Health-and-Nutrition/C2/Cross-cradle-hold/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | |
00:01 | नमस्कार मित्रानो,
स्तनपानासाठी क्रॉस क्रेडल स्थिती या स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरिअल मध्ये आपण आज शिकणार आहोत - आई व बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे,
|
00:16 | स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि |
00:20 | क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती.
|
00:24 | चला तर मग सुरुवात करूयात,
|
00:26 | जगभरात सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना विविध पद्धतीच्या स्थितीचा वापर करतात.
|
00:32 | आई व बाळासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती तीच आहे, ज्यामध्ये आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होई पर्यंतचा काळ आरामदायक असेल, |
00:43 | बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल,
|
00:48 | आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल.
|
00:51 | आज आपण स्तनपानाच्या क्रॉस कराडले स्थिती बद्दल शिकू,
|
00:56 | क्रॉस क्रेडल स्थिती बाळाच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी, आईच्या स्तनाला योग्य रीतीने पकडण्यासाठी आणि बाळाला स्तनावर घट्ट पकड करण्यासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती आहे.
|
01:06 | स्तनपान करण्यापूर्वी आईने स्वतःचे हात योग्यरीत्या स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि सुकवावेत.
|
01:12 | मग तिने ग्लासभर उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
|
01:16 | स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये दररोज सर्वसाधारणपणे ७५०-८५० मिलिलिटर दूध बनते.
|
01:24 | म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे.
|
01:29 | चला तर आता आपण आईने स्तनपान करताना कसे बसावे यावर चर्चा करू.
|
01:33 | आईने पलंगावर किंवा फरशीवर मांडी घालून बसावे,
|
01:38 | किंवा खुर्चीवर बसावे पण तिचे पाय जमिनीला टेकलेले असावेत.
|
01:43 | जर खुर्ची इतक्या उंची वर असेल कि तिचे पाय फरशीवर टेकत नसतील तर, ती एक छोटे टेबले किंवा उशी फरशीवर ठेवून त्यावर आपले पाय टेकवू शकते.
|
01:54 | बसताना तिने पुढील गोष्टी सुनिश्चित कराव्यात-
बसताना तिची पाठ सरळ असावी जेणेकरून तिला पाठदुखी होणार नाही.
|
02:03 | तिचे खांदे आरामशीर असावेत, वर केलेले किंवा झुकलेले नसावेत.
|
02:08 | आणि हि आरामदायी स्थिती स्तनपान संपेपर्यंत अशीच ठेवावी.
|
02:13 | आईने ज्या स्तना ने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे.
|
02:19 | आईने कपडे काढताना सुनिश्चित करावे कि तिच्या ब्लॉऊस किंवा ब्रा मुले स्तनांवर दबाव येऊ नये.
|
02:26 | व्यवस्थित बसल्यानंतर बाळाला आई जवळ आणावे.
|
02:31 | आईने बाळाचे डोके ती बाळाला स्तनपान करेल त्याच्या दुसऱ्या बाजूच्या हाताने पकडावे.
|
02:39 | त्याच हाताच्या काखे मध्ये बाळाचे पाय ठेवलेले असावेत.
|
02:45 | या चित्रामध्ये, आई तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तना ने स्तनपान करणार आहे,
म्हणून बाळाचे पाय आईच्या डाव्या काखेमध्ये ठेवलेले आहेत.
|
02:57 | आणि तिने तिच्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोटे यांचा वापर करून बाळाच्या डोक्याचा खालील भाग पकडला आहे.
|
03:05 | जर बाळाला वर उचलले असताना आईला अतिरिक्त आधाराची गरज लागल्यास ती बाळाखाली व
मांडीवर उशी घेऊ शकते.
|
03:15 | लक्षात ठेवा, आईने तिचे खांदे झुकवून स्तनाला बाळाजवळ आणू नये.
|
03:21 | हे तिच्यासाठी त्रासदायक ठरून तिला पाठदुखी होऊ शकते.
|
03:26 | नेहमी तिने तिची पाठ सरळ ठेवावी आणि बाळाला वर उचलून स्तनापर्यंत आणावे.
|
03:33 | पुढे आपण आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती बघुयात.
|
03:39 | आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानांमागे असावीत.
|
03:46 | तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून मानेपर्यंत आणू नयेत.
|
03:52 | तिचे मनगट बाळाच्या खान्द्यांमध्ये असावे.
|
03:56 | आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये.
|
04:04 | यामुळे स्तनपान करताना बाळाला आराम मिळेल.
|
04:08 | पुढे आपण शिकू, बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती.
|
04:15 | आईच्या शरीरावर बाळाच्या पोटामुळे थोडासा दबाव पडला पाहिजे.
|
04:20 | जेवढे त्या दोघांच्या शरीरातील अंतर कमी असेल तेवढे बाळाचे आईच्या स्तनापर्यंत जाण्याचे कष्ट कमी होतील.
|
04:26 | आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल.
|
04:32 | बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये दुसरा मुद्दा आहे, बाळाच्या शरीराची संरेखना.
|
04:37 | जेव्हा आपण अन्न खातो, आपले डोके, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असतात.
|
04:43 | पण स्तनपान करताना बऱ्याच आई बाळाला त्यांच्या पाठीवर झोपवून फक्त बाळाचे डोके स्तनांच्या बाजूस फिरवितात.
|
04:50 | यामुळे स्तनपान करताना बाळाला त्रास होईल.
|
04:55 | यामुळे स्तनपान करताना बाळाचे डोके, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावेत.
|
05:01 | यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल.
|
05:05 | आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये तिसरा मुद्द्यावर आलो आहोत.
|
05:10 | आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा.
|
05:14 | नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घ्यावी लागेल.
|
05:22 | पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटी च्या स्थिती बद्दल बोलू.
|
05:28 | बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत.
|
05:33 | आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी. |
05:38 | यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरिओला चा खालचा भाग जास्त तोंडात घेईल .
|
05:45 | आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल.
|
05:51 | कृपया लक्षात घ्या,
एरिओला निप्प्लच्या आजूबाजूचा गडद भाग आहे.
|
05:57 | आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्यानंतर, चला आपण शिकूया, स्तनाला कसे पकडावे -
|
06:04 | दुसऱ्याच्या हाताच्या बोटांचा वापर करून, आईने स्वतःच्या स्तनाला खालून U आकारात पकडावे.
|
06:12 | या चित्रामध्ये आई तिच्या उजव्या हाताने उजवे स्तन पकडेल.
|
06:19 | अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी -
कल्पना करा कि आईच्या उजव्या स्तनावर एक घड्याळ आहे ज्याच्या मध्यभागी निप्पल आहे.
|
06:31 | आईने तिचा उजवा अंगठा या घड्याळावरील ९ या अंकावंर ठेवावा.
|
06:38 | आणि अंगठ्याच्या बाजूची दोन बोटे ३ या अंकावर ठेवावीत.
|
06:46 | आईची बोटे आणि बाळाचे ओठ नेहमी एका दिशेत असावेत.
|
06:51 | हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण बघुयात,
|
06:56 | जेव्हा आपण वडापाव किंवा बर्गर खातो आपण आपले ओठ आडवे उघडतो.
|
07:02 | आपण वडापाव किंवा बर्गर आडवे पकडतो जेणेकरून आपण मोठा घास घेऊ शकू.
|
07:08 | इथे आपली बोटे आणि ओठ एकाच दिशेत आहेत.
|
07:12 | जर आपण वडापाव किंवा बर्गर लंबकार पकडले तर आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.
|
07:19 | तसेच इथे आपण बाळाच्या ओठांच्या दिशेकडे बघुयात.
|
07:25 | इथे त्याचे ओठ लंबकार उघडलेले आहेत. म्हणून आईच्या बोटांना स्तनावर लंबकार ठेवणे गरजेचे आहे.
|
07:34 | यामुळे बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
|
07:39 | बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत -
आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पलपासून ३ बोटे अंतरावर असावीत.
|
07:50 | पुन्हा, वडापाव किंवा बर्गर खाताना-
आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.
|
08:00 | आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल.
|
08:07 | म्हणून आपण मोठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो.
|
08:12 | तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे बाळासाठी, स्तनाला निप्पल पासून ३ बोटे अंतरावर पकडावे.
|
08:20 | हे अंतर सुनिश्चित करेल कि, आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल.
|
08:29 | आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते.
|
08:35 | आई एरिओला च्या खालील मोठ्या दुग्धनलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते
|
08:42 | आणि स्तनाला योग्य आकार मिळून बाळाला घट्ट पकड करण्यास मदत मिळते. |
08:49 | आईचा अंगठा स्तनाच्या ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावा जेथे बाळाचे नाक आहे .
|
08:59 | आणि तिची दोन बोटे निप्पल पासून ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावीत जेथे बाळाची हनुवटी आहे.
|
09:09 | चला पुन्हा आपण वडापाव किंवा बर्गर च्या उदाहरणाकडे जाऊया,
|
09:13 | वडापाव किंवा बर्गर योग्यरीत्या पकडल्यानंतर आपण मोठा घास घेण्यासाठी त्यावर दबाव देतो.
|
09:21 | तसेच आईने स्तनाला खालून U आकारात पकडून हळुवारपणे दबाव द्यावा. |
09:28 | यामुळे बाळाला स्तनाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
|
09:34 | पण लक्षात ठेवा,आईने तिचे स्तन V आकारात दाबू नये.
|
09:39 | v आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पल मधून दूध मिळेल.
|
09:45 | हे सुद्धा निश्चित करा कि अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा.
|
09:52 | नाहीतर निप्पल उजव्या किंवा डाव्या बाजूस सरकून बाळाची पकड अयोग्यरीत्या होईल. |
10:00 | लक्षात ठेवा, कधीही स्तनावर दबाव पडून स्तनाला बाळाकडे आणू नये.
|
10:08 | नेहमी बाळाला स्तनाकडे आणावे.
|
10:12 | आता बाळ क्रॉस क्रेडल स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे.
|
10:18 | स्तनाशी पकड करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअल मध्ये सांगितली आहे.
|
10:24 | एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरीत्या पकड झाली आणि स्तन खूप जड नसतील तेव्हा आईने स्तनावरील तिचे हात काढावेत आणि बाळाच्या शरीराखाली आधार देण्यासाठी आणावेत.
|
10:40 | या स्थितीमध्ये आईने तिचे दोन्ही हात तिच्या शरीराच्या खूप जवळ आणावेत,
|
10:46 | यामुळे तिला स्तनपान करताना आराम मिळेल / हि स्थिती स्तनपान करताना तिच्यासाठी आरामदायक असेल.
|
10:50 | चला तर आपण या ट्युटोरिअलच्या शेवटी पोहोचलो आहोत.
|
10:54 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो, बाळ व आईसाठी स्तनपानाची योग्य स्थिती निवडणे,
|
11:03 | स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती.
|
11:09 | या ट्युटोरिअलला स्पोकन ट्युटोरिअल संघ, आई आई टी बॉम्बे यांचे योगदान आहे.
|
11:15 | स्पोकन ट्युटोरिअल संघाला भारत सरकारच्या एन एम इ आई सी टी ,एम एच आर दि यांच्याकडून योगदान मिळाले आहे.
|
11:23 | या मिशन वरील अधिक माहिती पुढील लिंक वर उपलब्ध आहे.
|
11:28 | या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फौंडेशन यांकडूनदेखील उदार अनुदान मिळालेले आहे.
|
11:34 | हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्ट चा भाग आहे.
|
11:39 | या ट्युटोरिअल च्या कार्यक्षेत्र परीक्षक आहेत डॉक्टर रुपल दलाल एम डी - बालरोगचिकित्सा.
|
11:45 | या ट्युटोरिअलचे ऍनिमेशन शीतल जोशी यांनी केले आहे.
|
11:49 | हे ट्युटोरिअल आहार तज्ज्ञ तसनीम शेख यांनी बनविले आहे.
|
11:54 | मी रजनी सावंत, स्पोकन ट्युटोरिअल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |