OpenFOAM/C3/Creating-a-sphere-in-GMSH/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:26, 23 February 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Creating a sphere in GMSH या पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत: वर्तुळाकार कंस तयार करणे

ruled surfaces बनवणे आणि .geo एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे.

00:17 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 GMSH वर्जन 2.8.5 वापरत आहे.

00:27 या पाठासाठी युजरला पॉईंटस तयार करण्याचे प्राथमिक ज्ञान असावे. नसल्यास या वेबसाईटवरील OpenFOAM च्या पाठांच्या मालिकेमधील GMSH वरील पाठ बघा.
00:38 आता सुरूवात करू.

गोलाकृतीचे मूळ (0,0,0) वर आहे आणि त्याचे इतर बिंदू येथे दाखवल्याप्रमाणे आहेत.

00:48 आता टर्मिनलमधून GMSH उघडू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl+Alt+T ही बटणे दाबा.

आता gmsh space sphere1.geo टाईप करून एंटर दाबा. GMSH उघडेल.

01:09 येथे दाखवल्याप्रमाणे गोलाकृतीसाठी 7 बिंदू मी आधीच बनवले आहेत. हे बिंदू तयार करण्यासाठी मागे नमूद केलेले पाठ बघा.
01:19 आता वर्तुळाकार कंस बनवण्याचे प्रात्यक्षिक पाहू. GMSH मधे वर्तुळाकार कंस काटेकोरपणे Pi पेक्षा कमी असला पाहिजे.
01:27 कंस बनवण्यासाठी डाव्या बाजूच्या मेनूमधून Circle arc हा पर्याय निवडा.
01:32 आता कंसाचा सुरूवातीचा बिंदू म्हणून सर्वात उजवीकडील बिंदू निवडा. नंतर येथील हा बिंदू मध्यबिंदू म्हणून निवडा. ह्या बिंदूचे (0,0,0) को-ऑर्डिनेटस आहेत हे लक्षात घ्या.
01:48 शेवटी, वरील बाजूवरील बिंदू हा कंसाचा अंतिम बिंदू म्हणून निवडू.
01:54 सर्व कंस तयार होईपर्यंत प्रक्रिया करत रहा. सर्व कंसांसाठी एकच केंद्रबिंदू ठेवा.
02:02 आता डावीकडील मेनूमधून Ruled surface हा पर्याय वक्र पृष्ठभाग बनवण्यासाठी निवडा. येथे दाखवल्याप्रमाणे पृष्ठभागासाठी बाऊंडींग एजेस निवडा.
02:20 लक्षात घ्या सिलेक्ट केलेल्या बाजू लाल रंगात दिसत आहेत. की बोर्डवरील 'E' बटण दाबून हे सिलेक्शन कार्यान्वित करा.
02:29 येथे पृष्ठभाग तयार झालेला आपण पाहू शकतो. येथे दाखवल्याप्रमाणे हे तुटक रेषांनी दाखवले जाईल.
02:37 ही प्रक्रिया गोलाकृतीचे सर्व आठही पृष्ठभाग तयार होईपर्यंत करत रहा. पूर्ण झाल्यावर गोलाकृती अशी दिसली पाहिजे.
02:46 आता होम फोल्डरवर जा. sphere1.geo ही फाईल शोधून ती gedit टेक्स्ट एडिटरच्या सहाय्याने उघडा.
02:54 आपण तयार केलेल्या जॉमेट्रिकल एंटीटीजशी संबंधित माहिती येथे संचित झाली आहे.
03:00 GMSH मधे सिंटॅक्स असा आहे:

जॉमेट्रिकल एंटीटी पुढे कंसात आयडेंटीटी नंबर जे एक एक्सप्रेशन आहे.

03:11 येथे पॉईंटसाठी एक्सप्रेशन असे आहेः

Point, कंसात आयडेंटीफिकेशन नंबर जो साधारणपणे पुढची पूर्णांक संख्या असते, ज्याची सुरूवात 1 ने होते. पुढे इक्वल टू महिरपी कंसात X, Y, Z को-ऑर्डिनेटस आणि मेश एलिमेंटचा आकार.

03:30 ही हवी असलेली mesh element size आहे. मेश एलिमेंटचा आकार हा सुरूवातीच्या मेश एलिमेंट व्हॅल्युज लिनीयर इंटरपोलेशनने काढतात.
03:41 गोलाकृतीच्या बिंदूंच्या संख्यात्मक व्हॅल्यूच्या जागी 's' हे व्हेरिएबल वापरा.
03:49 सुरूवातीला टाईप करा "s = 0.1;"

हे गोलाकृतीच्या मेश एलिमेंट साईजची व्हॅल्यू निर्देशित करते.

04:01 बाऊंडरी लेयर मिळवण्यासाठी गोलाकृतीजवळील मेश रिफाईन करू. त्यासाठी

Mesh.CharacteristicLengthFromCurvature = 0.05 या ओळीचा उपयोग करू.

04:15 सिंटॅक्स: Mesh.CharacteristicLengthFromCurvature भौमितिक वक्र आकारांसाठी मेश दिलेली व्हॅल्यू घेईल.
04:25 घनफळ काढण्यासाठी सर्व बाऊंडींग पृष्ठभागांची गरज आहे. त्यासाठी फाईलच्या शेवटी टाईप करा:

"Surface Loop()" त्यापुढे त्याची आयडेंटीटी म्हणजेच कंसात पुढील पूर्णांक संख्या, त्यापुढे इक्वल टू महिरपी कंसात गोलाकृतीच्या सर्व पृष्ठभागांच्या आयडेंटीटीज.

04:48 येथे 14, 16, 18, 20, 22, 24, 26 आणि 28 या आयडेंटीटीज आहेत.
05:05 आता sphere1.geo फाईल सेव्ह करून बंद करा.
05:10 GMSH इंटरफेसवर परत जा. डाव्या बाजूला असलेल्या मेनूमधील Physical groups वर क्लिक करा. नंतर Add वर क्लिक करून Surface वर क्लिक करा. गोलाकृतीचे सर्व पृष्ठभाग सिलेक्ट करा.
05:26 की बोर्डवरील 'E' बटण दाबून हे सिलेक्शन कार्यान्वित करा.
05:30 आता पुन्हा टेक्स्ट एडिटरमधे sphere1.geo फाईल उघडा. खाली शेवटच्या भागात कोडच्या नव्या ओळी समाविष्ट झालेल्या दिसतील.
05:42 ह्या नंबरच्या जागी अवतरण चिन्हात "sphere" हा शब्द टाईप करा. याचा उपयोग पोस्ट प्रोसेसिंगमधे किंवा इतर गोष्टी करताना गोलाकृतीच्या बाऊंडरीज ओळखण्यासाठी होतो.
05:54 आता फाईल सेव्ह करून बंद करा. हा पाठ पूर्ण झाला आहे. थोडक्यात,
06:01 या पाठात शिकलो:

वक्ररेषा आणि पृष्ठभाग तयार करणे गोलाकृती तयार करणे .geo एक्सटेन्शनच्या फाईलचा उपयोग करून मूलभूत हाताळणी करणे.

06:13 असाईनमेंट म्हणून, मोठी त्रिज्या असलेला गोल तयार करा.
06:17 OpenFOAM मालिका ही FOSSEE Project, IIT Bombay यांनी तयार केली आहे.
06:21 FOSSEE म्हणजे Free and Open Source Software for Education. हे प्रोजेक्ट मुक्त आणि खुल्या सॉफ्टवेअर टुल्सच्या वापराला प्रोत्साहन देते. अधिक माहितीसाठी भेट द्या:

http://fossee.in/

06:33 URL वरील व्हिडिओमधे प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
06:40 प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा:

06:49 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
07:03 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana