PHP-and-MySQL/C2/Common-Errors-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:50, 24 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 नमस्कार. ह्या भागात आपण error शोधून ती दुरूस्त कशी करायची हे पाहू.
00:08 आपल्याकडे "extrachar dot php" ही फाईल आहे जी कार्यान्वित केल्यावर "Parse error in...on line 6 " हा मेसेज मिळेल.
00:23 येथे काय अपेक्षित आहे किंवा काय नाही ही माहिती आपल्याला दिलेली नाही.
00:32 सहाव्या ओळीत प्रथमदर्शनी चूक दिसत नाहीये.
00:37 येथे extra कंस आहे. तो काढल्यावर व्यवस्थित कार्य होईल.
00:44 हे शोधणं सोपे आहे.
00:47 गणिती क्रिया उदाहरणार्थ बेरीज, तुलना इत्यादी करताना आपल्याला कंसांचा ट्रॅक ठेवताना कधीकधी चूक होऊ शकते.
01:09 कधीकधी हे सोडवायला सोपे असते. हे कार्यान्वित केल्यावर आपल्याला आऊटपुट दिसत नाही. कारण ह्या दोन गोष्टी समान नाहीत.
01:18 हे कुठलीही error देत नाही.
01:20 जर येथे extra कंस समाविष्ट केला तर Parse error मिळेल.
01:28 जेव्हा if statements किंवा गणिती expressions सोडवतो तेव्हा कंसाच्या जोड्या जरूर तपासा.
01:36 हे तपासताना सर्व कंस असल्याची तसेच अतिरिक्त characters नसल्याची खात्री करा.
01:48 याच्या आधी येथे "a" समाविष्ट करा.
01:52 Parse error मिळाली आहे.
01:56 रिफ्रेश करूनही Parse error आहेच.
02:00 येथे काहीतरी टाईप केलेले काढून टाका.
02:04 "missing page" विषयी जाणून घेऊ.
02:08 ह्यासंबंधीची error पाहू. "missing.php"वर क्लिक करा. Parse errors नवव्या ओळीवर आहे.
02:17 नवव्या ओळीवर Semicolon हवे होते.
02:23 हे अपक्षित नसल्याने रिफ्रेश करा.
02:28 Parse errors अठराव्या ओळीवर आहे.
02:33 अठराव्या ओळीवर जाऊ या.
02:37 येथे मी अठरावी ओळ दाखवत आहे.
02:47 ह्यात काय चूक आहे?
02:49 ह्या ओळीवर काहीच नाही. तरीही error का मिळाली?
02:54 ह्यासाठी ओळीच्या आजूबाजूला तपासा.
03:00 आता वरच्या चार पाच ओळी तपासून पाहू.
03:06 आपल्याकडे "if" statement आहे. "if posted user name equals 'Alex'", echo "You own PHP Academy", else echo "Hello name".
03:17 आपल्याकडे "if" statement चा हा सुरूवातीचा आणि हा शेवट करणारा महिरपी कंस आहे.
03:24 error चे कारण "if" statement येथे सुरू झाले .
03:30 आपल्याला indentation चा हेतू आणि उपयोग कळेल.
03:36 अनुभवाने सांगते की हा कंस ह्या ओळीत इथे आणि तो कंस ह्या ओळीत इथेच असला पाहिजे.
03:45 परंतु हा राहून गेला आहे. जर हा इथे असता आणि हा इथे असायला हवा होता, तर आधीच्या "if" statementमधील हा block इथे सुरू होऊन इथे संपेल.
03:59 परंतु block येथे सुरू होतो आणि त्याचा शेवट करणारा कंस नाही.
04:03 तो समाविष्ट करून कार्यान्वित करू.
04:08 जर characters विसरलो, तर errors वेगळ्याच ठिकाणी मिळतील.
04:14 खरे तर ही error अयोग्य ठिकाणी नाही कारण "else" नंतर blockची सुरूवात व शेवट येथे आहे.
04:20 ह्या blockचा शेवट योग्य प्रकारे झाला नसल्यामुळे आपण त्याचा शेवट करणार आहोत.
04:28 म्हणजे errorयेथे नाही. आपल्याला blockचा शेवट करणे आवश्यक आहे.
04:35 आता हे कार्य करेल.
04:38 काही ओळी वर पहा. एखादे न संपवलेले elseस्टेटमेंट किंवा एखादे आवश्यक characterराहिले आहे का?
04:49 "getpost dot php" उघडा.
04:53 उदाहरणासाठी येथील error-reporting "E All" बघा.
04:58 हे केवळ दाखवण्यासाठी आहे. ही एक प्रकारची error आहे.
05:03 सर्व errors ची यादी येथे दिलेली नाही.
05:10 हे केवळ ह्या फंक्शनचे parameter आहे.
05:12 अशा प्रकारचे काही errors दाखवणारे फंक्शन तुमच्या वेबसाईटमध्ये वापरले जाणार नाही. माझ्याकडील यावरील ट्युटोरियल तुम्ही पाहू शकता.
05:25 ही "get post" error आहे.
05:28 येथे "data" हे व्हेरिएबल आहे.
05:33 हे "name" नावाचे GET variable आहे.
05:38 ह्या code नुसार data variable उपस्थित असल्यास echo होईल. हा साधा प्रोग्रॅम आहे.
05:47 येथे मुळात error नाही.
05:49 आपण येथे व्हेरिएबल्स घेत आहोत. सर्व काही ठीक आहे. येथे line break किंवा line terminating error नाही.
06:07 येथे काही लिहायचे विसरलेले नाही.
06:15 हे पेज कार्यान्वित केल्यावर आपल्याला नोटीस मिळेल.
06:18 ही "Parse error" नसून नोटीस आहे.
06:27 ह्या उपस्थित error सहित हे पेज व्यवस्थित कार्य करणार नाही.
06:33 येथे "name equals alex" टाईप केल्यास error जाईल.
06:41 code मध्ये काहीच चूक नसल्याचे हे दाखवते. परंतु हे data व्हेरिएबल परिपूर्ण नाही.
06:51 "data equals absolutely nothing" असे म्हणण्यासारखे आहे.
06:58 पाचव्या ओळीवर "echo variable alex" टाईप करा.
07:05 रिफ्रेश करा. Undefined variable alex, Undefined index name दिसेल.
07:11 आता पहिल्यापासून सुरूवात करू या.
07:19 header मध्ये नाव स्पष्ट न केल्यास ते पूर्ण होत नाही.
07:23 dataच नसल्यामुळे "Undefined index" ही, तसेच सेट नसलेले व्हेरिएबल echo केल्यामुळे "Undefined variable" ही error मिळेल.
07:35 data टाईप करताच ही errorजाईल.
07:39 हे रिफ्रेश करू.
07:41 ह्या प्राथमिक error टाळण्यासाठी ओळीच्या मध्ये किंवा सुरूवातीला "@ (at)" हे चिन्ह द्या.
07:50 रिफ्रेश केल्यावर हेडर सेट न केल्यामुळे काहीच दिसणार नाही.
07:55 get variable सेट केलेले नाही. "name equals alex" टाईप केल्यावरcode प्रमाणे हे नाव echo होईल.
08:04 लक्षात घ्या, आपण जरी "if data exists" वापरत असलो तरी तांत्रिक दृष्ट्या तो अस्तित्वात नसतो.
08:14 आत्ता हे एवढेच. शेवटच्या भागात आणखी दोन errors बद्दल जाणून घेऊ.
08:20 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana