Java/C2/Non-static-block/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:51, 13 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Non Static block
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:02 | Java मधील Non-static blockवरील ट्युटोरियलमधे स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत, |
00:08 | non-static block विषयी, |
00:10 | तो कधी कार्यान्वित होतो? |
00:13 | non-static block चे उदाहरण, |
00:16 | constructors ची आवश्यकता काय? |
00:18 | येथे वापरत आहोत,
|
00:26 | या पाठासाठी माहिती असायला हवी , |
00:29 | Eclipse द्वारे Javaमध्ये constructorबनवणे. |
00:33 | नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:38 | non-static block म्हणजे काय ते पाहू. |
00:42 | दोन curly brackets मधे लिहिलेला कोणताही कोड म्हणजे non-static block. |
00:46 | येथे syntax पाहू शकतो. |
00:51 | non-static block केव्हा कार्यान्वित होतो? |
00:54 | बनलेल्या प्रत्येक object साठी non-static block कार्यान्वित होतो. |
00:59 | हा constructor च्या कार्यान्वित होण्यापूर्वी कार्यान्वित होतो. |
01:04 | हा क्लासचा instance member व्हेरिएबल initialize करू शकतो. |
01:08 | calculation सारखे इतर कार्यही block मधे करता येते. |
01:14 | आता Eclipse वर जाऊन non-static block वापरून पाहू. |
01:23 | Eclipseमधे NonStaticTest नावाचा classआधीच उघडला आहे. |
01:28 | मी A नावाचा class बनवला आहे. |
01:33 | class A मधे प्रथम int टाईपचे व्हेरिएबल बनवू. |
01:38 | टाईप करा int space a semicolon नंतर एंटर दाबा. |
01:46 | curly brackets मधे टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे Non static block of an instance of Class A semicolon. |
02:12 | नंतर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The value of a अधिकचे चिन्ह a semicolon. |
02:32 | आता constructor घोषित करू. |
02:36 | त्यासाठी टाईप करा public space A opening आणि closing brackets, open curly brackets आणि एंटर दाबा. |
02:51 | नंतर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे Constructing object of type A semicolon. |
03:11 | नंतर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotesमधे The value of a अधिकचे चिन्ह a semicolon. |
03:35 | फाईल सेव्ह करा. |
03:44 | Eclipse मधे NonStaticTest ह्या क्लासमधे class A चे object बनवू. |
03:53 | त्यासाठी टाईप करा A space a1 equal to new space A opening आणि closing brackets semicolon |
04:08 | पुढील ओळीवर class A चे आणखी object बनवू. |
04:12 | म्हणून टाईप करा A space a2 equal to new space A opening आणि closing brackets semicolon. |
04:25 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. त्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा. |
04:32 | आपल्याला असे आऊटपुट मिळेल. |
04:35 | जेव्हा पहिले object बनले तेव्हा non-static block कार्यान्वित झाला. |
04:45 | क्लास A च्या instance चा non-static block आणि instance व्हेरिएबल a हे शून्यने initialize झाले आहेत. |
04:53 | त्यानंतरच constructor कार्यान्वित होईल. टाईप A चे object बनेल. |
05:02 | instance व्हेरिएबल पुन्हा शून्यने initialize झाले. |
05:07 | पुन्हा जेव्हा दुसरे object तयार होईल non-static block कार्यान्वित होईल. |
05:16 | ही प्रक्रिया पुन्हा घडेल. |
05:20 | class मधे अनेक non-static blocks असू शकतात. |
05:25 | येथे class मधे ज्या क्रमाने ते आले आहेत त्याच क्रमाने कार्यान्वित होतील. |
05:30 | आपण हे करून बघू. |
05:34 | class A मधे पहिल्या block नंतर अजून एक block समाविष्ट करू. |
05:43 | पुन्हा curly brackets मधे टाईप करा. |
05:47 | System dot out dot println कंसात आणि double quotes मधे Second Non static block of an instance of Class A semicolon. |
06:08 | नंतर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The value of a अधिकचे चिन्ह a semicolon. |
06:30 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl S दाबा नंतरCtrl F11 दाबून कार्यान्वित करा. |
06:44 | आपल्याला हे आऊटपुट मिळेल. |
06:48 | असे दिसेल की पहिला block कार्यान्वित झाल्यावर दुसरा कार्यान्वित होईल. |
06:58 | यानंतरच constructor कार्यान्वित होईल. |
07:07 | तुम्हाला वाटेलconstructorsची गरजच काय. |
07:10 | default constructorची गरज नसते. |
07:15 | पणnon-static block ला parameter देता येत नाहीत. |
07:18 | बाहेरून व्हॅल्यू घेणारे objects तुमच्याकडे असू शकत नाहीत. |
07:22 | म्हणजेच non-static block हे constructorला पर्याय नाहीत. |
07:27 | थोडक्यात, |
07:29 | आपण शिकलो, |
07:32 | non-static block आणि त्यांचा वापर. |
07:35 | असाईनमेंट, |
07:36 | B नावाचा class बनवा. |
07:39 | पाठात शिकल्याप्रमाणे non-static block आणि constructor बनवा. |
07:44 | आधी बनवलेल्या NonStaticTest क्लासमधे class B चे object बनवा. |
07:49 | आऊटपुट तपासा. |
07:51 | प्रकल्पाची अधिक माहिती, |
07:53 | दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:56 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:00 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08:06 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:08 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:12 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:18 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:22 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:28 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:37 | हा पाठ येथे संपत आहे. |
08:40 | सहभागासाठी धन्यवाद . |