Java-Business-Application/C2/Overview-of-Library-Management-System/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 09:09, 4 July 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Overview-of-Library-Management-System

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration


00.00 Overview of the Web Application – Library Management System वरील पाठात आपले स्वागत.
00.08 या पाठात वेब ऍप्लिकेशनची माहिती घेऊ.
00.13 या मालिकेत, प्राथमिक इनव्हेन्टरी सिस्टीम बनवायला शिकणार आहोत.
00.19 येथे ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमचे उदाहरण पाहू.
00.24 ही मालिका समजून घेण्यासाठी,
00.27 Netbeans IDE मधून Core Java वापरण्याचे आणि
00.31 HTML चे ज्ञान असावे.
00.32 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.38 आता ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम हे वेब ऍप्लिकेशन पाहू.
00.43 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम ही,
00.46 ग्रंथालयाच्या सदस्यांना दिलेल्या व परत आलेल्या पुस्तकांचे
00.50 आणि ग्रंथालयाच्या सदस्यांच्या माहितीचे व्यवस्थापन करते.
00.54 आपल्याला ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम का आवश्यक आहे?
00.58 अशी सिस्टीम वापरल्याने -
01.00 ग्रंथपालाला ग्रंथालयातील पुस्तकांचे व्यवस्थापन सहज करता येते.
01.05 एखाद्या मध्यवर्ती सर्व्हरवर सभासदांची माहिती व्यवस्थित सांभाळली जाते.
01.10 वेळ आणि साधनसामुग्रीची बचत होते.
01.13 कामाचा भार हलका होतो.
01.15 आता आपण ही सिस्टीम पाहू.
01.17 त्यासाठी Netbeans IDEवर जाऊ.
01.22 आपल्याकडे ही अतिशय साधी सिस्टीम आहे.
01.24 MyFirstProject हे प्रोजेक्ट कार्यान्वित करू.
01.30 ब्राऊजर विंडो उघडेल.
01.33 तुम्ही ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमचे होम पेज बघू शकता.
01.38 येथे अगदी सोपा लॉगिन फॉर्म दिसेल.
01.42 Visitor’s Home Pageवर जाण्यासाठी एक लिंक आहे.
01.46 त्यावर क्लिक करा.
01.48 तुम्ही ग्रंथालयामधे उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची सूची बघू शकता.
01.53 ग्रंथालयाचे अनेक सभासद असतात.
01.56 सभासद म्हणून लॉगिन करू या; म्हणजे असे युजर ज्यांनी आधीच येथे रजिस्टर केले आहे.
02.03 मी “mdhusein” म्हणून लॉगिन करत आहे. पासवर्ड देऊन एंटर दाबा.
02.10 आपण Success Greeting Page बघू शकता.
02.13 तसेच आपल्याकडे युजरनी सध्या घेतलेल्या पुस्तकांची यादी देखील आहे.
02.18 आता logout करू.
02.21 पुढे आपण ग्रंथपाल म्हणजेच admin म्हणून लॉगिन करणार आहोत .
02.26 लॉगिन केल्यावर Admin Section page दिसेल.
02.31 येथे 4 पर्याय दिसतील.
02.33 प्रत्येक पर्याय वापरून त्याचा रिझल्ट पाहू.
02.37 पहिला पर्याय आहे List Books.
02.41 येथे ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी मिळेल.
02.46 पुढचा पर्याय List Borrowed Books.
02.50 येथे वेगवेगळ्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल.
02.54 आणि परतीची तारीख उलटून गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल.
02.59 पुढील पर्याय List Users.
03.03 येथे ग्रंथालयामधे रजिस्टर्ड असलेल्या सर्व युजर्सची यादी मिळेल .
03.08 शेवटचा पर्याय म्हणजे Checkout/Return a Book.
03.12 या पर्यायावर क्लिक करा.
03.15 हा Checkout/Return Bookचा इंटरफेस आहे.
03.20 आता लॉगिन पेजवर परत जाऊ.
03.23 लक्षात घ्या, येथे नवीन युजर म्हणून रजिस्टर करण्याचा पर्याय आहे.
03.28 त्यासाठी येथे क्लिक करा.
03.31 हा नवीन युजर रजिस्टर करण्यासाठी registration form आहे.
03.35 आपण असा साध्या वेब ऍप्लिकेशनचा संक्षिप्त आढावा घेतला.
03.39 या मालिकेत तुम्ही साधी ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम बनवायला शिकणार आहात.
03.46 तसेच त्यामधे अधिक कार्यप्रणाली समाविष्ट करू शकणार आहात जसे की एखादे पुस्तक शोधणे.
03.53 पुढील पाठांत -
03.54 वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी JSP आणि servlets वापरणार आहोत.
03.59 आपण MVC architecture सविस्तर जाणून घेणार आहोत.
04.04 आणि MVC पध्दतीचा वापर होणारे कुठलेही ऍप्लिकेशन आपल्याला बनवता येईल.
04.10 स्पोकन ट्युटोरिअल विषयी अधिक माहितीसाठी,
04.13 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04.16 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04.20 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04.24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
04.26 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04.29 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04.32 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
04.38 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
04.42 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
04.49 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
04.52 http://spoken-tutorial.org/NMEICT- Intro
04.59 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
05.08 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
05.13 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana