Advanced-Cpp/C2/Polymorphism/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Polymorphism
Author: Manali Ranade
Keywords: Advanced-C++
Time | Narration
|
---|---|
00:02 | C++ मधील Polymorphismवरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | यात शिकणार आहोत, |
00:10 | पॉलिमॉर्फिझम, |
00:11 | व्हर्च्युअल फंक्शन. |
00:13 | उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू. |
00:16 | ह्या पाठासाठी, उबंटु OS वर्जन 11.10 आणि g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू. |
00:27 | पॉलिमॉर्फिझमबद्दल जाणून घेऊ. |
00:31 | पॉलिमॉर्फिझम म्हणजे विविध रूपे घेण्याची क्षमता. |
00:36 | या यंत्रणेद्वारे एकाच नावाचे फंक्शन विविध प्रकारे काम करते. |
00:42 | आता व्हर्च्युअल फंक्शन्स पाहू. |
00:45 | व्हर्च्युअल फंक्शन हे क्लासचे मेंबर फंक्शन असते. |
00:49 | हे derived क्लासमधे ओव्हरराईड केलेले असू शकते. |
00:53 | हे व्हर्च्युअल ह्या कीवर्डद्वारे घोषित केले जाते. |
00:57 | व्हर्च्युअल फंक्शनला दिलेला कॉल run-time ला रिझॉल्व केला जातो. |
01:01 | आता व्हर्च्युअल फंक्शन्सचे उदाहरण पाहू. |
01:06 | मी कोड आधीच टाईप करून ठेवला आहे. |
01:08 | तो समजून घेऊ. |
01:10 | virtual.cpp हे आपले फाईलनेम आहे. |
01:15 | ह्या प्रोग्रॅममधे: |
01:16 | आपण आयत, समांतरभुज चौकोन आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत . |
01:22 | iostream ही हेडर फाईल आहे. |
01:25 | येथे std namespace वापरत आहोत. |
01:29 | आपल्याकडे parallelogram हा क्लास आहे. |
01:33 | हा बेस क्लास आहे. |
01:35 | ह्यामधे width, height आणि ar ही इंटिजर व्हेरिएबल्स घोषित केली आहेत. |
01:42 | ही प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत. |
01:45 | नंतर set_values हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे. |
01:50 | येथे a आणि b ही दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत. |
01:55 | नंतर पब्लिक मेंबर्सद्वारे प्रोटेक्टेड मेंबर्स अॅक्सेस करणार आहोत. |
02:00 | Area हे व्हर्च्युअल फंक्शन आहे. |
02:04 | येथे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढणार आहोत. |
02:07 | आपल्याकडे Rectangle हा derived क्लास आहे. |
02:12 | वारशाने त्याला parallelogram ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत. |
02:17 | येथे Area हे फंक्शन ओव्हरराईड करणार आहोत. |
02:21 | नंतर आयताचे क्षेत्रफळ काढणार आहोत. |
02:23 | आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत. |
02:25 | आपल्याकडे triangle हा आणखी एक derived क्लास आहे. |
02:29 | त्याला देखील वारशाने parallelogram ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत. |
02:35 | येथे Area हे फंक्शन पुन्हा एकदा ओव्हरराईड करणार आहोत. |
02:39 | नंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत. |
02:41 | आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत. |
02:43 | हे main फंक्शन आहे. |
02:46 | येथे p हे parallelogram चे ऑब्जेक्ट बनवत आहोत. |
02:52 | येथे parallel हा pointer बघू शकतो. |
02:56 | हा parallelogram ह्या क्लासचा pointer आहे. |
03:00 | ह्याला बेस pointer म्हणतात. |
03:03 | बेस क्लासचा पॉईंटर derived क्लासच्या ऑब्जेक्टला पॉईंट करू शकतो. |
03:08 | येथे Rectangle आणि Triangle क्लासचे ऑब्जेक्टस बनवले आहेत. |
03:14 | येथे Parallel हे p च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे. |
03:18 | नंतर 3 आणि 2 ही अर्ग्युमेंटस पास केली आहेत. |
03:23 | आता Area हे फंक्शन कॉल करू. |
03:26 | येथे Parallel हे rect च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे. |
03:30 | rect हे Rectangle क्लासचे ऑब्जेक्ट आहे. |
03:33 | पुन्हा 4 आणि 5 ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत. |
03:37 | Area हे फंक्शन कॉल करू. |
03:40 | आणि शेवटी Parallel हे Triangle च्या अॅड्रेसला प्रदान करत आहोत. |
03:45 | trgl. |
03:47 | हे Triangle क्लासचे ऑब्जेक्ट आहे. |
03:51 | येथे 6 आणि 5 ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत. |
03:54 | Area हे फंक्शन कॉल करू. |
03:56 | हे रिटर्न स्टेटमेंट आहे. |
03:59 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
04:02 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा. |
04:09 | कंपाईल करण्यासाठी टाईप करा |
04:10 | g++ space virtual.cpp space -o space vir एंटर दाबा. |
04:20 | टाईप करा: ./vir एंटर दाबा. |
04:24 | येथे आऊटपुट असे दिसेल, |
04:27 | Area of parallelogram is 6 |
04:29 | Area of rectangle is 20 |
04:31 | आणि Area of triangle is 15 |
04:34 | स्लाईडसवर जाऊ. |
04:36 | थोडक्यात, |
04:37 | या पाठात शिकलो, |
04:39 | पॉलिमॉर्फिझम. |
04:41 | व्हर्च्युअल फंक्शन उदा. virtual int area |
04:45 | असाईनमेंट म्हणून, |
04:46 | आयत, चौरस आणि त्रिकोणाची परिमिती काढा. |
04:50 | perimeter हे व्हर्च्युअल फंक्शन बनवा. |
04:54 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
04:57 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:00 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05:04 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
05:06 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05:09 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
05:14 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
05:21 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
05:25 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
05:32 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:37 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |