PHP-and-MySQL/C2/Common-Errors-Part-1/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:02, 20 May 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Common Errors-1

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Visual Clue
Narration
0:00 नमस्कार. हे आपले ट्युटोरियल थोडेसे स्पष्टीकरणाच्या स्वरूपात आहे.
0:07 PHP मध्ये प्रोग्रॅमिंग करताना होणा-या common errors आपण जाणून घेणार आहोत.
0:13 त्यापैकी ब-याचशा self explanatory आहेत.
0:17 मी असे म्हणेन की 50% errors ह्या आपण काहीतरी चुकीचे टाईप केल्यामुळे किंवा काहीतरी टाईप करण्यास विसरल्यामुळे होतात.
0:32 जसे की semicolon टाईप न करणे, जादा bracket समाविष्ट करणे किंवा अशाच काही चुका प्रत्येक जण करतो.
0:41 आता येथे मी काही पेजेस तयार केली आहेत. ह्यात काही errors आहेत ज्या सामान्यतः आपल्याला आढळतात.
0:47 ही संपूर्ण यादी नाही. परंतु आपण काही बेसिक errorsबघूया.
0:51 एकेक करून तुम्हाला माहिती देण्यासाठी मी context editorतयार ठेवला आहे.
1:00 प्रथम मी तुम्हाला हे html पेज दाखवणार आहे.
1:06 येथे echo कमांड मध्ये html code समाविष्ट केला आहे.
1:10 हे पेज कार्यान्वित केले तर आपल्याला ही Parse error मिळेल.
1:17 आणि येथे हा मेसेज दिसेल.
1:21 येथे लक्ष द्या- expecting either a comma or a semicolon
1:27 तसेच line number दिला जाईल. जेव्हा Parse error मिळते तेव्हा नेहमी ओळीचा क्रमांक दिला जातो.
1:34 येथे ओळ क्रमांक 5 दिसत आहे.
1:36 जर आपण खाली 5व्या ओळीवर आलो तर येथे line 5 column 19 (Ln5, Col19); अशी सर्व माहिती दिसेल.
1:45 ही 5 वी ओळ आहे.
1:46 आता ह्यामध्ये आपल्याला काहीही चुकीचे दिसत नाही.
1:50 php मध्ये echoकमांडचा अशा पध्दतीने अर्थ लावला जातो. सुरूवात, नंतर double quotes आणि शेवट. म्हणजे येथे सुरूवात असेल आणि येथे शेवट असेल.
2:06 प्रत्यक्षात आपण येथे html code चा समावेश केला असल्यामुळे येथे मध्येच आपण double quotesवापरले आहेत. याचा अर्थ echo कमांड अशी वाचली जाईल. येथे सुरूवात असेल आणि येथे शेवट असेल.
2:17 याबद्दल आपण एको फंक्शन वरील ट्युटोरियलमध्ये जाणून घेतले होते.
2:21 या ओळीवर एरर मिळाली कारण की पहिल्यांदा double quotes अशा ठिकाणी दिला गेला आहे जिथे तो असायला नको.
2:31 तांत्रिक दृष्ट्या ही एरर phpला सापडलेली नाही म्हणून ती येथे दिसायला नको.
2:36 ही एरर आपल्याला असे सांगते की येथे semicolon असणे आवश्यक आहे. साधारणतः याचा वापर आपण एकोच्या शेवटी करतो. म्हणजेच हा semicolon येथे असणे अपेक्षित आहे.
2:49 परंतु येथे semicolon चा वापर अगदीच निरर्थक आहे.
2:52 त्याऐवजी आपण single quote चा वापर करणे आवश्यक आहे.
2:58 आता जर हे आपण सेव्ह करून कार्यान्वित केले तर आपल्याला 6 व्या ओळीवरची एरर दर्शवली जाईल.
3:08 आपल्याला कळेल की 6 व्या ओळीवर किंवा त्याच्या जवळपास बदल आवश्यक आहे. आपण अशाही काही एरर बघणार आहोत ज्या नक्की कुठल्या ओळीवर आहेत ते दर्शवत नाही.
3:19 आणि आता हे बघा आपला html code यशस्वीरित्या चालला आहे. याचा काही खास उपयोग नाही. परंतु आपण ते आता समजून घेतले आहे.
3:28 आता पुढे semicolonया अजून एका कॉमन एररबद्दल जाणून घेऊ.
3:33 आपण येथे semicolon ही फाईल उघडू. या येथे आपल्याला expecting a semicolon अशी parse error मिळाली आहे.
3:39 आता आपल्याला semicolonची गरज कशासाठी आहे? हा code तर आपल्याला ठीक दिसतो आहे. आपल्याकडे ही दोन व्हेरिएबल्स आहेत ज्यांची व्हॅल्यू Alex ही आहे.
3:47 आपण या दोन व्हेरिएबल्सची तुलना करत आहोत. म्हणजे येथे double equals असणे आवश्यक आहे.
3:52 म्हणजे जर ही कंडिशन true असेल तर हा मेसेज एको होईल.
3:55 आता आपण येथे 9 व्या ओळीवर जाऊ या.
3:58 हा अत्यंत साधा code आहे. तो जर कठीण असता तरी आपण line 9वर गेलो असतो.
4:07 आता येथे बघितल्यावर 9 व्या ओळीवर काहीच चूक दिसत नाही.
4:10 परंतु काहीतरी चूक नक्की आहे. phpमध्ये pages एकेका ओळीने वाचली जातात.
4:19 आपण बघत असलेल्या या code मध्ये आणि आधीच्या code मध्ये काहीच फरक नाही.
4:23 हे compileहोऊन कार्यान्वित होईल. परंतु हे इथे खाली आहे तसेच ते वर सुध्दा आहे. त्यामुळे यानंतर semicolon अपेक्षित आहे.
4:34 आपण हे केल्यास हा codeबरोबर होईल. आपण semicolon इथे घातला आहे जरी प्रत्यक्षात डोळ्यांना तो इथे बरा दिसतो.
4:42 आपण येथे हे खाली आणू आणि हा code पुन्हा कार्यान्वित करू.
4:53 बघा आपले पेज यशस्वीरित्या कार्यान्वित झाले आहे.
4:57 अर्थातच हे आपण येथे नेले तरी देखील हा पूर्वीसारखाच valid code आहे.
5:02 या ओळीमध्ये एरर आहे असे phpमध्ये खात्रीने सांगता येत नाही.
5:07 सामान्यतः असे म्हणता येईल की पूर्वीच्या ओळींमध्ये एरर असल्यामुळे current line कार्यान्वित करता येत नाही.
5:13 ह्या ओळीत semicolon दिला गेलेला नसल्याने ही लाईन काम करत नाही. त्यामुळे आपल्याला दिसते की ही एरर line 9मध्ये दाखवली गेली आहे.
5:29 अशा प्रकारे आपण दोन बेसिक errors बद्दल जाणून घेतले.
5:33 जर तुम्हाला अशा प्रकारची एरर मिळाली तर ज्या ओळीवर एरर आहे केवळ तीच ओळ न तपासता
5:40 त्याच्या आधीची ओळही तपासून बघा. आणि त्या तिथे दुरूस्ती करता येते का ते बघा.
5:47 गरज असल्यास प्रत्येक अक्षरही तपासून बघा.
5:50 तुमच्यासारखे अनेक जण जे अशा प्रकारच्या चुका करतात, त्यांना मला मदत करायला नक्की आवडेल.
5:56 संकोच न करता तुम्ही मला शंका विचारू शकता. परंतु त्यापूर्वी तुम्ही तुमचे काम दोन तीन वेळा तपासून पहा.
6:04 पुढील भागात आपण इतर errors ही जाणून घेऊ या. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे.सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana