PhET/C3/Membrane-Channels/Marathi
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Membrane Channels PhET सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.
|
00:08 | या पाठात, Membrane Channels, या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
|
00:16 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 जावा वर्जन 1.7.0 |
00:29 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.
|
00:35 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील जीवशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:43 | Membrane Channels , सिम्युलेशन च्या सहाय्याने आपण शिकणार आहोत,
पटलातून होणाऱ्या कणांच्या हालचालींचा अंदाज लावणे, |
00:52 | पटलावर उपस्थित असलेल्या चॅनेल्सचे(मार्गिका) प्रकार बघू, |
00:56 | उपस्थित चॅनेलची संख्या आणि प्रकार यावर आधारित डिफ्युजन(विसरणाचा) दर सांगणे, |
01:03 | Membrane Channels विषयी माहिती
Membrane Channels ही प्रथिने आहेत. |
01:10 | ते पटलातून द्राव्य पदार्थाचे निष्क्रीय(passive) वहन होऊ देतात. |
01:15 | द्राव्य पदार्थ साध्या विसरणाने पटलातून पार होऊ शकतो. |
01:20 | द्राव्य पदार्थ जास्त सांद्रतेच्या(concentration) विभागातून कमी सांद्रतेच्या विभागाकडे जातो. |
01:27 | दोन्ही विभागांतील सांद्रता समान होईपर्यंत विसरण चालू राहते. |
01:34 | पटलामधे दोन प्रकारचे चॅनेल्स आढळतात. |
01:39 | लिकेज चॅनेल्स आणि गेटेड चॅनेल्स.
लिकेज चॅनेल्स नेहमीच उघडे असतात. |
01:47 | गेटेड चॅनेल्स काही उत्तेजकांना प्रतिसाद देताना उघडतात. |
01:53 | सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.
|
01:58 | मी डाउनलोड्स फोल्डरमधे Membrane Channels सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे.
|
02:05 | सिम्युलेशन कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल उघडा.
प्रॉम्प्टवर, cd space Downloads टाईप करून एंटर दाबा. |
02:18 | नंतर java space hyphen jar space membrane hyphen channels_en.jar टाईप करून एंटर दाबा. |
02:32 | Membrane Channels सिम्युलेशन उघडेल. |
02:36 | Membrane Channels सिम्युलेशनचा हा इंटरफेस आहे.
|
02:41 | सिम्युलेशन विंडोमधे पटलाद्वारे वेगळे झालेले दोन भाग आहेत. |
02:48 | प्रत्येक भागात एक द्राव्य कणांचा पंप आहे.
प्रत्येक पंपात दोन भिन्न प्रकारचे द्राव्य कण आहेत. |
02:58 | कण हिरव्या वर्तुळाने आणि निळ्या हिऱ्याच्या आकाराने दाखवले आहेत. |
03:04 | डिफॉल्ट रूपात वरील भागात हिरवे वर्तुळ निवडलेले आहे.
आणि खालील भागात निळा हिऱ्यासारखा आकार निवडलेला आहे. |
03:15 | कणाच्या शेजारी असलेल्या रेडिओ बटणावर क्लिक करून पार्टिकल निवडू. |
03:21 | खालील भागात एकच कण सोडण्यासाठी लाल बटणावर क्लिक करा. |
03:27 | दोन भिन्न प्रकारचे चॅनेल्स खाली दिले आहेत. |
03:32 | लिकेज आणि गेटेड चॅनेल्स.
पटलावर चॅनेल्स समाविष्ट करण्यासाठी ते ड्रॅग करून ड्रॉप करा. |
03:43 | उजव्या पॅनेलवरील बटणांच्या सहाय्याने गेटेड चॅनेल्स उघड बंद करता येतात. |
03:50 | सिम्युलेशन सुरू किंवा पॉझ करण्यासाठी Play/Pause button वापरा. |
03:56 | Play/Pause बटण प्ले मोडमधे असताना Step बटण सक्रिय होते.
Sim speed स्लाइडरने वेग Slow पासून Fast करता येतो. |
04:08 | कणांची सांद्रता दाखवण्यासाठी उजवीकडील पॅनेलमधे एक चेकबॉक्स आहे.
Show Concentrations च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
04:19 | प्रत्येक भागासाठी सांद्रता दर्शविणारे बार आलेख स्क्रीनवर दिसतील. |
04:26 | खालील भागातील कण काढून टाकण्यासाठी Clear Particles वर क्लिक करा. |
04:33 | सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी, Reset All बटणावर क्लिक करा. |
04:38 | सर्व सेटिंग्ज रिसेट करण्याची पुष्टी देण्यासाठी एक मेसेज दाखवला जाईल. |
04:44 | Yes बटणावर क्लिक करा. |
04:47 | सिम्युलेशन सुरू करण्यासाठी Play वर क्लिक करा. |
04:51 | खालील भागात निळ्या रंगाचा कण निवडा. |
04:56 | खालील भागात निळे कण समाविष्ट करण्यासाठी लाल बटणावर क्लिक करा. |
05:01 | खालील भागात 10 निळे कण समाविष्ट करण्यासाठी 10 वेळा लाल बटणावर क्लिक करा. |
05:11 | पटलावर 2 निळे लिकेज चॅनेल्स समाविष्ट करा.
निळे कण चॅनेलमधून वरील भागात जात आहेत. |
05:22 | काही सेकंद थांबा.
वरील भागातील निळ्या कणांच्या संख्येची नोंद करा. |
05:30 | चॅनेल्सच्या मधून कण दोन्ही दिशांना आत बाहेर करत आहेत.
कणांचे विसरण चालू आहे. |
05:39 | काही वेळानंतर दोन्ही भागांमधील कण जवळजवळ समान होतील.
सिम्युलेशन काही काळ थांबवण्यासाठी Pause बटणावर क्लिक करा. |
05:49 | Show Concentrations च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
05:53 | प्रत्येक भागातील कणांची सांद्रता बार आलेखाने दाखवली आहे. |
06:00 | सिम्युलेशन सुरू करण्यासाठी Play बटणावर क्लिक करा. |
06:04 | पटलावर एक हिरव्या रंगाचा लिकेज चॅनेल ठेवा. |
06:09 | हिरव्या चॅनेलमधून निळे कण दुसऱ्या बाजूला जात नाहीत हे लक्षात घ्या. |
06:15 | आता खालील भागात 10 हिरवे कण समाविष्ट करा. |
06:20 | हिरव्या कणाच्या शेजारील रेडिओ बटणावर क्लिक करा. |
06:25 | 10 हिरवे कण समाविष्ट करण्यासाठी 10 वेळा लाल बटणावर क्लिक करा. |
06:32 | कणांच्या हालचालींचे निरीक्षण करा.
हिरवे कण निळ्या चॅनेल्समधून दुसऱ्या भागात जात नाहीत हे लक्षात घ्या. |
06:42 | ते केवळ हिरव्या चॅनेलमधून दुसऱ्या बाजूला जातील.
हे चॅनेल्स निवडक द्राव्यासाठी असल्याचे दर्शवते. |
06:50 | ते केवळ विशिष्ट कणाला चॅनेलमधून जाण्याची अनुमती देतात. |
06:55 | काही वेळाने सांद्रतेचा समतोल साधला जाईल.
सिम्युलेशन थांबवण्यासाठी Pause वर क्लिक करा. |
07:03 | लक्षात घ्या की या टप्प्यावर दोन्ही भागातील कणांची सांद्रता जवळजवळ सारखीच आहे. |
07:11 | Play बटणावर क्लिक करा.
समतोल राखण्यासाठी कण दोन्ही दिशांना फिरत राहतील. |
07:20 | Reset All बटणावर क्लिक करा.
सर्व सेटिंग्ज रिसेट करण्याची पुष्टी देण्यासाठी Yes वर क्लिक करा. |
07:27 | 20 हिरवे कण वरील भागात समाविष्ट करण्यासाठी 20 वेळा लाल बटणावर क्लिक करा. |
07:37 | खालील भागात निळ्या कणांसाठीच्या रेडिओ बटणावर क्लिक करा. |
07:42 | खालील भागात 20 निळे कण समाविष्ट करा. |
07:50 | पटलावर प्रत्येकी एक निळा आणि हिरवा गेटेड चॅनेल ठेवा. |
07:57 | उजवीकडील पॅनेलवरील निळ्या Open बटणावर क्लिक करा. |
08:01 | पटलावरील निळा चॅनेल उघडेल. |
08:05 | निळे कण गेटेड चॅनेलमधून दोन्ही दिशांना ये जा करताना दिसतील. |
08:10 | Show Concentrations च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
समतोल साधेपर्यंत प्रतीक्षा करा. |
08:19 | हिरवे कण निळ्या गेटेड चॅनेलमधून दुसऱ्या भागात जात नाहीत त्यामुळे ते वरच्या भागात तसेच राहिले आहेत. |
08:28 | खालील भागात एकही हिरवा कण नाही याकडे लक्ष द्या. |
08:34 | आता उजव्या पॅनेलवरील हिरव्या Open बटणावर क्लिक करा.
पटलावर ग्रीन चॅनेल उघडेल. |
08:43 | हिरवे कण हिरव्या गेटेड चॅनेलमधून खालील भागात जातील. |
08:49 | काही मिनिटात समतोल साधला जाईल. |
08:55 | पुढे हिरवा गेटेड चॅनेल बंद करण्यासाठी हिरव्या Close बटणावर क्लिक करा. |
09:01 | कणांच्या हालचालींचे निरीक्षण करा. लक्षात घ्या आता दोन्ही भागांमधून केवळ निळे कण आत बाहेर करत आहेत. |
09:11 | हिरवे कण दुसऱ्या भागात जाणार नाहीत कारण ते निळ्या चॅनेलमधून दुसऱ्या भागात जाऊ शकत नाहीत. |
09:18 | अशाप्रकारे द्राव्य पदार्थ किंवा आयनांचे पेशींच्या पटलांमधून विसरण होते |
09:29 | थोडक्यात या पाठात शिकलो,
Membrane Channels हे PhET सिम्युलेशन कसे वापरायचे, |
09:38 | तसेच पटलाच्या माध्यमातून कणांच्या हालचालींचा अंदाज बांधणे |
09:44 | पटलावर उपस्थित असलेल्या चॅनेल्सचे प्रकार बघणे |
09:48 | उपस्थित चॅनेलची संख्या आणि प्रकार यावर आधारित विसरणाचा दर सांगणे.
|
09:55 | असाईनमेंट म्हणून -
वरील आणि खालील भागात निळ्या आणि हिरव्या रंगाचे समान कण भरा. |
10:05 | पटलावर दोन्ही रंगाचे गेटेड चॅनेल्स समाविष्ट करा. |
10:10 | विसरणाचा दर चॅनेल्सची संख्या वाढवल्यावर वाढतो का ते बघा.
निष्कर्षाचे स्पष्टीकरण द्या. |
10:20 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
10:29 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
10:43 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
10:48 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
10:56 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:09 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |