LibreOffice-Suite-Draw/C3/Import-and-Export-Images/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:28, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | लिबर ऑफिस ड्रॉच्या Import आणि Export Images वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | यात ड्रॉ पेजवर इमेज इंपोर्ट करणे आणि ड्रॉ फाईल विविध फाईल फॉरमॅटसमधे सेव्ह करण्याबाबत जाणून घेऊ. |
00:16 | आपण व्हेक्टर, बिटमॅप किंवा raster इमेजेस या दोन्ही, Draw मधे इंपोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकतो. |
00:23 | येथे आपण उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू. |
00:32 | RouteMap उघडू. |
00:35 | या पाठासाठी WaterCycle या चित्राची JPEG फाईल तयार करून ती डेस्कटॉपवर सेव्ह केली आहे. |
00:46 | ही इमेज आपल्या ड्रॉ फाईलमधे इंपोर्ट करू. |
00:49 | ही इमेज बंद करू. |
00:52 | प्रथम जिथे चित्र इंपोर्ट करायचे आहे ते पान सिलेक्ट करा. |
00:57 | नवे पान समाविष्ट करून ते सिलेक्ट करा. |
01:01 | व्हेक्टर किंवा बिटमॅप इमेज इंपोर्ट करण्यासाठी Insert टॅबवर क्लिक करून Picture पर्याय निवडा. |
01:08 | From File वर क्लिक करा. |
01:10 | Insert picture डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:14 | Water Cycle.jpeg सिलेक्ट करा. |
00:17 | Open वर क्लिक केल्यास इमेज Draw फाईलमधे प्रत्यक्ष समाविष्ट केली जाईल. |
01:24 | Link बॉक्स चेक केली असल्यास इमेज त्याच्या पाथद्वारे जोडली जाईल. |
01:29 | Open वर क्लिक करा. |
01:32 | इमेज केवळ लिंक म्हणून संचित होईल अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल. |
01:37 | Keep Link वर क्लिक करा. |
01:40 | ड्रॉ फाईलमधे चित्र लिंक म्हणून समाविष्ट करण्यात येईल. |
01:44 | लिंक्स सहजपणे काढून देखील टाकता येतात. |
01:48 | मुख्य मेनूतील Edit खालील Link वर क्लिक करा. |
01:53 | Edit Links चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:57 | हा डायलॉग बॉक्स ड्रॉ फाईल मधील सर्व लिंक्सची सूची दाखवेल. |
02:02 | WaterCycle च्या चित्रासाठी या लिंकवर क्लिक करा. |
02:06 | Break Link वर क्लिक करा. |
02:09 | Draw कन्फरमेशन मेसेज देईल. Yes वर क्लिक करा. |
02:14 | लिंक काढून टाकली जाईल. Close वर क्लिक करा. |
02:20 | परंतु चित्र अजूनही फाईलमधे उपलब्ध असल्याचे आपल्या लक्षात येईल. |
02:25 | लिंक काढून टाकल्यास चित्र आपोआप Draw फाईलमधे Embed करून समाविष्ट होते. |
02:31 | हे चित्र डिलीट करण्यासाठी ते सिलेक्ट करून Delete वर क्लिक करा. |
02:39 | ही असाईनमेंट करा. |
02:42 | दोन ड्रॉ फाईल्स बनवा. |
02:44 | एका फाईलमधे चित्र लिंकद्वारे समाविष्ट करून ती सेव्ह करा. |
02:48 | दुस-या फाईलमधे चित्र Embed करून समाविष्ट करा आणि ती सेव्ह करा. |
02:52 | दोन्ही फाईल्सच्या आकारांची तुलना करा. |
02:55 | इमेज लिंक केलेल्या फाईल मधे इमेजच्या आकारात बदल करा. |
03:00 | हा बदल मूळ फाईलमधे दिसतो आहे का ते तपासा. |
03:05 | पुढे या फाईलमधे WaterCycle चे चित्र Draw image म्हणून इंपोर्ट करू. |
03:13 | मुख्य मेनूतील Insert वर क्लिक करून File पर्याय निवडा. |
03:18 | Insert File हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:21 | सूचीतून WaterCycle.odg ही ड्रॉ फाईल निवडा. |
03:28 | Open वर क्लिक करा. |
03:30 | Insert slides/objects हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:34 | फाईल पाथच्या पुढे असलेल्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करा. |
03:38 | स्लाईडसची सूची बघायला मिळेल. |
03:41 | WaterCycle चे चित्र असलेली स्लाईड निवडा. |
03:46 | पेज किंवा ऑब्जेक्ट, लिंक म्हणून देखील समाविष्ट करता येते. |
03:51 | हे असे करण्यासाठी केवळ Link च्या चेक बॉक्सवर क्लिक करा. |
03:55 | OK क्लिक करा. |
03:57 | ऑब्जेक्ट नवीन फॉरमॅटमधे बसवण्यासाठी विचारणा करणारा कन्फरमेशन डायलॉगबॉक्स उघडेल. |
04:05 | Yes क्लिक करा. |
04:07 | फाईलमधे नव्या पानावर स्लाईड समाविष्ट होईल. |
04:12 | ड्रॉ मधून चित्र एक्सपोर्ट करण्याबद्दल जाणून घेऊ. |
04:17 | ड्रॉ मधे फाईल एक्सपोर्ट करणे म्हणजे
ड्रॉ फाईल किंवा ड्रॉ फाईलचे पान किंवा त्यातले ऑब्जेक्ट इतर फाईल फॉरमॅटमधे रूपांतरित करणे |
04:29 | उदाहरणार्थ ड्रॉ फाईल PDF, HTML, JPEG किंवा bitmap फाईलमधे रूपांतरित करता येऊ शकते. |
04:39 | PDF, Flash आणि HTML या फाईल फॉरमॅटसमधे नेहमीच संपूर्ण ड्रॉ फाईल एक्सपोर्ट केली जाते. |
04:47 | RouteMap फाईल मिनीमाइज करा. |
04:51 | तुम्हाला आश्चर्य वाटेल की Draw WaterCycle डायग्रॅम JPEG फॉरमॅट मधे कसा रूपांतरित झाला? |
04:58 | हे कसे करायचे ते पाहू. |
05:01 | WaterCycle फाईल उघडा. |
05:05 | नंतर पेजेस पॅनेलमधून WaterCycle चे चित्र असलेले पान निवडा. |
05:11 | मुख्य मेनूतील File खालील Export वर क्लिक करा. |
05:16 | Export डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:18 | Filename फिल्डमधे WaterCycleDiagram हे नाव टाईप करा. |
05:24 | Places पॅनेलमधे Desktop वर क्लिक करा. |
05:29 | File type फिल्डमधे JPEG हा पर्याय निवडणार आहोत. परंतु तुम्ही ड्रॉ फाईल इतर फॉरमॅटमधे देखील सेव्ह करू शकता. |
05:38 | Selection चेक बॉक्सवर क्लिक करा. |
05:42 | Save क्लिक करा.JPEG Options डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:47 | डायलॉग बॉक्समधील डिफॉल्ट रूपात असलेल्या पर्यायांमधे बदल करू नका. |
05:53 | OK क्लिक करा. |
05:55 | WaterCycle चित्र असलेले ड्रॉ पेज डेस्कटॉपवर JPEG फाईल म्हणून सेव्ह झाले आहे. |
06:02 | येथे ड्रॉ फाईलमधील केवळ एकच पान JPEG फाईलमधे रूपांतरित झाले आहे. |
06:08 | फाईल PDF, Flash किंवा HTML फॉरमॅटमधे सेव्ह केल्यास ड्रॉ फाईल मधील सर्व पाने एक्सपोर्ट केली जातात. |
06:18 | ड्रॉ मधे raster इमेजेस देखील एडिट करता येऊ शकतात. |
06:22 | Raster इमेजेस Format मेनूच्या सहाय्याने फॉरमॅट करता येतात. |
06:26 | ही चित्रे एडिट करण्यासाठी तुम्ही Picture टूलबारचा देखील वापर करू शकता. |
06:31 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:37 | या पाठात इमेजेस इंपोर्ट आणि एक्सपोर्ट करायला आणि ड्रॉ ऑब्जेक्टस विविध फाईल फॉरमॅटसमधे सेव्ह करायला शिकलो. |
06:47 | ही असाईनमेंट करा. |
06:50 | एखादे ऑब्जेक्ट किंवा निवडलेल्या ऑब्जेक्टसचा संच देखील एक्सपोर्ट करता येतो. |
06:56 | WaterCycle या ड्रॉ फाईलमधील केवळ ढग आणि डोंगर JPEG फॉरमॅटमधे रूपांतरित करा. |
07:05 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:09 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:12 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:17 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07:20 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:23 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:28 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07:35 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:40 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:48 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
08:01 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |