Netbeans/C2/Adding-a-File-Chooser/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 22:01, 18 May 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.00 नमस्कार.
00.01 जावा ऍप्लिकेशनमधे File Chooser (फाईल चुजर) समाविष्ट करण्याच्या पाठात स्वागत.
00.07 ह्या पाठात शिकू,
00.09 ऍप्लिकेशन बनवणे.
00.10 ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे.
00.12 File Chooser(फाईल चुजर) समाविष्ट करणे.
00.14 File Chooser(फाईल चुजर) कॉनफिगर करणे.
00.17 ऍप्लिकेशन कार्यान्वित करणे.
00.19 ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु v12.04
00.26 आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00.31 ह्या पाठात जावा ऍप्लिकेशन मधील javax.swing.JFileChooser कॉम्पोनंटद्वारे File chooser(फाईल चुजर) समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ.
00.42 सरावासाठी छोटे जावा ऍप्लिकेशन बनवू जे टेक्स्ट एरियामधे .txt फाईल लोड करेल.
00.52 प्रथम जावा ऍप्लिकेशन बनवू.
00.55 IDE उघडा.
00.57 मुख्य मेनूतील File(फाइल) खालील New Project(न्यू प्रॉजेक्ट) सिलेक्ट करा.
01.03 category तील Java(जावा) आणि प्रोजेक्ट टाईप जावा ऍप्लिकेशन निवडा.
01.08 आणि Next(नेक्स्ट) क्लिक करा.
01.10 Project Name(प्रॉजेक्ट नेम)फिल्डमधे टाईप करा JFileChooserDemo.
01.20 Create Main Class(क्रियेट मेन क्लास) चेकबॉक्स क्लियर करा.
01.23 Set as Main Project(सेट अस मेन प्रॉजेक्ट) चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा.
01.27 Finish(फिनिश) क्लिक करा.
01.31 येथे JFrame कंटेनर बनवून त्यात काही कॉम्पोनंटस समाविष्ट करू.
01.37 Source Packages(सोर्स पॅकेजस) नोडवर राईट क्लिक करा.
01.41 New(न्यू) मधील Other( अदर) सिलेक्ट करा.
01.45 कॅटॅगरीज खालील Swing GUI Forms आणि टाईप खालील JFrameForm निवडा.
01.51 Next(नेक्स्ट) क्लिक करा.
01.54 Class Nameमधे टाईप करा JFileChooserDemo.
02.02 Packageफिल्ड मधे टाईप करा jfilechooserdemo.resources.
02.12 Finish(फिनिश) क्लिक करा.
02.17 Properties(प्रॉपर्टीस ) विंडोमधे Title(टाइटल) प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
02.22 टाईप करा Demo Application. (डेमो ऍप्लिकेशन)
02.30 खात्रीसाठी एंटर दाबा.
02.32 Palette(पॅलेट) मधे Swing Menus(स्विंग मेनुस ) कॅटॅगरी उघडा.
02.40 Menu Bar(मेनु बार ) कॉम्पोनंट सिलेक्ट करून Jframe च्या वरती डाव्या कोप-यात ड्रॅग करा.
02.50 Menu Bar(मेनु बार) कॉम्पोनंटचा Edit(एडिट ) आयटम राईट क्लिक करा.
02.55 कॉन्टेक्स्ट मेनूमधे Delete(डिलीट ) सिलेक्ट करा.
02.59 पुढे मेनू आयटम समाविष्ट करू जो चालू ऍप्लिकेशनमधे FileChooser(फाइलचुजर ) उघडण्याची परवानगी देईल.
03.07 दुसरा मेनू आयटम ड्रॅग करण्यापूर्वी मेनूबार निवडला असल्याची खात्री करा.
03.14 पॅलेटमधील Swing Menus(स्विंग मेनुस ) कॅटॅगरी खालील नवा Menu Item( मेनु आइटम) सिलेक्ट करा.
03.22 मेनू बार वर ड्रॅग करून त्यातील File(फाइल) आयटमवर ड्रॉप करा.
03.30 Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 वर राईट क्लिक करा.
03.35 आणि कॉन्टेक्स्ट मेनूमधून Change Variable Name(चेंज वेरियबल नेम) निवडा.
03.41 आयटमचे नाव बदलून Open(ओपन) करून OK(ओके ) क्लिक करा.
03.48 Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा.
03.53 कॉम्पोनंटच्या टेक्स्टमधे बदल करण्यासाठी स्पेसबार दाबा.
03.58 टेक्स्ट बदलून ते Open(ओपन) करा आणि एंटर दाबून खात्री करा.
04.04 Open(ओपन) मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा.
04.08 मेनू आयटम Open(ओपन) वर राईट क्लिक करून कॉन्टेक्स्ट मेनूमधून Events(इवेंट्स) मधील Action(एक्षन ) खालील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड) पर्याय निवडा.
04.20 GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल.
04.25 OpenActionPerformed() ही नवी इव्हेंट हँडलर मेथड बनेल.
04.31 Design(डिज़ाइन) व्ह्यूवर परत जा.
04.35 File Chooser(फाइलचुजर ) मधून बाहेर पडण्यासाठी मेनू आयटम समाविष्ट करा.
04.39 Palette(पॅलेट) मधे Swing Menus(स्विंग मेनुस ) कॅटॅगरी निवडा.
04.45 Menu Item( मेनु आइटम) सिलेक्ट करा.
04.48 फॉर्मच्या मेनूबार वरील Open ह्या मेनू आयटमखाली ड्रॅग करा.
04.53 jmenuItem1 कुठे ठेवले जाणार आहे हे ऑरेंज रंगाच्या हायलाईटिंगने दर्शवले जात आहे याकडे लक्ष द्या.
05.03 Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 वर राईट क्लिक करा.
05.07 कॉन्टेक्स्ट मेनूमधून Change Variable Name(चेंज वेरियबल नेम) निवडा .
05.12 आयटमचे नाव बदलून Exit(एग्ज़िट) करून OK(ओके) क्लिक करा.
05.20 Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा.
05.25 कॉम्पोनंटचे टेक्स्ट एडिट करण्यासाठी Space bar(स्पेस बार ) दाबा.
05.30 टेक्स्ट बदलून Exit(एग्ज़िट) करा. खात्री करण्यासाठी एंटर दाबा.
05.36 Exit(एग्ज़िट) ह्या मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा.
05.41 मेनू आयटम Exit(एग्ज़िट) वर राईट क्लिक करा.
05.44 कॉन्टेक्स्ट मेनूतून Events(इवेंट्स), Action(एक्षन ), Action Performed()(एक्षन पर्फॉर्म्ड) निवडा.
05.51 GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल.
05.56 ExitActionPerformed() नावाची नवी इव्हेंट हँडलर मेथड तयार होईल.
06.02 Navigator(नॅविगेटर) विंडोमधे OpenActionPerformed() नोडच्या वरती ExitActionPerformed नोड बनलेला दिसेल.
06.12 Navigator(नॅविगेटर) दिसत नसल्यास,
06.14 मेनूबारमधील Window(विंडो) मेनूवर जा.
06.18 Navigating(नॅविगेटिंग) मधील Navigator(नॅविगेटर) क्लिक करा.
06.25 येथे OpenActionPerformed नोडच्या वरती ExitActionPerformed नोड दिसेल .
06.33 Exit(एग्ज़िट) मेनू आयटम सुरू करण्यासाठी,
06.36 System.exit(0) हे स्टेटमेंट ExitActionPerformed() मेथडच्या बॉडीमधे समाविष्ट करू.
06.47 Design(डिज़ाइन) मोडवर जा.
06.50 पॅलेटच्या Swing Controls(स्विंग कंट्रोल्स) कॅटॅगरीमधून फॉर्मवर Text Area(टेक्स्ट एरिया) ड्रॅग करा.
07.06 File Chooser(फाइल चुजर) द्वारे नंतर दाखवल्या जाणा-या मजकूरासाठी नवीन समाविष्ट केलेल्या घटकाचा आकार बदलून घ्या.
07.18 व्हेरिएबलचे नाव बदलून textarea(टेक्स्ट एरिया) करा.
07.26 आता पुढे File Chooser (फाइल चुजर) समाविष्ट करू.
07.31 Navigator(नॅविगेटर) विंडो उघडलेली नसल्यास ती उघडण्यासाठी Window(विंडो) खालील Navigating(नॅविगेटिंग) मधील Navigator(नॅविगेटर) सिलेक्ट करा.
07.38 Navigator(नॅविगेटर) मधे Jframe नोडवर राईट क्लिक करा.
07.44 कॉन्टेक्स्ट मेनूमधून Add From Palette(एड फ्रॉम पॅलेट) मधील Swing Windows(स्विंग विंडोस) खालील File Chooser(फाइल चुजर) पर्याय निवडा.
07.54 फॉर्ममधे JFileChooser समाविष्ट झालेले तुम्ही Navigator(नॅविगेटर) मधे पाहू शकता .
08.01 JFileChooser नोडवर राईट क्लिक करून व्हेरिएबलचे नाव बदलून fileChooser(फाइल चुजर) नाव द्या.
08.16 OK क्लिक करा.
08.19 आता File Chooser(फाइल चुजर) समाविष्ट केले आहे.
08.21 पुढे आपल्याला हवे असलेले शीर्षक दाखवण्यासाठी File Chooser(फाइल चुजर) कॉनफिगर करू.
08.27 तसेच custom file filter(कस्टम फाइल फिल्टर) समाविष्ट करू. ऍप्लिकेशनमधे File Chooser (फाइल चुजर)समाविष्ट करू.
08.34 Navigator(नॅविगेटर) विंडोमधे JfileChooser निवडा.
08.38 आता Properties(प्रॉपर्टीस) डायलॉग बॉक्समधे त्याची प्रॉपर्टी एडिट करू.
08.43 पॅलेट खालील Properties(प्रॉपर्टीस) विंडोमधे,
08.47 dialogTitle बदलून This is my open dialog करा.
09.00 निश्चित करण्यासाठी एंटर दाबा.
09.03 आता Source(सोर्स) मोडवर जाऊ.
09.07 आता FileChooser(फाइल चुजर) ऍप्लिकेशनमधे समाविष्ट करू.
09.12 आपल्याकडील हा उपलब्ध कोड आपण OpenActionPerformed() मेथडमधे कॉपी पेस्ट करू.
09.20 हे उदाहरण फाईल मधील मजकूर वाचून तो टेक्स्ट एरियामधे दाखवेल.
09.27 आता युजरनी क्लिक केलेली फाईल ठरवण्यासाठी FileChooser ची getSelectedFile() ही मेथड कॉल करू.
09.36 आपण हा कोड क्लिपबोर्डवर कॉपी करून IDE च्या सोर्स व्ह्यूमधील OpenActionPerformed मेथडमधे पेस्ट करू.
09.51 एडिटर कोडमधे एरर्स दाखवत असल्यास कोडमधे कुठेही राईट क्लिक करून Fix Imports(फिक्स इंपोर्ट्स) सिलेक्ट करा.
10.00 आता कस्टम फाईल फिल्टर समाविष्ट करू. ज्यामुळे File Chooser(फाइल चुजर) केवळ .txt फाईल्स दाखवेल.
10.09 डिझाईन मोडवर जाऊन Navigator(नॅविगेटर) विंडोमधे fileChooser(फाइल चुजर) सिलेक्ट करा.
10.16 Properties(प्रॉपर्टीस) विंडोमधे fileFilter( फाइल फिल्टर ) प्रॉपर्टीच्या पुढील ellipsis( एलिप्सिस) बटणावर क्लिक करा.
10.25 fileFilter( फाइल फिल्टर ) डायलॉग बॉक्समधील कॉम्बो बॉक्समधून Custom Code(कस्टम कोड) निवडा.
10.31 टेक्स्ट फिल्डमधे new MyCustomFilter() टाईप करा.
10.41 OK क्लिक करा.
10.44 कस्टम कोड कार्य करण्यासाठी MyCustomFilter क्लास लिहू.
10.52 हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilter( फाइल फिल्टर ) क्लासला एक्स्टेंड करतो.
10.57 import(इम्पोर्ट) स्टेटमेंटखाली आपल्या सोर्समधे,
11.04 हा कोड येथे कॉपी पेस्ट करत आहोत.
11.11 अशाप्रकारे हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilter( फाइल फिल्टर ) क्लासला एक्स्टेंड करतो.
11.20 प्रोजेक्टस विंडोमधे JFileChooserDemo वर राईट क्लिक करून सँपल प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी Run(रन) क्लिक करा.
11.31 Run Project(रन प्रॉजेक्ट) डायलॉग बॉक्समधे jfilechooserdemo.resources.JFileChooserDemo हा मेन क्लास सिलेक्ट करा.
11.41 OK क्लिक करा.
11.47 ऍप्लिकेशन चालू झाल्यावर File( फाइल) मेनूतील Open( ओपन) निवडून डेमो कार्यान्वित करू.
11.55 टेक्स्ट एरियामधे मजकूर दाखवण्यासाठी कुठलीही टेक्स्ट फाईल उघडा.
12.00 आपण Sample.txt निवडून Open( ओपन) क्लिक करू.
12.06 fileChooser(फाइल चुजर) टेक्स्ट फाईलचा मजकूर दाखवत आहे.
12.10 ऍप्लिकेशन बंद करण्यासाठी फाईल मेनूतील Exit(एग्ज़िट) सिलेक्ट करा.
12.17 या पाठात आपण शिकलो,
12.19 जावा ऍप्लिकेशन मधे File chooser(फाइल चुजर) समाविष्ट करणे,
12.23 File chooser(फाइल चुजर) कॉनफिगर करणे.
12.27 असाईनमेंटमधे आपण बनवलेले डेमो प्रोजेक्ट वापरून पुढील फीचर्स समाविष्ट करा.
12.35 मेनूबार खाली Save(सेव) मेनू आयटम समाविष्ट करा.
12.38 सर्व मेनू आयटमसाठी कीबोर्ड शॉर्टकटस समाविष्ट करा.
12.42 फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह कार्यान्वित करणारा कोड लिहा.
12.51 आपण अशाच प्रकारची असाईनमेंट आधीच बनवली आहे. ज्यामधे filechooser(फाइल चुजर) फाईल मेनूखाली सेव्ह पर्याय दाखवेल.
13.01 जो आपण उघडलेली टेक्स्ट फाईल सेव्ह करण्याचा पर्याय देईल.
13.09 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टच्या माहितीसाठी,
13.12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
13.15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
13.19 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
13.24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13.30 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13.33 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
13.41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13.46 यासाठी अर्थसहाय्यनॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
13.53 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13.59 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
14.04 धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana