GIMP/C2/Setting-Up-GIMP/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:44, 12 March 2014 by Madhurig (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration


00.21 GIMP सेट करणाऱ्या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.25 आज मी तुम्हाला दाखवेल, पहिल्यांदा GIMP वापरतांना ते सेट कसे करायचे.
00.30 The GIMP एक मोठ्या विंडो ऐवजी इतर विंडोस आणि Macintosh प्रोग्राम प्रमाणे अनेक लहान विंडोस वापरते.
00.39 हा Unix वर्ल्ड साठी एक इतिहास आहे आणि Unix लोकांना स्क्रीन वर सर्वत्र पसरलेले विंडोस आवडतात तसेच एकाच वेळी अनेक प्रोग्राम कार्यान्वित करणे ही आवडते.


00.49 जर तुम्हाला खरोखर या विविध विंडो सहित काम करता जमत नसेल तर तुम्हाला GIMP shopपाहायला हवे.
00.57 हा एक प्रोग्राम आहे जो GIMP वापरतो आणि त्यास थोडेसे फोटॉशॉप प्रमाणे बनविण्यासाठी त्यामध्ये नवीन यूज़र इंटरफेस ठेवतो.
01.05 मला GIMP वापरायला आवडते कारण सर्व नवीन आणि चांगले टूल्स GIMP मध्ये आहे.
01.12 ही आजची सूचना आहे जी तुम्हाला उपयुक्त माहिती आणि सूचना देईल.
01.17 सध्यासाठी Undo पर्यायाबदद्ल सूचना आहे. ज्या द्वारे तुम्ही काही स्टेप करू शकता आणि पुन्हा त्यास Undo ने बदलू शकता.
01.26 हे अनेकवेळा कार्य करते.
01.28 काही खूप वेगळे करण्यापूर्वी तुमचे कार्य सेव करणे अधिक चांगले आहे.
01.33 चला आता इतर टूल्स पाहु.
01.36 येथे GIMP ची मुख्य विंडो आहे. कमांड सेंट्रल.
01.41 आणि सर्वात वर येथे Toolbox आहे.
01.45 नंतर आपल्याकडे कलर्स निवडण्यास Color boxआहे आणि त्या खाली Toolbox वरुन टूल्स चे अनेक पर्याय आहेत.
01.53 यास थोडे मोठे करू.
01.56 येथे आपल्याकडे, Layers, Channels, Color Channels, Path आणि Undo History साठी डायलॉग बॉक्सेस आहेत.
02.09 त्याखाली color selection डायलॉग आहे जेथे तुम्ही अनेक कलर निवडू शकता.
02.15 तेथे आणखीन डायलॉग आहेत जसे की, Brushes, Patterns, Gradient आणि इत्यादी.
02.21 मला यामधील काही डायलॉग्स टूलबॉक्स मध्ये समाविष्ट करायचे आहेत. हे खूप सोपे आहे.
02.28 डायलॉग च्या टाइटल मध्ये Layers शब्दावर क्लिक करा आणि त्यास टूलबार च्या खाली Color Picker या शब्दावर आणा.
02.39 आणि मला असा टॅब डायलॉग मिळाला आहे.
02.43 मी हे चॅनेल्स ने करेल.
02.46 मी हे Paths ने करेल.
02.52 आणि मी हे Undo History ने करेल.
02.54 मला Brushes टूल ची गरज आहे असे वाटत नाही कारण जर टूल ला ब्रश आहे तर ते इथे दिसेल आणि नंतर मी हे निवडू शकते.
03.09 परंतु मला कलर हवेत तर मी त्या वर क्लिक करते आणि त्यास Undo History च्या पुढे ड्रॅग करते.
03.16 आणि ही विंडो येथे बंद करू शकतो.
03.23 मी सर्व डायलॉग बॉक्सेस File >> Dialogs द्वारे एक्सेस करू शकते.
03.30 तुम्ही पाहु शकता येथे काही डायलॉग्स आहेत जे आपल्या टूल बॉक्स मध्ये नाहीत आणि आपल्याला त्यातील एक हवा आहे तो म्हणजे टूल.
03.38 माझ्या टूल बॉक्स मध्ये काही टूल समाविष्ट आहे ज्याचा मी वापर केलेला नाही. आणि मी त्यास मला जे टूल्स वापरयाचे आहेत त्या सोबत रीप्लेस करेल.
03.48 मला जे टूल्स हवे आहेत त्याने सुरवात करू.
03.51 मला Curves, Levels, Threshold, Brightness आणि Contrast हवेत. मला निवडायचे नाही.
03.58 मला Perspective Clone, Ink किंवा Airbrush ची गरज नाही.
04.05 आणि मला उरलेले सर्व टूल हवे आहेत.
04.08 स्पेस किती उरला आहे हे पहिल्या नंतर मी याकडे बघेण.
04.16 आता मी File आणि Preferences वर जाते.
04.26 मी Environment आणि Interface जसे आहे तसे ठेवते.
04.32 Theme मध्ये Small निवडते.
04.35 जेव्हा मी ही विंडो एका बाजूला ओढेल सर्व आइकॉन्स आंकुचित झाले आहेत आणि तेथे टूल्स च्या माहिती साठी आणखीन जागा उपलब्ध आहे.
04.45 Tool पर्याया वर जा आणि Default Interpolation ला SINC मध्ये बदला SINC हे pixels मोजण्यासाठी एक उत्तम interpolation आहे, आकार बदलतांना किंवा रोटेट करतांना आणि इत्यादी.
05.00 इतर पर्यायांना जसे आहेत तसे ठेवा.
05.03 Toolbox वर जा आणि तुमच्या कडे हा पर्याय असेल तर त्यास निवडा किंवा निवडू नका.
05.12 Foreground आणि Background कलर बदलण्यासाठी तुम्ही कलर वापरु शकता जी जलद पद्धत आहे.
05.19 तुम्ही Brush आणि Gradient टूल्स मिळवू शकता, येथे तुम्ही लहाण इमेज किंवा सक्रिय इमेज चे थंबनेल ही मिळवू शकता.
05.29 मला याची गरज नाही म्हणून मी हे निवडत नाही. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला हे हवे आहे की नाही.
05.36 तुम्ही Default image, Default grid आणि Default image विंडो जसे आहे तसे ठेवा.
05.42 सर्व Preferences झाले आहेत.
05.45 आणि,
05.47 मी Path बदललेला नाही तर मी यास येथे वापरु शकते.
05.52 काही अधिक स्पेस मिळण्यासाठी येथील केवळ एक टूल मला काढावा लागेल. परंतु प्रथम मी हे थोडे मोठे करते.
06.01 तुम्ही पाहु शकता Toolbox डायलॉग खूपच लहान झाला आहे.
06.06 त्यास येथे ओढा.
06.08 मला असे वाटते की मी येथे नवीन रो न घेता आणखीन 3 टूल्स जोडू शकते.
06.19 तर मी Brightness, Hue-Saturation आणि Color Balance जोडेल.
06.24 सर्व टूल्स जे येथे दिसत नाहीत ते File आणि Dialogs वर क्‍लिक केल्या वर ते येथे येतील.
06.39 आता आपण आपल्या कार्या साठी सज्ज आहोत.
06.42 जेव्हा तुम्ही GIMP बंद कराल सर्व पर्याय आपोआप सेव होतील आणि हे पुन्हा तसेच सुरू होईल जसे तुम्ही त्यास बंद केले होते.


06.52 तसे असले तरी मी development version, वापरत आहे GIMP 2.3.18 चे अस्थिर वर्जन आहे.
07.02 मी आत्ताच पहिले की आज 2.3.19 प्रकाशित झाले आहे.
07.07 यास 'unstable' म्हणतात परंतु GIMP हे अशा थराला पोहोचले आहे की, जेथे संस्थर वर 2.4 हे पुढील स्थिर वर्जन आहे.

आणि या वर्षी ते मार्केट मधील इतर सॉफ्टवेअर प्रमाणे स्थिर आहे.

07.22 GIMP सेट्टिंग बदद्ल एवढेच.
07.25 हे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana