PhET/C2/Trig-tour/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:11, 9 January 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Trig Tour या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वरील पाठात आपले स्वागत.


00:07 या पाठात, Trig Tour या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.


00:15 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04,

00:22 जावा वर्जन 1.8.0
00:26 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे.
00:32 हा पाठ समजण्यासाठी त्रिकोणमितीचे ज्ञान असावे.
00:36 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत-

युनिट वर्तुळावर फिरणार्‍या बिंदूसाठी काटकोन त्रिकोण तयार करणे,

00:47 theta या कोनासाठी cos, sin आणि tan ही त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढणे,
00:54 ’‘‘x’’’ अक्षावर ‘‘‘theta’’’ घेऊन ‘‘‘theta’’’ विरूध्द ‘‘‘cos’’’, ‘‘‘sin’’’ आणि ‘‘‘tan’’’ फंक्शन्स यांचा ‘‘‘y ‘‘‘अक्षावर आलेख काढणे.
01:01 सुरूवात करूया.
01:03 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
01:08 मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Trig Tour हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.
01:14 सिम्युलेशन उघडण्यासाठी trig-tour html या फाईलवर राईट क्लिक करा.
01:20 Open With Firefox Web Browser पर्याय निवडा.


ब्राऊजरमधे फाईल उघडेल.


01:29 हा Trig Tour सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
01:34 या इंटरफेसवर चार बॉक्सेस आहेत-

Values

Unit circle

01:41 Functions, Special angles, labels आणि grid

Graph

01:48 रीसेट बटण तुम्हाला परत सुरूवातीस घेऊन जाते.
01:53 फंक्शन्स बॉक्समधे, Special angles, Labels, Grid चेक करा आणि cos वर क्लिक करा.
02:05 Cosine फंक्शन

एखाद्या कोनाचा Cosine म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण हे गुणोत्तर.

02:15 युनिट वर्तुळावर फिरणार्‍या बिंदूसाठी Cosine म्हणजे त्याचा x co-ordinate.


02:23 युनिट वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे 0 comma 0 हा आरंभबिंदू.

cosine theta म्हणजे x भागिले त्रिज्या. म्हणजेच युनिट त्रिज्येच्या वर्तुळासाठी x होय.

02:38 Unit Circle बॉक्समधे एक युनिट वर्तुळ काढून त्यात x आणि y अक्ष असलेली कार्टेशियन को-ऑर्डिनेट सिस्टीम काढलेली आहे.
02:49 वर्तुळाच्या परिघावर x अक्षावर एक तांबडा बिंदू आहे.
02:55 x अक्षावर तांबड्या बिंदूपर्यंत पोचणारा निळ्या रंगाचा बाण दिसत आहे.

युनिट वर्तुळासाठी ही त्रिज्येची लांबी 1 आहे.

03:07 Values बॉक्समधे महत्त्वाच्या व्हॅल्यूज दिसत आहेत.
03:12 कोन ϴ (theta) हा degrees किंवा radians मधे देता येतो.
03:17 degrees रेडिओ बटणावर क्लिक करा.
03:20 कोन theta शून्य डिग्रीज असताना तांबड्या बिंदूचे x comma y हे को-ऑर्डिनेटस 1 comma 0 आहेत.
03:30 कोन theta बरोबर 0 डिग्रीज असताना तांबड्या बिंदूचा x को-ऑर्डिनेट 1 आहे.
03:38 आलेखाचा x अक्ष कोन theta दाखवत आहे.
03:43 आलेखाचा y अक्ष cos theta फंक्शनची किंमत दाखवत आहे.
03:49 कोन theta 0 डिग्रीज इसताना cos theta 1 आहे.
03:54 तांबड्या बिंदूची सर्वाधिक किंमत 1 असते.
03:59 Values बॉक्समधे radians रेडिओ बटण क्लिक करा.
04:04 theta विरूध्द cos theta आलेखाचा x अक्ष radians मधे बदलला आहे.
04:11 लक्षात घ्या pi radians बरोबर 180 degrees.
04:17 360 अंशातील पूर्ण फेरी ही 2 pi radians असते.

degrees रेडिओ बटणावर पुन्हा क्लिक करा.

04:29 तुम्हाला युनिट वर्तुळावर रिक्त वर्तुळे दिसतील.

Functions बॉक्समधील Special Angles अनचेक करा.

04:39 रिक्त वर्तुळे गायब होताना दिसतील.
04:43 Special Angles परत चेक करा.
04:47 ही वर्तुळे तांबडा बिंदू युनिट वर्तुळावर फिरताना त्याने x अक्षाशी केलेला कोन दाखवतात.
04:56 महत्त्वाचे कोन हे Special angles म्हणून निवडले आहेत.
05:01 युनिट वर्तुळावर तांबडा बिंदू घड्याळाच्या उलट दिशेने पुढील special angle पर्यंत ड्रॅग करा.
05:09 तांबडा बिंदू युनिट वर्तुळावर घड्याळाच्या उलट दिशेने 30 डिग्री फिरला आहे.
05:16 Values बॉक्समधे, x comma y हा वर्गमूळात 3 भागिले 2 comma ½ आहे.
05:25 युनिट वर्तुळावर पायथागोरसच्या प्रमेयानुसार x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 1 आहे.
05:34 युनिट वर्तुळाची त्रिज्या 1 असल्याने कार्टेशियन प्रतलातील दोन चौरस चौकटींची लांबी 1 आहे.
05:44 y फक्त 1 चौकट लांबीचा असल्यामुळे त्याची किंमत ½ आहे.
05:50 x ची लांबी 1 पूर्ण आणि दुसरी जवळपास पाऊण चौकट एवढी आहे.
05:57 3 चे वर्गमूळ भागिले 2 बरोबर 0.866 असते.

ही x ची व्हॅल्यू आहे.

06:07 आलेख पहा.

cos function सोबत तांबडा बिंदू 30 डिग्रींनी सरकला आहे.

06:15 Values बॉक्समधे radians रेडिओ बटणावर क्लिक करा.
06:20 यामुळे Values बॉक्समधील theta ची किंमत 30 डिग्रीजवरून बदलून pi भागिले 6 रेडियन्स होईल.
06:29 Sine फंक्शन

एखाद्या कोनाची Sine म्हणजे समोरच्या बाजूची लांबी आणि कर्ण यांचे गुणोत्तर.

06:39 Sine ची व्हॅल्यू ही युनिट वर्तुळावर फिरणाऱ्या बिंदूचा y को-ऑर्डिनेट असते.
06:47 Sine theta ही y भागिले त्रिज्या म्हणजेच युनिट वर्तुळासाठी y असते.
06:56 तांबडा बिंदू परत x अक्षावर ड्रॅग करा.
07:00 Functions बॉक्समधे sin वर क्लिक करा.
07:04 degrees रेडिओ बटणावर क्लिक करा.
07:07 आधी पाहिल्याप्रमाणे x comma y हे 1 comma 0 असतील.
07:13 आधी दिलेल्या sine theta च्या व्याख्या पहा.
07:18 जेव्हा कोन theta शून्य डिग्रीज असतो, तांबड्या बिंदूचा y को-ऑर्डिनेट शून्य असतो.
07:25 आलेखात कोन theta x अक्षावर आहे आणि sine theta फंक्शनची किंमत y अक्षावर आहे.
07:34 कोन theta शून्य डिग्रीज असताना, तांबड्या बिंदूची उंची शून्य असल्याने sine theta शून्य असतो.
07:43 युनिट वर्तुळावर तांबडा बिंदू घड्याळाच्या उलट दिशेने पुढील special angle 30 डिग्रीजवर ड्रॅग करा.
07:51 Values बॉक्समधे x comma y हा वर्गमूळात 3 भागिले 2 comma ½ झालेला दिसेल.

ही किंमत कशी काढता येईल ते लक्षात घ्या.

08:04 आलेखावर तांबडा बिंदू sine फंक्शनबरोबर 30 डिग्रीजनी फिरला आहे.

त्याची किंमत 0.5 किंवा ½ आहे.

08:17 Tangent फंक्शन

कोनाचा Tangent म्हणजे समोरच्या बाजूची लांबी व लगतच्या बाजूची लांबी यांचे गुणोत्तर.

08:27 Tan theta म्हणजे sin theta आणि cos theta यांचे गुणोत्तर किंवा y भागिले x.
08:35 तांबडा बिंदू परत x अक्ष म्हणजेच 1 comma 0 वर ड्रॅग करा.
08:44 Functions बॉक्समधे tan वर क्लिक करा.
08:48 जेव्हा कोन theta 0 असतो, tan theta हे y को-ऑर्डिनेट 0 आणि x को-ऑर्डिनेट 1 यांचे गुणोत्तर म्हणजेच 0 आहे.
09:00 आलेखात कोन theta x अक्षावर आहे आणि tan theta फंक्शनची किंमत y अक्षावर आहे.
09:09 कोन theta शून्य डिग्रीज असताना, तांबड्या बिंदूची उंची शून्य असल्याने tan theta शून्य असतो.


09:17 युनिट वर्तुळावर तांबडा बिंदू घड्याळाच्या उलट दिशेने y अक्षावरील special angle 90 डिग्रीजवर ड्रॅग करा.


09:27 Values बॉक्समधे x comma y हा 0 comma 1 झाला आहे.
09:33 लक्षात घ्या Values बॉक्समधे tan theta ची किंमत अधिक किंवा वजा अनंत (Infinity) झाली आहे.
09:40 आता आलेखाकडे पहा.
09:43 तांबडा बिंदू 90 डिग्रीवर गेला आहे आणि tan theta आता उभ्या तुटक रेषेवर दाखवला जात आहे.
09:53 ही तुटक रेषा म्हणजे फंक्शनची vertical asymptote आहे.
09:58 हे x चे मूल्य दर्शवते. जे फंक्शनच्या जवळ येते परंतु कधीही स्पर्श करत नाही.
10:05 येथे फंक्शन अमर्यादपणे दोन्ही दिशांना infinity पर्यंत वाढत जाते.
10:13 थोडक्यात,
10:16 या पाठात, Trig Tour या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक पाहिले.
10:23 सिम्युलेशन वापरून आपण पाहिले:

युनिट वर्तुळावर फिरणार्‍या बिंदूसाठी काटकोन त्रिकोण तयार करणे

10:33 theta या कोनासाठी cos, sin आणि tan ही त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढणे
10:39 x अक्षावर theta घेऊन theta विरूध्द cos, sin आणि tan फंक्शन्स यांचा y अक्षावर आलेख काढणे.
10:46 असाईनमेंट म्हणून, सर्व special angles ना Cosine, sine आणि tangent च्या व्हॅल्यूज बघा.
10:53 Cosine, sin आणि tangent चे आलेख पहा.
10:57 पूरक कोनांसाठी वरील गुणोत्तरातील संबंध पहा.

पूरक कोनांची बेरीज 180 डिग्रीज असते.

11:08 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.


11:17 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

11:29 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.


11:33 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


11:42 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

11:55 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali