LibreOffice-Suite-Calc/C2/Basic-Data-Manipulation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:25, 3 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | Calc च्या Basic Data Manipulation वरील Tutorial मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या Tutorial मध्ये आपण शिकणार आहोत: |
00:09 | Formula वापरण्यासंबंधी प्राथमिक परिचय. |
00:12 | Column Sort करणे. |
00:15 | Data Filter बद्दलची प्राथमिक माहिती. |
00:17 | येथे आपण उबंटू लिनक्स व्हर्जन 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि लिबर ऑफिस 3.3.4 वापरणार आहोत. |
00:27 | कॅल्कमध्ये वापरल्या जाणा-या प्राथमिक सूत्रांच्या माहितीने ट्युटोरियलला सुरूवात करू. |
00:35 | सूत्रे, फॉर्म्युला म्हणजे समीकरणे. ह्यात संख्या आणि व्हेरिएबल्सचा वापर करतात. |
00:41 | येथे सेल्स व्हेरिएबल प्रमाणे वापरतात. त्यात समीकरणास आवश्यक डेटा ठेवला जातो. |
00:47 | मूलभूत गणिती क्रियांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा समावेश होतो. |
00:56 | आता आपण प्रथम 'Personal Finance Tracker.ods' ही फाईल उघडू. |
01:02 | वरील फाईलमधील "Cost" या हेडिंग खाली असलेल्या सर्व खर्चांची बेरीज कशी करता येते ते पाहू. |
01:13 | 'Miscellaneous' या हेडिंगखाली 'SUM TOTAL' या नावाने अजून एक हेडिंग बनवा. |
01:19 | आता A8 सेलवर क्लिक करा आणि त्यात सिरियल नंबर '७' लिहा. |
01:25 | आता सेल C8 वर क्लिक करा जिथे आपण सर्व खर्चांची बेरीज मांडणार आहोत. |
01:32 | सर्व खर्चांची बेरीज करण्यासाठी टाईप करा. 'Is Equal to SUM' आणि गोल कंसात ज्या सेल रेंजची आपल्याला बेरीज करायची आहे ती रेंज म्हणजेच '(C3 colon C7)'. |
01:44 | आता एंटर दाबा. |
01:47 | तुम्हाला "Cost" खाली असलेल्या सर्व खर्चाची बेरीज झालेली दिसेल. |
01:51 | आत आपण कॅल्कमध्ये वजाबाकी कशी करायची ते पाहू. |
01:55 | जर आपल्याला "House Rent" आणि "Electricity Bill" यांची वजाबाकी करून आलेले उत्तर A9 मध्ये दाखवायचे असेल तर प्रथम A9 वर क्लिक करा. |
02:06 | या सेलमध्ये टाईप करा 'Is Equal to' आणि संबंधित सेल रेफरन्स म्हणजे 'C3 - C4'. |
02:17 | आता Enter दाबा. |
02:20 | आपल्याला दिसेल की दोन सेल रेफरन्स मधील खर्चांची वजाबाकी होऊन उत्तर A9 मध्ये आलेले असेल. |
02:29 | आपण केलेले बदल Undo करा. |
02:32 | अशाच पध्दतीने आपण भागाकार किंवा गुणाकारही करू शकतो. |
02:37 | स्प्रेडशीटमध्ये असलेली अजून एक प्राथमिक क्रिया म्हणजे सरासरी. |
02:43 | आता ती कशा पध्दतीने करतात ते पाहू. |
02:45 | Sum Total सेलच्या खाली Average या नावाने नवीन हेडिंग बनवा. |
02:50 | येथे आपण सर्व खर्चाची सरासरी काढणार आहोत. |
02:55 | आता C9 सेल वर क्लिक करा. |
02:58 | आणि टाईप करा 'Is Equal to Average' आणि कंसात '(Cost)'. |
03:04 | कीबोर्डवरील एंटर दाबा. |
03:07 | या सेलमध्ये तुम्हाला Cost या कॉलमची सरासरी दिसेल. |
03:11 | आपण केलेले बदल पुन्हा Undo करू या. |
03:15 | असेच आपण Row मधील सेल्सची सरासरी काढू शकतो. |
03:20 | Formula आणि Operators बद्दल Advance Tutorial मध्ये शिकू. |
03:25 | आता Calc मध्ये Data Sort कसा करतात ते पाहू. |
03:30 | सॉर्टद्वारे दृश्य सेल्सची क्रमवारी आपण इच्छेनुसार बदलू शकतो. |
03:35 | इथे आपल्याला एकापुढे एक असे तीनपर्यंत निकष वापरून Data Sort करता येतो. |
03:43 | डेटा मधील विशिष्ट Item शोधण्यासाठी Sorting व Filter उपयोगी होतात. |
03:51 | आपल्याला "Cost" खालील डेटा चढत्या क्रमाने सॉर्ट करायचा आहे. |
03:57 | सॉर्ट करायचे सेल्स सिलेक्ट करण्यासाठी "Cost" या सेलवर क्लिक करू. |
04:03 | आता माऊसचे लेफ्ट बटण दाबून ते "2000" लिहिलेल्या सेलपर्यंत Drag करू. |
04:12 | सॉर्ट करायचा कॉलम सिलेक्ट होईल. |
04:15 | मेनूबार मधील "Data Option" वर क्लिक करून मग "Sort" निवडा. |
04:21 | आता "Current Selection" या Option ची निवड करा. |
04:24 | तुम्हाला "Sort Criteria" आणि "Options" नावाचे दोन टॅब्स डायलॉग बॉक्समध्ये दिसतील. |
04:31 | "Sort Criteria" टॅबमध्ये "Sort By" या फिल्डमध्ये "Cost" ची निवड करा. |
04:37 | कॉस्ट चढत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी त्याच्या शेजारी असलेल्या "Ascending" Option वर क्लिक करा. |
04:44 | आता "OK" या बटणवर क्लिक करा. |
04:47 | तुम्हाला दिसेल की कॉलम चढत्या क्रमाने सॉर्ट झालेला आहे. |
04:51 | उतरत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी "Descending" वर क्लिक करा. व नंतर "OK" क्लिक करा. |
04:59 | आता Spreadsheet मध्ये केलेले बदल Undo करा. |
05:02 | सर्व कॉलम एकदम सिलेक्ट करून ते सॉर्ट केल्यास एकावेळी अनेक कॉलम सॉर्ट होऊ शकतात. |
05:09 | समजा सिरियल नंबर आणि कॉस्ट हे कॉलम्स सॉर्ट करायचे आहेत. |
05:14 | आता पूर्वी केल्याप्रमाणे हे दोन्ही कॉलम सिलेक्ट करून घ्या. |
05:18 | आता मेनूबार मधील "Data" Option वर क्लिक करा आणि मग "Sort" वर क्लिक करा. |
05:24 | डायलॉग बॉक्समधील "Sort By" Field मध्ये पहिल्यांदा "Cost" निवडा |
05:30 | नंतर "Then By" Field मध्ये "SN" निवडा. |
05:35 | दोन्ही Option मध्ये "Descending" वर क्लिक करा आणि मग "OK" बटण दाबा. |
05:43 | ही दोन्ही हेडिंग उतरत्या क्रमात सॉर्ट झाली आहेत. |
05:47 | केलेले बदल पुन्हा Undo करू. |
05:49 | आता Data Filter कसा करायचा ते पाहू. |
05:53 | स्प्रेडशीट मधील फिल्टर म्हणजे एक किंवा अनेक कसोटींवर खरे ठरणारे Data items screen वर दाखवणे. |
06:00 | Spreadsheet मध्ये Filter सुरू करण्यासाठी "Item" नावाच्या सेलवर क्लिक करा. |
06:07 | आता मेनूबार मधील "Data" Option वर क्लिक करा आणि मग "Filter" वर क्लिक करा. |
06:12 | Pop-Up मेनूमध्ये "Auto Filter" Option वर क्लिक करा. |
06:16 | तुम्हाला हेडिंगवर बाणाचे चिन्ह आलेले दिसेल. |
06:20 | आता "Item" नामक सेलवरील down arrow वर क्लिक करा. |
06:24 | जर आपल्याला फक्त Electricity Bill संबंधित Data बघायचा असेल, |
06:29 | तर "Electricity Bill" Option वर क्लिक करा. |
06:34 | आपल्याला फक्त Electricity Bill संबंधित Data येथे दिसेल. |
06:40 | बाकीचे सर्व Options Filter झाले आहेत. |
06:43 | सर्व Data बघण्यासाठी "Item" नामक सेलवरील down arrow वर क्लिक करा आणि मग "All" वर क्लिक करा. |
06:52 | अशा पध्दतीने तुम्हाला पूर्ण Data बघता येईल. |
06:59 | Auto Filter शिवाय अजून दोन Filter Options आहेत "Standard Filter" आणि "Advanced Filter". |
07:11 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
07:15 | आपण जे शिकलो ते थोडक्यात पाहू या. |
07:18 | Formula संबंधी प्राथमिक परिचय. |
07:21 | Column Sort करणे. |
07:23 | Data Filters बद्दलची प्राथमिक माहिती. |
07:26 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:30 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:33 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:37 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
07:40 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:43 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.. |
07:47 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
07:53 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:58 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD,Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:06 | यासंबंधी माहिती |
08:08 | पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:16 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |