GeoGebra-5.04/C3/Create-and-manage-Tools/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:20, 5 February 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Create and Manage Tools वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.

या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत, टूलबार Customize करणे एक नवीन टूल तयार करणे तयार केलेले टूल व्यवस्थापित करणे आणि

00:06 एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडणे आणि तयार केलेले टूल तपासणे

हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे. उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04

00:21 जिओजेब्रा आवृत्ती 5.0.438.0-डी

या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला GeoGebra इंटरफेसची माहिती असावी.

00:34 संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया या वेबसाइटला भेट द्या.
00:46 मी माझ्या मशीनवर GeoGebra इंटरफेस आधीच उघडला आहे.
00:51 या ट्यूटोरियल साठी मी axes un-check करेन
00:56 आपण टूलबार Customize करण्यास सुरवात करू.
00:59 टूल्स मेनूवर क्लिक करा आणि Customize Toolbar पर्याय निवडा. Customize Toolbar विंडो उघडेल.
01:08 views निवडण्यासाठी विंडोमध्ये एक ड्रॉप-डाउन आहे. आधिपासूनच, General view निवडले आहे.
01:16 टूलबार बॉक्समध्ये संबंधित टूल्स दर्शविण्यासाठी प्रत्येक टूल्सच्या पुढे मेनू बटण आहे.
01:22 टूलबार बॉक्सच्या खाली आपल्याकडे अप आणि डाऊन एरो बटणे आहेत.
01:27 मी लाइन टूल निवडेन
01:30 ही बटणे सूचीमधील निवडलेले टूल्स वर आणि खाली हलविण्यासाठी वापरले जातात.
01:37 खाली डावीकडे, Default Toolbar  Restore करण्यासाठी आपल्याकडे Restore Default Toolbar बटण आहे.
01:43 रीस्टोर डीफॉल्ट टूलबार बटणावर क्लिक करा.
01:46 पुढे आपल्याकडे टूल्स बॉक्स आहे. This is used to separate the tools from the Toolbar' box.
01:53 टूलबार बॉक्समध्ये, संबंधित tools दर्शविण्यासाठी मूव्हच्या पुढील मेनू बटणावर क्लिक करा.
01:59 मूव्ह टूल वर क्लिक करा आणि नंतर Remove  बटणावर क्लिक करा.
02:04 लक्ष द्या की मूव्ह टूल टूल बॉक्स मध्ये हलवले आहे.
02:08 मूव्ह मेनू बंद करण्यासाठी मेनू बटणावर क्लिक करा.
02:11 संबंधित tools दर्शविण्यासाठी पुढील Perpendicular Line  असलेल्या मेनू बटणावर क्लिक करा.
02:17 आता टॅन्जेन्ट्स टूलवर क्लिक करा आणि नंतर 'रिमूव्ह' या बटणावर क्लिक करा.
02:23 लक्ष द्या टॅन्जेन्ट्स टूल देखील टूल बॉक्स मध्ये हलवले आहे.
02:28 Perpendicular Line मेनू बंद करण्यासाठी मेनू बटणावर क्लिक करा.
02:34 चला ही tools त्यांच्या संबंधित tools पासून विभक्त करूया.
02:38 "टूल्स बॉक्समधील मूव्ह टूल निवडा आणि Insert  बटणावर क्लिक करा.

मूव्ह टूल स्वतंत्र टूल म्हणून समाविष्ट केले आहे."

02:48 पुढे टॅन्जेन्ट्स टूल निवडा आणि insert बटणावर क्लिक करा.
02:54 टॅन्जेन्ट्स टूल स्वतंत्र टूल म्हणून समाविष्ट केले आहे.
02:58 बदल लागू करण्यासाठी आता अप्लाय बटणावर क्लिक करा.विंडो बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा.
03:06 लक्ष द्या, मूव्ह टूल आणि टॅन्जेन्ट्स टूल टूलबारवर स्वतंत्रपणे दर्शविलेले आहेत.
03:13 आता आपण नवीन टूल तयार करण्यास शिकू.
03:16 आपण वर्तुळात स्पर्शिका रेखाटून प्रारंभ करू.
03:20 Circle with Center and Radius  टूल वर क्लिक करा. ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा.
03:27 Circle with Center and Radius  टेक्स्ट बॉक्स उघडेल.
03:31 रेडियस फील्डमध्ये, टाइप करा 3 आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.मध्यभागी A आणि त्रिज्यासह 3 सेमी असलेले एक वर्तुळ रेखाटले आहे."
03:42 वर्तुळाचे समीकरण पाहण्यासाठी Algebra view ची सीमा ड्रॅग करा.
03:47 Graphics view स्पष्टपणे पाहण्यासाठी सीमा ड्रॅग करा.
03:51 आता पॉईंट टूल वापरुन आपण ग्राफिक्स व्यू वर बाह्य बिंदू B चिन्हांकित करू.
03:58 टॅन्जेन्ट्स टूल वर क्लिक करा. नंतर बिंदू B वर क्लिक करा आणि नंतर वर्तुळ c वर क्लिक करा.
04:07 बिंदू B पासून वर्तुळ c ला दोन स्पर्शिका रेखाटल्या जातात.
04:12 टूल्स मेनूवर क्लिक करा आणि Create New Tool पर्याय निवडा.
04:18 Create New Tool dialog बॉक्स उघडेल.
04:22 बॉक्समध्ये आपल्याकडे आउटपुट ऑब्जेक्ट्स, इनपुट ऑब्जेक्ट्स आणि नेम आणि आयकॉन टॅब आहेत.
04:29 आधिपासूनच आउटपुट ऑब्जेक्ट्स टॅब उघडलेला आहे.
04:33 आउटपुट ऑब्जेक्ट्स टॅबमध्ये ऑब्जेक्ट्स निवडण्यासाठी ड्रॉप-डाउन आहे.
04:38 ड्रॉप-डाऊन मधून निवडा

Circle c with center A and radius 3 Line f: Tangent to c through B. Line g: Tangent to c through B.

04:52 पुढील इनपुट ऑब्जेक्ट्स टॅबवर क्लिक करा. या टॅबमध्ये  Point A आणि  Point B आधीच निवडलेले आहेत.
05:00  Name & Icon टॅबवर क्लिक करा. या टॅबमध्ये आपण टूल नेम आणि टूल हेल्प टाईप करू शकतो.
05:07 Tool Name साठी मी Tangents to a circle टाइप करेन
05:11 लक्ष द्या, मी Tool name टाईप केल्यावर Command name आपोआप भरते.
05:17 टूल हेल्प बॉक्समध्ये मी क्लिक टू पॉईंट टाईप करेन.
05:22 लक्ष द्या,Show in Toolbar  चेक-बॉक्स आधीच चेक केलेले आहे.
05:27 शेवटी Finish वर क्लिक करा.
05:30 Geogebra Info message box New tool created successfully! मजकूरासह दिसते
05:37 हा message बॉक्स बंद करण्यासाठी ओके बटणावर क्लिक करा.
05:41 लक्ष द्या,नवीन tool  Tangents to a circle टूलबारवर टूल टिपसह दिसते
05:47 इंटरफेसमधील सर्व ऑब्जेक्ट्स डिलिट करू.
05:51 आता आपण तयार केलेले टूल वापरू.
05:55 "Tangents to circle tool वरती क्लिक करा आणि ग्राफिक्स view मध्ये दोन बिंदू क्लिक करा.

वर्तुळातील स्पर्शिका रेखाटल्या जातात."

06:05 आपण तयार केलेले टूल कसे व्यवस्थापित करायचे ते पाहू.
06:09 टूल्स मेनूवर क्लिक करा आणि manage tools पर्याय निवडा.
06:14 मॅनेज टूल्स डायलॉग बॉक्स उघडेल.
06:17 या डायलॉग बॉक्समध्ये Delete, Open, Save As आणि Share बटणे आहेत.
06:24 आपण Tangents to a circle टूल सेव्ह करू. Saves As या बटणावर क्लिक करा.
06:31 Save as dialog बॉक्स उघडेल.
06:34 फाईल नेम टेक्स्ट बॉक्समधे मी टॅन्जेन्टस हायफन सर्कल (टॅन्जेन्टस-सर्कल) टाईप करेन.
06:39 लक्षात घ्या की  Files of type मध्ये, जिओजेब्रा टूल्स (.ggt) आधीपासून निवडलेले आहे.
06:46 फाईल सेव्ह करण्यासाठी एक स्थान निवडा. मी डेस्कटॉप निवडेन.
06:52 त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा.
06:56 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा.
07:00 आता मी Geogebra विंडो बंद करेन. मी फाईल वर क्लिक करेन आणि क्लोज सिलेक्ट करेन.
07:08 क्लोज फाइल बॉक्स उघडेल.
07:11 ते विचारते Do you want to save your changes?
07:15 बॉक्समधे मी आधीच फाईल सेव्ह केल्याने Don't save बटन निवडेन.
07:22 आता आपण सेव्ह केलेली फाईल उघडणार आहोत.
07:25 मी हे माझ्या डेस्कटॉपवर Tagents-circle.ggt म्हणून सेव्ह केले होते
07:31 "आपण फाईल वर डबल क्लिक करून उघडू शकतो. किंवा राइट-क्लिक करा आणि

 Open With GeoGebra  पर्याय निवडा."

07:40 कृपया लक्षात ठेवा,आपण तयार केलेले नवीन tools केवळ या फाईलमध्ये उपलब्ध असतील.
07:46 "आपण डॅश होम वापरुन नवीन जिओजेब्रा विंडो उघडल्यास आपल्याला तयार

केलेले टूल दिसत नाहीत."

07:55 आपण ते स्वतः तपासू शकता. नवीन जिओजेब्रा विंडोमध्ये नवीन tools उपलब्ध नाहीत.
08:02 आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
08:05 या पाठात शिकलो,

टूलबार Customize करणे एक नवीन टूल तयार करणे तयार केलेले टूल व्यवस्थापित करणे आणि एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडणे आणि तयार केलेले टूल तपासणे

08:21 असाईनमेंट म्हणून,

त्रिकोणाचा शिरोलंब काढण्यासाठी आणि मध्यगा चिन्हांकित करण्यासाठी एक नवीन tool तयार करा.

08:29 आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखे दिसावी.
08:39 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करा आणि पहा.
08:47 "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा."

08:55 या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा.
08:59 "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.

यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे."

09:10 मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika