PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-1/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:52, 31 December 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: User-Registration-Part-1

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:00 युजर रजिस्ट्रेशन फॉर्म बनवणे, mysqlडेटाबेसमधे युजर रजिस्टर करणे ह्यावरील पाठात आपले स्वागत.
0:09 हा पाठ सुरू करण्यापूर्वी "User login" वरील पाठ जरूर पाहा. ती लिंक तुम्हाला दिलेली आहे.
0:19 "User registration" पूर्वी "User login" बनवण्याचे कारण "User login" ची प्रक्रिया "Registration" च्या प्रक्रियेपक्षा सोपी आहे.
0:34 योग्य पध्दतीने "login" ची प्रक्रिया झाली आणि डेटाबेसमधील fields मिळाली की रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करू शकतो.
0:43 डेटाबेसमधे काय रजिस्टर करत आहोत हे कळण्याच्या दृष्टीने हे सोपे आहे.
0:49 या भागाच्या सुरूवातीला आपण फॉर्म बनवू आणि login च्या माहितीची उपलब्धता तपासू.
0:56 आपल्या आधीच्या पाठांतील "login session" फोल्डर वापरू.
1:03 येथे login सेशन आणि fields आहेत पण आपण नवी फाईल बनवणार आहोत.
1:12 प्रथम काही टॅग्ज समाविष्ट करू.
1:15 ही फाईलlogin सेशन फोल्डर मधे बनवू. ज्याचे "index dot php" हे मुख्य पेज दिसत आहे.
1:22 Log in, log out आणि युजर्स logged in असल्यास member पेजही दिसत आहेत. ही फाईल "register dot php" नावाने सेव्ह करू.
1:32 युजर रजिस्ट्रेशन फॉर्म बनवत असल्यामुळे युजर login करण्यापूर्वी स्वतःला रजिस्टर करू शकतो.
1:40 "register dot php" बनवली आहे. तसेच index file मधे खाली लिंक बनवून ती उघडणार आहोत.
1:48 ही रजिस्टर पेजला लिंक करेल म्हणून येथे "Register" टाईप करा.
2:02 आपल्याला "Register" अशी लिंक मिळेल. आत्ता ह्या पेजवर काहीही नाही.
2:09 हे login करण्याच्या पाठातून घेतले आहे. येथे लिंक समाविष्ट केल्याने loginकरण्यापूर्वी आपण रजिस्टर करू शकतो.
2:20 डेटाबेसमधे डेटा टाईप करण्यासाठी नवी विंडो उघडून "php my admin" वर जाऊ.
2:29 हा "php login" डेटाबेस आहे आणि हे "users" टेबल आहे.
2:38 मी येथे "name" हे नवे फिल्ड समाविष्ट करून आता "date" हे फिल्ड समाविष्ट करणार आहे.
2:47 At the end of the table हा पर्याय निवडून खाली फिल्डमधे "date" टाईप करा. date फॉरमॅट निवडा.
3:04 ही कोणती तारीख याबद्दल विचार करत असाल तर युजर रजिस्टर होत असतानाची ही date असेल. आता हे सेव्ह करू.
3:15 "User login" या पाठातील id, username आणि password ही फिल्डस घेत आहोत. याशिवाय युजरचे नाव आणि रजिस्टर केल्याची तारीख ने ही फिल्डस वाढवत आहोत.
3:29 ब्राऊज करू. येथे आधीपासूनच असलेल्या काही व्हॅल्यूज दिसत आहेत.
3:35 त्या डिलिट करून रिकाम्या डेटाबेसने सुरूवात करू. आपण युजर्स रजिस्टर करत आहोत.
3:40 आता एकही युजर नाही आणि रजिस्टर पेजवर जाण्यासाठी लिंक मिळाली असे समजू. हे आपले रजिस्टर पेज आहे.
3:49 ह्यात पेज कसे बनवायचे हे सांगणारा html कोड थोडक्यात बघू. आपल्याकडे एक फॉर्म असेल.
3:59 हा स्वतः सबमिट होणारा फॉर्म असेल. हा "register dot php" वर पुन्हा सबमिट होईल.
4:07 आपण एक टेबल बनवणार आहोत. त्यामधे येथे row असणार आहे.
4:13 आपल्याकडे दोन कॉलम्स आहेत म्हणून दोन td blocks आहेत. पहिला म्हणजे fullname.
4:23 हे तुमच्यावर सोडतो. वेळ वाचवण्याकरता मी असे करत आहे.
4:30 दुस-या कॉलममधे टाईप करा, input type equal to "text" आणि name equals "fullname".
4:38 मूळ पेजवर जाऊन register वर क्लिक करा.
4:47 येथे बघू शकतो, हा पहिला कॉलम आहे आणि हा दुसरा input box असलेला कॉलम आहे.
4:55 आपण येथे वर जाऊ. php codeमधे header एको करू. याबद्दल मी नंतर सांगेन.
5:07 आपल्याला हे मिळाले आहे. वेळ वाचविण्यासाठी हे खाली कॉपी पेस्ट करू.
5:15 तुम्ही "t r" पासून "end t r" पर्यंत निवडल्याची खात्री करा.
5:22 हे खाली पेस्ट करू. नंतर "Choose a username" टाईप करा आणि हे बदलून येथे "username" टाईप करा.
5:32 हे पुन्हा पेस्ट करू. येथे "Choose a password" टाईप करा. तुमचा संगणक हॅक करण्यासाठी कोणी screen capture softwareवापरून किंवा तुमच्या स्क्रीनकडे लक्ष ठेवून पासवर्ड चोरू नये म्हणून ही खबरदारी आहे.
5:47 आणि पुढे येथे खाली पेस्ट करा त्याला "Repeat your password" नाव द्या.
05:58 येथे "password" टाईप करा.
6:07 ह्याला पुन्हा "password" नाव देऊ शकत नाही म्हणून "repeat password".
6:10 सुरक्षिततेसाठी युजरने सबमिट केल्यावर दोन्ही पासवर्ड एकमेकांबरोबर तपासून बघणार आहोत.
6:20 इतर कुठल्याही फिल्डची गरज नाही. हे शेवटचे आहे.
6:24 आपल्याला "date" ची गरज आहे. फॉर्म सबमिट करताना ते करू.
6.31 अशाप्रकारे फॉर्म बनवला आहे. मागे जाऊन रिफ्रेश करू.
6:37 टेबल वापरल्यामुळे ह्याची समान पध्दतीने मांडणी झालेली दिसेल.
6:42 आपल्याला सबमिट बटण हवे आहे.
6:45 टेबलच्या खाली paragraph break द्या.
6:48 टाईप करा input type equal to "submit" आणि name equal to "submit".
6:54 उपलब्धता तपासायची आहे. ज्याची व्हॅल्यू "register" असेल.
6:57 रिफ्रेश करा. पासवर्ड फिल्डसमधे आपल्याला अक्षरे दिसत नाहीत.
7:05 युजर्सना त्यांच्या व्हॅल्यूज टाईप करण्यासाठी fullname आणि username आहे.
7:12 आपण येथे पाठ संपवत आहोत.
7:16 हे तुम्ही क्रमाक्रमाने करून बघत असाल तर तुम्ही तुमच्या पध्दतीने हा फॉर्म बनवू शकता.
7:25 थोडा वेळ घेऊन हवा तसा फॉर्म तुम्ही बनवा.
7:30 त्यात हवे ते बदल जसे की labels बदलू शकता.
7:33 boxes आणि register बटण मिळाल्याची खात्री करा.
7:35 पुढील भागात युजरने प्रत्येक फिल्ड टाईप केले का ते तपासू.
7:44 पासवर्ड समान आहेत का हे तपासण्यासाठी तुलना करू. दोन पासवर्ड आहेत पण character lengthवेगळी असल्याने ते समान नाहीत. युजरकडून काही चूक झाल्यामुळे तो रजिस्टर करू शकणार नाही.
7:59 खात्री आहे तुम्ही आत्तापर्यंत कुठे ना कुठे रजिस्टर केले असेल आणि पासवर्ड पुन्हा टाईप केलेला असेल.
8:07 तसेच पासवर्ड encrypt करून हानीकारक html tags फॉर्ममधून काढून टाकणार आहोत. रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी अशी सुरक्षितता घेणार आहोत.
8:17 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Pratik kamble, Ranjana