Advanced Cpp/C2/Friend-Function/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:53, 22 September 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Friend-Function

Author: Manali Ranade

Keywords: Advanced-C++


Time Narration


00:01 C++ मधील friend function वरील पाठात आपले स्वागत.
00:06 यात शिकणार आहोत,
00:08 फ्रेंड फंक्शन.
00:10 उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू.
00:13 ह्या पाठासाठी,
00:15 उबंटु OS वर्जन 11.10 आणि
00:19 g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:24 फ्रेंड फंक्शनबद्दल जाणून घेऊ.
00:27 प्रायव्हेट डेटा, क्लासच्या बाहेर अॅक्सेस करता येत नाही हे आपल्याला माहित आहे.
00:33 प्रायव्हेट डेटा अॅक्सेस करण्यासाठी फ्रेंड फंक्शन वापरता येते.
00:37 फ्रेंड फंक्शन हे क्लासचे मेंबर फंक्शन नसते.
00:42 फ्रेंड फंक्शन ऑब्जेक्टचा वापर न करता देखील कार्यान्वित करता येते .
00:46 फ्रेंड फंक्शनमधे पास केलेले अर्ग्युमेंट हे त्याचे ऑब्जेक्ट म्हणून वापरले जाते.
00:51 फ्रेंड फंक्शन कसे घोषित करतात ते पाहू.
00:55 फ्रेंड फंक्शन घोषित करण्यासाठी friend हा कीवर्ड वापरतात.
00:59 नंतर return_type दिला जातो.
01:02 function_name हे फंक्शनचे नाव असते.
01:05 नंतर class_name आणि क्लासचे ऑब्जेक्ट ही अर्ग्युमेंटस पास करतात .
01:11 आता उदाहरण पाहू.
01:13 मी एडिटरवर कोड आधीच टाईप करून ठेवला आहे .
01:16 आपण तो उघडू.
01:18 ह्या प्रोग्रॅममधे बेरजेची कृती करू.
01:22 frnd.cpp हे फाईलनेम आहे.
01:27 आता कोड समजून घेऊ.
01:30 iostream ही हेडरफाईल आहे.
01:34 येथे std namespace वापरत आहोत.
01:37 आपण frnd क्लास घोषित केला आहे.
01:41 यामधे a आणि b व्हेरिएबल्स प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहेत.
01:46 येथे इनपुट हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे.
01:52 यामधे युजरकडून इनपुट घेऊ.
01:55 compute हे फ्रेंड फंक्शन आहे.
01:58 येथे frnd हे class_name आणि f1 हे क्लासचे ऑब्जेक्ट ही अर्ग्युमेंटस पास करू.
02:06 नंतर क्लास पूर्ण करू.
02:08 आता फ्रेंड फंक्शनद्वारे frnd क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स अॅक्सेस करू.
02:16 येथे compute मेथड वापरू.
02:19 येथे बेरजेची क्रिया करू.
02:23 व्हेरिएबल्स a आणि b ची बेरीज करू.
02:26 आणि नंतर व्हॅल्यू रिटर्न करू.
02:28 येथे नॉन-मेंबर फंक्शन मधील प्रायव्हेट व्हेरिएबल्स, f1 ऑब्जेक्ट वापरून अॅक्सेस करत आहोत.
02:35 हे main फंक्शन आहे.
02:38 ह्यात f हे frnd क्लासचे ऑब्जेक्ट बनवले आहे.
02:44 नंतर ऑब्जेक्ट f द्वारे इनपुट फंक्शन कॉल करू.
02:48 येथे compute फंक्शन कॉल करू आणि f हे अर्ग्युमेंट पास करू .
02:54 f हे अर्ग्युमेंट compute फंक्शनमधे पास केल्याचे दिसेल.
02:58 हे pass by value मेथडद्वारे करत आहोत .
03:03 f1 ची व्हॅल्यू म्हणूनf पास केले आहे.
03:06 हे रिटर्न स्टेटमेंट आहे.
03:09 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:11 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
03:20 टाईप करा:
03:21 g++ space frnd dot cpp space hyphen o space frnd. एंटर दाबा.
03:32 टाईप करा:
dot slash frnd 
03:36 एंटर दाबा.
03:38 येथे दिसेल:
Enter the value of a and b 
03:41 मी टाईप करणार आहे: 8 आणि 4
03:46 आऊटपुट असे दिसेल,
03:48 The result is: 12
03:51 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
03:54 स्लाईडसवर जाऊ.
03:56 थोडक्यात,
03:57 या पाठात शिकलो,
फ्रेंड फंक्शन.उदा.friend int compute क्लासचे नाव frndआणि ऑब्जेक्ट f1.
04:08 असाईनमेंट म्हणून ,
दिलेल्या संख्येचा वर्ग आणि घन काढणारा प्रोग्रॅम लिहा. 
04:14 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:17 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:20 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04:30 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04:33 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
04:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
04:43 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
04:51 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
04:56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana