BOSS-Linux/C3/The-sed-command/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:46, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of script: The-sed-command
Author: Manali Ranade
Keywords: Linux
Time | Narration |
00:01 | sed - दि स्ट्रीम एडिटर वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | ह्या पाठात sed कमांडचा वापर करण्याबद्दल जाणून घेऊ. |
00:11 | हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. |
00:14 | ह्या पाठासाठी, |
00:16 | आपण लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि GNU BASH वर्जन 4.2.24 वापरणार आहोत. |
00:26 | पाठाच्या सरावासाठी GNU bashच्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू. |
00:33 | तसेच तुम्हाला |
00:35 | लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:38 | संबंधित पाठांसाठी आमच्या http://spoken-tutorial.org या वेबसाईटला भेट द्या. |
00:44 | आता sed बद्दल जाणून घेऊ. |
00:47 | sed हा स्ट्रीम एडिटर आहे. |
00:50 | Sed, फाईलमधील विशिष्ट जागी टेक्स्टचा एखादा पॅटर्न शोधते. |
00:57 | ही कमांड, टेक्स्ट दर्शवण्याचे किंवा एडिट करण्याचे कार्य करते. |
01:01 | जसे की जुळलेल्या टेक्स्टच्या जागी टेक्स्ट समाविष्ट करणे, पुसणे किंवा बदलून लिहिणे यासारखी एडिटिंगची कामे. |
01:10 | प्रथम काही उदाहरणांद्वारे सुरूवात करू. |
01:13 | sed कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू. |
01:18 | माझ्याकडे होम डिरेक्टरीमधे seddemo.txt नामक फाईल आहे. |
01:23 | त्यातील घटक पाहू. |
01:26 | ह्या फाईलमधे आपल्याकडे roll no, name, stream, marks, pass किंवा fail आणि stipend amountअशा एंट्रीज आहेत. |
01:38 | समजा फाईलची दुसरी ओळ प्रिंट करायची आहे. |
01:43 | त्यासाठी टर्मिनल उघडावे लागेल. |
01:47 | आता टाईप करा sed space सिंगल कोटसमधे ‘2p’ सिंगल कोटस नंतर space seddemo.txt |
01:57 | एंटर दाबा. |
02:00 | येथे दुसरी ओळ दाखवण्यासाठी 2 हा अंक आहे. |
02:05 | p हे अक्षर प्रिंटीग ही कृती दाखवत आहे. |
02:09 | आता आऊटपुट पहा. |
02:11 | हे संपूर्ण फाईल दाखवत आहे. पण दुसरी ओळ दोनदा प्रिंट झाल्याचे दिसेल. |
02:18 | हे p ह्या कृतीचे डिफॉल्ट बिहेवियर आहे. |
02:22 | केवळ दुसरी ओळ प्रिंट करण्यासाठी, |
02:25 | टाईप करा sed space -n space (सिंगल कोटसमधे) 2p सिंगल कोटस नंतर space seddemo.txt |
02:37 | एंटर दाबा. |
02:40 | केवळ दुसरी ओळ प्रिंट झालेली दिसेल . |
02:44 | -n म्हणजे ‘silent mode’ जे सर्व अनावश्यक आऊटपुट काढून टाकते. |
02:51 | स्ट्रीममधे सांगितलेले लोकेशन एडिट करायचे किंवा दाखवायचे आहे. |
02:57 | आपल्याला दुसरी ओळ सिलेक्ट करायची आहे. |
03:00 | p हे कृती सांगते. म्हणजेच दुसरी ओळ प्रिंट करायची आहे. |
03:06 | आणि seddemo.txt हे फाईलचे नाव आहे. |
03:11 | हा sed कमांडचा सर्वसाधारण सिंटॅक्स आहे. |
03:15 | आता फाईलची शेवटची ओळ प्रिंट करू. |
03:20 | प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ. |
03:24 | आता टाईप करा. sed space -n space सिंगल कोटसमधे (dollar) $p सिंगल कोटस नंतर space seddemo.txt |
03:36 | एंटर दाबा. |
03:39 | शेवटची ओळ प्रिंट झालेली दिसेल. |
03:42 | आता टेक्स्ट एडिटरवर जा. |
03:45 | समजा 3पासून 6 पर्यंतच्या एंट्रीज प्रिंट करायच्या आहेत. |
03:50 | त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा: |
03:54 | sed space -n space सिंगल कोटसमधे '3 (comma) , 6p' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt |
04:07 | एंटर दाबा. |
04:09 | तिस-या ओळीपासून सहाव्या ओळीपर्यंत आऊटपुट दाखवले जाईल. |
04:14 | कृतीच्या आधी उद्गारचिन्ह दिल्याने कुठलीही कृती उलट केली जाते. |
04:21 | समजा 3पासून 6पर्यंतच्या ओळी सोडून बाकी सर्व ओळी प्रिंट करायच्या असल्यास टाईप करा: sed space -n space सिंगल कोटसमधे ‘3 (comma) ,6 (exclamation mark) !p' |
04:38 | सिंगल कोटस नंतर space seddemo.txt |
04:45 | एंटर दाबा. अशाप्रकारे आऊटपुट दिसेल. |
04:49 | स्लाईडस वर परत जाऊ. |
04:52 | लाईन अॅड्रेसिंग आणि काँटेक्स्ट अॅड्रेसिंग. |
04:56 | आतापर्यंत ज्यावर कृती करायची आहे ती फाईलमधील ओळ क्रमांक नमूद करीत होतो. |
05:02 | त्याला लाईन अॅड्रेसिंग म्हणतात. |
05:05 | ओळीच्या क्रमांकाने अॅड्रेस नमूद केला जातो. |
05:08 | ही अॅड्रेसिंगची एक पध्दत आहे. |
05:11 | अॅड्रेसिंगची दुसरी पध्दत म्हणजे काँटेक्स्ट अॅड्रेसिंग . |
05:16 | अशा ओळी ज्यात विशिष्ट काँटेक्स्ट असेल जसे की विशिष्ट शब्द. |
05:21 | विशिष्ट शब्द असलेल्या ओळीवर कृती करायची असल्यास काँटेक्स्ट अॅड्रेसिंग वापरू. |
05:29 | आपण रेग्युलर एक्सप्रेशन्स वापरू शकतो. |
05:32 | आता उदाहरण पाहू. |
05:35 | आपल्या एडिटरवर जाऊ. |
05:38 | समजा computers हा शब्द असलेल्या ओळी प्रिंट करायच्या आहेत. |
05:44 | टर्मिनलवर जाऊ. |
05:46 | टाईप करा |
05:48 | sed space -n space (सिंगल कोटसमधे) (front slash)(चौकटी कंस सुरू) cC (चौकटी कंस पूर्ण) omputers/p(front slash) सिंगल कोटस नंतरspace seddemo.txt |
06:14 | एंटर दाबा. |
06:16 | आपण computers हा शब्द असलेल्या ओळी बघू शकतो. |
06:22 | आपण पॅटर्न चौकटी कंसात लिहितो. |
06:24 | यामुळे चौकटी कंसातील कोणतेही एक किंवा दोन्ही अक्षरे जुळवून पाहिली जातील. |
06:30 | पॅटर्न जुळवून बघायचा असतो त्यावेळी तो front slashesमधे लिहितात. |
06:37 | आपण तो फाईलमधे प्रिंट करू शकतो किंवा w option वापरू शकतो. |
06:43 | त्यासाठी टाईप करा: sed space -n space (सिंगल कोटसमधे) (front slash) (चौकटी कंस सुरू) cC (चौकटी कंस पूर्ण) Computers/w space computer_student.txt सिंगल कोटस नंतर space seddemo.txt |
07:11 | एंटर दाबा. |
07:14 | आता जुळणा-या सर्व ओळी computer_student.txt ह्या फाईलमधे पाठवल्या जातील. |
07:21 | आता computer_studentमधील घटक पाहू. |
07:25 | टाईप करा cat space computer_student.txt |
07:32 | एंटर दाबा. |
07:35 | आपण ह्या एंट्रीज पाहू शकतो. |
07:37 | आपण पॅटर्न्स वेगवेगळ्या फाईल्स मधे पाठवू शकतो. |
07:42 | प्रॉम्प्ट क्लियर करा. |
07:45 | टाईप करा sed space -n space -e space (सिंगल कोटसमधे) (front slash) ‘/electronics/w space electro.txt’ सिंगल कोटस नंतर space -e space (सिंगल कोटसमधे) (front slash) ‘/civil/w space civil.txt’ सिंगल कोटस नंतर space seddemo.txt |
08:18 | एंटर दाबा. |
08:22 | येथे -e चा वापर अनेक मेथडस एकत्र करण्यासाठी केला आहे. |
08:27 | हे electro.txt आणि civil.txtह्या दोन फाईल्स बनवेल. |
08:34 | त्यामधे काय आहे ते बघण्यासाठी टाईप करा: |
08:37 | cat space electro.txt |
08:42 | electronicsहा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे. |
08:47 | आता civil फाईलमधील घटक पाहू. |
08:50 | टाईप करा cat space civil.txt |
08:55 | एंटर दाबा. |
08:57 | civilहा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे. |
09:01 | आपण आणखी कमांडसचा संच पुढील पाठांत पाहू. |
09:05 | त्यासाठी हाच प्रोग्रॅम वापरू. |
09:08 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
09:11 | स्लाईडवर परत जाऊ. |
09:14 | थोडक्यात, या पाठात आपण शिकलो , |
09:18 | sedद्वारे प्रिंट करणे. लाईन अॅड्रेसिंग. |
09:21 | काँटेक्स्ट अॅड्रेसिंग. |
09:23 | असाईनमेंट म्हणून, |
09:25 | seddemo.txt ही टेक्स्टफाईल वापरून, |
09:28 | 6व्या पासून 12व्या ओळीपर्यंतची रेकॉर्डस प्रिंट करा. |
09:33 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:36 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:39 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:44 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09:46 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:49 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:53 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10:00 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:04 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:11 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:17 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |