Linux/C2/The-Linux-Environment/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:24, 2 December 2012 by Pravin1389 (Talk | contribs)
Title of script: The Linux Environment
Author: Manali Ranade
Keywords: Linux
|
|
---|---|
00:00 | Linux Environment आणि ते कुशलतेने हाताळण्याचे मार्ग यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या पाठातील उदाहरणे सोडवून पाहण्यासाठी शक्यतो UBUNTU किंवा कुठलीही लिनक्स सिस्टीम वापरली तरी चालेल. |
00:13 | तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सुरू करणे तसेच कमांडस्, फाईल सिस्टीम आणि shell या बद्दल थोडी माहिती आहे असे आपण समजू या. |
00:22 | जर तुम्हाला या संकल्पनांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ती स्पोकन ट्युटोरियलच्या संकेतस्थळावर इतर पाठांमध्ये उपलब्ध आहे. |
00:32 | या ट्युटोरियलसाठी आपण UBUNTU Linux 10.10 चा वापर करणार आहोत. |
00:36 | तसेच लक्षात टेवा की लिनक्स केस सेन्सेटिव्ह आहे. जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत वापरलेल्या सर्व कमांडस लोअर केसमध्ये असतील. |
00:46 | ऑपरेटिंग सिस्टीम युजरशी कशी वागेल, युजरने दिलेल्या कमांडस् चा अर्थ कसा लावेल व त्यांना कसा प्रतिसाद देईल हे Linux Environment वर अवलंबून असते. |
00:55 | Shellच्या सेटींगमध्ये बदल करून लिनक्स, वापरण्यासाठी अधिक सोपे होऊ शकते. |
00:58 | हे कसे होते ते आपण पाहू. |
00:59 | Shell कशा प्रकारे काम करेल हे shell Variables ठरवतात. |
01:04 | Shell Variables चे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. Environment Variables आणि Local Variables. |
01:12 | Environment Variables नावाप्रमाणेच युजरच्या एकूण Environment मध्ये उपलब्ध असतात. |
01:19 | शेलस्क्रिप्ट कार्यान्वित करताना शेल जेव्हा subshell निर्माण करते, अशा subshell मध्येही हे Variable उपलब्ध असतात. |
01:24 | नावाप्रमाणेच Local Variables ची उपलब्धता मर्यादित असते. |
01:31 | हे shell द्वारे बनवलेल्या subshell मध्ये उपलब्ध नसतात. |
01:36 | या ट्युटोरियलमध्ये आपण मुख्यत्वे Environment Variables बद्दल चर्चा करणार आहोत. आता प्रथम आपण shell variables च्या व्हॅल्यू कशा घालायच्या ते पाहू या. |
01:48 | चालू Shell मधील सर्व उपलब्ध Variables बघण्यासाठी आपण set ही कमांड कार्यान्वित करू या. |
01:53 | टर्मिनलवर टाईप करा. set space vertical-bar more आणि एंटर दाबा. |
02:00 | आपण चालू Shell मधील सर्वVariables बघू शकतो. |
02:04 | उदाहरणार्थ HOME हे Environment Variable आणि त्याला दिलेली व्हॅल्यू बघा. |
02:15 | पुढील सूची बघण्यासाठी एंटर दाबा. आणि सूचीतून बाहेर पडण्यासाठी q हे बटण दाबा. |
02:21 | set या कमांडचा मोठा आऊटपुट स्क्रीनवर पाठवताना एकावेळी एका स्क्रीनवर मावेल एवढाच मजकूर more या पर्यायामुळे पाठवला जातो. |
02:38 | केवळ Environment Variable बघण्यासाठी env ही कमांड कार्यान्वित करू या. |
02:45 | टर्मिनलवर टाईप करा env space vertical-bar more आणि एंटर दाबा. |
02:52 | Shellया variableकडे लक्ष द्या. याची व्हॅल्यू slash bin slash bash आहे. |
03:00 | सूचीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही q हे बटण दाबू शकता. |
03:07 | आता लिनक्समधील इतर काही महत्त्वाच्या Environment variables ची चर्चा करू या. |
03:11 | येथील सर्व प्रात्यक्षिके बघण्यासाठी आपण bash shell चा वापर करणार आहोत. |
03:15 | विविध shells थोड्याफार फरकाने वापरणा-यांच्या सोयीनुसार तयार केलेल्या असतात. |
03:19 | व्हेरिएबलमध्ये काय व्हॅल्यू साठवली आहे हे पाहण्यासाठी echo कमांड वापरली जाते. या कमांडचा पुढे dollar sign व व्हेरिएबलचे नाव लिहितात. |
03:30 | आपण SHELL variable प्रथम बघणार आहोत. |
03:35 | या मध्ये चालू Shell चे नाव संचित केले जाते. |
03:37 | SHELL variable ची व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर echo space dollar SHELL कॅपिटलमध्ये असे टाईप करून एंटर दाबा. |
03:55 | सध्या आपण slash bin slash bash या शेलमध्ये कार्यरत आहोत. |
04:02 | दुसरे variable आहे HOME |
04:05 | जेव्हा आपण लिनक्समध्ये login करतो तेव्हा साधारणपणे ज्या डिरेक्टरीमध्ये असतो तिचे नाव आपल्या userच्या नावावर आधारित असते. |
04:11 | त्या डिरेक्टरीला होम डिरेक्टरी असे म्हणतात आणि HOME variable मध्ये हे उपस्थित असते. |
04:17 | व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर echo space dollar HOME कॅपिटलमध्ये टाईप करून एंटर दाबा. |
04:29 | PATH variable हे पुढील Environment variable आहे. |
04:32 | कमांड दिली असता त्या कमांडशी सबंधित फाईल कुठे आहे ते शोधण्यासाठी shell ज्या डिरेक्टरींचा शोध घेते त्यांची यादी PATH या व्हेरिएबल मध्ये असते. |
04:40 | आता PATH variableची व्हॅल्यू बघू या. |
04:43 | टर्मिनलवर echo space dollar PATH कॅपिटलमध्ये ही कमांड टाईप करा. |
04:51 | माझ्या संगणकावर या डिरेक्टरीज दाखविल्या जात आहेत. |
05:04 | प्रत्येक सिस्टीमप्रमाणे यात थोडा बदल असू शकतो. |
05:07 | colon या डिलिमिटर द्वारे डिरेक्टरीज ही सूची वेगळी केली आहे. shell त्या क्रमाने executable commandsचा शोध घेतो. |
05:18 | आपण आपली स्वतःची डिरेक्टरी या सूचीत समाविष्ट करू शकतो जेणे करून आपली डिरेक्टरी देखील shell द्वारे शोधली जाईल. |
05:25 | आपली स्वतःची डिरेक्टरी समाविष्ट करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा. |
05:29 | PATHकॅपिटलमध्ये 'equal-to' dollar PATHकॅपिटलमध्ये colon slash home slash 'the name of my own home directory' आणि एंटर दाबा. |
5.54 | आता जर आपण पुन्हा PATH variable ची व्हॅल्यू बघितली |
06:04 | तर PATH variable मध्ये आपली डिरेक्टरी समाविष्ट झालेली असेल. |
06:10 | बघा आता आपली डिरेक्टरी येथे उपस्थित आहे. |
06:16 | अजून एक उत्सुकता वाढविणारे variable म्हणजे LOGNAME. |
06:20 | हे सध्याच्या userचे नाव संचित करते. |
06:24 | या variable ची व्हॅल्यू बघण्यासाठी टाईप करा echo space dollar LOGNAMEआणि एंटर दाबा. |
06:35 | जेव्हा आपण टर्मिनल उघडतो तेव्हा डॉलरचे चिन्ह दिसते, ज्याला prompt म्हणतात आणि येथे आपण सर्व कमांडस टाईप करतो. |
06:42 | ती primary prompt string आहे. जी Environment variable PS1 मध्ये ठेवली जाते. |
06:47 | येथे secondary prompt string देखील आहे. |
06:50 | जर आपली कमांड मोठी असेल आणि तिला एका ओळीपेक्षा जास्त जागा लागत असेल तर
दुस-या ओळीपासून आपल्याला 'Greater Than' चे चिन्ह > prompt म्हणून दिसते. |
07:00 | ही Secondary prompt string असून ती Environment variable PS2 मध्ये ठेविली जाते. |
07:05 | Secondary command prompt ची व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर echo space dollar PS2 असे टाईप करून एंटर दाबा. |
07:20 | आपण आपली Primary prompt string बदलू शकतो. जसे की prompt म्हणून at the rate - @ हे चिन्ह. |
07:28 | हे करण्यासाठी टाईप करा PS1 equal-to '@' आणि एंटर दाबा. |
07:41 | आता prompt म्हणून dollar च्या चिन्हाऐवजी आपल्याला @ हे चिन्ह दिसेल. |
07:50 | आपण अजून एक गंमत करू शकतो. जसे की आपण prompt म्हणून user name ही दर्शवू शकतो. |
07:56 | त्यासाठी केवळ टाईप करा PS1 equal-to within quotes dollar LOGNAME कॅपिटलमध्ये आणि एंटर दाबा. |
08:12 | आता माझे user name येथे prompt म्हणून दिसत आहे. |
08:16 | हे पूर्ववत करण्यासाठी केवळ टाईप करा PS1 equal-to dollar within quotes आणि एंटर दाबा. |
08:28 | आपण अनेक Environment variables ना व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. |
08:32 | परंतु एक लक्षात ठेवा की हे बदल केवळ चालू सत्रासाठी मर्यादित असतात. |
08:37 | जसे आपण आत्ताच आपली डिरेक्टरी PATH variable मध्ये समाविष्ट केली होती. |
08:40 | जर आपण टर्मिनल बंद करून पुन्हा उघडले किंवा एक नवे टर्मिनल उघडून त्यात echo कमांड कार्यान्वित करून PATH variable ची व्हॅल्यू तपासली, |
09:00 | तर आपण केलेले बदल आता तेथे उपस्थित नाहीत हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. |
09:05 | आपण हे बदल कायम स्वरूपाचे कसे करता येतात हे पुढील Advanced Tutorial मध्ये बघू या. |
09:13 | अनेकदा आपण काही काळापूर्वी वापरलेल्या कमांडस आपल्याला पुन्हा पुन्हा कार्यान्वित कराव्या लागतात. मग तेव्हा काय करायचे? आपल्याला संपूर्ण कमांड पुन्हा टाईप करावी लागते का? |
09:22 | नाही. त्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत. |
09:26 | प्रथम जर आपण कीबोर्डवरील up arrow चे बटण दाबले तर आपल्याला टाईप केलेली शेवटची कमांड दिसेल. |
09:33 | तेच बटण दाबत राहिल्यास त्यामागील कमांड एकेक करून दिसतील. |
09:37 | तर मागील कमांड बघण्यासाठी down arrowचे बटण दाबा. |
09:42 | परंतु अनेक कमांडस मधून स्क्रॉल करत राहणे थोडे कंटाळवाणे होते त्यापेक्षा चांगला मार्ग म्हणजे history कमांड होय. |
09:52 | command prompt वर history टाईप करा. |
09:58 | आणि एंटर दाबा. आपल्याला पूर्वी कार्यान्वित झालेल्या कमांडची सूची दिसेल. |
10:04 | मोठ्या सूचीऐवजी शेवटच्या केवळ १० नोंदी बघण्यासाठी |
10:08 | history space 10 असे टाईप करून एंटर दाबा. |
10:20 | लक्षात घ्या की सूचीमध्ये पूर्वी कार्यान्वित केलेल्या प्रत्येक कमांडला एक क्रमांक दिलेला आहे. |
10:27 | एखादी कमांड पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी |
10:32 | केवळ टाईप करा उद्गार चिन्ह (!) आणि त्यापुढे त्या कमांडचा क्रमांक उदाहरणार्थ 442 जे या ठिकाणी echo space dollar PATH ही कमांड कार्यान्वित करेल. |
10:51 | जर तुम्हाला शेवटची कमांड पुन्हा कार्यान्वित करायची असेल तर केवळ दोन वेळा उद्गारचिन्ह टाईप करा. आणि एंटर दाबा. |
11:03 | आपण पुढे tilde substitution बद्दल जाणून घेणार आहोत. होम डिरेक्टरीचे संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी tilde (~) या चिन्हाचा वापर केला जातो. |
11:12 | आता तुमच्या होम डिरेक्टरीमध्ये testtree नावाची डिरेक्टरी आहे. त्या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी cd space tilde slash testtree ही कमांड टाईप करा. |
11:25 | cd tilde minus किंवा फक्त cd minus ही कमांड current working directory व या आधी वापरलेली डिरेक्टरी यांच्यात आलटून पालटून जाण्यासाठी उपयोगी पडते. |
11:35 | आता आपण testtree या डिरेक्टरी मध्ये आहोत आणि त्या आधी आपण होम या डिरेक्टरीमध्ये होतो. |
11:41 | आता cd space minus ही कमांड टाईप करून कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा. त्यामुळे आपण होम या डिरेक्टरीमध्ये परत जाऊ. |
11:47 | हीच कमांड पुन्हा कार्यान्वित करा. आता आपण पुन्हा testtree या डिरेक्टरी मध्ये आलो आहोत. |
11:55 | शेवटची पण थोडी महत्त्वाची alias ही कमांड आता आपण बघणार आहोत. |
11:59 | आपल्याला मोठी कमांड परत परत कार्यान्वित करण्याची गरज भासू शकते. |
12:04 | येथे आपण या कमांडला दुसरे एखादे छोटे नाव देऊ शकतो व कमांड कार्यान्वित करताना त्या दुस-या नावाचा उपयोग करू शकतो. |
12:11 | समजा आपल्याकडे डिरेक्टरीची मोठी हायरार्की आहे. त्यात आपण संगीत ऐकण्यासाठी सतत जात असतो. आपण त्याला अशा प्रकारे दुसरे छोटे नाव देऊ शकतो. |
12:20 | alias space cdMusic equal-to within double quotes cd space slash home slash arc slash files slash entertainment slash music असे टाईप करून एंटर दाबा. |
12:47 | आता प्रत्येक वेळी या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी केवळ cdMusic टाईप करून एंटर दाबा. |
12:55 | बघा आता आपण Music या डिरेक्टरीत आहोत. |
12:58 | आता prompt वर cd space minus ही कमांड टाईप करून तुम्ही मागील चालू डिरेक्टरीमध्ये जाऊ शकता. |
13:08 | हायरार्कीला दिलेले दुसरे नाव काढून टाकण्यासाठी केवळ unalias space cdMusic असे टाईप करू एंटर दाबा. |
13:20 | आता पुन्हा जर आपण cdMusic ही कमांड टर्मिनलवर कार्यान्वित केली तर आपल्याला command not found अशी error दाखवेल. |
13:30 | समजा चालू डिरेक्टरी मध्ये test1 आणि test2 या दोन फाईल्स आहेत. |
13:38 | आणि जर आपण rm आणि test1 ही कमांड कार्यान्वित केली तर test1 ही फाईल डिलिट होईल. |
13:45 | आपल्या माहित आहे की rm या कमांडसोबत i हा पर्याय डिलिट करण्याच्या प्रक्रियेला interactive बनवतो. |
13:52 | आता आपण alias या कमांडनी alias बनवू शकतो. alias rm equal-to, now within quotes “rm space hyphen i” |
14:03 | आता आपण जेव्हा rm ही कमांड कार्यान्वित करू तेव्हा प्रत्यक्षात rm space i कमांड कार्यान्वित होईल. |
14:13 | अशा प्रकारे आपण पाहिले की test1 ही फाईल डिलिट झाली परंतु test2 डिलिट करण्यापूर्वी सिस्टीम आपल्याला परवानगी विचारते. |
14:20 | आपण या ट्युटोरियलमध्ये Environment variable, history आणि alias याबद्दल शिकलो |
14:25 | अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
|
14:28 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
14:36 | *यासंबंधी माहिती साईटवर उपलब्ध आहे. |
14:39 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. |
14:42 | ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |