PHP-and-MySQL/C2/XAMPP-in-Windows/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:49, 10 May 2013 by Madhurig (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script : Install Windows

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Visual Clue
Narration
0:00 PHP Academy मध्ये आपले स्वागत आहे.
0:03 ह्या बेसिक ट्युटोरियलमध्ये पॅकेजमध्ये असणा-या PHP आणि mysql तसेच webserver चे installation बघणार आहोत आणि त्याचा उपयोग करणार आहोत.
0:22 आपण XAMPP वापरणार आहोत. तुम्ही त्याला "ZAMP" देखील म्हणू शकता.
0:34 तुम्हाला PHP आणि mysql databaseचे installation करून ते चालू करण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होईल.
0:46 "apachefriends.org" वर जा किंवा "XAMPP" असे शोधा.
0:51 त्याचे स्पेलिंगX-A-M आणि double P आहे.
0:57 हे विंडोजसाठी install, सेटअप करून कसे कार्यान्वित करायचे ते बघणार आहोत.
1:06 Linux किंवा इतर Operating Systems साठी मदत लागल्यास आम्हास कळवा.
1:14 आपणwebsite वरील हा Installer निवडू.
1:19 हे आपल्याला पेजवर घेऊन येईल आणि ह्या व्हर्जन नंबरची ही फाईल डाऊनलोड करेल.
1:29 त्यासाठी प्रथम Installer निवडा.
1:32 डबल क्लिक करून run करा. भाषा निवडा.
1:37 मी Vista वापरत असल्यामुळे "Windows Vista Account is deactivated on your system" हा मेसेज दिसेल.
1:46 हे महत्वाचे नसल्याने मेसेजकडे दुर्लक्ष करा.
1:52 installation च्या प्रक्रियेत पुढे जा.
1:56 येथे तुमचा local drive निवडा. ह्यामध्ये तुम्ही Program Files ठेवू शकता.
2:04 तुम्हाला हवा तो पर्याय निवडा. मी "Create a XAMPP desktop option" निवडत आहे. हा नाही.
2:15 आता "Install Apache as a service" आणि "Install MySQL as a service" हे पर्याय निवडा.
2:24 ह्या Systems Service आहेत. संगणक सुरू होताना ह्या कार्यान्वित होतील.
2:30 तुम्ही हे पर्यायuncheck करू शकता. पण मी हे निवडत आहे.
2:36 हे install होत आहे. मी video pause करते. install झाल्यावर तो परत सुरू करू.
2:46 आता मी PHP installation च्या उरलेल्या setting बद्दल सांगते.
2:53 मी install करण्यापूर्वी जर blank browser उघडला आणि localhost acess करण्याचा प्रयत्न केला,
3:00 हा webserverचा localhost आहे.
3:05 येथे "google dot com" सारखा एखादा web address असतो. पण आपण "localhost" लिहू.
3:12 "Failed to connect" हा error message मिळाला आहे.
3:16 परंतु Xampp इन्स्टॉल झाल्यावर localhost पर्याय निवडला असता serverशी जोडले जाऊ.
3:25 Xampp मुळे http webserver Apache, install करणे सोपे होते. ते php module आणि नंतर mysql database serverही install करते.
3:39 installation पूर्ण झाल्यावर localhost कार्यान्वित झाले पाहिजे.
3:46 फाईल्स localhost directory मध्ये कशा ठेवायच्या ते बघू.
3:51 ह्याला localhostम्हणत नाहीत. परंतु webserverवरील आपला root folder आपण असा address करतो.
4:00 इन्स्टॉल झाले की video वर परत जाऊ.
4:05 इन्स्टॉल झाले आहे. येथे काही messages दिसत आहेत.
4:11 "Finish" वर क्लिक करा.
4:14 checking for necessary ports असा मेसेज दिसेल.
4:23 हे port 80 आणि कदाचित mysql तपासत आहे.
4:27 कुठलीही एरर मिळाली नाही म्हणजे सर्व ठीक आहे.
4:32 Apache 2.2 सेटअप होत आहे.
4:36 सदर service आणि mysql service सुरू होत आहे.
4:42 installation पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल.
4:46 "Yes" वर क्लिक करून XAMP control panel सुरू करा.
4:52 Apache आणि Mysql server सुरू झाला आहे.
4:58 आपल्याला येथे PHPदिसत नाही कारण ते Apacheचे वेबसर्व्हर मध्ये टाकलेले separate module आहे, वेगळी serviceनाही.
5:14 हे पेज येथे पुन्हा लोड करू.
5:17 आणि "localhost" वर जाऊन एंटर दाबल्यावर "XAMPP"शी आपण जोडले गेलो आहोत.
5:25 वेबसर्व्हरमधील एखाद्या डिरेक्टरीत जाऊ.
5:30 English वर क्लिक करा.
5:33 "XAMPP" set-up तुम्ही पाहू शकता.
5:37 "C" drive उघडू. येथे पहा.
5:42 "XAMPP" ह्या installation डिरेक्टरीवर क्लिक करू.
5:49 "htdocs" ह्यामध्ये आपण php मध्ये प्रोसेस झालेल्या आणि webserver मध्ये कार्यान्वित होणा-या फाईल्स ठेवणार आहोत.
6:02 ह्यावर डबलक्लिक केल्यावर विविध प्रकारच्या फाईल्स दिसतील.
6:07 ही "index.html" फाईल येथे आहे आणि ही "index.php" फाईल येथे आहे.
6:15 Index dot नावाने सुरू होणा-या फाईल्स आपोआप सुरू होतात.
6:20 तुम्ही हे बदलू शकता पण आत्ता ते तसेच राहू द्या.
6:25 "phpacademy" फोल्डर येथे आहे.
6:29 आपण नवे टेक्स्ट डॉक्युमेंट बनवू. सोपे होण्यासाठी हे context editor मध्ये करू.
6:38 हे बंद करून नवी फाईल बनवू या.
6:44 ती फाईल "htdocs" ह्या फोल्डरमध्ये सेव्ह करू. तिला "phpinfo.php" असे नाव देऊ.
6:53 ह्या फाईलमध्ये php code टाईप करू.
6:59 येथे "php underscore info" नंतर पुढे दोन कंस आणि सेमीकोलन काढा.
7:06 हे तुम्हाला समजत नसले तरी काही हरकत नाही.
7:14 हे PHP server किंवा webserver php installation ची माहिती देईल.
7:20 आता येथे परत येऊ. त्यासाठी आपल्याला "localhost" ची गरज आहे.
7:26 "htdocs" टाईप करण्याची गरज नाही.
7:29 "localhost" ची आवश्यकता आहे आणि आपली फाईल उघडण्यासाठी "phpinfo dot php" टाईप करून एंटर दाबा.
7:42 आपल्याला underscore ची गरज नाही. ते काढून रिफ्रेश करा.
7:50 भरपूर माहिती असलेली php information file दिसेल.
7:55 येथे htdocs file मधील php script कार्यान्वित करीत आहोत.
8:01 म्हणजे जर "favicon dot ico" टाईप केले तर ती फाईल आपल्याला दिसेल.
8:10 आपला webserver, "htdocs" मधील कुठलीही फाईल, php द्वारे प्रोसेस करेल.
8:18 ट्युटोरियल्समध्ये आपण लिहिलेली कुठलीही फाईल "c: \ xampp and htdocs" मधील "htdocs" फोल्डर मध्ये ठेवल्यावर कार्यान्वित होईल.
8:34 तुम्ही ते localhost किंवा 127.0.0.1. द्वारे कार्यान्वित करू शकता. एंटर दाबल्यावर काही बदललेले दिसणार नाही. तो केवळ local webserver आहे.
8:50 आपण "XAMPP" इन्स्टॉल केले. त्यामुळे आपोआपच "Apache" आणि "mysql" database services सुरू करता आल्या. तसेच "php module" ही "Apache" मध्ये इन्स्टॉल झाले. त्यामुळे php फाईल्स प्रोसेस करणे सोपे व सुटसुटीत झाले.
9:10 तसेच php file बनवून ती कशी कार्यान्वित करायची ते पाहिले.
9:16 पुढील ट्युटोरियल्ससाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल.
9:23 सहभागाबद्दल धन्यवाद.
9:26 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana