LibreOffice-Suite-Calc/C2/Working-with-Cells/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:44, 3 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | कॅल्कच्या वर्किंग विथ सेल्सवरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत |
00:08 | स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट, टेक्स्टस्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे |
00:16 | फॉरमॅट सेल्सचा उपयोग कसा करावा |
00:19 | शीट तसेच सेलमधून स्थान कसे बदलावे |
00:23 | Rows, कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत |
00:29 | येथे आपण उबंटु 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00:39 | आता प्रथमcells मध्ये डेटा कसा भरायचा ते शिकू या. |
00:43 | आपण आपली Personal Finance Tracker.ods ही फाईल उघडू या. |
00:49 | तुम्ही कुठल्याही एका सेलवर फक्त क्लिक करून कीबोर्डच्या सहाय्याने कुठल्याही प्रकारचे टेक्स्ट म्हणजे मजकूर टाईप करू शकता. |
00:59 | टेक्स्टची डिफॉल्ट अलाईनमेंट डावीकडे असते. अलाइनमेंट टॅब वर क्लिक करून अलाईनमेंट बदलता येते. |
01:08 | आता हे undo करू या |
01:11 | स्प्रेडशीट वरील A1सेल वर क्लिक करा. |
01:15 | सिलेक्ट केलेला सेल तुम्हाला हायलाईट झालेला दिसेल. |
01:20 | इथे आपण पूर्वीच कॉलम हेडिंग्ज टाईप केलेली आहेत. |
01:24 | Items ह्या हेडिंग्ज अंतर्गत एकाखाली एक Salary, House Rent, Electricity Bill, Phone Bill, Laundry, Miscellaneous अशा काही आयटमची नावे टाईप करू या. |
01:38 | संख्या एंटर करण्यासाठी, सेलवर क्लिक करून ती टाईप करा. |
01:43 | वजा संख्या एंटर करण्यासाठी त्या संख्येच्या आधी वजाचे चिन्ह टाईप करा किंवा तो आकडा कंसात लिहा. |
01:53 | संख्यांची डिफॉल्ट अलाईनमेंट उजव्या बाजूला असते. तसेच उणे संख्यांच्या पुढे वजाचे चिन्ह असते. |
02:01 | केलेले बदल undo करूया. |
02:04 | आपल्या “personal finance tracker.ods” फाईलमध्ये Serial Number हेडिंगखाली (जे आपण “SN” असे लिहीले आहे), आपल्याला एकाखाली एक अनुक्रमांक लिहावयाचे आहेत. |
02:17 | आता सेल A2 वर क्लिक करा आणि १,२,३ असे आकडे एका खाली एक एंटर करा. |
02:27 | सेलमध्ये automatically भरले जाण्यासाठी A4 वर क्लिक करा. सेलच्या उजव्या कोप-यात एक छोटा काळा बॉक्स दिसेल, तिथे माऊसचे बटण दाबून ते सेल A7 पर्यंत ड्रॅग करा आणि सोडून द्या. |
02:42 | तुम्हाला सेल A5 ते A7 पर्यंत पुढचे आकडे क्रमाने आलेले दिसतील. |
02:51 | आयटमला Serial Number दिल्यानंतर Cost या हेडिंगखाली आयटमसाठी किंमत एंटर करूया. |
02:59 | आता आपण C3 सेलवर क्लिक करा आणि हाऊस रेंट साठी Rupees 6000 टाईप करूया. |
03:07 | नंबरपुढे रूपयाचे चिन्ह देण्यास काय करावे? |
03:11 | समजा Electricity Bill साठी Rupees 800 एंटर करायचे आहेत. आता C4 वर राईट क्लिक करून Format Cells ऑप्शन निवडा. |
03:23 | Format Cells चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:27 | Numbers हा पहिला टॅब सिलेक्ट केलेला नसल्यास तो करा. |
03:32 | तुम्हाला Category खाली Number, Percent, Currency, Date आणि Time इत्यादी पर्याय दिसतील. |
03:41 | त्यामधील "Currency” सिलेक्ट करूया. |
03:44 | आता फॉरमॅट ऑप्शन खालील डाऊन ऍरोवर क्लिक करूया. इथे तुम्हाला जगभरातील विविध चलने व मुद्रा पहायला मिळतील. |
03:53 | वरील दिशेला स्क्रॉल करून INR Rupees English India हा ऑप्शन निवडा. ड्रॉपडाऊन मध्ये खाली डिफॉल्ट रूपात Rupees 1234 हे सिलेक्ट झालेले दिसेल. |
04:04 | तुम्हाला उजव्या बाजूच्या प्रिव्ह्यू एरियात ह्याचा प्रिव्ह्यू पाहाता येईल. |
04:10 | “Options” च्या खाली तुम्हाला संख्येत Decimal places म्हणजेच दशांश चिन्हानंतर किती स्थाने असावीत व Leading Zeros किती असावेत ते सांगता येते |
04:20 | तुम्हाला हे लक्षात येईल की Decimal places 2 केल्यास आपल्या संख्येचा फॉरमॅट Rupees 1234 नंतर पूर्णांक शून्य शून्य असा होतो. |
04:35 | केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये दिसत आहेत. |
04:40 | प्रत्येक सहस्त्र स्थानानंतर स्वल्पविराम देण्यासाठी Thousand Separator वर क्लिक करा. झालेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा. |
04:50 | तुम्ही फाँट टॅबवर क्लिक करून फाँट बदलू शकता. त्यामध्ये फाँट, टाईप फेस, साईझ यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत. |
05:00 | तुम्ही फाँट आणि इतर टॅब्ज मध्ये जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. |
05:05 | आपण पुढील ट्युटोरियलमध्ये अलाईनमेंट टॅबमधील ऑप्शन्सबद्दल अधिक माहिती घेऊ. |
05:11 | “OK” वर क्लिक करा. |
05:15 | आता ८०० टाईप करून एंटर दाबा. तुम्हाला दिसेल की नंबर ८०० हे रूपये ८०० असे दर्शवले गेले असून त्याच्यापुढे दशांशचिन्ह आणि दोन शून्य दिसतील. |
05:26 | आता सेल C5 पासून C7 पर्यंत सिलेक्ट करा. Ctrl हे बटण दाबून ठेवून सेल G2 सुध्दा सिलेक्ट करा. तुम्ही सिलेक्ट केलेले सर्व सेल हायलाईट झालेले दिसतील. |
05:39 | हायलाईट झालेल्या सेलपैकी कुठल्याही सेलवर राईट क्लिक करून Format Cell निवडा. |
05:46 | पूर्वीप्रमाणेच सर्व ऑप्शन्स निवडा आणि “OK” वर क्लिक करा. |
05:51 | आता आपण इतर आयटम्सचे खर्च एकाखाली एक टाईप करू या. फोन बिलसाठी रू.६००, लाँड्री चार्जेससाठी रू.३०० आणि मिसलेनियस म्हणजे इतर खर्च रू.२०००. |
06:06 | अकाऊंटस हेडिंगखाली महिन्याची सॅलरी रू.३०,००० टाईप करू या. |
06:13 | दिनांक एंटर करण्यासाठी एक सेल निवडून डेट टाईप करा. |
06:18 | तुम्ही दिनांकातील घटक फॉरवर्ड स्लॅश किंवा हायफनने वेगळे करू शकता. टेक्स्टचा उपयोग करू शकता. उदा. 10 October 2011. |
06:27 | कॅल्कमध्ये विविध प्रकारचे Date फॉरमॅट उपलब्ध आहेत. |
06:32 | यासाठी सेल वर राईट क्लिक करून Format Cell निवडू शकता. |
06:38 | "Category" खाली Date हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 12, 31, 1999 हा पर्याय निवडू या. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा. |
06:51 | शिवाय खाली फॉरमॅट कोडमध्ये MM, DD, YYYY असे दिसेल. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे फॉरमॅटचा कोड बदलता येतो. |
07:02 | DD, MM, YYYY असे टाईप करू या. केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. आणि “OK” वर क्लिक करा. |
07:12 | वेळ एंटर करण्यासाठी एक सेल सिलेक्ट करून Time असे टाईप करा. |
07:18 | वेळेतील घटक कोलन देऊन वेगळे करता येतात. उदाहरणार्थ 10 colon 43 colon 20. |
07:24 | या व्यतिरिक्त तुम्ही सेल वर माऊसचे उजवे बटण दाबून Format Cell ऑप्शन निवडा. |
07:31 | "Category" खाली टाईम हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 13, 37, 46 हा पर्याय निवडू या. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा. |
07:43 | खाली HH कोलन MM कोलन SS असा फॉरमॅट कोड दिसेल. तुम्ही फॉरमॅट कोड आवश्यकतेप्रमाणे बदलू शकता. आपण HH कोलन MM टाईप करू या. |
07:57 | केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. “OK” वर क्लिक करा. |
08:03 | केलेले बदल undo करा. |
08:06 | कॅल्कमध्ये टेक्स्ट, संख्या आणि डेटा कसा लिहायचा हे शिकल्यानंतर आता आपण स्प्रेडशीटमध्ये एका सेलमधून दुस-या सेलमध्ये तसेच एका शीटवरून दुस-या शीटवर कसे जायचे ते पाहू. |
08:17 | आपण प्रथम स्प्रेडशीटमध्ये सेलवर कसे जायचे ते पाहू. |
08:23 | माऊसचा कर्सर सेलवर क्लिक करून तुम्ही कोणत्याही सेलपर्यंत पोहचू शकता. |
08:29 | तुम्हाला ती विशिष्ट सेल हायलाईट झालेली दिसेल. |
08:32 | सेल रेफरन्सचा उपयोग करूनही विशिष्ट सेलवर जाता येते. |
08:38 | नेम बॉक्सच्या उजव्या काळ्या रंगाच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा. |
08:43 | योग्य सेलवर जाण्यास सेल रेफरन्स टाईप करून एंटर दाबा. |
08:49 | नेमबॉक्स मधे क्लिक करा. तेथील आधीचा सेल रेफरन्स डिलिट करून नवीन टाईप करा. एंटर दाबा. |
08:58 | एका सेल वरून दुस-या सेलवर कसे जायचे ते पाहू. |
09:03 | पहिली पध्दत म्हणजे कर्सरच्या सहाय्याने एका सेलवरून दुस-या सेलवर जाणे. |
09:09 | तुम्हाला तुमचे लक्ष एका सेलवरून दुस-या सेलवर न्यायचे असेल तेव्हां माउसने कर्सर हव्या त्या सेलवर नेऊन डावे बटण क्लिक करावे. |
09:18 | ह्या प्रकारे आपल्या कामाचे लक्ष नव्या सेलवर जाईल. |
09:22 | दोन सेलमध्ये जास्त अंतर असेल तेव्हा या पध्दतीचा उपयोग होतो. |
09:28 | अजून एक पध्दत म्हणजे टॅबचा उपयोग करून पुढच्या रो मधील सेल वर तुम्हाला जाता येते. |
09:35 | मागच्या रो मधील सेल वर जाण्यासाठी 'Shift + Tab' दाबा. |
09:39 | कॉलम मध्ये खालच्या सेलवर जाण्यासाठी 'Enter' दाबा. |
09:42 | कॉलम मध्ये वरच्या सेलवर जाण्यासाठी 'Shift + Enter' दाबा. |
09:46 | आपण आता शिकू या कॅल्कमध्ये कीबोर्डच्या सहाय्याने वेगवेगळ्या स्प्रेडशीटवर कसे जायचे. |
09:53 | तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या उजव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील 'Ctrl' व पेजडाऊन दाबा. |
10:00 | तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या डाव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील 'Ctrl' व पेजअप दाबा. |
10:08 | कर्सरचा उपयोग करून सुध्दा दुस-या शीटवर जाता येते. |
10:13 | Working with Sheets च्या ट्युटोरियलमध्ये आपण ह्या बद्दल अधिक माहिती घेऊ. |
10:19 | जर शीटस् ची संख्या खूप जास्त असल्यास, त्या हॉरिझाँटल स्क्रॉलबार मागे लपण्याची शक्यता असते. |
10:28 | असे असल्यास शीट टॅब्स खाली डाव्या बाजूला असलेल्या चार बटणांच्या सहाय्याने शीट टॅब्स पुढेमागे करता येतात. |
10:36 | केलेले बदल undo करू. |
10:39 | कर्सरने सेल रेंज सिलेक्ट करण्यासाठी प्रथम सेलवर क्लिक करा. |
10:45 | आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवा. |
10:48 | स्क्रीनवरील कर्सर तुम्हाला हव्या असलेल्या सेलपर्यंत नेऊन माऊसचे डावे बटण सोडून द्या. तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल हायलाईट झालेले दिसतील. |
11:00 | संलग्न असलेले Rowsकिंवा कॉलम्स सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुपमधे Row किंवा कॉलमवर क्लिक करा. |
11:09 | आता शिफ्ट बटण दाबून ठेवा. |
11:12 | ग्रुप मधील शेवटच्या कॉलम किंवा Row वर क्लिक करा. |
11:15 | संलग्न नसलेले विविध कॉलम्स आणि Rows सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुप मधील कॉलम किंवा Row वर क्लिक करा. |
11:23 | कंट्रोल बटण दाबून ठेवा आणि एकानंतर एक अशा पध्द्तीने कॉलम्स आणि Rows वर क्लिक करा. |
11:31 | विविध संलग्न शीटस् सिलेक्ट करण्यासाठी प्रथम तुम्हाला हव्या असलेल्या शीट टॅबवर क्लिक करा. |
11:39 | तुम्हाला हव्या असलेल्या शेवटच्या शीट टॅबपर्यंत कर्सर न्या. |
11:43 | शिफ्ट बटण दाबून ठेवा आणि शीट टॅबवर क्लिक करा. |
11:48 | दोन शीट मधील सर्व शीट टॅब्स पांढ-या रंगाच्या होतील जे त्या सिलेक्ट झाल्या असल्याचे दर्शवितात. |
11:56 | तुम्ही शीटमध्ये केलेले बदल सर्व सिलेक्टेड शीट मध्येही दिसतील. |
12:01 | आता संलग्न नसलेले विविध टॅब्स सिलेक्ट करण्यासाठी पहिल्या शीटच्या शीट टॅब वर क्लिक करा. |
12:08 | आता कर्सरला तिस-या शीट टॅबवर घेऊन जा. |
12:12 | आता कंट्रोल बटण दाबून ठेवून शीट टॅबवर क्लिक करा. |
12:16 | सिलेक्ट झालेल्या टॅब्सचा रंग पांढरा होईल आणि आपण शीट मध्ये केलेले बदल सर्व शीटमध्ये झालेले दिसतील. |
12:24 | आता आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. |
12:30 | आपण जे शिकलो ते थोडक्यात. |
12:33 | स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट, टेक्स्टस्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे |
12:40 | फॉरमॅट सेल्सच्या डायलॉग बॉक्सचा उपयोग कसा करावा |
12:43 | शीट मध्ये तसेच सेल्समध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जावे |
12:47 | Rows, कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत |
12:52 | COMPREHENSIVE ASSIGNMENT |
12:55 | Spreadsheet-Practice.ods उघडा |
12:58 | “Serial Number” खाली 1 ते 5 आकडे एकाखाली एक लिहा. |
13:04 | Keys चा उपयोग करून सेल्सवर जा. |
13:09 | “Serial Number” खालील सर्व आयटम सिलेक्ट करा. |
13:13 | दिनांक आणि वेळ यासाठी कॉलम Add करा. |
13:16 | “Format Cells” डायलॉग बॉक्स ऑप्शनचा उपयोग करून त्यात काही Values भरा. |
13:21 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
13:24 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
13:27 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
13:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
13:35 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
13:38 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
13:41 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
13:48 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
13:52 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
14:00 | यासंबंधी माहिती |
14:03 | पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
14:11 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
14:16 | सहभागासाठी धन्यवाद. |