LaTeX/C2/Tables-and-Figures/Marathi
Click here to view Reviews टेबल्स आणि आकृत्या
नमस्कार लेटेक वापरुन टेबल्स आणि आकृत्या कशा तयार करायच्या या प्रशिक्षणात आपले स्वागत. या प्रशिक्षणात आपल्याला दोन गोष्टी साध्य करायच्या आहेत. सर्वप्रथम, टॅब्यूलर पर्यावरणाचा वापर करुन टेबल्स् कशी तयार करावी आणि दुसरे म्हणजे टेबल पर्यावरणाचा वापर करुन लेटेकमधील दस्तऐवजात टेबल्स कशी सहभागी करावी. हेच तंत्र आकृत्यां अंतर्भूत कश्या कराव्या हे समजवण्यासाठीपण वापरता येते.
आपण शीर्षक पान कसे करावे ते पाहिले. यात शीर्षक आहे, लेखकाची माहिती, स्वामित्वहक्काबद्दलची माहिती हे सर्व समीकरणाच्या प्रशिक्षणात सांगितल्याप्रमाणे आहे. आजची तारीख शेवटच्या रकान्यात दिलेल्या आज्ञेनुसार आलेली आहे. आता आपण दुसऱ्या पानाकडे वळू या. आता मी तुम्हांला टप्प्या-टप्प्याने हे टेबल कसे तयार करायचे ते सांगते. आपण रिकाम्या दस्तऐवजापासून सुरुवात करु. प्रथम मी या आज्ञा खोडून टाकते. मी हे संकलित करुन रिकाम्या दस्तऐवजापासून सुरुवात करते. टॅब्यूलर पर्यावरण हे बिगिन टॅब्यूलर आणि एन्ड टॅब्यूलर या आज्ञा देऊन तयार करता येते. मी आता हे इथे करते.
बिगिन टँब्युलरच्या पुढील कंसातील 'r r' ही अक्षरे असे दर्शवतात की इथे दोन रकाने आहेत आणि ते उजवीकडे एका रेषेत आहेत. पहिल्या ओळीतील सुरुवात मँगो आणि मिक्स्ड आहे. दोन तिरक्या रेषा पुढील ओळ दर्शवतात. आता मी पुढील ओळ चालू करते. जॅकफ्रुट कोली हिल्स बनाना ग्रीन. आता मी टॅब्यूलर पर्यावरण संपवते. मी हे संकलित करते आणि आता हे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याकडे ३ बाय २ हे टेबल तयार झाले. यात ३ ओळी आणि २ रकाने आहेत. दोन रकाने r r या अक्षरांनी दर्शवले आहे त्याप्रमाणे उजवीकडे एका रेषेत आहेत.
दोन रकाने वेगळे करण्यासाठी, आपण रकान्यांतील अक्षरांमध्ये एक उभी रेष घालू या. ही मी उभी रेष घातली. रक्षित करा. संकलित करा. आता पहा एक उभी रेष आली. आहे. शेवटी पण उभी रेष हवी असल्यास, ती योग्य त्या जागी घाला. मी आता तसे करते, रक्षित करते, संकलित करते आणि आता त्या उभ्या रेषा आल्या आहेत. खरे म्हणजे आपण अजून उभ्या रेषा घालू शकतो. सुरुवातीला मी अजून एक उभी रेष घालते. हे पहा झाले, ही दुसरी रेषसुद्धा इथे आली. पहा इथे दोन उभ्या रेषा आहेत. आता आपण वेगवेगळ्या पंक्तीरचना वापरून पाहू. आता आपण इथे 'C' लिहू, म्हणजे दुसरा रकाना मध्य रेषेत आणण्यास सांगू. आता हे मध्य रेषेत आले. आता आपण पहिला रकाना डावीकडे एका रेषेत आणू. आत्ता हा रकाना उजवीकडे एका रेषेत होता आता मी तो डावीकडे एका रेषेत आणते. 'L' रक्षित करु, संकलित करु. आता हा डावीकडे एका रेषेत आला आहे.
आता आपण ओळी आडव्या ओळींनी अशा प्रकारे वेगळ्या करु. आता आपण इथे 'h' ओळ घालू. आपण हे केल्याने काय होते ते पाहू. ती ओळ अशी वरती आली. आता आपण एक अजून 'h' ओळ घातली तर, पहा ही अजून एक ओळ आली. आता मी हे पूर्ण करते. आता मी 'h' ओळ घालते. इथे आता मला एक तुटक रेषा दोन उलट्या तिरक्या रेघांच्या व 'h' ओळींच्या मध्ये घालायची आहे. 'h' ओळ ही वाक्याच्या सुरवातीला चालू होते. आता मी सगळ्या आडव्या ओळी पूर्ण केल्या आहेत.
आता आपण अजून तीन रकाने आणि एक ओळ घालू. आता मी काय केले, मी इथे आले आणि C, C, R, मी अजून तीन रकाने त्यामध्ये घातले आहेत. पहिले दोन रकाने मध्यभागी एका रेषेत आहेत आणि तिसरा रकाना उजवीकडे एका रेषेत आहे. आणि आता मी इथे लिहितेः फ्रुट, टाइप, संख्या, प्रत्येक नगाची किंमत, रुपयांमध्ये किंमत, 'h' ओळ म्हणजे मिक्स्ड 20, 75 रुपये 1500 रुपये जॅकफ्रुट, त्यातील 10, 50 रुपये, 500 रुपये. बनाना ग्रीन, 10 डझन, 20 रुपये प्रति डझन आणि एकूण 200 रुपये. आता आपल्याला हे संकलित करता येते का ते पाहू. आता हे टेबल तयार झाले आहे. आता हे उजवीकडे एका रेषेत न्यायची गरज आहे. म्हणजे आपल्याला पुढील क्रमांक घालता येतील.
समजा, आपल्याला आता हा रकाना दोन भागांत विभागायचा आहे. उदाहरणार्थ, या दोन रकान्यांत फळांसंबंधी चा तपशील आहे. आणि या तीनमध्ये किंमतीसंबंधीचा तपशील आहे. हे सर्व आपल्याला ज्याच्या मदतीने करायचे आहे. त्याला म्हणतात मल्टी कॉलम आज्ञा. मी आता हे पुढीलप्रमाणे करते- मल्टी कॉलम दोन घ्या, मध्ये एका रेषेत आणा. फळांसंबंधीचा तपशील. आता पहिले दोन संपले आहेत. नंतर मी पुढील रकाना दाखवण्यासाठी टॅब वापरते. आता आपण पुढील ओळीत जाऊ या. मल्टी कॉलम, तीन, हे सुद्धा मध्ये आणा. आता कंसात किंमतीबाबतचा तपशील, तिरकी रेषा, 'h' ओळ. आता आपल्याला हे मिळाले. पहिल्या दोन रकान्यांना फळांचा तपशील हे शीर्षक आहे. तर पुढील तीन रकान्यांना किंमतीसंबंधीचा तपशील हे शीर्षक आहे. इथे उभ्या रेषा नाहीत कारण मी लेटेक्सला तसे सांगितले नाही. म्हणून आपण आता हे सांगू या. इथे मला दोन उभ्या रेषा हव्या आहेत आणि इथे मला एक उभी रेषा हवी आहे. याआधी माझ्याकडे एक रेषा आधीच आहे म्हणून इथे अजून एकच रेषा काढू या. आता पाहूया काय होते ते. आता उभ्या रेषासुद्धा आल्या आहेत. इथे दोन आणि तीन हे एकच अक्षर असल्यामुळे ते कंसाशिवाय लिहिणे शक्य आहे. हे असे चालू शकते.
कधी कधी, काही थोड्या रकान्यांमध्येच आडव्या रेषा काढणे गरजेचे असते. आपण हे असे समजावून घेऊ. मी या मँगोची अशी विभागणी करते. मिक्स्डच्या ऐवजी मी याला मँगोज म्हणेन आणि नंतर 18 किलोग्रँम्स्, 50 किलोग्रँम्स, मी हे खोडते. आता इथे मी म्हणेन की हे अल्फॉन्सो आहे, दोन डझन, तिनशे रुपये प्रति डझन, आणि एकूण 1500. आता हे रक्षित केल्यावर काय होते ते पाहू या. संकलित केले. आता मला हे मिळाले, आता काय झाले आहे की ही ओळ इथे आली आहे. तसेच इथेपण आली आहे आणि मला हे नको आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की, या आडव्या रेषांऐवजी, मला 'C' ओळ हवी आहे रकाना 2 आणि रकाना 4 च्या मध्ये. त्यासाठी मी हे असे करायला हवे होते. मला हे परत इथे लिहू दे. 'H' रेषा इथे. C ओळ 2 ते 4, ठीक आहे. म्हणजे आता माझ्याकडे रकाना 2 आणि 4 मध्ये ही ओळ तयार झाली आहे. आता ह्या मध्यवर्ती ओळीने मँगोज, 2 प्रसिद्ध आंब्याच्या प्रकारात विभागले गेले आहेत. आता आपण हे उदाहरण संपवूया, हे टेबल अखेरची ओळ लिहून संपवू. आता मी हे असे करते. मल्टी कॉलम चार, दोन उभ्या रेषा, उजवीकडे एका रेषेत, उभी विभागणी, एकूण किंमत रुपयांमध्ये. हे बंद करा. पुढील टॅब 2200, h ओळ आणि हे आपले करून झाले. या टेबलापासून आपण आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात केली होती.
टॅब्युलर पर्यावरण वापरुन टेबल कसे तयार करायचे ? टॅब्युलर पर्यावरणचा वापर करून बनवलेले हे टेबल म्हणजे एकच वस्तू आहे असे लेटेक समजते. उदाहरणार्थ, आता आपण हे टेबल उदाहरणासाठी घेऊ शकतो. इथे काय होते तर, हे टेबल या दोनच्या मध्ये येते. हे टेबल उदाहरणासाठी घेतले आहे. चालू वाक्याच्या मधेच हे टेबल येते. सेंटर (मध्य) पर्यावरण वापरुन टेबल्सचा यात समावेश करणे शक्य आहे. सामान्यपणे याचा टेबल पर्यावरणामध्ये समावेश करता येतो. जसे आपण आता पाहू या. सुरु करा. टेबल, बंद करा. आता काय होते तर, हे उदाहरणार्थ टेबल तयार झाले आहे. हे वाक्य वेगळे येते आणि बिगिन (सुरु), आणि एन्ड (शेवट) टेबल या आज्ञांच्या मध्ये जे दिसत आहे ते एक टेबल म्हणून दिसते आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, जरी टेबल हे मजकुराच्या मध्ये दिसत असेल, तरी ते वेगळे आहे. ते मधोमध नाही आहे. आता मी काय करु शकते, तर मी सेंटरींग ही आज्ञा देऊ शकते. यामुळे ते याच्या मध्यभागी येऊ शकेल.
आता आपण मथळा तयार करून पाहू. टेबलचा मथळा टेबलच्या अगोदर दाखवला जातो. मी इथे हा मथळा टाकते. मथळा- कॉस्ट ऑफ फ्रूट्स इन इंडिया. हा मथळा आला. हे फारच जवळ आले आहे. मला थोडी जागा सोडायची आहे. मी हे व्ही-स्पेस ही आज्ञा वापरून करते. वन ई एक्स ही जागा एक्स या अक्षराला लागणाऱ्या जागेइतकी आहे. मी अशी उभी जागा सोडली आहे. आता हे ठीक दिसते आहे.
सामान्यपणे लेटेक हे टेबल या पानाच्या सुरुवातीला देते. ही जागा आपोआपच ठरवली जाते. टेबल हे पुढील शिल्लक असणाऱ्या जागेच्या पुढे ठेवते. हे समजवण्यासाठी मी या दस्तऐवजाच्या अखेरीचा काही मजकूर कापून परत चिटकवून दाखविते. मी हे खोडते. ठीक आहे. आता इथे फळासंबंधीची काही माहिती आहे. आता आपण याच्या वरती जाऊ. हे इथे चिटकवू. संकलित करु. आधीप्रमाणेच टेबल हे या पानाच्या सरुवातीला आले आहे. आता मी इथे आणखी काही मजकूर घालते. चार प्रती, आता काय झाले आहे की, हे टेबल दुसऱ्या पानावर गेले आहे. आणि इथे दुसरे काहीच नाही त्यामुळे ते पानाच्या मध्यभागी आले आहे. मी आता याची अजून एक प्रत ठेवते, आणखीन काही मजकूर, आता काय झाले आहे की, हे शीर्षकाचे पान आहे, हे मजकुराचे पान आहे, टेबल दिसते आहे आणि ते पानाच्या सरुवातीला गेले आहे.
समीकरणांप्रमाणे आपण लेबलही तयार करु शकतो आणि ते संदर्भासाठी वापरु शकतो. उदाहरणार्थ तुम्ही ही आज्ञा कॅप्शन आज्ञेच्या खाली द्या. तुम्हाला ही आज्ञा कॅप्शन आज्ञेच्या खाली द्यायची आहे कारण ही कॅप्शन आज्ञाच टेबल क्रमांक तयार करते. उदाहरणार्थ इथे या कॅप्शनच्या आज्ञेमुळे आपोआप टेबल-१ तयार झाले आहे. तुम्ही जर लेबल याच्या नंतर लिहिले तर ते लेबल कॅप्शन आज्ञेने तयार झालेला क्रमांक दर्शवेल. म्हणून लेबल – फ्रुट्स. आता मी परत मागे जाते. आणि मी ही ओळ इथे लिहिते. या फळांची किंमत या संदर्भ टेबल मध्ये दिली आहे. तुम्हाला लेबल द्यायचे आहे, ते टॅब – फ्रुट्स सारखेच असले पाहिजे. हे संकलित करते. आता हे पहा. प्रथम संकलित केल्यावर हे चला नसल्याने ते मिळाले नाही. म्हणून मी परत संकलित करते, आणि आता हे मला मिळाले.
आपल्याला टेबल ची यादी आपोआप तयार करता येते. जसे मी आता तुम्हाला दाखविले. मेक टायटल या आज्ञेनंतर आपल्याला जर टेबल ची यादी हवी असेल तर - वन वर्ड ही आज्ञा. आता काय झाले आहे की टेबल ची यादी तयार झाली आहे. सामान्यपणे टेबल क्रमांक बरोबर येण्यासाठी आपल्याला हे दोनदा संकलित करावे लागते. आणि इथे आहे. या यादीप्रमाणे टेबल हे क्रमांक दोनच्या पानावर आहे. पण आपल्याला माहिती आहे की हे पान क्रमांक तीन वर आहे. म्हणून आता आपण परत मागे जाऊ. आणि परत संकलित करू. आणि हे पहा, हे पान क्रमांक तीन वर आहे. हे मी आधी सांगितल्याप्रमाणे आहे. ठिक आहे. आता आपण टेबलच्या स्पष्टीकरणाच्या शेवटी आलो आहोत.
आता आपण इन्क्लूड ग्राफिक्स ही आज्ञा वापरून आकृत्या कशा तयार कराव्यात हे समजून घेऊ. यासाठी आपल्याला ग्राफिक्स या पॅकेजच समाविष्ट करावे लागेल. आता मी याच्या अखेरीस जाते. आणि ही आज्ञा ही अशी आहे. बिगिन, फिगर, इनक्लूड ग्राफिक्स, विड्थ इक्वल्स, माझ्याकडे एक फाईल आहे. ज्याचे नाव आहे. आय.आय.टी.बी. डॉट पी.डी.एफ्. आणि हे पहा हे सुध्दा या पानाच्या सुरूवातीला आले आहे. आता जर मला ओळीची संपूर्ण रुंदी वापरायची असेल तर, किंवा समजा पॉईंट फाइव्ह म्हणजे ओळीच्या निम्मी तर हे लहान होईल. नीट पहा की हे डावीकडे दिसत आहे. आणि टेबलमधे सांगितल्याप्रमाणे मी सेंटरिंग म्हणते म्हणजे हे मध्यभागी येईल.
मला मथळा सुध्दा तयार करता येईल. आकृत्यांचा अंतर्भाव केल्यावर आकृत्यांचा मथळा तयार करता येतो. गोल्डन ज्युबिली लोगो ऑफ आय.आय.टी. बाँबे. आधी सांगितल्या प्रमाणे मला लेबल तयार करता येईल. आणि त्याचा संदर्भ आपल्याला ref आज्ञा देऊन देता येतो. मला ही आकृत्यांची यादीही टेबलाच्या यादीबरोबरच दाखवता येते. म्हणून मला समजा आकृत्यांची यादीही हवी असेल तर मी दोन वेळा संकलित करते आणि हे झाले. आकृत्यांची यादी आपोआपच येते. आकृत्यांचे मथळेही इथे दिसतील.
आता एक शेवटची गोष्ट मी तुम्हांला दाखवते.ते म्हणजे या आकृत्या कशा फिरवाव्यात. हे अँगल पर्याय वापरून करता येते. समजा मला हे 90 अंशातून फिरवायचे आहे. तर आपण ही आकृती पाहू. आता हे संकलित करु. आता हे नव्वद अंशातून फिरलेले दिसते आहे. आता हे वजा 90 अंशामधून फिरवू, ठिक आहे. अशा तऱ्हेने आपल्याला आकृत्यांचा समावेश करता येतो. आता मी गृहीत धरते की आय.आय.टी.बी.पी.डी.एफ् फाईल उपलब्ध आहे.
इथेच आपले हे प्रशिक्षण संपत आहे. लेटेकचे सुरवातीचे शिक्षण घेणाऱ्यांनी प्रत्येक बदलाच्या नंतर सर्व संकलित करावे आणि ते बरोबर केले आहे की नाही ते तपासावे हे प्रशिक्षण ऐकल्याबद्दल धन्यवाद मी चैत्राली जोगळेकर आपली रजा घेते.