Geogebra/C3/Theorems-on-Chords-and-Arcs/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Theorems-on-Chords-and-Arcs
Author: Manali Ranade
Keywords: Geogebra
|
|
---|---|
00.01 | नमस्कार. Geogebra मधील जीवा( Chords) आणि कंस(Arcs) या वरील प्रमेयांच्या(Theorems) पाठात स्वागत. |
00.08 | ह्या पाठाच्या शेवटी तुम्ही, |
00.10 | वर्तुळाच्या जीवा आणि
कंस तपासण्यास सक्षम व्हाल. |
00.19 | Geogebra चे प्राथमिक ज्ञान आपल्याला आहे असे समजू. |
00.23 | नसल्यास संबंधित पाठासाठी http://spoken-tutorial.org ह्या वेबसाईटला भेट द्या. |
00.30 | ह्या पाठासाठी आपण, |
00.33 | Ubuntu Linux OS Version 11.10, Geogebra Version 3.2.47.0 वापरत आहोत. |
00.43 | आपण पुढील Geogebra टूल्स वापरू. |
00.47 | * Circle with Center and Radius |
00.50 | * Circular Sector with Center between Two Points |
00.53 | * Circular Arc with Center between Two points |
00.56 | * Midpoint आणि
|
01.00 | GeoGebra ची नवीन विंडो उघडू . |
01.02 | Dash home मधील Media Apps वर क्लिक करा. |
01.07 | Type खालील Education वर क्लिक करून GeoGebra वर क्लिक करा. |
01.15 | आता प्रमेय मांडू. |
01.18 | वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. |
01.23 | वर्तुळमध्य A मधून BC या जीवेवर टाकलेला लंब ती जीवा दुभागत. |
01.32 | प्रमेय तपासून पाहू. |
01.37 | ह्या पाठासाठी Axes ऐवजी 'Grid layout' वापरू. |
01.42 | ड्रॉईंग पॅड वर राईट क्लिक करा. |
01.44 | 'Graphic view' मधे |
01.45 | 'Axes' अनचेक करून |
01.47 | 'Grid' निवडा. |
01.52 | आता वर्तुळ काढू. |
01.54 | टूलबारवरील Circle with Center and Radius हे टूल निवडा. |
01.58 | ड्रॉईंग पॅडवर बिंदू 'A' काढा. |
02.01 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
02.03 | त्रिज्येसाठी( Radius) '3' टाईप करा. |
02.06 | OK क्लिक करा. |
02.07 | मध्यबिंदू 'A' आणि त्रिज्या '3सेंटीमीटर' असलेले वर्तुळ तयार होईल. |
02.14 | बिंदू 'A' हलवून वर्तुळाच्या हालचाली पाहु. |
02.19 | “Segment between two points” हे टूल निवडा. |
02.22 | वर्तुळाच्या परीघावर 'B' आणि 'C' हे बिंदू काढा. |
02.27 | जीवा 'BC' तयार होईल. |
02.30 | जीवा 'BC' वर बिंदू 'A' मधून जाणारा लंब काढू. |
02.36 | टुलबार वरील "Perpendicular line" टूलवर क्लिक करा. |
02.39 | जीवा 'BC', आणि बिंदू 'A' वर क्लिक करा. |
02.45 | बिंदू 'B' हलवून, बिंदू 'B' सोबत लंब देखील हलताना आपण पाहु. |
02.52 | लंब आणि जीवा 'BC', एका बिंदूत छेदतात. |
02.57 | “Intersect Two objects” वर क्लिक करा, |
02.59 | छेदनबिंदू 'D' म्हणून मार्क करा. |
03.04 | D हा जीवा BC चा मध्यबिंदू आहे का ते तपासू. |
03.09 | "Distance" tool... वर क्लिक करा |
03.12 | बिंदू 'B' 'D' आणि 'D' 'C' वर क्लिक करा. |
03.19 | 'BD' आणि 'DC' हे अंतर समान असल्याचे लक्षात येईल. |
03.24 | हे सुचवते, 'D' हा जीवा 'BC' चा मध्यबिंदू आहे. |
03.29 | आता कोन 'CDA' मोजू. |
03.33 | Angle tool वर क्लिक करा. |
03.36 | बिंदू 'C','D', 'A' वर क्लिक करा. |
03.42 | 'CDA' हा 90 अंशाचा कोन आहे. |
03.46 | प्रमेय सिध्द झाले आहे. |
03.50 | आता बिंदू 'C' हलवू. |
03.52 | बिंदू 'C' सोबत अंतर देखील बदलताना दिसेल. |
04.03 | फाईल सेव्ह करू. |
04.05 | “File”>> "Save As" वर क्लिक करा. |
04.08 | फाईलला "circle-chord" हे नाव देऊन “Save” वर क्लिक करा. |
04.21 | आता पुढील प्रमेय पाहू. |
04.28 | समान कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात. |
04.34 | BC या कंसाने आंतरलिखित केलेले BDC आणि BEC हे कोन समान असतात. |
04.44 | हे प्रमेय तपासून पाहू. |
04.51 | नवी Geogebra विंडो उघडू, |
04.54 | “File” खालील "New" वर क्लिक करा. |
04.55 | एक वर्तुळ काढू. |
04.57 | टूलबारवरील " Circle with Center through point टूल वर क्लिक करा. |
05.01 | मध्यबिंदू म्हणून बिंदू 'A' काढा. |
05.04 | बिंदू 'B' आणि 'C' मिळवण्यासाठी परिघावर पुन्हा एकदा क्लिक करा. |
05.09 | आता कंस 'BC' काढू. |
05.13 | "Circular Arc with Center between Two points" वर क्लिक करा. |
05.18 | परिघावरील बिंदू 'A' आणि बिंदू 'B' आणि 'C' वर क्लिक करा. |
05.24 | कंस 'BC' तयार झाला आहे. |
05.27 | कंस 'BC' च्या प्रॉपर्टीमधे बदल करू. |
05.30 | "Algebra View" मधे |
05.32 | object 'd' वर राईट क्लिक करा. |
05.35 | "Object Properties" निवडा. |
05.38 | हिरवा रंग निवडून close वर क्लिक करा. |
05.46 | new point टूल वर क्लिक करा. वर्तुळाच्या परिघावर बिंदू 'D' आणि 'E' काढा. |
05.56 | कंस BCवरून बिंदू 'D' आणि 'E' शी दोन कोन तयार करू. |
06.04 | "Polygon" टूलवर क्लिक करा. |
06.05 | बिंदू 'E', 'B', 'D', 'C' आणि आकृती पूर्ण करण्यासाठी पुन्हा 'E' वर क्लिक करा. |
06.18 | कोन 'BDC' आणि 'BEC' मोजू. |
06.27 | "Angle" टूलवर क्लिक करा. |
06.29 | बिंदू 'B', 'D', 'C' आणि 'B', 'E', 'C' वर क्लिक करा. |
06.40 | कोन 'BDC' आणि 'BEC' हे समान असल्याचे दिसेल. |
06.52 | पुढील प्रमेय पाहू. |
06.55 | कुठल्याही कंसाने वर्तुळमध्याशी केलेला कोन हा त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो. |
07.06 | BC या कंसाने A शी केलेला BACहा कोन त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या BEC आणि BDC या कोनांच्या दुप्पट असतो. |
07.22 | हे प्रमेय तपासून पाहू. |
07.26 | वर्तुळखंड 'ABC' काढू. |
07.30 | "Circular Sector with Center between Two Points" टूल वर क्लिक करा. |
07.35 | बिंदू 'A', 'B', 'C' वर क्लिक करा. |
07.45 | वर्तुळखंड 'ABC' चा रंग बंदलू. |
07.48 | वर्तुळखंड 'ABC' वर राईट क्लिक करा. |
07.51 | "Object Properties" निवडा. |
07.54 | हिरवा रंग निवडून "Close" वर क्लिक करा. |
08.00 | कोन 'BAC' मोजू. |
08.04 | "Angle" टूल वर क्लिक करा. बिंदू 'B', 'A', 'C' वर क्लिक करा. |
08.15 | कोन 'BAC' हा कोन 'BEC' आणि 'BDC' च्या दुप्पट आहे. |
08.28 | बिंदू 'C' हलवून पाहू. |
08.32 | कोन 'BAC' हा कायमच 'BEC' आणि 'BDC' च्या दुप्पट आहे. |
08.41 | अशाप्रकारे ही प्रमेय सिध्द झाली आहेत. |
08.45 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08.48 | थोडक्यात, |
08.53 | ह्या पाठात आपण सिध्द केले, |
08.57 | * वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. |
09.00 | * समान कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात |
09.06 | * कुठल्याही कंसाने वर्तुळमध्याशी केलेला कोन हा त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो. |
09.15 | असाईनमेंट म्हणून तुम्ही हे तपासून पाहा. |
09.19 | वर्तुळाच्या समान जीवा मध्यबिंदूपासून समान अंतरावर असतात. |
09.24 | वर्तुळ काढा. |
09.26 | Segment with Given length from point टूल निवडा. |
09.29 | हे टूल दोन समान आकाराच्या दोन जीवा काढण्यासाठी वापरा. |
09.33 | त्या जीवांवर मध्यबिंदूपासून लंब काढा. |
09.37 | छेदनबिंदू मार्क करा. |
09.40 | लंबांचे अंतर मोजा. |
09.44 | असाईनमेंट अशाप्रकारे दिसणे गरजेचे आहे. |
09.48 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09.51 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09.53 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09.58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
10.00 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10.03 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10.07 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10.14 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10.18 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10.25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10.29 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |