OpenFOAM/C3/Using-PyFoam-Utilities/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:10, 13 March 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Using PyFoam Utilities वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात PyFoam Utilities बद्दल जाणून घेऊ.
00:12 PyFoam Utilites चा वापर करणे,
00:15 PyFoam Utilites च्या सहाय्याने shockTube केस कार्यान्वित करून डेटा प्लॉट करणे.
00:22 या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04
00:30 OpenFOAM वर्जन 2.3.0,
00:34 PyFoam 0.6.5 वापरत आहे.
00:37 या पाठासाठी युजरला लिनक्स टर्मिनलवर कमांडस कार्यान्वित करण्याचे प्राथमिक ज्ञान तसेच,
00:45 OpenFOAM केसेस कार्यान्वित करण्याचा आणि त्याचे विश्लेषण करण्याचा अनुभव असावा.
00:51 आता PyFoam utilities बद्दल जाणून घेऊ.
00:55 Utilities हे Python प्रोग्रॅम्स आहेत जे PyFoam बरोबर अंतर्भूत असतात.
01:01 प्रत्येक utility ला विशिष्ट कार्य आहे.
01:05 Utilities कमांड लाईनमधून कार्यान्वित केल्या जातात.
01:10 टॅब कंप्लिशनच्या सहाय्याने utilites ची सूची बघता येते.
01:16 टर्मिनल उघडा.
01:18 utilities ची सूची बघण्यासाठी pyFoam टाईप करून दोन वेळा टॅबचे बटण दाबा.
01:29 आता स्लाईडसवर परत जाऊ.
01:32 minus help या पर्यायाबरोबर प्रत्येक utility कार्यान्वित करता येते.
01:38 याचा उपयोग प्रत्येक संबंधित utility काय करते आणि तिचे पर्याय बघण्यासाठी होतो.
01:44 Shock Tube केस कार्यान्वित करण्यासाठी खालील PyFoam Utilities चा उपयोग करू.
01:51 आपण वापरणार आहोत – PyFoamRunner dot py, PyFoamSamplePlot dot py
01:58 आणि PyFoam च्या सहाय्याने नंतर आवश्यक डेटा प्लॉट करू.
02:02 केसेस कार्यान्वित करण्यासाठी PyFoamRunner dot py चा वापर करता येऊ शकतो.
02:07 नंतर वापरण्यासाठी log files देखील तयार केली जाते.
02:12 या utility चा उपयोग पूर्वी सेटअप केलेल्या sampleDict मधून मिळवलेला विविध प्रकारचा डेटा प्लॉट करण्यासाठी होतो.
02:21 Shock Tube ह्या उपकरणाचा वापर स्फोटाच्या प्रतिकृतीचे तरंग(waves) सेन्सरच्या दिशेने पाठवण्यासाठी,
02:29 आणि प्रत्यक्ष स्फोट व त्याचे परिणाम यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी होतो.
02:34 या केसमधे आयताकृती ट्युबमधे उजव्या बाजूला कमी दाब आणि डाव्या बाजूला उच्च दाब आहे.
02:42 दोन्ही प्रेशर झोन हे एका पातळ पडद्याद्वारे वेगळे केले गेले आहेत.
02:47 टर्मिनल उघडा आणि compressible solver मधील rhoCentralFoam पाथ टाईप करा.
02:56 ls टाईप करा. आपल्याला shockTube केस दिसेल.
03:02 टाईप करा cd space shockTube
03:05 0 dot org , constant आणि system हे तीन फोल्डर्स दिसतील.
03:11 आपल्याला 0 dot org मधून 0 फाईल कॉपी करणे गरजेचे आहे. त्यासाठी टाईप करा cp space minus r space 0 dot org space 0 आणि एंटर दाबा.
03:26 आता cd space system टाईप करून system फोल्डरमधे जा.
03:32 gedit च्या सहाय्याने sampleDict फाईल उघडा.
03:37 फाईलच्या खालच्या भागात जाऊन U.Component(0) काढून टाका.
03:45 त्याजागी Ux Uy आणि Uz लिहा. rho देखील काढून टाका.
03:53 फाईल सेव्ह करून त्यामधून बाहेर पडा.
03:56 एक लेव्हल मागे जाण्यासाठी टाईप करा cd dot dot
04:01 जॉमेट्री मेश करण्यासाठी blockMesh कमांड कार्यान्वित करा.
04:06 त्यानंतर प्रेशर बाऊंडरी कंडिशन्स सेट करण्यासाठी टाईप करा setFields.
04:13 आता pyFoam utility of pyFoamRunner.py चा वापर करणार आहोत.
04:19 टाईप करा pyFoamRunner dot py space पुढे सॉल्व्हरचे नाव द्या. म्हणजेच RhoCentralFoam.
04:28 ही केस कार्यान्वित करून postProcessing log तयार करा.
04:33 टाईप करा ls
04:35 आपण तयार झालेल्या लॉग फाईल्स बघू शकतो.
04:39 सँपल युटिलिटी कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा sample.
04:44 यानंतर pyFoamSamplePlot dot py space dot slash space minus minus directory ie. Dir equal to postProcessing/sets space hyphen info या कमांडच्या सहाय्याने विविध टाईम स्टेप्स प्लॉट करू शकतो.
05:10 हे आपल्याजवळ कोणकोणती फिल्डस आहेत हे दाखवेल.
05:14 नंतर टाईप करा pyFoamSamplePlot.py space dot slash space minus minus dir equal to postProcessing/sets space minus minus field equal to capital T space minus minus mode equal to timesInOne space vertical pipe space gnuplot
05:44 मिळालेले आऊटपुट ही png फाईल असेल.
05:48 ls टाईप करा. आपण तयार झालेली png फाईल बघू शकतो.
05:54 या पाठात PyFoam Utilities बद्दल जाणून घेतले.
05:58 तसेच विविध pyFoam utilities बघितल्या.
06:03 सॉल्व्हर कार्यान्वित करण्यासाठी pyFoamRunner.py
06:07 तसेच png फाईल तयार करण्यासाठी pyFoamSamplePlot युटिलिटीबद्दल जाणून घेतले.
06:13 कृपया या फोरममधे संबंधित विषयाचे प्रश्न वेळासहित पाठवा.
06:17 कृपया या फोरमवर OpenFOAM वरील सर्वसाधारण प्रश्न पाठवा.
06:22 FOSSEE टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
06:26 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
06:36 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana