Java/C2/Getting-started-Eclipse/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:30, 6 November 2013 by Madhurig (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Getting-started-Eclipse

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:01 Getting started with Eclipse वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत,
00:08 eclipse मध्ये project आणि class बनवणे.
00:12 java program लिहिणे.
00:14 Eclipse मध्ये तो कार्यान्वित करणे.
00:18 आपण वापरणार आहोत,
  • Ubuntu 11.10
  • Eclipse 3.7


00:25 ह्यासाठी आपल्याकडे
00:28 system वर Eclipse install केलेले हवे .
00:30 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटवर जा.
00:39 Eclipse हे Integrated Development Environment आहे.
00:42 ह्या टूलमध्ये java program लिहिता येतो, debug आणि कार्यान्वित करता येतो.
00:50 Eclipse उघडू.
00:55 Alt F2 दाबा. Dialog box मध्ये eclipse टाईप करून एंटर दाबा.
01:08 Workspace Launcher डायलॉग बॉक्स उघडेल.
01:11 Workspace म्हणजे project चा डेटा आणि Eclipse च्या फाईल्स जिथे संचित करतात ती जागा.
01:19 येथे अगोदरच एक default location आहे.
01:24 browse ने दुसरी डिरेक्टरी निवडू शकतो.
01:27 default directory सहित पुढे जाऊ.
01:30 पुढे जाण्यासाठी OK क्लिक करा.
01:39 Welcome to Eclipse हे पेज उघडेल.
01:46 पानाच्या उजव्या कोप-यात वरती Workbench वर क्लिक करा.
01:52 हे Eclipse IDE आहे. आता project समाविष्ट करू.
01:57 File खालील New मधील Project सिलेक्ट करा.
02:05 Project च्या सूचीतून Java Project निवडा.
02:10 आपण अनेक ट्युटोरियल्ससाठी java project चा वापर करणार आहोत. Next क्लिक करा.
02:19 project नेममध्ये EclipseDemo टाईप करा.
02:30 use default location कडे लक्ष द्या.
02:34 हा पर्याय निवडला तर EclipseDemo project data हा default workspace मध्ये संचित होईल.
02:41 जर हा निवडलेल्या नसल्यास browse ने दुसरे location निवडता येते.
02:47 आपण Default location वापरू.
02:52 Wizard च्या तळाच्या उजव्या कोप-यात Finish वर क्लिक करा.
03:00 Open Associated Perspective हा dialog box उघडेल.
03:04 perspective म्हणजे Eclipse मधील विविध घटकांची रचना.
03:09 Dialog box , Java development साठी सोयीचा perspective सुचवीत आहे.
03:20 remember my decision सिलेक्ट करून Yes निवडा.
03:28 येथे project बरोबर EclipseIDE आहे. आता project मध्ये class समाविष्ट करू.
03:37 project वर राईट क्लिक करून new खालील class सिलेक्ट करा.
03:46 class name मध्ये DemoClass टाईप करा.
03:55 modifiers मध्ये public आणि default हे दोन पर्याय आहेत.
03:59 आपण public ठेवू.
04:01 दुसरा पर्याय नंतरच्या ट्युटोरियलमध्ये बघू.
04:06 method stubs च्या सूचीतून public static void main निवडा.
04:15 इतर पर्याय पुढील ट्युटोरियलमध्ये बघू.
04:19 wizard च्या उजव्या कोप-यात खाली असलेले Finish बटण क्लिक करा.
04:30 ही आपली class file आहे.
04:35 येथे अनेक partitions आहेत त्याला portlets म्हणतात.
04:41 Package Explorer portlet हे File Browser सारखे कार्य करते.
04:46 Editor portlet मध्ये आपण code लिहितो.
04:50 Outline portlet आपल्याला project ची hierarchy दाखवते.
04:56 प्रत्येक portlet चा आकार बदलता येतो.
05:10 त्यास minimize बटणाद्वारे minimize करता येते.
05:26 restore बटणाद्वारे ते परत आणता येतात.
05:37 इतर portlets minimize करून एडिटरकडे लक्ष देऊ.
05:49 Eclipse ने आपल्यासाठी येथे आधीच code तयार केला आहे.
05:54 हा code आपण class तयार करताना निवडलेल्या पर्यायांवर अवलंबून असतो.
06:00 येथे print statement समाविष्ट करू.
06:08 टाईप करा System.out.println ("Hello Eclipse").
06:26 statement च्या शेवटी semicolon द्या .
06:31 File खालील Save वर क्लिक करून File सेव करा
06:37 विकल्पाने तुम्ही Control S हा shortcut ही वापरू शकता.
06:42 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी एडिटरवर राईट क्लिक करा. run as वर जाऊन java application निवडा.
06:56 काही प्रिंट झाले तर Output आपल्याला output console वर दिसेल.
07:04 code मध्ये अडचण असल्यास Problems portlet मध्ये दाखवली जाते.
07:10 अशाप्रकारे Eclipse मध्ये Java program लिहिता आणि कार्यान्वित करता येतात .
07:18 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:20 या ट्यूटोरियल मध्ये आपण eclipse मध्ये प्रॉजेक्ट बनविणे आणि त्यामध्ये class समाविष्ट करणे, तसेच java source code लिहीणे आणि Eclipse मध्ये java प्रोग्राम कार्यान्वित करणे शिकलो.
07:33 Assignment म्हणून Display नावाचे नवे project बनवा.
07:38 Display project मध्ये Welcome नावाने class समाविष्ट करा.
07:44 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:50 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:53 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
07:59 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:02 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:05 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:12 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:27 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana