवर क्लिक करून Metalloids वर क्लिक करा. |
07:40 | Metalloids ह्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड रंग हिरवा असेल. |
07:45 | उरलेली सर्व मूलद्रव्ये काळ्या बॅकग्राऊंडमधे दिसतील. |
07:49 | पुन्हा Color Scheme वर जाऊन Electronegativity ही रंगसंगती निवडा. |
07:57 | लाल रंगातील मूलद्रव्यांच्या Electronegativity व्हॅल्यूज सर्वात कमी आहेत. |
08:01 | निळ्या रंगातील मूलद्रव्यांच्या Electronegativity व्हॅल्यूज सर्वाधिक आहेत. |
08:06 | लाल पासून निळ्या रंगामधे हळूहळू बदल होत जातो. |
08:12 | गुलाबी रंगातील मूलद्रव्यांच्या Electronegativity व्हॅल्यूज मधल्या आहेत. |
08:18 | डेटाबेसमधे डेटा उपलब्ध नसल्यास मूलद्रव्याला काळी बॅकग्राऊंड असते. |
08:23 | Block सिलेक्ट करा. |
08:27 | प्रत्येक ब्लॉकची मूलद्रव्ये त्यांना दिलेल्या ब्लॉकच्या रंगांसहित दाखवली जातील. |
08:31 | * 's' block – निळा |
08:34 | * 'p' block – लालसर तपकिरी |
08:37 | * 'd' block – हिरवा आणि |
08:40 | * 'f' block – जांभळा. |
08:43 | थोडक्यात, |
08:46 | या पाठात शिकलो, |
08:48 | * एलिमेंटल विंडोबद्दलची माहिती. |
08:51 | *1.फिजीकल स्टेट |
08:53 | 2.फॅमिली |
08:54 | 3.इलेक्ट्रोनिगेटीव्हिटी आणि |
08:56 | 4.ब्लॉक यांची रंगसंगती |
08:58 | असाईनमेंट. |
09:00 | करून बघा. |
09:01 | * Cobalt, Nickel, Copper इत्यादीच्या एलिमेंटल विंडोज. |
09:06 | * फॅमिलीच्या रंगसंगतीतील फरक |
09:08 | * Atomic radius ची रंगसंगती |
09:11 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:15 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:18 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:22 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09:25 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:28 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:32 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
09:38 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:42 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:49 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:55 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |