LibreOffice-Suite-Calc/C2/Working-with-Cells/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:25, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 कॅल्कच्या वर्किंग विथ सेल्सवरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
00:08 स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट, टेक्स्टस्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे
00:16 फॉरमॅट सेल्सचा उपयोग कसा करावा
00:19 शीट तसेच सेलमधून स्थान कसे बदलावे
00:23 Rows, कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत
00:29 येथे आपण उबंटु 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00:39 आता प्रथमcells मध्ये डेटा कसा भरायचा ते शिकू या.
00:43 आपण आपली Personal Finance Tracker.ods ही फाईल उघडू या.
00:49 तुम्ही कुठल्याही एका सेलवर फक्त क्लिक करून कीबोर्डच्या सहाय्याने कुठल्याही प्रकारचे टेक्स्ट म्हणजे मजकूर टाईप करू शकता.
00:59 टेक्स्टची डिफॉल्ट अलाईनमेंट डावीकडे असते. अलाइनमेंट टॅब वर क्लिक करून अलाईनमेंट बदलता येते.
01:08 आता हे undo करू या
01:11 स्प्रेडशीट वरील A1सेल वर क्लिक करा.
01:15 सिलेक्ट केलेला सेल तुम्हाला हायलाईट झालेला दिसेल.
01:20 इथे आपण पूर्वीच कॉलम हेडिंग्ज टाईप केलेली आहेत.
01:24 Items ह्या हेडिंग्ज अंतर्गत एकाखाली एक Salary, House Rent, Electricity Bill, Phone Bill, Laundry, Miscellaneous अशा काही आयटमची नावे टाईप करू या.
01:38 संख्या एंटर करण्यासाठी, सेलवर क्लिक करून ती टाईप करा.
01:43 वजा संख्या एंटर करण्यासाठी त्या संख्येच्या आधी वजाचे चिन्ह टाईप करा किंवा तो आकडा कंसात लिहा.
01:53 संख्यांची डिफॉल्ट अलाईनमेंट उजव्या बाजूला असते. तसेच उणे संख्यांच्या पुढे वजाचे चिन्ह असते.
02:01 केलेले बदल undo करूया.
02:04 आपल्या “personal finance tracker.ods” फाईलमध्ये Serial Number हेडिंगखाली (जे आपण “SN” असे लिहीले आहे), आपल्याला एकाखाली एक अनुक्रमांक लिहावयाचे आहेत.
02:17 आता सेल A2 वर क्लिक करा आणि १,२,३ असे आकडे एका खाली एक एंटर करा.
02:27 सेलमध्ये automatically भरले जाण्यासाठी A4 वर क्लिक करा. सेलच्या उजव्या कोप-यात एक छोटा काळा बॉक्स दिसेल, तिथे माऊसचे बटण दाबून ते सेल A7 पर्यंत ड्रॅग करा आणि सोडून द्या.
02:42 तुम्हाला सेल A5 ते A7 पर्यंत पुढचे आकडे क्रमाने आलेले दिसतील.
02:51 आयटमला Serial Number दिल्यानंतर Cost या हेडिंगखाली आयटमसाठी किंमत एंटर करूया.
02:59 आता आपण C3 सेलवर क्लिक करा आणि हाऊस रेंट साठी Rupees 6000 टाईप करूया.
03:07 नंबरपुढे रूपयाचे चिन्ह देण्यास काय करावे?
03:11 समजा Electricity Bill साठी Rupees 800 एंटर करायचे आहेत. आता C4 वर राईट क्लिक करून Format Cells ऑप्शन निवडा.
03:23 Format Cells चा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:27 Numbers हा पहिला टॅब सिलेक्ट केलेला नसल्यास तो करा.
03:32 तुम्हाला Category खाली Number, Percent, Currency, Date आणि Time इत्यादी पर्याय दिसतील.
03:41 त्यामधील "Currency” सिलेक्ट करूया.
03:44 आता फॉरमॅट ऑप्शन खालील डाऊन ऍरोवर क्लिक करूया. इथे तुम्हाला जगभरातील विविध चलने व मुद्रा पहायला मिळतील.
03:53 वरील दिशेला स्क्रॉल करून INR Rupees English India हा ऑप्शन निवडा. ड्रॉपडाऊन मध्ये खाली डिफॉल्ट रूपात Rupees 1234 हे सिलेक्ट झालेले दिसेल.
04:04 तुम्हाला उजव्या बाजूच्या प्रिव्ह्यू एरियात ह्याचा प्रिव्ह्यू पाहाता येईल.
04:10 “Options” च्या खाली तुम्हाला संख्येत Decimal places म्हणजेच दशांश चिन्हानंतर किती स्थाने असावीत व Leading Zeros किती असावेत ते सांगता येते
04:20 तुम्हाला हे लक्षात येईल की Decimal places 2 केल्यास आपल्या संख्येचा फॉरमॅट Rupees 1234 नंतर पूर्णांक शून्य शून्य असा होतो.
04:35 केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये दिसत आहेत.
04:40 प्रत्येक सहस्त्र स्थानानंतर स्वल्पविराम देण्यासाठी Thousand Separator वर क्लिक करा. झालेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.
04:50 तुम्ही फाँट टॅबवर क्लिक करून फाँट बदलू शकता. त्यामध्ये फाँट, टाईप फेस, साईझ यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत.
05:00 तुम्ही फाँट आणि इतर टॅब्ज मध्ये जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
05:05 आपण पुढील ट्युटोरियलमध्ये अलाईनमेंट टॅबमधील ऑप्शन्सबद्दल अधिक माहिती घेऊ.
05:11 “OK” वर क्लिक करा.
05:15 आता ८०० टाईप करून एंटर दाबा. तुम्हाला दिसेल की नंबर ८०० हे रूपये ८०० असे दर्शवले गेले असून त्याच्यापुढे दशांशचिन्ह आणि दोन शून्य दिसतील.
05:26 आता सेल C5 पासून C7 पर्यंत सिलेक्ट करा. Ctrl हे बटण दाबून ठेवून सेल G2 सुध्दा सिलेक्ट करा. तुम्ही सिलेक्ट केलेले सर्व सेल हायलाईट झालेले दिसतील.
05:39 हायलाईट झालेल्या सेलपैकी कुठल्याही सेलवर राईट क्लिक करून Format Cell निवडा.
05:46 पूर्वीप्रमाणेच सर्व ऑप्शन्स निवडा आणि “OK” वर क्लिक करा.
05:51 आता आपण इतर आयटम्सचे खर्च एकाखाली एक टाईप करू या. फोन बिलसाठी रू.६००, लाँड्री चार्जेससाठी रू.३०० आणि मिसलेनियस म्हणजे इतर खर्च रू.२०००.
06:06 अकाऊंटस हेडिंगखाली महिन्याची सॅलरी रू.३०,००० टाईप करू या.
06:13 दिनांक एंटर करण्यासाठी एक सेल निवडून डेट टाईप करा.
06:18 तुम्ही दिनांकातील घटक फॉरवर्ड स्लॅश किंवा हायफनने वेगळे करू शकता. टेक्स्टचा उपयोग करू शकता. उदा. 10 October 2011.
06:27 कॅल्कमध्ये विविध प्रकारचे Date फॉरमॅट उपलब्ध आहेत.
06:32 यासाठी सेल वर राईट क्लिक करून Format Cell निवडू शकता.
06:38 "Category" खाली Date हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 12, 31, 1999 हा पर्याय निवडू या. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.
06:51 शिवाय खाली फॉरमॅट कोडमध्ये MM, DD, YYYY असे दिसेल. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे फॉरमॅटचा कोड बदलता येतो.
07:02 DD, MM, YYYY असे टाईप करू या. केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. आणि “OK” वर क्लिक करा.
07:12 वेळ एंटर करण्यासाठी एक सेल सिलेक्ट करून Time असे टाईप करा.
07:18 वेळेतील घटक कोलन देऊन वेगळे करता येतात. उदाहरणार्थ 10 colon 43 colon 20.
07:24 या व्यतिरिक्त तुम्ही सेल वर माऊसचे उजवे बटण दाबून Format Cell ऑप्शन निवडा.
07:31 "Category" खाली टाईम हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 13, 37, 46 हा पर्याय निवडू या. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.
07:43 खाली HH कोलन MM कोलन SS असा फॉरमॅट कोड दिसेल. तुम्ही फॉरमॅट कोड आवश्यकतेप्रमाणे बदलू शकता. आपण HH कोलन MM टाईप करू या.
07:57 केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. “OK” वर क्लिक करा.
08:03 केलेले बदल undo करा.
08:06 कॅल्कमध्ये टेक्स्ट, संख्या आणि डेटा कसा लिहायचा हे शिकल्यानंतर आता आपण स्प्रेडशीटमध्ये एका सेलमधून दुस-या सेलमध्ये तसेच एका शीटवरून दुस-या शीटवर कसे जायचे ते पाहू.
08:17 आपण प्रथम स्प्रेडशीटमध्ये सेलवर कसे जायचे ते पाहू.
08:23 माऊसचा कर्सर सेलवर क्लिक करून तुम्ही कोणत्याही सेलपर्यंत पोहचू शकता.
08:29 तुम्हाला ती विशिष्ट सेल हायलाईट झालेली दिसेल.
08:32 सेल रेफरन्सचा उपयोग करूनही विशिष्ट सेलवर जाता येते.
08:38 नेम बॉक्सच्या उजव्या काळ्या रंगाच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा.
08:43 योग्य सेलवर जाण्यास सेल रेफरन्स टाईप करून एंटर दाबा.
08:49 नेमबॉक्स मधे क्लिक करा. तेथील आधीचा सेल रेफरन्स डिलिट करून नवीन टाईप करा. एंटर दाबा.
08:58 एका सेल वरून दुस-या सेलवर कसे जायचे ते पाहू.
09:03 पहिली पध्दत म्हणजे कर्सरच्या सहाय्याने एका सेलवरून दुस-या सेलवर जाणे.
09:09 तुम्हाला तुमचे लक्ष एका सेलवरून दुस-या सेलवर न्यायचे असेल तेव्हां माउसने कर्सर हव्या त्या सेलवर नेऊन डावे बटण क्लिक करावे.
09:18 ह्या प्रकारे आपल्या कामाचे लक्ष नव्या सेलवर जाईल.
09:22 दोन सेलमध्ये जास्त अंतर असेल तेव्हा या पध्दतीचा उपयोग होतो.
09:28 अजून एक पध्दत म्हणजे टॅबचा उपयोग करून पुढच्या रो मधील सेल वर तुम्हाला जाता येते.
09:35 मागच्या रो मधील सेल वर जाण्यासाठी 'Shift + Tab' दाबा.
09:39 कॉलम मध्ये खालच्या सेलवर जाण्यासाठी 'Enter' दाबा.
09:42 कॉलम मध्ये वरच्या सेलवर जाण्यासाठी 'Shift + Enter' दाबा.
09:46 आपण आता शिकू या कॅल्कमध्ये कीबोर्डच्या सहाय्याने वेगवेगळ्या स्प्रेडशीटवर कसे जायचे.
09:53 तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या उजव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील 'Ctrl' व पेजडाऊन दाबा.
10:00 तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या डाव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील 'Ctrl' व पेजअप दाबा.
10:08 कर्सरचा उपयोग करून सुध्दा दुस-या शीटवर जाता येते.
10:13 Working with Sheets च्या ट्युटोरियलमध्ये आपण ह्या बद्दल अधिक माहिती घेऊ.
10:19 जर शीटस् ची संख्या खूप जास्त असल्यास, त्या हॉरिझाँटल स्क्रॉलबार मागे लपण्याची शक्यता असते.
10:28 असे असल्यास शीट टॅब्स खाली डाव्या बाजूला असलेल्या चार बटणांच्या सहाय्याने शीट टॅब्स पुढेमागे करता येतात.
10:36 केलेले बदल undo करू.
10:39 कर्सरने सेल रेंज सिलेक्ट करण्यासाठी प्रथम सेलवर क्लिक करा.
10:45 आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवा.
10:48 स्क्रीनवरील कर्सर तुम्हाला हव्या असलेल्या सेलपर्यंत नेऊन माऊसचे डावे बटण सोडून द्या. तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल हायलाईट झालेले दिसतील.
11:00 संलग्न असलेले Rowsकिंवा कॉलम्स सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुपमधे Row किंवा कॉलमवर क्लिक करा.
11:09 आता शिफ्ट बटण दाबून ठेवा.
11:12 ग्रुप मधील शेवटच्या कॉलम किंवा Row वर क्लिक करा.
11:15 संलग्न नसलेले विविध कॉलम्स आणि Rows सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुप मधील कॉलम किंवा Row वर क्लिक करा.
11:23 कंट्रोल बटण दाबून ठेवा आणि एकानंतर एक अशा पध्द्तीने कॉलम्स आणि Rows वर क्लिक करा.
11:31 विविध संलग्न शीटस् सिलेक्ट करण्यासाठी प्रथम तुम्हाला हव्या असलेल्या शीट टॅबवर क्लिक करा.
11:39 तुम्हाला हव्या असलेल्या शेवटच्या शीट टॅबपर्यंत कर्सर न्या.
11:43 शिफ्ट बटण दाबून ठेवा आणि शीट टॅबवर क्लिक करा.
11:48 दोन शीट मधील सर्व शीट टॅब्स पांढ-या रंगाच्या होतील जे त्या सिलेक्ट झाल्या असल्याचे दर्शवितात.
11:56 तुम्ही शीटमध्ये केलेले बदल सर्व सिलेक्टेड शीट मध्येही दिसतील.
12:01 आता संलग्न नसलेले विविध टॅब्स सिलेक्ट करण्यासाठी पहिल्या शीटच्या शीट टॅब वर क्लिक करा.
12:08 आता कर्सरला तिस-या शीट टॅबवर घेऊन जा.
12:12 आता कंट्रोल बटण दाबून ठेवून शीट टॅबवर क्लिक करा.
12:16 सिलेक्ट झालेल्या टॅब्सचा रंग पांढरा होईल आणि आपण शीट मध्ये केलेले बदल सर्व शीटमध्ये झालेले दिसतील.
12:24 आता आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.
12:30 आपण जे शिकलो ते थोडक्यात.
12:33 स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट, टेक्स्टस्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे
12:40 फॉरमॅट सेल्सच्या डायलॉग बॉक्सचा उपयोग कसा करावा
12:43 शीट मध्ये तसेच सेल्समध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जावे
12:47 Rows, कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत
12:52 COMPREHENSIVE ASSIGNMENT
12:55 Spreadsheet-Practice.ods उघडा
12:58 “Serial Number” खाली 1 ते 5 आकडे एकाखाली एक लिहा.
13:04 Keys चा उपयोग करून सेल्सवर जा.
13:09 “Serial Number” खालील सर्व आयटम सिलेक्ट करा.
13:13 दिनांक आणि वेळ यासाठी कॉलम Add करा.
13:16 “Format Cells” डायलॉग बॉक्स ऑप्शनचा उपयोग करून त्यात काही Values भरा.
13:21 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
13:24 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
13:27 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
13:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
13:35 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13:38 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13:41 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13:48 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13:52 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
14:00 यासंबंधी माहिती
14:03 पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14:11 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
14:16 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha