BOSS-Linux/C3/The-grep-command/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:36, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of script: The-grep-command
Author: Manali Ranade
Keywords: LINUX
Time | Narration |
00:01 | grep कमांडवरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | ह्या पाठात grep कमांडबद्दल जाणून घेऊ. |
00:09 | आपण काही उदाहरणांच्याद्वारे हे करू. |
00:12 | ह्या पाठासाठी वापरणार आहोत, |
00:15 | लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. |
00:18 | आणि *GNU BASH वर्जन 4.2.24 |
00:22 | ह्या पाठासाठी GNU bashचे वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन गरजेचे आहे. |
00:30 | तसेच Linux टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:34 | संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:39 | प्रथमregular expressions बद्दल जाणून घेऊ. |
00:43 | ही पॅटर्न जुळवून पहाण्याची पध्दत आहे. |
00:47 | ओळींत, पॅरेग्राफ किंवा फाईलमधे एखादा पॅटर्न अस्तित्वात आहे का हे पाहणे. |
00:54 | उदाहरणार्थ टेलिफोन डिरेक्टरीत फोन नंबर शोधणे, |
01:01 | किंवा पॅरेग्राफ किंवा ओळीमधे एखादा कीवर्ड शोधण्यासाठी grep कमांड वापरणार आहोत. |
01:08 | grep एक किंवा अनेक ओळींमधे, पॅरेग्राफ किंवा फाईलमधे एक किंवा अनेक पॅटर्न्स शोधते. |
01:15 | फाईलनेमचा उल्लेख नसल्यास grep स्टँडर्ड इनपुटमधील पॅटर्न्स शोधते. |
01:22 | फाईलनेम न सापडल्यास grep स्टँडर्ड इनपुटमधील पॅटर्न्स शोधते. |
01:28 | grep कमांड कशी वापरायची हे बघण्यासाठी grepdemo.txt ही डेमो फाईल वापरू. |
01:35 | ह्या फाईलमधील घटक पाहू. |
01:37 | ह्या फाईलमधे 13 नोंदी आहेत. |
01:41 | प्रत्येक नोंदीसाठी roll number, name, stream, marks, आणि stipend amount ही सहा फिल्डस आहेत. |
01:50 | प्रत्येक फिल्ड हे बार ह्या delimiterने वेगळे केले आहे. |
01:55 | grep कसे कार्य करते ते पाहू. |
01:58 | समजा कॉम्प्युटर्स स्ट्रीममधे कोणते विद्यार्थी आहेत हे बघण्यासाठी grep कमांड वापरू. |
02:04 | त्यासाठी टर्मिनल उघडावे लागेल. |
02:07 | टर्मिनलवर टाईप करा: |
02:09 | grep space डबल कोटसमधे computersडबल कोटस नंतर space grepdemo .txt |
02:18 | एंटर दाबा. |
02:20 | हे computers ही स्ट्रीम असलेल्या नोंदीची सूची दाखवेल. |
02:25 | आता ह्या रिझल्टची मूळ फाईल सोबत तुलना करा. |
02:29 | आता टेक्स्ट एडिटरवर जा. |
02:31 | Zubin साठीची नोंद सूचीत दिसत नाही. |
02:37 | असे का झाले? , कारण grep ने “computers” ह्या पॅटर्नसाठी शोध घेतला. ज्यात c स्मॉल आहे. |
02:43 | तर Zubin, साठी “Computers” ह्या स्ट्रीममधे C कॅपिटल आहे. |
02:48 | पॅटर्न मॅचिंग हे case सेन्सेटिव्ह आहे. |
02:51 | हे case सेन्सेटिव्ह ठेवायचे नसल्यास grepसोबत minus i वापरणे आवश्यक आहे. |
02:58 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा: grep space (minus) i space (डबल कोटसमधे) “computers” डबल कोटस नंतर space grepdemo.txt |
03:12 | एंटर दाबा. ,आता हे चारही नोंदी सूचीत दाखवेल. |
03:17 | grep फाईलमधील केवळ आपण दिलेल्या पॅटर्नशी जुळणा-या ओळी दाखवते. |
03:23 | आपण हे उलट देखील करू शकतो. |
03:26 | grep द्वारे दिलेल्या पॅटर्नशी न जुळणा-या ओळीही दाखवता येतात. |
03:32 | त्यासाठी minus v हा पर्याय आहे. |
03:35 | उदाहरणार्थ, पास न झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदीची सूची. |
03:40 | तुम्ही हा रिझल्ट दुस-या फाईलमधे देखील संचित करू शकता. |
03:43 | त्यासाठी टाईप करा: grep space minus iv space डबल कोटसमधे pass डबल कोटस नंतर space grepdemo.txt space greater than sign space notpass.txt |
04:02 | एंटर दाबा. |
04:04 | फाईलमधील घटक बघण्यासाठी टाईप करा: cat space notpass.txt |
04:11 | एंटर दाबा. आऊटपुट दाखवले जाईल. |
04:15 | प्रॉम्प्ट वर टाईप करा: |
04:17 | grep space minus i space' डबल कोटसमधे fail डबल कोटस नंतर space grepdemo.txt |
04:28 | आणि एंटर दाबा. |
04:30 | हे वेगळे आहे. |
04:32 | ह्यामधे नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परंतु ह्याचा रिझल्ट अपूर्ण आहे. |
04:37 | सर्व नोंदींची सूची असलेल्या फाईलमधे ओळींचा क्रमांक बघायचा असल्यास minus n हा पर्याय आहे. |
04:46 | प्रॉम्प्ट क्लियर करा. |
04:49 | आता टाईप करा "grep space -in space डबल कोटसमधे "fail" डबल कोटस नंतर space grepdemo.txt |
05:01 | एंटर दाबा. |
05:03 | ओळीचा क्रमांक दाखवला जाईल. |
05:06 | आत्तापर्यंत आपण एकच शब्द असलेला पॅटर्न पाहिला. |
05:10 | आपल्याकडे अनेक शब्द असलेला पॅटर्न देखील असू शकतो. |
05:13 | परंतु संपूर्ण पॅटर्न quotesमधे असणे आवश्यक आहे. |
05:17 | त्यासाठी टाईप करा: grep space minus i spaceडबल कोटसमधे ankit space saraf डबल कोटस नंतर space grepdemo.txt |
05:29 | एंटर दाबा. |
05:31 | Ankit Sarafचे रेकॉर्ड दाखवले आहे. |
05:35 | आपण अनेक फाईल्समधील पॅटर्न्स शोधू शकतो. |
05:39 | त्यासाठी टाईप करा: grep space minus i space डबल कोटसमधे fail डबल कोटस नंतरspace grepdemo.txt space notpass.txt |
05:55 | एंटर दाबा. |
05:57 | आऊटपुट दाखवले जाईल. |
05:59 | अनेक फाईल्स असताना grep नोंद सापडलेल्या फाईलचे नावही सोबत लिहील. grepdemo.txt आणि notpass.txt |
06:10 | ही रेकॉर्डसnotpass.txt फाईलमधील आणि ही रेकॉर्डस grepdemo.txt फाईलमधील आहेत. |
06:18 | समजा केवळ जुळणा-या पॅटर्नची एकूण आकडेवारी किंवा काऊंट हवा आहे. |
06:23 | त्यासाठी आपल्याकडे minus c हा पर्याय आहे. |
06:27 | त्यासाठी टाईप करा: grep space minus c spaceडबल कोटसमधे कॅपिटल F वापरून Fail डबल कोटस नंतर space grepdemo.txt |
06:40 | एंटर दाबा. |
06:42 | हे दिलेल्या पॅटर्नशी जुळणा-या ओळींची एकूण संख्या दाखवेल. |
06:46 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:51 | थोडक्यात. |
06:53 | आपण पाठात शिकलो, |
06:55 | फाईलमधील घटक बघणे उदा. cat filename |
06:59 | विशिष्ट स्ट्रीममधील नोंदींची सूची मिळवणे उदा. grep “computers” grepdemo.txt |
07:06 | casesविचारात न घेणे उदा. grep -i “computers” grepdemo.txt |
07:14 | पॅटर्न न जुळणा-या नोंदी मिळवणे उदा. grep -iv “pass” grepdemo.txt |
07:22 | नोंदीसोबत ओळीच्या क्रमांकाचा समावेश असलेली सूची मिळवणे उदा. grep -in “fail” grepdemo.txt |
07:31 | रिझल्ट दुस-या फाईलमधे संचित करणे उदा. grep -iv “pass” grepdemo.txt > notpass.txt |
07:41 | आणि नोंदीचा एकूण काऊंट मिळवणे उदा. grep -c “Fail” grepdemo.txt |
07:48 | असाईनमेंट, |
07:50 | -E, + आणि? ह्या काही कमांडस वापरून बघा. |
07:56 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:58 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:01 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:05 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08:07 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:11 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:14 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:21 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:25 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:32 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:36 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . धन्यवाद. |