LibreOffice-Suite-Impress/C2/Creating-a-presentation-document/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 09:23, 21 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | इम्प्रेसच्या 'Creating a presentation document' आणि बेसिक फॉरमॅटिंग वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:08 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत इम्प्रेस विंडोतील विविध घटक, स्लाईड समाविष्ट आणि कॉपी करणे तसेच फाँट्स आणि त्यांचे फॉरमॅटिंग. |
00:21 | इथे आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00:29 | आपण आधीच्या ट्युटोरियलमध्ये बनवलेले 'Sample Impress' हे प्रेझेंटेशन उघडू या. |
00:35 | स्क्रीनवरील गोष्टींवर प्रथम नजर टाकू. |
00:39 | मध्यभागातल्या 'Work Space' मध्ये आपण काम करणार आहोत. |
00:44 | यात दिसणा-या पाच Tabs ना 'View Buttons' म्हणतात. |
00:49 | सध्या 'Normal' Tab निवडलेला आहे. |
00:52 | स्लाईड बनवण्यासाठी वापरला जाणारा हा मुख्य व्ह्यू आहे. |
00:55 | 'Outline' व्ह्यूमधे स्लाईडचे शीर्षक, बुलेटस् आणि अनुक्रमांक ह्या स्वरूपात स्लाईड्सची यादी दिसते. |
01:03 | 'notes' व्ह्यूमध्ये स्लाईडसाठी तळटीपा लिहिता येतात ज्या प्रेझेंटशनच्या वेळी दिसत नाहीत. |
01:10 | 'Handout' व्ह्यू हँडआऊट प्रिंटींगसाठी वापरतात. |
01:14 | येथे आपल्याला एका पानावर किती स्लाईडस् प्रिंट करायच्या ते ठरवता येते. |
01:19 | स्लाईड्स थंबनेल्स बघण्यासाठी सॉर्टर व्ह्यू वापरतात. |
01:23 | 'Normal' व्ह्यू बटणावर पुन्हा क्लिक करा. |
01:26 | स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला 'Slides' Pane दिसेल. प्रेझेंटेशन मधील स्लाईडसच्या थंबनेल्स येथे उपलब्ध असतात. |
01:34 | उजव्या बाजूला तुम्हाला 'Task' Pane दिसेल ज्याच्यात ५ विभाग आहेत. |
01:40 | 'Layout Section' मध्ये स्लाईडचे आराखडे असतात. |
01:43 | हे जसेच्या तसे किंवा त्यात बदल करून वापरता येतात. |
01:48 | प्रत्येक विभागांबद्दल अधिक माहिती पुढे करून घेणार आहोत. |
01:53 | आता आपण स्लाईड कशी समाविष्ट करावी ते शिकू या. 'Slide Pane' वरील दुस-या स्लाईडवर क्लिक करून ती सिलेक्ट करा. |
02:02 | आपण 'Insert' आणि मग 'Slide' वर क्लिक करा. |
02:05 | आपल्याला दुस-या स्लाईड नंतर नवीन स्लाईड समाविष्ट झालेली दिसेल. |
02:10 | स्लाईडला शीर्षक देण्यासाठी 'Click to add Title' असे लिहिलेल्या टेक्स्टबार वर क्लिक करा. |
02:17 | आता 'Short term strategy' असे टाईप करून टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर क्लिक करा. |
02:23 | अशा प्रकारे आपल्याला शीर्षक समाविष्ट करता येते. |
02:26 | आपण दोन पध्दतींनी स्लाईडची कॉपी बनवू शकतो. |
02:30 | पहिली पध्दत बघू या; 'Insert' आणि मग 'Duplicate' स्लाईडवर क्लिक करा. |
02:35 | आपण प्रथम बनवलेल्या स्लाईड नंतर नवीन 'Duplicate Slide' समाविष्ट झालेली दिसेल. |
02:42 | या व्यतिरिक्त 'Work Space Pane' मधील 'Slide Sorter' वर क्लिक करून स्लाईड सॉर्टर व्ह्यू वर जा. |
02:50 | आता सातवी स्लाईड कॉपी करण्यासाठी माऊसचे उजवे बटण दाबून 'Context' मेनूमधील 'Copy' हा पर्याय सिलेक्ट करा. |
02:58 | शेवटच्या स्लाईडवर राईट क्लिक करून 'Paste' निवडा. |
03:01 | 'After' हा पर्याय सिलेक्ट करून 'OK' वर क्लिक करा. |
03:04 | तुमच्या प्रेझेंटेशनच्या शेवटी ह्या स्लाईडची कॉपी तयार केली गेली आहे. |
03:10 | आता फाँट आणि फाँटला फॉरमॅटींग बद्दल जाणून घेऊ. |
03:15 | 'Long Term Goal' असे शीर्षक असलेल्या स्लाईडवर डबल क्लिक करून ती सिलेक्ट करा. |
03:20 | Body च्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि सर्व मजकूर सिलेक्ट करून तो डिलिट करा. |
03:26 | आता हे टाईप करा. 'Reduce cost', 'Reduce dependence on few vendors', 'Develop customized application'. |
03:37 | लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटप्रमाणे Font Type आणि Font Size मध्ये बदल करू या. |
03:43 | टेक्स्टची एक ओळ निवडा. Text Format या टूलबारमध्ये 'Albany' हा फाँट टाईप बदलून तो 'Arial Black' करा. |
03:52 | आणि '32' हा फाँट साईज बदलून तो '40' करा. |
03:56 | टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
03:59 | लक्षात घ्या की फाँट बदललेला आहे. |
04:02 | 'Format' मेनूमधील 'Character' या पर्यायावर क्लिक करून देखील फाँट बदलता येतो. |
04:09 | एक डायलॉग बॉक्स उघडेल, जिथे आपण आवश्यकतेनुसार फाँट, स्टाईल आणि साईज निवडू शकतो. |
04:16 | हा डायलॉग बॉक्स बंद करू. |
04:19 | फाँटचा रंग बदलण्यासाठी आपण 'Development up to present' असे शीर्षक असलेली स्लाईड घेऊ. |
04:25 | बॉडीच्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून सर्व मजकूर सिलेक्ट करा. |
04:30 | फाँट कलरच्या आयकॉन शेजारील डाऊन ऍरोवर क्लिक करून तुम्हाला योग्य वाटेल असा रंग निवडा. |
04:37 | टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
04:40 | रंगामध्ये झालेल्या बदलाकडे लक्ष द्या. |
04:43 | लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटप्रमाणेच येथे 'Bold', 'Italic', 'Underline' ही फॉरमॅटिंग वापरता येतात. |
04:50 | 'Recommendation' असे शीर्षक असलेली स्लाईड निवडा. |
04:53 | बॉडीच्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून टेक्स्टची एक ओळ निवडा. |
04:58 | आता 'Bold', 'Italic', 'Underline' या आयकॉनवर क्लिक करा. |
05:03 | टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
05:06 | टेक्स्ट मध्ये झालेला बदल लक्षात घ्या. |
05:08 | आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
05:11 | आपण शिकलो ते थोडक्यातः इम्प्रेस विंडोतील विविध घटक, स्लाईड समाविष्ट आणि कॉपी करणे तसेच फाँट्स आणि त्यांचे फॉरमॅटिंग. |
05:24 | COMPREHENSION TEST ASSIGNMENT |
05:28 | नवीन प्रेझेंटेशन तयार करा. |
05:30 | तिस-या आणि चौथ्या स्लाईडस् मध्ये एक नवीन स्लाईड समाविष्ट करा. |
05:35 | प्रेझेंटेशनच्या शेवटी चौथ्या स्लाईडची कॉपी बनवा. |
05:40 | दुस-या स्लाईडमध्ये टेक्स्टबॉक्स बनवा. त्यामध्ये काही टेक्स्ट टाईप करा. |
05:45 | टेक्स्टचा फाँट साईज बदलून तो 32 करा. |
05:49 | टेक्स्टला Bold, Italic आणि Underline करून त्याचा रंग निळा करा. |
05:56 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05:59 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:02 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:07 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:12 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:16 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
06:23 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
06:27 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
06:35 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:46 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज जगदीश शिंदे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद. |