QGIS/C4/Nearest-Neighbour-Analysis/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | QGIS मधील Nearest Neighbour Analysis वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत |
00:11 | Distance matrix पद्धतीनुसार Nearest Neighbour Analysis . |
00:16 | Nearest Neighbour Analysis टूल वापरून Statistics. |
00:21 | येथे मी वापरत आहे, Ubuntu Linux OS आवृत्ती. १६.०४ ,QGIS आवृत्ती २.१८ |
00:32 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी शिकणाऱ्याला QGIS इंटरफेसची ओळख असणे आवश्यक आहे. |
00:39 | पूर्व-आवश्यक QGIS ट्यूटोरियलसाठी, कृपया ही लिंक वापरा. |
00:45 | या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेल्या फाइल्स कोड फाइलस लिंकमध्ये उपलब्ध आहेत. |
00:52 | कृपया फोल्डरमधील कंटेंट डाउनलोड आणि एक्सट्रॅक्ट करा. |
00:57 | या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी येथे माझ्याकडे आवश्यक फाईल असलेले फोल्डर आहे. |
01:04 | फोल्डर उघडण्यासाठी डबल-क्लिक करा. येथे तुम्हाला urban area.shp आणि Volcanoes.shp मिळतील. |
01:15 | Volcanoes.shp लेयर जगातील सक्रिय ज्वालामुखी दाखवते. |
01:21 | Urban area.shp जगातील लोकसंख्या असलेले शहरी भाग दाखवते. |
01:28 | QGIS मध्ये दोन्ही शेप फाइल्स उघडा, दोन्ही फाइल्स निवडा. |
01:35 | राइट-क्लिक करा आणि कॉन्टैक्स्ट मेनूमधून Open with QGIS Desktop पर्याय निवडा. |
01:42 | QGIS इंटरफेस लेयर्स पॅनेलमध्ये लोड केलेल्या दोन लेयर्ससह उघडतो. |
01:49 | volcanoes लेयर वर राइट -क्लिक करा आणि झूम टू लेयर पर्याय निवडा. |
01:55 | कॅनव्हासवर तुम्हाला पॉईंट फीचरस सह नकाशा दिसेल. |
02:01 | या पॉईंट फीचरसना लेबल करूया. |
02:05 | Volcanoes layer वर राइट -क्लिक करा, सब-मेनूमधून Properties वर क्लिक करा. |
02:12 | Layer Properties डायलॉग बॉक्स उघडतो. |
02:16 | डाव्या पॅनलमधून Labels निवडा. |
02:20 | ड्रॉप डाउनमधून Show labels for this layer निवडा. |
02:25 | Label with ड्रॉप डाउन मध्ये Name निवडा. |
02:29 | येथे तुम्हाला लेबल स्टाइल सुधारण्यासाठी विविध पर्याय सापडतील. |
02:34 | आवश्यक स्टाइल निवडा आणि ओके बटणावर क्लिक करा. |
02:39 | कॅनव्हासवर, नावांसह पॉइंटस प्रदर्शित केले जातात. |
02:44 | त्याचप्रमाणे आपण Urban areas लेबल करू या. |
02:51 | कॅनव्हास पॉइंटवर फीचर्स त्यांच्या शहरांसह लेबल केलेली आहेत. |
02:57 | फीचरसमधील spatial संबंधांचे विश्लेषण करण्यासाठी QGIS मध्ये टूलस आहेत. |
03:04 | Nearest Neighbour Analysis असे एक टूल आहे . |
03:08 | खालील विश्लेषणासाठी Nearest Neighbour Analysis वापरले जाते. |
03:13 | दोन पॉईंट फीचरसमधील अंतर शोधणे. |
03:17 | दिलेल्या फीचरसच्या सर्वात जवळची फीचर शोधणे. |
03:23 | प्रथम, आपण अंतर मोजण्यासाठी distance matrix तयार करू. |
03:29 | Volcanoes च्या लेयरसाठी attribute table उघडू या. |
03:34 | Volcanoes लेयर वर राइट -क्लिक करा. |
03:37 | open attribute table निवडा. |
03:40 | attribute table मध्ये अनेक कॉलम्स आहेत. |
03:45 | पॉईंट फीचरससाठी विविध गुणधर्म येथे सूचीबद्ध आहेत. |
03:50 | ज्वालामुखींची नावे आणि त्यांची ठिकाणे देखील येथे सूचीबद्ध आहेत. |
03:56 | attribute table बंद करा. |
03:59 | शहरी क्षेत्र लेयर साठी attribute table उघडा. |
04:04 | टेबलमधील विविध कॉलम्ससकडे लक्ष द्या. |
04:08 | या टेबलमध्ये तुम्हाला शहरांची, देशांची नावे आणि इतर माहिती मिळेल. |
04:15 | attribute table बंद करा. |
04:18 | सक्रिय ज्वालामुखी आणि जवळच्या शहरांमधील अंतर मोजू. |
04:24 | Vector मेनूवर क्लिक करा. |
04:27 | Analysis Tools निवडा. |
04:30 | सब-मेनूमधून distance matrix पर्याय निवडा. |
04:34 | Distance Matrix डायलॉग बॉक्स उघडतो. |
04:38 | कृपया उजव्या पॅनेलवरील Distance matrix चे वर्णन वाचा. |
04:44 | बाय डीफॉल्ट Parameters टॅब स्क्रीनवर उघडतो. |
04:49 | येथे दाखवल्याप्रमाणे Parameters निवडा. |
04:53 | Input Point Layer म्हणून Volcanoes निवडा. |
04:58 | Input unique ID field म्हणून NAME निवडा |
05:03 | Target Point Layer म्हणून Urban Areas निवडा. |
05:08 | Target unique ID field म्हणून City निवडा. |
05:13 | Output matrix type म्हणून Linear ठेवा. |
05:17 | ज्वालामुखीपासून जवळच्या दोन शहरांचे अंतर शोधू या. |
05:23 | Use only the nearest target Points फील्ड मध्ये 2 निवडा. |
05:30 | Distance Matrix फील्डच्या शेजारी असलेल्या 3 डॉट्स बटणावर क्लिक करा. |
05:35 | ड्रॉप-डाउन मेनूमधून,Save to file ऑप्शन निवडा. |
05:40 | डायलॉग बॉक्समध्ये, योग्य नाव आणि स्थान द्या. |
05:44 | Files of type मध्ये CSV, निवडा. |
05:49 | Encoding फील्डमध्ये System निवडा. Save बटणावर क्लिक करा. |
05:56 | Distance matrix डायलॉग बॉक्समध्ये खालील गोष्टींसाठी चेक-बॉक्स चेक करा. Open output file after running algorithm. |
06:06 | डायलॉग बॉक्सच्या तळाशी-उजव्या कोपऱ्यात असलेल्या रन बटणावर क्लिक करा. |
06:12 | प्रक्रियेस काही सेकंद लागतील. |
06:15 | Layers पॅनेलमध्ये Distance matrix नावाचा नवीन csv layer ऍड केला आहे. |
06:22 | distance matrix लेयरसाठी attribute table उघडा. |
06:27 | attribute table मध्ये तीन कॉलम्सस आहेत. शेवटचा कॉलम ज्वालामुखी आणि जवळच्या शहरामधील अंतर आहे. |
06:38 | कृपया लक्षात घ्या, येथे अंतर मीटरमध्ये आहे. |
06:43 | याचे कारण असे की WGS 84 UTM Zone 46N system मध्ये लेयर्स प्रोजेक्ट केले जातात. |
06:52 | CRS वर अवलंबून, अंतर layer units मध्ये किंवा degrees मध्ये देखील असू शकते. |
07:00 | हे देखील पहा की प्रत्येक ज्वालामुखीसाठी, दोन जवळची शहरे सूचीबद्ध आहेत. |
07:07 | Nearest neighbour tool वापरून लेयर साठी काही सांख्यिकीय विश्लेषण करूया. |
07:14 | फीचरसच्या वितरणाचे विश्लेषण करण्यासाठी आपण nearest neighbour analysis रन करू. |
07:21 | परिणाम क्लस्टर्ड, विखुरलेले किंवा यादृच्छिक म्हणून वितरण स्थापित करतील. |
07:29 | attribute table बंद करा. |
07:32 | Vector मेनूवर क्लिक करा. |
07:35 | खाली स्क्रोल करा आणि Analysis Tools वर क्लिक करा. |
07:40 | सब-मेनूमधून, Nearest Neighbour analysis निवडा. |
07:46 | Nearest Neighbour Analysis डायलॉग बॉक्स उघडतो. |
07:50 | उजव्या पॅनेलवर Nearest neighbour analysis विषयी दिलेली माहिती वाचा. |
07:57 | Points ड्रॉप-डाउन मध्ये Volcanoes चा लेयर निवडा. |
08:02 | तळाशी-उजव्या कोपर्यात Run बटणावर क्लिक करा. |
08:06 | Results विंडो उघडते. |
08:09 | ज्वालामुखी लेयर साठी काही सांख्यिकीय मापदंड येथे सूचीबद्ध आहेत. |
08:15 | Observed mean distance |
08:17 | Expected mean distance |
08:20 | Nearest neighbour index |
08:23 | Number of point features आणि Z-Score. |
08:29 | Nearest Neighbour Index हा Expected Mean Distance चे Observed Mean Distance गुणोत्तर म्हणून व्यक्त केला जातो. |
08:39 | निर्देशांक मूल्य 1 पेक्षा कमी असल्यास, पैटर्न क्लस्टरिंग प्रदर्शित करतो. |
08:45 | जर निर्देशांक मूल्य 1 पेक्षा जास्त असेल, तर त्याचा कल विखुरण्याच्या दिशेने आहे. |
08:52 | येथे ०.२ चे Nearest Neighbor Index क्लस्टरिंग दर्शवते.याचा अर्थ, ज्वालामुखी एकमेकांच्या अगदी जवळ स्थित आहेत. |
09:04 | त्याचप्रमाणे नकारात्मक Z-Score देखील पॉईंट फीचरसचे क्लस्टरिंग सूचित करतो. |
09:10 | Results विंडो बंद करा. |
09:13 | Project मेनू वापरून प्रोजेक्ट सेव्ह करा. |
09:17 | चला थोडक्यात बघू. |
09:19 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो, |
09:22 | distance matrix पद्धतीनुसार Nearest Neighbour Analysis.सर्वात Nearest Neighbour Analysis टूल वापरून आकडेवारी. |
09:32 | असाइनमेंट म्हणून, शहरी भागात जवळच्या ५ ज्वालामुखीसाठी distance matrix तयार करा.सूचना: इनपुट म्हणून Urban Areas आणि K म्हणून 5 वापरा. |
09:46 | तुमची पूर्ण केलेली असाइनमेंट येथे दाखवल्याप्रमाणे दिसली पाहिजे. |
09:51 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो.कृपया डाउनलोड करून पहा.
|