Firefox/C2/Tabbed-Browsing-Blocking-Pop-ups/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:42, 11 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search


Time
Narration
00:00 Mozilla Firefoxच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 या ट्युटोरियलमध्ये आपण Tabbed Browsing, off-line घटक स्टोअर करणे आणि pop-ups ब्लॉक करणे शिकणार आहोत.
00:13 या ट्युटोरियलमध्ये आपण UBUNTU Linux 10.04 मध्ये Firefox Version 7.0 चा वापर करणार आहोत.
00:21 Mozilla Firefox एकाच ब्राऊजर विंडोमध्ये अनेक वेब पेजेस वेगवेगळ्या टॅबमध्ये उघडू शकते.
00:29 या टॅब ब्राउजिंगचा मोठा फायदा असा की तुम्हाला ब्राऊजरच्या अनेक विंडोज उघडाव्या लागत नाहीत.
00:36 ह्यामूळे तुमचा डेस्कटॉप नीट दिसेल.
00:40 प्रत्येक टॅब ब्राऊजरचा पूर्ण viewing area चा प्रयोग करतो.
00:45 त्यामुळे ब्राऊजर विंडोजचे आकार बदलण्याचे किंवा त्या हलवण्याचे गरज नसते.
00:52 Tabbed Browsingऑपरेटिंग सिस्टीमवर कमी भार टाकतो.
01:00 जर आपण एकाच वेळेला अनेक टॅब उघडून ठेवले नसतील.
01:05 समजा तुम्ही एखाद्या विशिष्ट वेबपेजवर आहात.
01:08 त्यात “Firefox for Desktop” ही लिंक आहे.
01:11 तुम्ही ही लिंक नव्या टॅबमध्ये उघडू शकता.
01:14 लिंकवर माऊसचे उजवे बटण दाबा.
01:17 मेनूमधील open link in new tab निवडा.
01:21 आता त्यात ब्राऊजर विंडोमध्ये उपलब्ध टॅबच्या उजवीकडे नवीन टॅब उघडला आहे.
01:28 एक विंडो बंद न करता त्याच विंडोतून तुम्ही दुसरे वेब पेज असे उघडू शकता.
01:34 नवीन टॅब उघडण्यासाठी File आणि नंतर New Tabवर क्लिक करा.
01:40 त्यासाठी Ctrl + T ही शॉर्टकट की आहे.
01:44 तुम्ही नवीन टॅब उघडला की तो तत्काळ कार्यान्वित होतो.
01:50 आता URL बारवर जाऊन ‘www.google.com’ टाईप करा.
01:56 आपल्याकडील ३ टॅब मधे वेगवेगळी वेबपेजेस आहेत.
02:01 उजवीकडील टॅबच्या पुढचे '+' हे बटण दाबून तुम्ही नवीन टॅब उघडू शकता.
02:08 आपण इच्छेनुसार टॅबचा क्रम बदलू शकतो.
02:11 टॅबवर क्लिक करुन बटण न सोडता ड्रॅग करा.
02:17 इष्ट स्थानवर बटण सोडून द्या.
02:20 आता टॅब हव्या असलेल्या ठिकाणी आला आहे.
02:23 आता Mozilla Firefox मधील काही बेसिक ऑपरेशन्स बघू या.
02:29 सर्च इंजिन बदलून ते गुगल करू या.
02:32 सर्च बारवर 'e-mail wikipedia' टाईप करा. उजवीकडील magnifying glass चिन्हावर क्लिक करा.
02:40 Result मध्ये विकिपीडिया संबंधित पान दिसेल.
02:44 लिंकवर क्लिक करून ते पान उघडू या.
02:48 आता File वर आणि Save page as वर क्लिक करा.
02:52 फाईल search.html या नावाने डेस्कटॉपवर सेव्ह करा.
02:59 आता ब्राउजर विंडो File वर मग new Tab वर क्लिक करून नवीन टॅब उघडा.
03:05 आता आपण सेव्ह केलेले पान नव्या टॅब विंडोमध्ये उघडू या.
03:10 File मधील Open File वर क्लिक करा.
03:12 सेव्ह केलेली फाईल शोधा आणि उघडा.
03:17 URL बारवर दिसणारा address हा इंटरनेट address नसून तो कॉम्प्युटरमधील स्थान आहे.
03:25 ऑफलाईन असताना देखील हे पान तुम्ही वाचू शकता.
03:29 pop-up windows तुमच्या परवानगीशिवाय आपोआप येतात.
03:34 pop-ups आणि pop-unders नियंत्रित करण्यासाठी Preferences window मधील Content tab वापरा.
03:42 विंडोजमध्ये हा पर्याय Options मध्ये असेल.
03:46 डिफॉल्ट रूपात pop-ups ब्लॉक केलेले असतात.
03:50 Edit व नंतरPreferences निवडा.
03:52 विंडोजसाठी Tools व नंतर Options वर क्लिक करा.
03:56 content टॅबमधील block pop-up विंडो डिफॉल्ट रूपात निवडलेला असतो.
04:02 नसल्यास block pop-up निवडा.
04:05 यामधील इतर पर्याय दुस-या ट्युटोरियलमध्ये आपण बघणार आहोत.
04:11 क्लोज बटणावर क्लिक करा.
04:13 हा पाठ येथे संपत आहे.
04:16 आपण काय शिकलो त्याबद्दल थोडक्यात.
04:19 Tabbed Browsing, off-line घटक स्टोअर करणे आणि pop-up block करणे.
04:25 COMPREHENSIVE TEST ASSIGNMENT
04:29 नवीन टॅब उघडा.
04:30 सर्च इंजिन बदलून ते गुगल करा.
04:33 'The history of e-mail' साठी शोध घ्या.
04:36 आलेला पहिला रिझल्ट सेव्ह करा. आणि ऑफलाईन डॉक्युमेंट म्हणून बघण्यासाठी ते नव्या टॅबमध्ये उघडा.
04:43 सर्च इंजिन बदलून ते 'bing' करा.
04:46 पुन्हा The history of e-mailसाठी शोध घ्या.
04:49 आणि ऑफलाईन डॉक्युमेंट म्हणून बघण्यासाठी ते नव्या टॅबमध्ये उघडा.
04:58 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:04 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:09 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:14 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:18 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
05:25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
05:29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
05:37 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:48 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha