Firefox/C4/Extensions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:58, 11 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
|
|
---|---|
00:00 | Mozilla Firefox मधील Extensions वरील पाठात स्वागत. |
00:05 | ह्या पाठात शिकणार आहोत- Extensions किंवा Add-ons. Extensions इन्स्टॉल करणे. सुचविलेली Extensions. |
00:14 | येथे आपण Ubuntu 10.04 वर Firefox 7.0 वापरणार आहोत. |
00:20 | Firefox ब्राऊजर उघडू. |
00:23 | डिफॉल्ट रूपात yahoo चे होमपेज उघडेल. |
00:27 | Extensions किंवा Add-ons म्हणजे काय? |
00:29 | Extensions मुळे, |
00:31 | * Firefox ब्राऊजरमधे नवी फीचर्स समाविष्ट करता येतात. |
00:35 | * उपलब्ध फीचर्समधे सुधारणा करता येते. |
00:37 | * तुमच्या preferences नुसार ब्राऊजर Customize करता येतो. |
00:42 | Extension हा फायरफॉक्स ब्राऊजरचा भाग आहे. |
00:45 | * त्यामुळे ब्राऊजरची क्षमता वाढते. |
00:48 | आपण अशी extensions इन्स्टॉल करू शकतो, |
00:51 | # जी जाहिराती किंवा popups रोखेल. |
00:54 | # वस्तूंच्या किंमतीची तुलना करेल. |
00:56 | # तसेच हवामानाची अद्ययावत माहिती दाखवेल. |
01:00 | Grab and Drag extension इन्स्टॉल करू. |
01:03 | त्या मुळे तुम्हाला वेबपेजेस विविध पध्दतीने स्क्रॉल करता येतील. |
01:07 | grab and drag फंक्शन Adobe Acrobat प्रमाणेच आहे. |
01:12 | Menu वरील Tools खालील Add-ons क्लिक करा. |
01:16 | Add-ons Manager टॅब उघडेल. |
01:20 | किंवा Add-ons Manager टॅब उघडण्यासाठी CTRL+Shift+A कीज दाबू शकतो. |
01:28 | Add-ons Manager मधील डाव्या पॅनेलमधे उपलब्ध पर्याय दिसतील. |
01:34 | डिफॉल्ट रूपात Get Add-ons पर्याय निवडल्याचे लक्षात येईल . |
01:39 | डाव्या पॅनेलमधील सिलेक्ट केलेल्या पर्यायाची माहिती उजव्या पॅनेलमधे दिसते. |
01:45 | म्हणजेच येथे Add-ons चे कार्य आणि ते कसे वापरायचे हे सांगितले जाते. |
01:51 | इन्स्टॉल करण्यायोग्य Add-ons ची यादीही दिलेली असते. |
01:55 | आता नवे Add-on: Grab and Drag इन्स्टॉल करू. |
01:59 | प्रथम उजवीकडे वर कोप-यात असलेल्या Search bar मधे Grab and Drag टाईप करून एंटर दाबा. |
02:08 | उजव्या पॅनेलमधे आपण दिलेल्या नावाशी मिळत्या जुळत्या add-ons ची यादी दिसेल. |
02:14 | drag हा शब्द असलेले सर्व add-ons येथे दाखवले गेले आहेत. |
02:20 | सूचीतील पहिले नाव Grab and Drag बरोबर जुळत असल्याचे दिसेल. |
02:26 | Install वर क्लिक करा. |
02:28 | बहुतांश सॉफ्टवेअर प्रमाणे काही add-ons साठी देखील end-user license agreements असतात. |
02:35 | End-User License Agreement च्या डायलॉग बॉक्सवरील Accept and Install क्लिक करा. |
02:41 | Add-on डाऊनलोडींगचा प्रोग्रेसबार उघडेल. |
02:46 | पुढे, “add-on will be installed |
02:50 | when you restart Mozilla Firefox असा मेसेज दिसेल |
02:54 | Restart Now वर क्लिक करा. |
02:57 | Firefox ब्राऊजर बंद होऊन पुन्हा उघडेल. |
03:01 | Add-ons Manager नव्या टॅबमधे उघडेल. |
03:05 | Extensions टॅबच्या उजव्या पॅनेलमधे Grab and Drag extension दिसेल. |
03:11 | आधी केल्याप्रमाणेच Scrap Book हे आणखी एक extension इन्स्टॉल करू. |
03:18 | Scrap Book मुळे तुम्हाला वेबपेजेसचा संग्रह सांभाळता येतो. |
03:24 | * इन्स्टॉलेशन प्रोग्रेस बार आणि Firefox बंद करून पुन्हा सुरू करण्याचा मेसेज वेगळा दाखवला जाणार नाही. |
03:33 | * ते Scrap Book बारवर दाखवले जाईल. |
03:36 | Restart Now वर क्लिक करा. |
03:40 | Firefox मधे Scrap Book इन्स्टॉल झाले आहे. |
03:44 | पाठात थांबवून एक assignment करू. |
03:48 | * Firefox ब्राऊजरमधे Add-ons Manager उघडा. |
03:52 | * Get Add-ons पर्यायातील Add-ons च्या दिलेल्या यादीतील एक नवा add-on इन्स्टॉल करा . |
03:59 | *“Add-ons Manager” तील “Extensions” पर्याय वापरुन तुम्ही व्यवस्थापित करा. |
04:03 | * म्हणजेच add, delete |
04:06 | * किंवा update करणे. |
04:08 | Firefox ब्राऊजरमधे Add-ons Manager टॅब वर क्लिक करा. |
04:13 | डाव्या पॅनेलवरील Extensions वर क्लिक करा. |
04:16 | उजव्या पॅनेलवर आता कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेली Extensions दिसतील. |
04:22 | ScrapBook बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ते सिलेक्ट करून More वर क्लिक करा. |
04:27 | * Scrap Book ची विस्तृत माहिती दिसेल. |
04:31 | * Extension संदर्भात जाणून घेण्यासाठी वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करा. |
04:35 | आता डाव्या पॅनेलवरील Extension वर क्लिक करा. |
04:40 | प्रत्येक Extension साठी preferences सेट करता येतात, अक्षम किंवा ते काढून टाकता येते. |
04:46 | Grab and Drag सिलेक्ट करून Preferences वर क्लिक करा. |
04:49 | ह्या डायलॉग बॉक्सद्वारे preferences सेट करू शकतो. |
04:53 | डायलॉग बॉक्समधून बाहेर पडण्यासाठी Cancel क्लिक करा. |
04:57 | आता Scrap Book सिलेक्ट करून Preferences क्लिक करा . |
05:01 | Scrap Book Options आणि Grab and Drag Preferences ह्यांचे डायलॉग बॉक्स वेगळे असल्याचे दिसेल. |
05:09 | * त्यामुळे प्रत्येक Extension ची वेगवेगळी सेटींग्ज असतात ज्या, बदलता येतात. |
05:13 | * एखाद्या Extension साठी Preferences चे बटण दिसत नसेल तर, |
05:17 | * याचा अर्थ त्यासाठी preferences उपलब्ध नाहीत. |
05:21 | Scrap Book Options डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close क्लिक करा. |
05:26 | बहुतांश सॉफ्टवेअरप्रमाणेच add-ons ही नियमित अपडेट करता येतात. |
05:31 | Scrap Book अपडेट करण्यासाठी त्यास सिलेक्ट करून, त्यावर राईट क्लिक करा. नंतर Find Updates क्लिक करा. |
05:37 | अपडेटस उपलब्ध असल्यास Update बटण दाखवले जाईल. |
05:42 | add-on अपडेट करण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
05:47 | Scrap Book साठी अपडेट नसल्याने Update बटण दिसणार नाही. |
05:51 | आणि शेवटी जर extension चा उपयो ग करायचा नसेल तर Disable बटण क्लिक करा. |
05:58 | कॉम्प्युटरमधून extension काढून टाकायचे असेल तर Remove क्लिक करा. |
06:03 | आपण Extensions बद्दल जाणून घेतले. |
06:06 | Firefox मधे आणखी पर्याय उपलब्ध करून कामे सुरळीत करण्यासाठी Extensions वापरतात. |
06:13 | * विविध Add-ons बद्दल जाणून घेण्यासाठी Get Add-ons वापरू शकतो. |
06:18 | * जे उपयोगी Add-ons असतील ते सिलेक्ट करून इन्स्टॉल करू शकतो. |
06:24 | Firefox Extensions बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Firefox वेबसाईटला भेट द्या. |
06:31 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
06:34 | ह्या पाठात Extensions म्हणजे काय, Extensions इन्स्टॉल करणे, Extensions सुचवणे हे शिकलो. |
06:42 | असाईनमेंट. |
06:45 | * WebMail Notifier हे extension शोधा. |
06:49 | * ते कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करा. |
06:52 | * ह्या extension ची फीचर्स आणि अकाऊंटमधील न वाचलेले मेल्स बघण्यासाठी त्यांचा कसा उपयोग होतो ते शोधा. |
07:01 | * extension डिसेबल करा. |
07:03 | * नंतर Firefox मधून काढून टाका. |
07:07 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:10 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:13 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:18 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07:19 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:23 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:27 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07:33 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:37 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:45 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:48 | * spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
07:56 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
08:00 | सहभागासाठी धन्यवाद. |