PHP-and-MySQL/C2/Loops-Do-While-Statement/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:46, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00:00 | DO-WHILE loop वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | सोयीनुसार ह्याला आपण DO-WHILE loop किंवा statement असेही म्हणू शकतो. |
00:12 | जरी यातीलcondition लूप च्या शेवटी तपासली जात असली तरी त्याचे स्वरूप मूलतः WHILE loop प्रमाणेच आहे. |
00:20 | आता DO टाईप करून पुढे आपल्या block साठी महिरपी कंस काढून शेवटी WHILEटाईप करा. येथे आपली condition असेल. |
00:29 | आता आपण एक छोटा प्रोग्रॅम लिहू या. आपल्याला प्रत्येक वेळी वाढ होणारा नंबर हवा आहे आणि प्रत्येक ओळीवर तो echo करेल. हेच आपण WHILE loop साठीही केले होते. |
00:41 | आणि आता आपली कंडिशन- जेव्हा नंबर 10होईल त्यावेळी आपण nameव्हेरिएबल बदलू आणि आपले लूप थांबेल. |
01:00 | आता सुरूवातीला num = 1 असे टाईप करा. |
01:04 | आणि माझे नाव Alex असे name व्हेरिएबलला देऊ. |
01:09 | या लूपची कंडिशन जोपर्यंत name = Alexआहे अशी ठेवणार आहोत. |
01:15 | जोपर्यंत name = Alexआहे तोपर्यंत लूप चालू राहिल. आपल्याला कुठेतरी nameह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलून Billy करायची आहे. असे झाले की लूप चालू राहणार नाही कारण name ची व्हॅल्यू आता Alex नाही. |
01:31 | आपण DO loop मध्ये IF statement वापरणार आहोत.
आपण IF मध्ये IF, loops मध्ये IF, loops मध्ये loops समाविष्ट करू शकतो. जोपर्यंत तुमचा code, infinite values न बनवता नीट काम करतो, तोपर्यंत ह्यावर कसलेही बंधन नाही.
|
01:55 | आता DO टाईप करू या. |
01:57 | प्रथम num व्हेरिएबल echo करू या. |
02:00 | ओळ ब्रेक करण्यासाठी आपण HTML code concatenate करू या. |
02:05 | येथे आपण num++ टाईप करू या जे num +1 सारखे आहे. |
02:14 | मग आपले IF statement म्हणजे If num is greater than or equal to 10 then no echo. |
02:26 | आता मी name बदलून Billy करत आहे. |
02:30 | तुम्हाला कळेल की मी येथे महिरपी कंस वापरला नाही. कारण block मध्ये IF statement नंतर आपल्याला केवळ एका ओळीचा code कार्यान्वित करायचा आहे. |
02:42 | एका ओळीचा codeयेथे सुटसुटीत दिसतो. |
02:46 | लक्षात घ्या, आपण numची 1 ही व्हॅल्यू सेट केली आहे. |
02:51 | num ह्या व्हेरिएबल मध्ये वाढ होते आणि user साठी ते echo देखील होते. |
02:57 | तसेच आपण name साठी Alex ही व्हॅल्यू दिली आहे. |
03:00 | आपण DO सुरू करूया. |
03:02 | name अजूनही Alex च आहे. |
03:04 | येथे कुठलीही कंडिशन नसली तरी, हे कार्यान्वित होईल. |
03:07 | 1 echo होईल. |
03:10 | num 1 ने वाढेल आणि 2 होईल. |
03:14 | आता आपला चालू नंबर 2 आहे जो 10पेक्षा जास्त आहे की नाही ते तपासेल आणि पुढे जाईल. |
03:26 | ह्याचे उत्तर नाही असे असल्यामुळे ते सोडून द्या. येथे name = Alex. आणि पुन्हा सगळ्यात वर जा. |
03:34 | नंबर 2च आहे. या व्हॅल्यूने कोड कार्यान्वित होईल. |
03:41 | हे 2 असे echo करेल. |
03:43 | ह्यात 1 ने वाढ होईल म्हणजेच 3 होईल. |
03:46 | आता हे 3 हे 10 पेक्षा मोठा आहे का ते तपासेल. |
03:51 | अजूनही नाही. त्यामुळे nameची व्हॅल्यू बदलून ती Billy न होता Alex च राहिल. |
03:58 | अजूनही nameची व्हॅल्यू Alex आहे. |
04:00 | अशाप्रकारे लूप चालू राहिल. हे अशा प्रकारे 10पर्यंत पोहोचेल पण user साठी ते 9 पर्यंत echoकरेल. |
04:09 | आता num ची व्हॅल्यू 10 होईल. |
04:11 | आता आपली IF condition True होईल. |
04:13 | आता nameची व्हॅल्यू बदलून Billy होईल आणि while condition मध्ये nameची व्हॅल्यू Alex नसल्यामुळे WHILE loop थांबेल आणि त्याखालील code कार्यान्वित होईल. |
04:25 | आता हा code कार्यान्वित करू या. येथे क्लिक करा. |
04:31 | आपल्याला 1 2 3 असे 9 पर्यंत रिझल्ट मिळाला आहे. |
04:35 | आपली condition पूर्ण झाली आहे. name ची व्हॅल्यू Alex न राहता ती Billy झाली आहे. |
04:43 | येथे आपला लूप थांबेल. |
04:45 | IF मधील व्हॅल्यू 11 करा किंवा num ची व्हॅल्यू 0 करा. |
04:50 | आता हे काम करणार नाही आणि आपल्याला दिसेल |
04:54 | की आपल्याला 0 ते 9 नंबर्स मिळाले आहेत. |
04:57 | ह्याचे कारण आपला सुरूवातीचा नंबर आहे |
05:02 | आपण चालू नंबर echo करत आहोत. नंतर त्यात 1 ने वाढ करून त्याची IF मध्ये तुलना करत आहोत. |
05:13 | हा नंबर आपण बघू शकत नाही. |
05:16 | आता num ची तुलना11 शी होईल. मग name बदलून Billy झाल्याने loop संपेल. |
05:23 | 11एको न होता फक्त compare केली जाते. |
05:27 | आता हे रिफ्रेश करा. आपल्याला 1 ते 10 आकडे दिसतील. |
05:31 | अशा प्रकारे हे DO-WHILE loop आहे. ब-यापैकी साम्य असले तरी अनेक ठिकाणी DO-WHILE loop हे WHILE loopपेक्षा अधिक उपयोगी आहे. उदाहरणार्थ जेव्हा प्रोग्रॅमिंग लॉजिक गुंतागुंतीचे असते. |
05:44 | ह्याचा सराव करून बघा. तसेच मी बनवलेला प्रोग्रॅम पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करा. |
05:52 | पुढे आपण अजून काही loops बघणार आहोत. |
05:56 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद. |