Netbeans/C2/Handling-Images-in-a-Java-GUI-Application/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration
|
---|---|
00.01 | नमस्कार. |
00.02 | Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE वरील पाठात स्वागत. |
00.10 | आपल्याला नेटबीन्स ची प्राथमिक ओळख तसेच, |
00.15 | JFrame फॉर्मवरील टेक्स्ट फिल्डस, बटण्स, मेनू समाविष्ट करण्याचे ज्ञान आहे असे समजू. |
00.22 | नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.29 | ह्या पाठात जाणून घेऊ: इमेजेस हाताळण्या संदर्भात सविस्तर माहिती, |
00.34 | आणि त्यांच्यावर GUI ऍप्लिकेशनमधे एखादी कृती करणे. |
00.39 | ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत. |
00.52 | जावा ऍप्लिकेशन मधे इमेजेस ऍक्सेस करणे आणि हाताळण्याची सर्वमान्य पध्दत म्हणजे getResource() मेथड. |
00.59 | IDE मधील GUI Builder वापरून ऍप्लिकेशनमधे इमेज समाविष्ट करणारा कोड बनवायला शिकू. |
01.07 | आणि साधी Jframe बनवू ज्यामधे इमेज दाखवणारे एक Jlabel असेल. |
01.13 | ह्या पाठात पाहू - |
01.15 | ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे. |
01.18 | इमेजसाठी पॅकेज समाविष्ट करणे. |
01.20 | लेबलवर इमेज दाखवणे. |
01.22 | माऊस इव्हेंटस आणि पॉप-अप्स बनवणे. |
01.25 | ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करणे. |
01.28 | आपले सँपल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी IDE वर जाऊ. |
01.33 | फाईल मेनूतून New Project निवडा. |
01.37 | Categories मधील Java, Projects खालील Java Application निवडून Next क्लिक करा. |
01.46 | Project Name फिल्डमधे ImageDisplayApp टाईप करा. |
01.54 | Create Main Class चेकबॉक्स क्लियर करा. |
01.58 | तसेच Set as Main Project चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा. |
02.03 | Finish क्लिक करा.IDE मधे प्रोजेक्ट तयार झालेले असेल. |
02.08 | ह्या भागात Jframe form बनवून त्यात Jlabel समाविष्ट करणार आहोत. |
02.14 | प्रथम Jframe form बनवू. |
02.17 | Projects विंडोत ImageDisplayApp नोड एक्सपांड करा. |
02.23 | Source Packages नोडवर राईट क्लिक करून New मधील Jframe form पर्याय निवडा. |
02.30 | Class Name फिल्डमधे ImageDisplay टाईप करा. |
02.37 | Package फिल्डमधे org.me.myimageapp टाईप करा. |
02.45 | Finish क्लिक करा. |
02.48 | आता Jlabel समाविष्ट करू. |
02.52 | IDE च्या उजव्या बाजूच्या पॅलेट मधील Label कॉम्पोनंट निवडून Jframe वर ड्रॅग करा. |
03.01 | आता तुमचा फॉर्म अशाप्रकारे दिसला पाहिजे. |
03.06 | ऍप्लिकेशनमधे इमेजेस किंवा इतर रिसोर्सेस वापरता तेव्हा सामान्यतः रिसोर्सेससाठी वेगळे Java पॅकेज बनवतात. |
03.15 | लोकल फाईल सिस्टीममधे, पॅकेज हे फोल्डर सदृश्य असते. |
03.19 | प्रोजेक्टस विंडोमधे org.me.myimageapp च्या नोडवर राईट क्लिक करून New मधील Java Package निवडा. |
03.30 | New Package विझार्ड मधे org.me.myimageapp पुढे .resources टाईप करा. |
03.40 | त्यामुळे नव्या पॅकेजचे नाव आता org.me.myimageapp.resources हे असेल. |
03.47 | Finish क्लिक करा. |
03.49 | इमेज समाविष्ट करू तेव्हा प्रोजेक्टस विंडोतील org.me.myimageapp.resources ह्या पॅकेजमधे इमेज आलेली दिसली पाहिजे. |
03.59 | ऍप्लिकेशनमधे इमेज Jlabel कॉम्पोनंटमधे बसवली जाणार आहे. |
04.04 | आता लेबलवर इमेज समाविष्ट करू. |
04.08 | GUI designer मधे फॉर्ममधे समाविष्ट केलेले लेबल सिलेक्ट करा. |
04.14 | विंडोच्या उजवीकडे असलेल्या पॅलेट खालील प्रॉपर्टी विंडोमधे स्क्रॉल करून Icon प्रॉपर्टीवर जा. |
04.23 | ellipsis म्हणजेच उजवीकडील तीन टिंबांवर क्लिक करा. |
04.30 | Icon प्रॉपर्टी डायलॉग बॉक्समधे Import to Project वर क्लिक करा. |
04.34 | फाईल निवडण्यासाठी तुम्हाला हवी असलेली इमेज ज्या फोल्डरमधे आहे त्या फोल्डरवर जा. |
04.42 | Next क्लिक करा. |
04.45 | विझार्डच्या Select Target Folder पेजमधे Resources फोल्डर निवडा. |
04.49 | Finish क्लिक करा. |
04.52 | नंतर IDE आपल्या प्रोजेक्टमधे इमेज कॉपी करेल. |
04.57 | ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करतो तेव्हा ही इमेज वितरणासाठीच्या JAR फाईलमधे समाविष्ट होते. |
05.07 | OK क्लिक करा. |
05.11 | तुमच्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून Clean and Build पर्याय निवडा. |
05.18 | आता फाईल विंडोवर जाऊन build फोल्डर खालील, |
05.29 | dist फोल्डर मधे jar फाईल बघू शकता. |
05.33 | imagedisplay क्लासमधे इमेज ऍक्सेस करण्यासाठी येथे कोड बनतो. |
05.38 | तसेच फॉर्मच्या डिझाईन व्ह्यूमधे लेबलवर तुमची इमेज दाखवते. |
05.43 | आता फॉर्म चांगला दिसण्यासाठी काही सोप्या गोष्टी करू. |
05.48 | Properties विंडोमधे Text प्रॉपर्टी सिलेक्ट करा. |
05.56 | आणि jLabel1 डिलिट करा. |
06.04 | लेबलवर दाखवले जाणारे टेक्स्ट ही GUI Builder ने तयार केलेली व्हॅल्यू आहे. |
06.10 | परंतु आपण टेक्स्ट ऐवजी इमेज दाखवण्यासाठी लेबल वापरत आहोत. |
06.15 | त्यामुळे टेक्स्टची गरज नाही. |
06.18 | आता लेबल ड्रॅग करून ते फॉर्मच्या मध्यात ठेवा. |
06.26 | GUI Designer मधे Source टॅब क्लिक करा. |
06.30 | Generated Code असे लिहिलेल्या ओळीपर्यंत स्क्रॉल करा. |
06.33 | GUI Designer द्वारे बनलेला कोड बघण्यासाठी Generated Code च्या डावीकडे असलेले अधिकचे चिन्ह क्लिक करा. |
06.42 | येथे ही कीलाईन आहे. |
06.49 | jLabel1 आयकॉन प्रॉपर्टीसाठी Property editor वापरलेला असल्याने IDE ने setIcon मेथड बनवली आहे. |
06.57 | त्या मेथडच्या पॅरामीटरमधे getResource() मेथडला ImageIcon च्या निनावी इनर क्लास कडून कॉल येतो. |
07.10 | एकदा तुमची इमेज समाविष्ट झाली की Design व्ह्यूमधे इमेजवर राईट क्लिक करा. |
07.19 | Events खालील Mouse मधील mouseClicked क्लिक करा. |
07.24 | व्ह्यू बदलून Source मोडवर जाईल. |
07.28 | येथे माऊस क्लिक झाल्यावर कार्य करणारा तुमचा कोड येथे लिहू शकता. |
07.33 | GUI मधे इमेज क्लिक केल्यावर पॉप अप उघडण्यासाठी कोडच्या काही ओळी समाविष्ट करू. |
08.00 | आपण आवश्यक असलेल्या कोडच्या काही ओळी टाईप केलेल्या आहेत. |
08.05 | प्रथम पॉप अप साठी नवी Jframe बनवली आहे. |
08.12 | आणि डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन सेट केले आहे. |
08.15 | आणि शेवटी पॉप अप वर दिसणारे टेक्स्ट येथे दिलेले आहे. |
08.24 | ह्या कोडच्या ओळी समाविष्ट केल्यावर फाईलच्या सुरूवातीला दोन ओळी टाईप करून आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट करू. |
08.36 | import javax.swing.* |
08.45 | आणि import java.awt.* हे समाविष्ट करा. |
08.53 | ह्यामुळे प्रोग्रॅमसाठी आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट होतील. |
08.59 | ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करू. |
09.02 | इमेज ऍक्सेस करण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी कोड बनवला आहे. |
09.07 | इमेज ऍक्सेस होते का ही खात्री करण्यास ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करा. |
09.12 | प्रथम प्रोजेक्टचा Main class सेट करू. |
09.16 | प्रोजेक्ट सुरू केल्यावर कुठला क्लास कार्यान्वित करायचा हे मेन क्लास मुळे IDE ला समजते . |
09.21 | याशिवाय ऍप्लिकेशन बिल्ड होताना JAR फाईलमधे Main class हा घटक तयार झाल्याची खात्री होते. |
09.33 | प्रोजेक्ट विंडोतील ImageDisplayApp प्रोजेक्ट नोड वर राईट क्लिक करून Properties निवडा. |
09.41 | Project Properties च्या डायलॉग बॉक्समधे डावीकडील Run कॅटॅगरी सिलेक्ट करा. |
09.47 | Main Class फिल्ड समोर असलेले Browse बटण क्लिक करा. |
09.51 | org.me.myimageapp.ImageDisplay सिलेक्ट करून Select Main Class क्लिक करा. |
10.01 | OK क्लिक करा. |
10.05 | आता Project नोड वर राईट क्लिक करून Clean & Build सिलेक्ट करा. |
10.11 | Files विंडोमधे ऍप्लिकेशनच्या Build प्रॉपर्टीज बघू शकतो. |
10.20 | Build फोल्डरमधे कंपाईल केलेला क्लास असतो. |
10.23 | dist फोल्डरमधे एक्झीक्युटेबल JAR फाईल असते ज्यात कंपाईल केलेला क्लास आणि इमेजचा समावेश असतो. |
10.32 | आता टूलबारवरील Run निवडा. |
10.34 | इमेज असलेली आऊटपुट विंडो उघडेल. |
10.39 | ह्या इमेजवर क्लिक करा. |
10.42 | वरच्या बाजूला इमेजचे वर्णन दाखवणारा pop-up दिसेल. |
10.50 | आता असाईनमेंट करू. |
10.54 | ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे चार इमेजेस असलेले आणखी एक GUI बनवा. |
11.01 | प्रत्येक इमेजसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस जसे की, कीबोर्ड, माऊस-मोशन, माऊस-क्लिक, माऊस-व्हील इव्हेंट लिहा. |
11.12 | आपण असाईनमेंट आधीच तयार केली आहे. |
11.17 | ही कार्यान्वित करू. |
11.20 | असाईनमेंट अशी दिसली पाहिजे. |
11.26 | आपण कीबोर्ड आणि माऊस इव्हेंटस बनवले आहेत. |
11.34 | शिकलो ते थोडक्यात, |
11.36 | Jframe फॉर्म बनवला. |
11.39 | इमेजसाठी पॅकेज समाविष्ट केले. |
11.41 | लेबलवर इमेज दाखवली. |
11.44 | तसेच माऊस इन्हेंटस, pop-ups बनवले. |
11.49 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
11.53 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11.56 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
12.02 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
12.07 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
12.11 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
12.19 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
12.23 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
12.30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12.42 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
12.46 | सहभागासाठी धन्यवाद . |