ExpEYES/C3/Steady-state-response-of-circuits/Marathi
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Steady State Response of Circuits वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण शिकणार आहोत:
RC, RL आणि LCR सर्किटस मधील AC फेज शिफ्ट. फेज शिफ्टच्या व्हॅल्यूज काढणे, प्रयोगांसाठी विद्युत मंडलाच्या आकृत्या दाखवणे. |
00:24 | ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10 |
00:34 | या पाठासाठी तुम्हाला, ओळख असावी:
मूलभूत भौतिकशास्त्र आणि ExpEYES Junior इंटरफेस. नसल्यास ExpEYES च्या संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:50 | प्रथम सर्किटच्या Steady state response ची व्याख्या करू. |
00:55 | Steady state response म्हणजे सर्किट स्थिर किंवा समतोल स्थितीत असताना केलेले निरीक्षण. |
01:02 | आता फेज शिफ्टची व्याख्या पाहू. फेज शिफ्ट म्हणजे तरंगाच्या फेजमधील तुलनात्मक बदल. |
01:10 | आता RC सर्किटमधील AC फेज शिफ्टबद्दल जाणून घेऊ. |
01:14 | या प्रयोगात सर्किटमधील विद्युतदाबातील बदल आणि फेज शिफ्ट मोजणार आहोत. |
01:20 | हा प्रयोग करण्यासाठी,
A1 हे SINE ला जोडले आहे. 1uF(एक मायक्रो फॅराड)चा कपॅसिटर हा SINE आणि A2 च्या मधे जोडला आहे. 1K रेझिस्टर A2 आणि ग्राऊंड (GND) च्या मधे जोडला आहे. |
01:36 | ही विद्युतमंडलाची आकृती आहे. |
01:40 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
01:44 | प्लॉट विंडोवरील A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा.
A1 हे CH1 ला प्रदान केले आहे. |
01:54 | A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा.
A2 हे CH2 ला प्रदान केले आहे. |
02:02 | साईन वेव्ज मिळवण्यासाठी mSec/div चा स्लायडर हलवा. |
02:08 | EXPERIMENTS बटणावर क्लिक करून Study of AC circuits पर्याय निवडा. |
02:14 | Study of AC Circuits आणि स्किमॅटिक विंडो उघडतील.स्किमॅटिक विंडो विद्युतमंडलाची आकृती दाखवेल. |
02:24 | वेगळ्या विद्युतदाबाच्या तीन रेषा Study of AC Circuits विंडो दाखवत आहे. |
02:30 | काळी रेष A1 वरील लावलेला एकूण विद्युतदाब दाखवते. |
02:35 | लाल रेष रेझिस्टरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब दाखवते. |
02:39 | निळी रेष कपॅसिटरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब दाखवते. |
02:44 | विंडोच्या उजवीकडे फेजर प्लॉट पाहू शकतो. |
02:49 | प्लॉटवरील धन एक्स( X) अक्ष रेझिस्टरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब दाखवतो. |
02:56 | धन वाय (Y) अक्ष इंडक्टरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब दाखवतो. |
03:02 | ऋण Y अक्ष कपॅसिटरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब दाखवतो. |
03:08 | वेव्जची वारंवारता 149.4Hz आहे.
A1 वरील एकूण विद्युतदाब 3.54V आहे. Rच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब A2 ला 2.50V आहे. A1-A2 वरील विद्युतदाब 2.43V आहे. फेज शिफ्ट 43.1 डिग्री आहे. |
03:34 | Calculator वारंवारता, रेझिस्टन्स, कपॅसिटन्स आणि इंडक्टन्सच्या डिफॉल्ट व्हॅल्यू दाखवत आहे. |
03:44 | वारंवारतेची व्हॅल्यू बदलून 149.4Hz आणि इंडक्टरची व्हॅल्यू बदलून 0(zero) mH(मिली हेन्री) करा. |
03:53 | Calculate XL, XC and Angle वर क्लिक करा. |
03:59 | XC, XL आणि फेज अँगलच्या व्हॅल्यूज दाखवल्या जातील. XC आणि XL हे कपॅसिटन्स आणि इंडक्टन्सचे Impedences आहेत. |
04:11 | Dphi म्हणजे फेज शिफ्ट. 46.8 डिग्री ही फेज शिफ्टची व्हॅल्यू मिळाली आहे. |
04:20 | फेज शिफ्ट Φ = arctan(XC/XR) हे सूत्र वापरून व्हॅल्यू काढू. येथे XC=1/2πfC.
f म्हणजे वारंवारता हर्टझमधे, C म्हणजे कपॅसिटन्स फॅराडसमधे. 46.81 डिग्री ही फेज शिफ्टची व्हॅल्यू मिळाली आहे. |
04:48 | RL सर्किटमधील AC फेज शिफ्टबद्दल जाणून घेऊ. |
04:52 | या प्रयोगात कपॅसिटरच्या जागी इंडक्टर वापरून फेज शिफ्ट मोजू. |
04:59 | हा प्रयोग करण्यासाठी, A1 हे SINE ला जोडले आहे.
SINE आणि A2 मधे 3000 टर्नस् ची कॉईल जोडली आहे. |
05:11 | 560 ओहमचा रेझिस्टर A2 आणि GND च्या मधे जोडलेला आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे. |
05:20 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
05:24 | दोन साईन वेव्ज तयार झालेल्या दिसतील. |
05:27 | EXPERIMENTS वर क्लिक करा. Study of AC circuits पर्याय निवडा. Study of AC Circuits विंडो उघडेल. |
05:38 | विंडोच्या उजवीकडे फेजर प्लॉट पाहू शकतो. |
05:43 | फेज शिफ्टची -2.7 डिग्री(वजा 2.7 डिग्री) ही व्हॅल्यू बघू शकतो. वारंवारता आणि विद्युतदाबाच्या व्हॅल्यूजकडे लक्ष द्या. |
05:53 | पुढील व्हॅल्यू बदला:
वारंवारता 149.4Hz(हर्टझ), रेझिस्टन्स 1360 ओहम, कपॅसिटन्स 0 uF(मायक्रो फॅराड) आणि इंडक्टन्स 78 mH(मिली हेन्री). |
06:11 | व्हॅल्यूज बघण्यासाठी Calculate XL, XC and Angle बटणावर क्लिक करा. फेज शिफ्टची -3.1 डिग्री (वजा 3.1 डिग्री) ही व्हॅल्यू मिळेल. |
06:23 | सूत्राच्या सहाय्याने फेज शिफ्टची व्हॅल्यू काढू. |
06:27 | फेज शिफ्ट Φ = arctan(XL/XR), येथे XL=2πfL. येथे L म्हणजे इंडक्टन्स आहे. |
06:41 | बाह्य रेझिस्टन्सची व्हॅल्यू 560 ओहम आणि कॉईलचा रेझिस्टन्स 800 ओहम आहे. एकूण रेझिस्टन्स=( 560 ओहम + 800 ओहम)=1360 ओहम. फेज शिफ्टची काढलेली व्हॅल्यू 3.08 डिग्री आहे. |
07:05 | आता LCR सर्किटमधील AC फेज शिफ्टबद्दल जाणून घेऊ. |
07:10 | सर्किटमधे इंडक्टर आणि कपॅसिटर जोडल्यावर फेज शिफ्ट मोजू. |
07:17 | हा प्रयोग करण्यासाठी, SINE हे A1 ला जोडले आहे. |
07:21 | कॉईल आणि 1 uF(1 मायक्रो फॅराड) चा कपॅसिटर A1 आणि A2 च्या मधे जोडला आहे. |
07:28 | 1K चा रेझिस्टर A2 आणि ग्राऊंड (GND) च्या मधे जोडला आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे. |
07:36 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
07:39 | फेज शिफ्ट सहित दोन साईन वेव्ज तयार झालेल्या दिसतील. |
07:43 | EXPERIMENTS वर क्लिक करा Study of AC Circuits पर्याय निवडा. |
07:50 | Study of AC Circuits आणि स्किमॅटिक या दोन विंडो उघडतील.स्किमॅटिक विंडो विद्युत मंडलाची आकृती दाखवेल. |
07:59 | Study of AC Circuits विंडो तीन वेगळ्या विद्युतदाबांच्या तीन साईन वेव्ज दाखवेल. |
08:06 | विंडोच्या उजवीकडे फेजर प्लॉट पाहू शकतो. |
08:11 | वेव्जची वारंवारता 149.4Hz आहे,
A1 वरील एकूण विद्युतदाब 3.53V आहे, R च्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब A2 ला 2.50V आहे, LC च्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब A1-A2 ला 2.42V आहे. |
08:33 | फेज शिफ्ट 43.1 डिग्री आहे. |
08:37 | पुढील व्हॅल्यू बदला:
वारंवारता 149.4Hz आणि इंडक्टन्स 78mH(मिली हेन्री). |
08:48 | व्हॅल्यूज बघण्यासाठी Calculate XL, XC and Angle बटणावर क्लिक करा. फेज शिफ्टची आलेली व्हॅल्यू 44.8 डिग्री आहे. |
09:00 | सूत्राच्या सहाय्याने फेज शिफ्टची व्हॅल्यू काढू. |
09:04 | फेज शिफ्ट Φ =arctan(XC – XL/XR). |
09:10 | बाह्य रेझिस्टन्सची व्हॅल्यू 1000 ओहम आहे. सूत्राच्या सहाय्याने मिळालेली फेज शिफ्टची व्हॅल्यू 44.77 डिग्री आहे. |
09:20 | थोडक्यात, |
09:22 | या पाठात आपण शिकलो -
RC, RL आणि LCR सर्किटमधील AC फेज शिफ्टबद्दल, फेज शिफ्टच्या व्हॅल्यूज काढणे. |
09:33 | असाईनमेंट म्हणून, रेझिस्टन्स आणि कपॅसिटन्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज वापरून RL आणि LCR सर्किटसच्या AC फेज शिफ्टचा अभ्यास करा. |
09:44 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
09:52 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
09:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:06 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |