Ruby/C2/Control-Statements/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Control-Statements
Author: Manali Ranade
Keywords: Ruby
Time | Narration
|
---|---|
00.01 | रुबी मधील कंट्रोल स्टेटमेंटस वरील पाठात आपले स्वागत. |
00.06 | यात शिकणार आहोत, |
00.08 | if स्टेटमेंट |
00.09 | elsif स्टेटमेंट |
00.11 | else आणि |
00.12 | case स्टेटमेंटस. |
00.14 | त्यासाठी वापरणार आहोत, |
00.15 | उबंटु वर्जन 12.04 |
00.18 | रुबी 1.9.3 |
00.21 | या पाठासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असावे. |
00.24 | तुम्हाला लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे. |
00.30 | नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.34 | सुरूवात करण्यापूर्वी, मागे आपण “ttt” नामक डिरेक्टरी बनवली होती. |
00.38 | त्या डिरेक्टरीवर जाऊ. |
00.41 | आणि त्यानंतर ruby hyphen tutorial, control hyphen statements |
00.47 | आता त्या फोल्डरमधे आहोत. पुढे जाऊ. |
00.52 | रुबीमधे इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे: |
00.56 | if " कंडिशन" |
00.58 | रुबी कोड |
00.59 | end |
01.01 | त्याचे उदाहरण पाहू. |
01.03 | रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा. |
01.08 | if hyphen statement dot rb असे नाव द्या. |
01.12 | माझ्याकडे हे if स्टेटमेंटचे उदाहरण आहे. |
01.15 | पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता. |
01.19 | ह्या पाठात if स्टेटमेंट घोषित केले आहे. |
01.23 | प्रथम my_num हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्याला 2345 ही व्हॅल्यू दिली. |
01.31 | नंतर if स्टेटमेंट घोषित केले आहे. |
01.34 | if स्टेटमेंट मधे puts मेथड समाविष्ट केली आहे जी आऊटपुट दाखवेल. |
01.39 | if स्टेटमेंट my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आहे का ते तपासेल. |
01.43 | असेल तर दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवली जाईल. |
01.47 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा. |
01.51 | ruby space if hyphen statement dot rb |
01.57 | “The value of my_num is greater than 0”. असे आऊटपुट दिसेल. |
02.02 | हे आऊटपुट if कंडिशन true असल्याचे सिध्द करते. |
2.07 | आता रुबीमधे तुमचे if स्टेटमेंट लिहू शकता. |
02.12 | पुढे if-else स्टेटमेंट पाहू. |
02.16 | else वापरण्याचा सिंटॅक्स असा आहे: |
02.18 | if कंडिशन |
02.19 | रुबी कोड |
02.20 | else |
02.21 | रुबी कोड |
02.22 | end |
02.24 | आता उदाहरण पाहू. |
02.26 | रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा. |
02.30 | त्याला if hyphen else hyphen statement dot rb नाव द्या. |
02.37 | माझ्याकडे if-else स्टेटमेंटचे उदाहरण आहे . |
02.40 | पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता. |
02.44 | ह्या उदाहरणात if-else स्टेटमेंट घोषित केले आहे. |
02.48 | प्रथम my_num हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्यास -1 ही व्हॅल्यू दिली आहे. |
02.55 | नंतर if स्टेटमेंट घोषित केले. |
02.58 | if स्टेटमेंट my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आहे का ते तपासेल. |
03.03 | असेल तर दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवली जाईल. |
03.06 | नसेल तर हे else स्टेटमेंटवर जाईल. |
03.10 | आणि त्यात दिलेली स्ट्रिंग आपल्याला दाखवेल. |
03.13 | आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा. |
03.18 | ruby space if hyphen else hyphen statement dot rb |
03.26 | आणि आऊटपुट बघा. |
03.27 | “The value of my_num is lesser than 0” असे आऊटपुट दिसेल. |
03.32 | हे else स्टेटमेंट कार्यान्वित झाल्याचे दाखवत आहे. |
03.35 | आता तुम्ही if-else स्टेटमेंट रुबीमधे लिहू शकता. |
03.41 | आता if-elsif स्टेटमेंट पाहू. |
03.45 | elsifचा सिंटॅक्स असा आहे: |
03.48 | if कंडिशन रुबी कोड |
03.50 | elsif कंडिशन रुबी कोड |
03.52 | else रुबी कोड |
03.54 | end |
03.55 | त्याचे उदाहरण पाहू. |
03.58 | रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा. |
04.01 | त्याला if hyphen elsif hyphen statement dot rb असे नाव द्या. |
04.07 | माझ्याकडे हे if-elsif- स्टेटमेंटचे उदाहरण आहे. |
04.10 | पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता. |
04.14 | ह्या उदाहरणात if-elsif- स्टेटमेंट घोषित केले आहे. |
04.19 | येथे सुद्धा my_num हे व्हेरिएबल घोषित करून त्याला -1 ही व्हॅल्यू दिली आहे. |
04.25 | नंतर if स्टेटमेंट घोषित केले आहे. |
04.28 | हे if स्टेटमेंट my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे का ते तपासेल. |
04.32 | असल्यास दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवेल. |
04.35 | हे true नसल्यास ते elsif भागामधे जाईल. |
04.39 | आता हे my_num ची व्हॅल्यू -1 आहे का ते तपासेल. |
04.43 | trueअसल्यास येथे दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवेल. |
04.46 | my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त किंवा -1 नसेल तर ते else वर जाईल. |
04.54 | पण my_num = -1 असल्यामुळे हे else ब्लॉकवर जाणार नाही. |
05.00 | आणि हे कंडिशनल स्टेटमेंटमधून बाहेर पडेल. |
05.03 | आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा |
05.07 | ruby space if hyphen elsif hyphen statement dot rb |
05.15 | आणि आऊटपुट बघा. |
05.17 | “The value of my_num is -1 and is lesser than 0” आऊटपुट असे दिसेल . |
05.23 | आता आपल्या फाईलमधे जाऊन my_num ची व्हॅल्यू 5 करा. |
05.29 | कोड सेव्ह करून तो टर्मिनलवर कार्यान्वित करा. |
05.35 | येथे if कंडिशनची पूर्तता झाल्यामुळे तेथील स्ट्रिंग आऊटपुट म्हणून प्रिंट होईल. |
05.42 | “The value of my_num is greater than 0” |
05.45 | फाईलमधे जाऊन my_num ची व्हॅल्यू -5 करा. |
05.50 | कोड सेव्ह करून टर्मिनलवर कार्यान्वित करा. |
05.55 | येथे else कंडिशनची पूर्तता झाली आणि else ब्लॉक मधील puts स्टेटमेंट कार्यान्वित झाले. |
06.03 | आता रुबीमधे तुमचे if- elsif स्टेटमेंट बनवू शकता . |
06.08 | यानंतर आता आपण केस स्टेटमेंट पाहू. |
06.12 | केस स्टेटमेंट हे एखाद्या विशिष्ट निवडीसाठी कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आहे. |
06.17 | हे स्टेटमेंट समजून घेण्यासाठी case स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहू. |
06.22 | case स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे: |
06.24 | case व्हेरिएबल |
06.26 | when "व्हॅल्यू 1" |
06.28 | रुबी कोड |
06.29 | when "व्हॅल्यू 2” |
06.30 | रुबी कोड |
06.31 | else |
06.32 | रुबी कोड |
06.34 | end |
06.35 | त्याचे उदाहरण पाहू. |
06.37 | रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा. |
06.41 | case hyphen statement dot rb असे नाव द्या. |
06.44 | माझ्याकडे हे केस स्टेटमेंटचे उदाहरण आहे. |
06.48 | पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता. |
06.52 | ह्या उदाहरणात मी केस स्टेटमेंट घोषित केले आहे. |
06.55 | येथे हे प्रिंट स्टेटमेंट आहे जे टर्मिनलवर एक प्रश्न प्रिंट करेल. |
07.01 | नंतर मी gets, कॉल करीन जे standard input मधून एक ओळीचा डेटा स्वीकारेल. |
07.09 | घेतलेला input data मी new line characters वापरून chomp करीन. |
07.15 | त्याचा रिझल्ट domain नामक व्हेरिएबलमधे संचित होईल. |
07.18 | नंतर येथे case स्टेटमेंट घोषित केले आहे. |
07.22 | त्यामधे when स्टेटमेंट घोषित केले आहे. |
07.25 | हे येथे दिलेली स्ट्रिंग आणि domainची व्हॅल्यू सारखी आहे का ते तपासेल. |
07.30 | प्रथम हे domain ची व्हॅल्यू “UP” आहे का ते तपासेल. |
07.34 | असल्यास “Uttar Pradesh” प्रिंट करेल आणि केस स्टेटमेंट मधून बाहेर पडेल. |
07.39 | domain जर “UP” नसेल तर त्याची व्हॅल्यू “MP” आहे का ते तपासेल. |
07.44 | असल्यास “Madhya Pradesh” असे प्रिंट करेल आणि हे असे चालू राहिल. |
07.48 | domain ची व्हॅल्यू जुळेपर्यंत त्याचे तपासणे चालू राहिल. |
07.53 | असे करताना else स्टेटमेंट आढळल्यास, |
07.56 | वरील कुठलीही कंडिशन true न झाल्याने, |
07.59 | elseपुढील रुबी कोड कार्यान्वित करेल. |
08.03 | आपल्या उदाहरणात हे “Unknown” असे प्रिंट करेल. |
08.07 | फाईल सेव्ह करा. टर्मिनलवर जाऊन टाईप करा |
08.11 | ruby space case hyphen statement dot rb. |
08.18 | टर्मिनलवर असे दिसेल “Enter the state you live in:” . |
08.22 | “UP” टाईप करून आऊटपुट बघा. |
08.25 | “Uttar Pradesh” असे आऊटपुट दिसेल . |
08.28 | पुन्हा त्याच पध्दतीने रुबी फाईल कार्यान्वित करा. |
08.31 | ह्यावेळी प्रॉम्प्ट वर “KL” टाईप करून आऊटपुट बघा. |
08.36 | “Kerala” असे आऊटपुट दिसेल. |
08.38 | पुन्हा एकदा फाईल कार्यान्वित करा. |
08.41 | ह्यावेळी “TN” टाईप करून आऊटपुट बघा. |
08.47 | “Unknown” असे आऊटपुट दिसेल . |
08.50 | कारण कुठल्याही caseची पूर्तता झाली नाही. त्यामुळे डिफॉल्ट else स्टेटमेंट कार्यान्वित झाले. |
08.58 | आता रुबीमधे तुमचे case स्टेटेमेंट लिहू शकता. |
09.03 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09.07 | थोडक्यात. |
09.08 | पाठात शिकलो, |
09.10 | if स्टेटमेंट |
09.12 | elseचा वापर |
09.13 | if-elsif आणि |
09.15 | case स्टेटमेंटस |
09.17 | असाईनमेंट: |
09.18 | रुबी प्रोग्रॅम लिहा, |
09.20 | जो युजरला एक नंबर टाईप करण्यास सांगेल. |
09.23 | नंतर योग्य कंट्रोल-स्टेटमेंट वापरून |
09.26 | दिलेल्या संख्येचा 2हा अवयव आहे का ते तपासा. |
09.29 | असल्यास “The number entered is a multiple of 2” असे प्रिंट करा. |
09.35 | नसल्यास संख्येचा 3हा अवयव आहे का ते तपासा. |
09.38 | असल्यास “The number entered is a multiple of 3” असे प्रिंट करा. |
09.43 | नसल्यास 4 हा अवयव आहे का ते तपासा. |
09.47 | असल्यास “The number entered is a multiple of 4” असे प्रिंट करा. |
09.51 | नसल्यास “The number is not a multple of 2, 3 or 4” असे प्रिंट करेल. |
09.56 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
10.00 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10.03 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10.07 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
10.09 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10.13 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10.16 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10.21 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10.26 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10.32 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10.41 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |