KTurtle/C2/Grammar-of-TurtleScript/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:18, 2 September 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00.01 सर्वाना नमस्कार 
00.02 KTurtle मधील  Grammar of TurtleScript वरील स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00.08  या टयूटोरिअल मध्ये, आपण शिकणार आहोत,
00.11 टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि 'if'-'else'कंडीशन.
00.16 हि टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04  KTurtle version. 0.8.1 बीटा चा वापर करीत आहे. 
00.29 आम्ही मानत आहोत कि तुम्हाला  केटरटलचे मूलभूत ज्ञान आहे. 
00.35 जर नसेल , तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ  http://spoken-tutorial.org पहा. 
00.40 आता नवीन KTurtleअप्लिकेशन खोला.
00.43 Dash home वर क्लीक करा.
00.45 सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा.
00.49  KTurtle आयकॉन वर क्लीक करा.  
00.52 आपण  Terminal चा वापर करूनही केटर्टल खोलु शकतो. 
00.56 Terminal खोलण्यासाठी CTRL+ALT+T एकाच वेळी दाबा. 
01.01  केटर्टल टाईप करा आणि  केटर्टल अप्लिकेशन  खोलण्यासाठी एन्टर दाबा. 
01.08 प्रथम  TurtleScript पहा. 
01.11 TurtleScript एक प्रोग्रामिंग भाषा आहे. 
01.15 त्यात विविध प्रकारचे शब्द आणि चिन्हे विविध कारणांसाठी वापरली आहेत
01.21  ती टर्टलला काय करावे याची सूचना देतात 
01.25    KTurtle मधील Grammar of TurtleScript समावेश करते, 
01.30  कमेंटस 
01.31 कमांड्स 
01.32 नंबर्स   
01.33 स्ट्रींग्स  
01.34 वेरिअबल्स आणि 
01.36 बुलिअन वॅल्यूस.
01.38 आता आपण पाहू नंबर्स कुठे संग्रहित करावे 
01.42 नंबर्स येथे संग्रहित करू शकतो,
01.44 मेथेमेटिकल ऑपरेटर्स 
01.46 कम्पेरीजन ऑपरेटर्स आणि  
01.49 वेरिअबल्स
01.50 स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीत आहे. 
01.54 प्रथम वेरिअबल्सकडे पहा  
01.57  वेरिअबल्स हे शब्द आहेत जे $ चिन्हाने सुरु होतात, उदाहरणार्थ $a .  
02.04 एडिटर मध्ये ते जांभळ्या रंगात ठळक केले आहेत   
02.09 असाइग्नमेंट , इक्वल टू (=), वापरून वेरिअबलने त्याचा आशय दिला आहे. 
02.14  वेरिअबल्स नंबर्स सामाविष्ट करू शकतात $a=100
02.20 स्ट्रींग्स  सामाविष्ट करू शकतात $a=hello किंवा 
02.25 बुलिअन व्ह्यालूस जे  true किंवा false असतात  $a=true
02.32 प्रोग्राम जोपर्यंत एक्सेक्युशन संपवत नाही किंवा जोपर्यंत तो दुसरे काही रिअसाइग्न करीत नाही तोपर्यंत वेरिअबल आशय ठेवतो. 
02.41  उदाहरणार्थ, हा कोड मानूया. 
02.44 आता टाईप करा,  ,$a = 2004 
02.50 $b = 25 
02.55 print $a + $b 
03.01  वेरिअबल 'a' ने   2004 हि किंमत निश्चित केली आहे 
03.06  वेरिअबल 'b' ने   25 हि किंमत निश्चित केली आहे
03.10 print कमांड, टर्टलला कॅनवासवर काही लिहिण्यासाठी आदेश देते. 
03.15 print कमांड, इनपुट म्हणून नंबर्स आणि स्ट्रींग्स घेते. 
03.19 print $a + $b कमांड, टर्टलला कॅनवासवर दोन किंमती जोडण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी आदेश देते. 
03.29 आता कोड slow गतीने रन करा. 
03.34 2029 व्ह्याल्यू  कॅनवासवर प्रदर्शित होईल. 
03.40 आता पुढील मेथेमेटिकल ऑपरेटर्स पाहू 
03.44  मेथेमेटिकल ऑपरेटर्स समाविष्ट करत आहेत 
  • + (बेरिज )
  •  - (वजाबाकी)
  •  * (गुणाकार)
  • / (भागाकर)
03.53 मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणि कॅनवास क्लिन करण्यासाठी clear कमांड टाईप करीन आणि रन करीन. 
04.01 माझ्याकडे आगोदरच टेक्ष्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. 
04.05 आता मी कोड समजावित आहे. 
04.08 reset कमांड टर्टलला त्याच्या मूळ स्थानावर स्थापित करते
04.12 canvassize 200,200 कॅनवासची लांबी आणि उंची प्रत्येकी 200 पिक्सल्स वर स्थापित करते. 
04.22 व्हेल्यु 1+1 हि  $add, वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे. 
04.26 व्हेल्यु 20-5 हि $subtract  वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
04.31 व्हेल्यु  15 * 2 हि $multiply वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
04.36 '30/30 हि  $divide  वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
04.40 go 10,10 टर्टलला 10 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 10 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे करते.  
04.52 print कमांड कॅनवासवर वेरिअबल प्रदर्शित करते.   
04.56 मी टेक्ष्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
05.03 टुटोरिअल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.   
05.08 प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.  
05.13 प्रोग्राम रन करण्यासाठी run बटनावर क्लिक करा
05.17 एक्झेक्युट होणारी कमांड एडिटरमध्ये ठळक केली आहे.
05.22 टर्टल कॅनवासवर स्पष्ट स्थानांवर व्ह्याल्युस प्रदर्शित करते.  
05.34 आता comparison operator वापरण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ.  
05.41 मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणि कॅनवास क्लिन करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करेल.
05.49 मी स्पष्ट व्ह्यूसाठी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीन. 
05.53  आता टाईप करू,
05.55 $answer = 10 > 3
06.03 print $answer
06.09 येथे ’greater than’ ऑपरेटरने 10 ची तुलना 3 बरोबर केली आहे.  
06.14 या तुलनेचा परिणाम, boolean value true ,
06.19 वेरिअबल $answer मध्ये संग्रहित होते आणि व्ह्याल्यू true कॅनवासवर प्रदर्शित करते.  
06.27 आता कोड रन करू 
06.29 टर्टल कॅनवासवर Boolean value true  प्रदर्शित करते.
06.34 चला आता पाहू, स्ट्रींग्स या अेप्लिकेशनमध्ये कसे काम करते.
06.39 स्ट्रींग्स नंबर्स प्रमाणे वेरिअबल मध्ये वापरता येऊ शकतात. 
06.43 स्ट्रींग्स मेथेमेटिकल किंवा कम्पेरीजन ऑपरेटर्स मध्ये वापरता येत नाहित. 
06.49 स्ट्रींग्स लाल रंगात ठळक केले आहेत. 
06.53 केटर्टल रेषा डबल अवतरण चिन्हात स्ट्रिंग म्हणून ओळखते.  
07.00 मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणि कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करीन. 
 07.08 आता मी बुलिअन व्ह्याल्युस विषयी समजवेल
07.11 येथे फक्त दोन बुलिअन व्ह्याल्युस आहेत: true आणि false. 
07.16 उदाहरणार्थ कोड टाईप करू ,
07.20 $answer = 7<5
07.28 print $answer 
07.34 Boolean value false हि $answer  वेरिअबलला असाइग्न आहे कारण 7 हा 5 पेक्षा मोठा आहे.  
07.43 आता कोड रन करू .
07.47 टर्टल कॅनवासवर boolean व्ह्याल्यू  false दर्शवेल.
07.51 चला आता ‘if-else’कंडीशन विषयी शिकू.
07.56  ‘if’ कंडीशन फक्त तेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा boolean व्ह्याल्यू ‘true’ असेल.  
08.03 ‘else’ कंडीशन फक्त तेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा ‘if’ कंडीशन ‘false’ असेल.  
08.09 मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करीन आणि कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करेल  
08.17 माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट फाईल मध्ये एक कोड आहे.
08.21 हा कोड नंबर 4 , 5 आणि 6 यांची तुलना करतो आणि त्यानुसार कॅन्वस वर परिणाम प्रदर्शित करतो.  
08.30 मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
08.36 टुटोरिअल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
08.42 प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.
08.46 आता कोड रन करू .
08.49 टर्टल 4 आणि 5 व्ह्याल्युसची तुलना करते. 
08.53 आणि कॅनवासवर  4 is smaller than 6 परिणाम प्रदर्शित होईल. 
09.00 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09.05 चला सारांश पाहू.   
09.07 या टुटोरिअलमध्ये, आपण,
09.11 टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि 
09.14  ‘if-else’कंडीशन यांबद्दल शिकलो.
09.17 आता साइग्नमेंट भाग पाहु.
09.19 Solve an equation using
09.22 ‘if-else’ अटी 
09.24  मेथेमेटिकल आणि कम्पेरीजन ऑपरेटर्स
09.27 “print” आणि “go” कमांडस वापरून परिणाम प्रदर्शित करा. 
09.33 असाइग्नमेंट सोडवण्यासाठी, 
09.35 कुठलेही चार रयाण्डम नंबर्स निवडा. 
09.38 रयाण्डम नंबर्सच्या दोन समूहांचा गुणाकार करा.  
09.42 कम्पेरीजन ऑपरेटर्स वापरून परिणामांची तुलना करा.   
09.46 दोन्ही परिणाम प्रदर्शित करा.
09.49  कॅनवासच्या मध्यभागी उत्तम परिणाम प्रदर्शित करा.  
09.54 तुम्ही जे तुम्हाला आवडेल असे कुठलेही समीकरण निवडू शकता. 
09.59 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial.http://spoken-tutorial.org/What  
10.03 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
10.06 जर तुमच्याकडे चांगली बेंड विड्थ नसेल तर, आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता.
10.12 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम
10.14 स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.18 परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
10.22 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
10.30 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा Talk to teacher प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
10.35 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
1043 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
10.48 या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून मी रंजना भांबळे यांचा आहे.
10.52 सहभागासाठी धन्यवाद. 

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble