LibreOffice-Suite-Writer/C4/Creating-newsletter/Marathi
From Script | Spoken-Tutorial
VISUAL CUE | NARRATION |
00:00 | लिबर ऑफिस रायटरच्या Creating Newsletters with Multiple Columns वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण रायटरमध्ये Newsletters बनवणे आणि त्यासोबत करता येणा-या काही क्रियांबद्दल जाणून घेणार आहोत. |
00:17 | येथे आपण Ubuntu Linux 10.04 ही operating system आणि LibreOffice Suiteचे version 3.3.4 वापरणार आहोत. |
00:27 | Newsletter म्हणजे प्रकाशित नियतकालिके, परिपत्रके इत्यादी. जी सभासदांना नियमितपणे पाठवली जातात. |
00:39 | याचे कॉलम्सच्या रूपात अनेक भाग केल्यामुळे वाचकांना या भागांतील विविध लेख वाचणे सोपे होते. |
00:47 | लेखांचे वाचन सहज आणि जलद करता येईल असे newsletter आपण रायटरच्या सहाय्याने बनवू शकतो. |
00:55 | नवे टेक्स्ट डॉक्युमेंट उघडण्यास, Fileवर क्लिक करून नंतर New आणि Text Document वर क्लिक करा. |
01:03 | हे डॉक्युमेंट Newsletter नावाने सेव्ह करा. |
01:13 | आपल्याकडे Newsletter नामक नवे टेक्स्ट डॉक्युमेंट आहे. |
01:17 | आता डॉक्युमेंटमध्ये कॉलम्स समाविष्ट करू. |
01:20 | त्यासाठी प्रथम मेनूबारवरील Format वर क्लिक करा आणि नंतर Columns वर क्लिक करा. |
01:27 | अनेक पर्यायांसहित एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:31 | येथे आपण कॉलम्सची संख्या निवडू शकतो. |
01:34 | कॉलम्सची width आणि spacing ठरवता येते. |
01:37 | तसेच separator lines साठी विविध properties निश्चित करता येतात. |
01:42 | कॉलम्स फिल्डसची व्हॅल्यू दोन ने वाढवून newsletter डॉक्युमेंटसाठी आपण दोन कॉलम्स निवडू. |
01:49 | कॉलम्स फिल्डसच्या शेजारी पाच आयकॉन्स आपल्याला विविध उपलब्ध फॉरमॅटचे प्रिव्ह्यू दाखवतात. |
01:56 | दुस-या फॉरमॅटवर क्लिक करा. |
01:59 | कॉलम्सच्या प्रॉपर्टीज दाखविणा-या डिफॉल्ट रूपातील सर्व व्हॅल्यूज तशाच ठेवू. |
02:05 | OK वर क्लिक करा. |
02:08 | आपणास टेक्स्ट एरियामध्ये दोन कॉलम्स दिसतील. |
02:12 | पहिल्या कॉलममध्ये लेख लिहू. |
02:15 | याला Nature असे शीर्षक देऊन ते टेक्स्ट बोल्ड करून त्याचा फाँट साईज 15 करा. |
02:21 | आणि त्याच्याखाली लेख लिहायला सुरूवात करा. |
02:25 | पहिल्या कॉलमच्या शेवटी पोचल्यावर कर्सर आपोआप पुढच्या कॉलमवर गेलेला आपल्याला दिसेल. |
02:33 | आपण कॉलममध्ये picture देखील समाविष्ट करू शकतो. आणि कॉलममध्ये नीट बसवण्यासाठी त्याचा आकारही बदलू शकतो. |
02:39 | आता थोडी जागा सोडून आपण कॉलममध्ये दुसरा लेख लिहू या. |
02:46 | प्रथम त्या लेखाला बोल्ड टेक्स्टमध्ये आणि फाँटचा आकार 15 करून Sports असे शीर्षक देऊ आणि खाली त्यावरील लेख लिहू. |
02:56 | आपल्याला दिसेल की कॉलम्समुळे वाचकांना लेख वाचणे सोपे होते. |
03:02 | आपला लेख पहिल्या कॉलममध्ये बसवण्यास त्यातील काही वाक्ये डिलिट करू. |
03:08 | आता पुढील कॉलमवर जाण्यासाठी Insert बटणावर क्लिक करून मग Manual Break वर क्लिक करा. |
03:16 | उघडलेल्या डायलॉग बॉक्समध्ये Column break बटणावर क्लिक करून मग OK वर क्लिक करा. |
03:23 | कर्सर आपोआप पुढील कॉलमवर गेलेला दिसेल. |
03:27 | या कॉलममध्ये तुम्ही दुसरा लेख लिहिणे सुरू करू शकता. |
03:31 | फॉरमॅटिंगचे सर्व पर्याय जसे की, |
03:33 | Align left, Align right |
03:36 | टेक्स्टला Background Colorदेणे, |
03:38 | टेक्स्टला Highlighting करणे आणि इतर अनेक वैशिष्ट्ये, |
03:41 | समाविष्ट करून टेक्स्ट आकर्षक बनवता येऊ शकते. |
03:45 | उदाहरणार्थ background color देण्यासाठी टेक्स्टचा काही भाग सिलेक्ट करा. |
03:51 | टूलबारवरील background color च्या आयकॉनवर क्लिक करून मग Green 4 वर क्लिक करा. |
03:59 | निवडलेल्या टेक्स्टचा background color बदलून तो फिकट हिरवा झालेला दिसेल. |
04:05 | या प्रमाणे टेक्स्टच्या विविध भागांना विविध background color देऊ शकता. |
04:10 | ड्रॉईंग टूलबारवरील Text पर्यायावर क्लिक करून आपण newsletter मध्ये banners समाविष्ट करू शकतो. |
04:18 | डॉक्युमेंटमधील कुठल्याही टेक्स्ट नसलेल्या भागात हा टेक्स्ट बॉक्स नेऊन ठेवा. |
04:24 | टेक्स्ट बॉक्सच्या आतील भागात लिहिलेले टेक्स्ट हे बॅनर किंवा जाहिरातीसारखे काम करेल. |
04:30 | आता This is a newsletter हे टेक्स्ट टाईप करा. |
04:35 | आपण या टेक्स्टला काही effects ही देऊ शकतो. |
04:37 | उदाहरणार्थ प्रथम टेक्स्टवर राईट क्लिक करून मग मेनूमधील Text पर्यायावर क्लिक करा. |
04:45 | Text आणि Text Animation नामक टॅब असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:50 | Text Animation टॅबवर क्लिक करा. |
04:53 | या टॅब खालील Effects फिल्डमध्ये अनेक पर्याय आहेत. |
04:58 | newsletter मध्ये टेक्स्ट Blink होण्यासाठी Blink या पर्यायावर क्लिक करू या. |
05:04 | शेवटी OK वर क्लिक करा. |
05:07 | आपल्याला डॉक्युमेंटमध्ये This is a newsletter हे टेक्स्ट सतत blink होताना दिसेल. |
05:13 | अशा प्रकारचे अनेक effects आणि graphics आपण टेक्स्टला देऊ शकतो. |
05:18 | पुढील पानावर नवा लेख लिहिण्यासाठी प्रथम Insert बटणावर क्लिक करू या. |
05:25 | नंतर Manual Break पर्यायावर क्लिक करू. |
05:29 | उघडलेल्या डायलॉग बॉक्समधील Page break बटणावर क्लिक करू. |
05:34 | शेवटी OK वर क्लिक करू. |
05:37 | आपल्याला कर्सर पुढील पानावर आलेला दिसेल. |
05:40 | या पानावर, मागील पानाप्रमाणेच कॉलमचा फॉरमॅट असेल. |
05:46 | लेखातील शब्दसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी प्रथम टेक्स्टचा काही भाग किंवा संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करा. |
05:53 | आता मेनूबारवरील Tools पर्यायावर क्लिक करा. |
05:57 | आता ड्रॉप डाऊनमधील Word Count पर्यायावर क्लिक करा. |
06:02 | आपल्याला निवडलेल्या भागातील तसेच संपूर्ण डॉक्युमेंटमधील शब्द संख्या दाखवणारा डायलॉग बॉक्स दिसेल. |
06:10 | तसेच तो संपूर्ण डॉक्युमेंट तसेच निवडलेल्या भागातील अक्षरांची संख्या दाखवेल. |
06:18 | डॉक्युमेंट लिहिताना स्पेल चेकचे कार्य आपोआप होऊ शकते. |
06:23 | त्यासाठी टूलबारवरील AutoSpellcheck ह्या आयकॉनवर क्लिक करा. |
06:27 | लेख लिहिताना जर स्पेलिंगची काही चूक आढळल्यास रायटर ती चूक दाखवण्यासाठी त्या शब्दाला लाल रेघेने अंडरलाईन करेल. |
06:37 | उदाहरणार्थ Catया शब्दाते स्पेलिंग C -A- A -T असे लिहून स्पेस बार दाबा. आपल्याला या शब्दाखाली लाल रेघ दिसेल. |
06:48 | जेव्हा आपण ते दुरूस्त करू तेव्हा लाल रेघ निघून जाईल. |
06:52 | अशा प्रकारे आपण मागील ट्युटोरियलमध्ये बघितलेले फॉरमॅटिंगचे सर्व पर्याय newsletters साठी देखील वापरू शकतो. |
07:01 | लिबर ऑफिस रायटर चे, |
07:04 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
07:06 | थोडक्यात आपण लिबर ऑफिस रायटरमध्ये Newsletters बनविणे आणि त्यासोबत करता येणा-या काही क्रियांबद्दल शिकलो. |
07:17 | सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे |
07:21 | ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:24 | तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
07:28 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
07:31 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:34 | जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:38 | अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा. |
07:44 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:48 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
07:56 | यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
08:00 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
08:07 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |