LibreOffice-Suite-Base/C3/Create-Subforms/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:03, 30 September 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Create Subform

Author: Manali Ranade

Keywords: Base


Visual Clue
Narration
00:00 LibreOffice Base च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 आपण शिकणार आहोत,
00:07 Subform बनवणे.
00:09 त्यासाठी Library database वापरणार आहोत.
00:15 ह्या केसेस बघणार आहोत.
00:18 लायब्ररीच्या सर्व सभासदांची सूची दाखवणे,
00:22 सभासदांनी अजून परत न केलेल्या पुस्तकांची नावे मिळवणे,
00:31 लायब्ररीमधील सर्व सभासदांची सूची दाखवणारा form बनवणे,
00:36 त्याच्या खाली सभासदाने परत करायच्या पुस्तकांची सूची दाखवणारा subform बनवणे.
00:44 हा formडिझाईन केला की तो अपडेट करू शकतो .
00:49 उदाहरणार्थ,पुस्तक परत केल्यावर ती माहिती अपडेट करू शकतो.
00:55 जो form डिझाईन करणार आहोत त्याचा हा स्क्रीनशॉट आहे.
01:01 येथे खाली subform देखील दिसत आहेत.
01:06 Library database उघडा.
01:09 मागील पाठात History of Books Issued to Members ही query बनवली होती.
01:17 नवा form बनवण्यासाठी ही query आणि Members table वापरणार आहोत.
01:25 प्रथम query च्या नावावर राईट क्लिक करून ती copy करा. नंतर paste वर क्लिक करा.
01:34 query name साठी popup window उघडेल. तेथे Books Not Returned हे नाव टाईप करा.
01:42 Books Not Returned ही query edit mode मध्ये उघडा.
01:48 checked in न केलेली पुस्तके दाखवली जातील. हा criterion, Query Design window मध्ये समाविष्ट करा.
01:58 CheckedIn खालील Criterion column मध्ये equals 0 टाईप करा.
02:06 एंटर दाबा.
02:09 query सेव्ह करून विंडो बंद करा.
02:13 मुख्य Base window च्या डाव्या पॅनेलवरील Forms ह्या आयकॉनवर क्लिक करा.
02:20 नंतर Use Wizard to create Form ह्या पर्यायावर क्लिक करा.
02:25 आपल्या ओळखीचा Form wizard दिसेल.
02:28 Form बनवण्यासाठी डावीकडील आठ स्टेप्स मधून जाऊ.
02:34 पहिली स्टेप, field selection मध्ये Table: Members निवडू.
02:40 सर्व फिल्डस उजवीकडे स्थलांतरित करा.
02:46 Next वर क्लिक करा.
02:49 आता Setup a subform ह्या दुस-या स्टेपवर आहोत.
02:54 येथे Add subform ह्या checkbox वर क्लिक करा.
02:59 Subform based on manual selection of fields वर क्लिक करा.
03:07 तिसरी स्टेप, Add subform fields .
03:11 येथे थोड्यावेळापूर्वी बनवलेली new query call करणार आहोत.
03:18 Tables किंवा Queries dropdown मधून Query: Books Not Returned निवडू.
03:26 उपलब्ध सूचीतून सिलेक्ट केलेली फिल्डस स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे उजवीकडे स्थलांतरित करा. <pause>
03:37 Next क्लिक करा.
03:39 चौथी स्टेप Get joined fields.
03:43 वरील दोन drop down मधून MemberId field निवडा कारण हेच संबंध जोडणारे फिल्ड आहे.
03:53 Next क्लिक करा.
03:57 पाचवी स्टेप Arrange Controls .
04:00 येथे form आणि subform साठी Data sheet हा तिसरा पर्याय निवडू.
04:08 Next क्लिक करा.
04:11 सहावी स्टेप Set data entry.
04:15 हा पर्याय तसाच ठेवून Next क्लिक करा.
04:22 सातवी स्टेप Apply Styles.
04:26 form ची background Grey निवडा.
04:29 final step वर जा.
04:32 आठवी स्टेप Set Name.
04:36 येथे formला Members Who Need to Return Books असे सविस्तर नाव देऊ.
04:45 Modify form वर क्लिक करा. त्यात अजून बदल करणार आहोत
04:53 Finish वर क्लिक करा.
04:56 form design window मध्ये दोन tabular data sheet दिसतील.
05:04 वर असलेल्या sheet ला form आणि खाली असलेल्यास subform म्हणतात.
05:11 वरील formमध्ये label समाविष्ट करू.
05:15 वरती असलेल्या Form Controls toolbar मधील Label icon वर क्लिक करून ते form वर draw करा.
05:25 label वर डबल क्लिक करून properties उघडा.
05:31 label समोर Members of the Library असे टाईप करा.
05:37 font style बदलून Arial, Bold आणि Size 12 करा.<pause>
05:47 तसेच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे subform च्या वर दुसरे label समाविष्ट करा.
05:55 त्याला List of Books to be returned by the member नाव द्या.
06:00 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे form ची लांबी कमी करू.
06:07 नंतर form मधील Name field ची लांबी वाढवू. <pause>
06:13 subform मधील book title field ची लांबी वाढवू. <pause>
06:21 font बदलून Arial, Bold आणि Size 8 करा.
06:28 form चा background color बदलून तो white आणि subform साठी Blue 8 करा. <pause>
06:37 MemberId hide करण्यासाठी त्या column वरright click करून Hide column option निवडा.
06:47 form design सेव्ह करून ते तपासू.
06:54 मुख्य Base window मधील Members Who Need to Return Books ह्या form वर double click करून तो उघडा.
07:03 तेथे एक form आहे.
07:05 up किंवा down arrow keys वापरून members browse करू.
07:12 किंवा सभासदांच्या नावांवर क्लिक करू.
07:16 लक्ष द्या की subform मध्ये संबंधित सभासदांनी परत करायची पुस्तके दाखवली जात आहेत.
07:23 subform मध्ये कुठलेही एक रेकॉर्ड निवडा.
07:27 actual return date ह्या field मध्ये 12/7/11 टाईप करा आणि CheckedIn field मध्ये check करा.
07:41 एंटर दाबा.
07:45 form रिफ्रेश करण्यासाठी खालील Form Navigation toolbar वरील Refresh icon वर क्लिक करा.
07:56 आपण एडिट केलेले रेकॉर्ड आता येथे दिसत नाही.
08:02 ह्याचा अर्थ पुस्तक परत केले आहे.
08:07 अशाप्रकारे आपण form बरोबर subform बनवला.
08:11 आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:17 आपण शिकलो,
08:20 subform बनवणे.
08:23 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:44 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana