PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-3/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:07, 2 August 2013 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: MySQL-Part-3

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:00 नमस्कार. ह्या ट्युटोरियमध्ये, डेटाबेसमध्ये डेटा कसा लिहायचा ते पाहू.
0:07 त्यासाठी "mysql query" हे फंक्शन वापरू.
0:12 येथे आपण काही रेकॉर्डस बघू शकतो.
0:16 मी हे पुन्हा करत आहे कारण पहिल्या वेळेला हे चालले नव्हते.
0:22 येथील सर्व डेटा डिलिट करू,
0:29 येथे टेबल रिकामे केले आहे. याक्षणी आपल्या टेबलमध्ये कोणताही डेटा नाही.
0:37 येथे आता काहीही नाही.
0:40 केवळ फिल्डसची नावे आहेत.
0:43 येथे एकcomment लिहू.
0:47 "write some data". नंतर डेटा भरणारी query सेट करू.
0:52 "write" आणि पुढे "mysql query" हे फंक्शन वापरू.
0:57 हे एकच parameter घेते तो म्हणजे sql query.
1:02 डेटा समाविष्ट करण्यासाठी टाईप करा."INSERT"
1:06 "INSERT INTO". टाईप करू.
1:09 हा sql code असल्यामुळे कॅपिटलमध्ये टाईप केला.
1:14 uppercase मध्ये टाईप केलेले काहीही म्हणजे sql code.
1:19 lowercase मध्ये टाईप केलेले काहीही उदाहरणार्थtable name, database name किंवा डेटाबेसमधे लिहीत असलेला डेटा.
1:28 "INSERT INTO people" हे टेबलचे नाव,
1:33 आणि नंतर "VALUES" आणि कंसात प्रत्येक व्हॅल्यूसाठी जागा तयार करू.
1:42 एक, दोन, तीन, चार आणि पाच
1:46 पाच फिल्डस असल्यामुळे पाच भाग केले.
1:53 id, firstname, lastname, असे gender पर्यंत.
1:58 ही फिल्डसsingle quotes च्या सहाय्याने तयार केली असून comas ने वेगळी केली आहेत.
2:07 येथे double quotes वापरणार नाही. कारण ते सुरूवातीला आणि शेवटी वापरले आहेत.
2:15 id समाविष्ट करण्याची गरज नाही.
2:18 पुढे firstname "Alex".
2:22 नंतर lastname "Garrett".
2:25 date of birth साठी date function बनवू जे "date" variable असेल.
2:31 हे विशिष्ट रचनेत बसवू.
2:35 आपल्या डेटाबेसमधीलcalender function मध्ये dates दिसत आहेत.
2:44 तेवीसवर क्लिक केल्यावर फिल्डची रचना दिसेल.
2:50 येथे वर्ष long format मध्ये आहे.
2:52 month आणि नंतर day
2:55 2009 02 23 म्हणजेच2009 च्या दुस-या महिन्यातील 23तारीख.
3:02 date function साठी capital Y hyphen m hyphen d अशी रचना करू.
3:13 हे असे दिसेल.
3:16 अशा रचनेची ही current date असेल.
3:20 date व्हेरिएबलच्या सहाय्याने आपण डेटा समाविष्ट करू शकतो.
3:28 शेवटी gender. male साठी "M" टाईप करू.
3:34 हे कार्यान्वित करू.
3:37 पण त्याआधी त्यात "or die" आणि पुढे mysql errorसमाविष्ट करू शकतो.
3:44 हे आत्ता आपण वापरणार नाही. पण तुम्ही वापरू शकता.
3:50 पेज रिफ्रेश करू.
3:53 हा मागील ट्युटोरियलचा डेटा आहे.
3:57 आपण comment करू.
3:59 ह्याकडे दुर्लक्ष करू.
4:01 comment केल्यामुळे हा भाग वापरला जाणार नाही.
4:08 काम करत असलेल्या code वर जाऊ आणि रिफ्रेश करू.
4:14 दोन वेळा रिफ्रेश केल्यामुळे दोन रेकॉर्डस लिहिली गेली आहेत.
4:24 browse and scroll downकेल्यावर आपल्याला ती दिसतील. त्यातील एक डिलिट करू. आत्ता मी लिहिलेला डेटा त्यात भरला गेला आहे.
4:35 अनावधानाने current date ही माझी date of birth लिहिली गेली आहे.
4:43 हे चूक आहे कारण मी आज जन्मलेलो नाही!
4:48 आपले firstname, lastname, gender ठीक आहे.
4:53 आपला id सहा आहे. रेकॉर्ड समाविष्ट केल्यावर हा वाढत जाऊन सात, आठ झालेला दिसेल.
5:02 समजले का?
5:03 चूक दुरूस्त करण्यासाठी date of birth कशी बदलायची ते पाहू.
5:09 ह्या दोन ओळी comment केल्याने कार्यान्वित होणार नाहीत.
5:15 नवे व्हेरिएबल बनवू. "update data" अशी comment लिहू.
5:20 "update" हे व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू "mysql query" फंक्शन आहे.
5:26 ह्यातील parameter म्हणजे "mysql query" code आहे.
5:32 टाईप करा "UPDATE" आणि "people" हे table name .
5:38 "SET" टाईप करून जे फिल्ड सेट करायचे त्याचे नाव लिहू.
5:43 "d o b" बरोबर date of birth म्हणजेच 1989 हे वर्ष, नोव्हेंबर महिना आणि तारीख16.
5:57 ही कमांड कार्यान्वित केल्यास टेबलमधील प्रत्येकाची date of birth बदलेल.
6:05 कारण हा बदल कोठे करायचा ते सांगितलेले नाही.
6:10 unique id सहा असल्यामुळे "WHERE id=6" असे लिहू शकतो.
6:18 लक्ष द्या.
6:23 नाहीतर हे प्रत्येकासाठी अपडेट करेल.
6:26 unique idच्या सहाय्याने अपडेट करणे योग्य ठरेल.
6:32 जर "WHERE firstname equals Alex" असेल तर firstname "Alex" असलेले प्रत्येक रेकॉर्ड अपडेट करेल.
6:41 तेथे "AND lastname equals Garrett" लिहू शकतो.
6:46 डेटाबेसमधील दोन व्यक्तींचे firstname आणि lastname सारखे असेल तर दोन्ही रेकॉर्डस अपडेट होण्याचा धोका असतो.
6:54 त्यामुळे "unique id" चा वापर करणे उत्तम.
7:00 date of birth ही 2009 ह्या current date वर सेट केलेली दिसते .
7:06 पेज रिफ्रेश केल्यावरही फरक पडला नाही कारण आपण कमांड कार्यान्वित करत आहोत.
7:11 रिफ्रेश करण्यासाठी browse वर क्लिक केले तर खाली date of birth बदलली. बाकी तसेच राहिले.
7:21 डेटाबेसमध्ये कोणता डेटा अपडेट करायचा ते स्पष्ट करणे आवश्यक आहे.
7:29 आपण "dob" equals date of birth वापरले आहे.
7:34 lastname ही अपडेट करू शकतो.
7:36 ते कुठे अपडेट करायचे ते स्पष्ट करणे आवश्यक आहे.
7:40 ह्या ओळीला आपण रेकॉर्ड म्हणू शकतो.
7:46 "WHERE" id equal to 6 असे स्पष्ट केल्यामुळे unique record अपडेट झाले.
7:56 values समाविष्ट करणे, चूक दुरूस्त करणे, एखादा डेटा समाविष्ट करण्यासाठी डेटाबेस update करणे आपण शिकलो.
8:10 पुढील भागात डेटाबेस कसा वाचायचा आणि युजरला तो कसा दाखवायचा ते पाहू.
8:17 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana