LibreOffice-Suite-Writer/C2/Inserting-pictures-and-objects/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:50, 17 December 2013 by Nancyvarkey (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Resources for recording Inserting Pictures and Formatting Features

Time Narration
00:00 लिबर ऑफिस रायटरच्या Inserting Images वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
00:09 डॉक्युमेंटमध्ये इमेज फाईल समाविष्ट करणे.
00:12 रायटरमध्ये टेबल्स समाविष्ट करणे.
00:15 रायटरमध्ये हायपरलिंक समाविष्ट करणे.
00:18 आपण उबंटु लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिबर ऑफिस व्हर्जन3.3.4 वापरणार आहोत.
00:29 आपण लिबर ऑफिस रायटरमध्ये इमेज फाईल कशी समाविष्ट करायची हे जाणून घेऊ या.
00:36 आपली resume.odt ही फाईल उघडा.
00:39 डॉक्युमेंटमध्ये इमेज फाईल समाविष्ट करण्यासाठी प्रथम resume.odt वर क्लिक करा.
00:47 आता मेनूबारवरील 'Insert' या पर्यायावर क्लिक करा. नंतर 'Picture' वर क्लिक करून 'From File' या पर्यायावर क्लिक करा.
00:56 'Insert Picture' डायलॉग बॉक्स उघडेल.
01:00 आता जर तुम्ही एखादे 'Picture' तुमच्या सिस्टीम मध्ये सेव्ह केलेले असेल तर त्या फाईलचे नाव, 'Location' फिल्डमध्ये लिहून ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण काहीही सेव्ह केलेले नसल्यामुळे तेथे दिलेल्या डिफॉल्ट पिक्चरपैकी एक समाविष्ट करू या.
01:16 डाव्या बाजूच्या 'Picture' या पर्यायावर क्लिक करा.
01:21 आता कुठल्याही एका इमेजवर क्लिक करून शेवटी 'Open' या बटणावर क्लिक करा.
01:28 डॉक्युमेंट मध्ये इमेज समाविष्ट झाली आहे.
01:32 तुम्ही इमेजचा आकार बदलणे आणि ड्रॅग करणे ह्या क्रिया करू शकता.
01:38 प्रथम इमेजवर क्लिक करा. तुम्हाला रंगीत हँडल आलेले दिसेल.
01:44 कुठल्याही एका हँडलवर कर्सर न्या आणि माऊसचे डावे बटण दाबा.
01:50 कर्सर ड्रॅग करून इमेजचा आकार बदला. हे झाल्यावर इमेजवर क्लिक करून Editor च्या उजव्या कोप-यात वरपर्यंत ड्रॅग करा.
02:01 इमेज समाविष्ट करण्यासाठी 'Clip Board', 'Scanner' किंवा 'Gallery' या लोकप्रिय पध्दतींचा वापर करता येतो.
02:09 आपण 'Table' समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ.
02:13 आपल्याला लिबर ऑफिस रायटरच्या टेबलमध्ये माहिती सारणी वा तक्त्याच्या स्वरूपात साठवून ठेवता येते.
02:21 डॉक्युमेंटमध्ये टेबल समाविष्ट करण्यासाठी टूलबारवरील ‘Table’ या आयकॉनवर क्लिक करून टेबलचा आकार निवडू शकतो किंवा हेच आपण मेनूबार मधील ‘Insert’ या पर्यायाच्या सहाय्याने करू शकतो.
02:36 ‘Education Details’ या हेडिंगखाली ‘Table’ समाविष्ट करण्यासाठी कर्सर हेडिंगच्या खाली नेऊन ठेवा.
02:44 मेनूबारवरील ‘Insert’ वर आणि नंतर ‘Table’ वर क्लिक करा.
02:51 विविध फिल्ड्स असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
02:55 'Name' या फिल्डमध्ये आपण टेबलला 'resume table' असे नाव देऊ या.
03:01 'Size' या हेडिंगखाली आपण कॉलमची संख्या '2' ठेवू या.
03:06 'Rows' या फिल्डवरील upward arrow वर क्लिक करा आणि 'Rows' ची संख्या वाढवून ती '4' करा.
03:11 अशा प्रकारे तुम्ही 'column' आणि 'rows' या फिल्डवरील अप आणि डाऊन ऍरोवर क्लिक करून टेबल्सचा आकार कमी जास्त करू शकता.
03:21 डायलॉग बॉक्समधील 'Auto Format' वर क्लिक करा.
03:25 तुम्ही समाविष्ट करत असलेल्या टेबलचा फॉरमॅट ठरवण्यासाठी नवीन डायलॉग बॉक्स उघडेल.
03:33 फॉरमॅट निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ‘None’ या पर्यायावर क्लिक करा. आणि नंतर ‘OK’ या बटणावर क्लिक करा.
03:43 पुन्हा ‘OK’ या बटणावर क्लिक करा.
03:45 तुम्हाला हेडिंगखाली 2 columns आणि 4 rows असलेले टेबल समाविष्ट झालेले दिसेल.
03:53 आता काही माहिती सारणी स्वरूपात टेबलमध्ये लिहू.
03:58 ‘Table’ च्या पहिल्या रो आणि पहिल्या कॉलमच्या सेलवर क्लिक करा.
04:04 ‘Secondary School Examination’ टाईप करू.
04:08 आता त्याच्या शेजारील सेलवर क्लिक करा आणि 93% असे लिहा. हे रमेशने माध्यमिक शाळेच्या परीक्षेत संपादन केलेले गुण आहेत.
04:20 अशाच प्रकारे आपण टेबलमध्ये पुढील ‘Educational Details’ भरू शकतो.
04:25 ‘Secondary School Examination’ च्या खालील सेलवर क्लिक करा.
04:31 इथे आपण ‘Higher Secondary School Examination’ असे लिहू आणि त्याच्या संलग्न सेलमध्ये 88 Percent गुण लिहू.
04:41 पुढील सेलवर जाण्यासाठी तिस-या रो च्या पहिल्या सेलवर क्लिक करा. त्याशिवाय तुम्ही टॅबचे बटण दाबूनही पुढच्या सेलवर जाऊ शकता.
04:52 'Graduation' असे टाईप करा. त्याच्या संलग्न सेलमध्ये 75% असे टाईप करा. शेवटच्या रो च्या पहिल्या सेलमध्ये ‘Post Graduation’ असे टाईप करा. आणि त्याच्या शेजारील सेलमध्ये 70% लिहा.
05:12 अशाप्रकारे आपल्याला resume मध्ये ‘Educational Details’ असलेले टेबल दिसत आहे.
05:18 टेबलमधील शेवटच्या सेलमध्ये कर्सर नेऊन ठेवा.
05:24 आता जर तुम्हाला टेबलमध्ये शेवटच्या रो च्या अगदी खाली नवीन रो समाविष्ट करायची असल्यास की-बोर्ड वरील टॅब हे बटण दाबा.
05:33 तुम्हाला नवीन रो समाविष्ट झालेली दिसेल.
05:37 टेबलच्या डावीकडील भागात 'Ph.D' ही मिळवलेली पदवी. आणि उजवीकडे '65%' हे प्राप्त केलेले गुण टाईप करू या.
05:49 अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की शेवटच्या सेलमध्ये कर्सर ठेवून एकाखाली एक नवीन रो समाविष्ट करण्यासाठी टॅब या बटणाचा खूप उपयोग होतो.
06:00 टेबलमध्ये एका सेलमधून दुस-या सेलवर जाण्यासाठी Tab आणि Shift + Tab चा वापर करता येतो.
06:07 'Optimal Column Width' हा पर्याय कॉलम्सची रूंदी त्यातील मजकूराच्या आकाराप्रमाणे आपसूक बदलतो.
06:18 हा पर्याय दुस-या म्हणजेच उजवीकडील कॉलमला लागू करण्यासाठी त्या कॉलममध्ये कुठेही माऊस क्लिक करा.
06:30 आता शेवटच्या सेलमध्ये '65%' या टेक्स्टपुढे कर्सर नेऊन ठेवा.
06:35 आता मेनूबारवरील ‘Table’ या मेनूवर क्लिक करा आणि नंतर ‘Autofit’ या पर्यायावर जा.
06:42 स्क्रीनवर दिसत असलेल्या मेनूवरील ‘Optimal Column Width’ या पर्यायावर क्लिक करा.
06:49 तुम्हाला दिसेल की कॉलमची रूंदी त्यातील सेलमधल्या मजकूराप्रमाणे किंवा कंटेटप्रमाणे आपोआपच बदललेली आहे.
06:58 हे टेबलमच्या कुठल्याही कॉलमसाठी तुम्ही करू शकता.
07:02 टेबलसाठी विविध प्रकारच्या बॉर्डर्स निवडता येतात. जसे की No बॉर्डर, आतील व बाहेरील बॉर्डर किंवा केवळ बाहेरील बॉर्डर ठेवणे इत्यादी.
07:15 त्यासाठी 'Name' मेनूवरील 'Table' टॅब सिलेक्ट करून 'Table Properties' वर क्लिक करा. योग्य पर्यायांसाठी 'Border' टॅबवर क्लिक करा.
07:25 पुढे आपण रायटर मध्ये हायपर लिंक कशी बनवायची ते पाहू.
07:30 हायपरटेक्स्ट, ब्राऊज किंवा नेव्हिगेट करण्यासाठी हायपरलिंक वापरतात.
07:35 हायपर लिंक म्हणजे उघडलेल्या डॉक्युमेंटमधून दुस-या एखाद्या डॉक्युमेंटमध्ये जाण्यासाठी वापरलेला संदर्भ.
07:43 हायपर लिंक संपूर्ण डॉक्युमेंट किंवा डॉक्युमेंटमधील एखादा विशिष्ट भाग दर्शवते.
07:49 फाईलमध्ये हायपर लिंक तयार करण्यापूर्वी प्रथम आपण जे डॉक्युमेंट हायपर लिंक करायचे आहे ते बनवू या.
07:56 टूलबारवरील 'New' आयकॉनवर क्लिक करा.
08:00 नवीन डॉक्युमेंट उघडेल. नवीन डॉक्युमेंटमध्ये 'Hobbies' टेबल बनवू या.
08:06 आता आपण 'HOBBIES' असे हेडिंग लिहू या.
08:09 एंटरचे बटण दाबा.
08:11 आता एकाखाली एक 'Listening to Music', 'Playing Table Tennis', आणि 'Painting' अशी काही हॉबीज म्हणजे छंदांची नावे लिहू या.
08:20 आता ही फाईल सेव्ह करू या.
08:24 'Save' आयकॉनवर क्लिक करुन 'Name मध्ये ' Hobby' टाईप करा.
08:30 'Save in Folder' च्या डाऊन ऍरोवर क्लिक करा. आणि डेस्कडॉप या ऑप्शनवर क्लिक करा. आता 'Save' या बटणावर क्लिक करा.
08:40 डेस्कटॉपवर फाईल सेव्ह होईल.
08:43 आता आपण ही फाईल बंद करू या. हे डॉक्युमेंट उघडण्यासाठी 'resume.odt' या फाईलमध्ये हायपर लिंक बनवू या.
08:53 आता आपण 'Educational details' असलेल्या टेबलखाली 'HOBBIES' असे हेडिंग लिहू या.
09:00 'HOBBIES' या टेक्स्टची हायपर लिंक बनवण्यासाठी प्रथम या हेडिंगवर कर्सर ड्रॅग करून ते सिलेक्ट करा.
09:09 'Insert' मेनूवर क्लिक करून 'Hyper Link' पर्यायावर क्लिक करा.
09:15 'Internet', 'Mails and News', 'Document' आणि 'New Document' असा पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
09:24 आपण टेक्स्ट डॉक्युमेंटसाठी हायपर लिंक बनवत असल्यामुळे 'Document' या पर्यायावर क्लिक करू या.
09:30 आता 'Path' या फिल्डवरील 'Open File' या बटणावर क्लिक करा.
09:36 आता आपण बनवलेल्या नवीन डॉक्युमेंटवर जाण्यासाठी डायलॉग बॉक्सवरील 'Desktop' या पर्यायावर क्लिक करा.
09:44 आता 'Hobby.odt' या पर्यायावर क्लिक करा. आणि नंतर 'Open' या बटणावर क्लिक करा.
09:52 'Path' मध्ये समाविष्ट केल्या जाणा-या फाईलचा path दिसेल.
09:57 'Apply' वर क्लिक करून मग 'Close' वर क्लिक करा.
10:02 तुम्हाला 'HOBBIES' हे टेक्स्ट निळ्या रंगाने अधोरेखित झालेले दिसेल. अशा प्रकारे टेक्स्ट हायपर लिंक झालेले आहे.
10:11 'HOBBIES' वर कर्सर नेऊन 'Ctrl' key दाबून ठेवून माऊसचे डावीकडील बटण दाबा.
10:19 Hobbies असलेली फाईल तुम्हाला उघडलेली दिसेल.
10:23 अशाच प्रकारे तुम्ही इमेज आणि वेबसाईट म्हणजेच संकेत स्थळासाठी हायपरलिंक बनवू शकता.
10:30 आता आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत.
10:35 आपण जे शिकलो ते थोडक्यात.
10:37 डॉक्युमेंटमध्ये इमेज फाईल समाविष्ट करणे.
10:39 रायटरमध्ये टेबल्स समाविष्ट करणे.
10:42 रायटरमध्ये हायपरलिंक समाविष्ट करणे.
10:48 COMPREHENSIVE ASSIGNMENT
10:50 'Practice.odt' उघडा.
10:53 फाईलमध्ये इमेज समाविष्ट करा.
10:57 3 rows आणि 2 columns असलेले टेबल समाविष्ट करा.
11:01 फाईलमधल्या इमेजवर क्लिक केल्यानंतर www.Google.com ही वेबसाईट उघडेल अशी हायपर लिंक बनवा.
11:11 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:17 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:27 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:31 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:37 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:41 यासाठी अर्थसहाय्य National Misssion on Education through ICT, MHRD, Government of Indiaयांच्याकडून मिळालेले आहे.
11:50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana, Sneha